जॅम आणि कोकोनट केक

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
5 Feb 2011 - 3:38 am

साहित्य :

  • मैदा - १०० ग्रॅम
    बटर - १०० ग्रॅम
    पिठिसाखर - १०० ग्रॅम
    अंडी - २
    बेकिंग पावडर - १/४ टि स्पुन
    वॅनिला ईसेन्स - २-३ थेंब
    मिक्स फ्रुट जॅम
    डेसिगेटेड कोकोनट

कृति :

१. मैदा व बेकिंग पावडर एकत्र चाळुन घ्यावे. पिठिसाखर वेगळी चाळुन घ्यावी.
२. बटर व पिठिसाखर चांगले फेटुन घ्यावे.
३. अंड्यातील बलक बटर मधे टाकुन मिक्स करावे.
४. दुसर्‍या भांड्यामधे अंड्याचे पांढरे घेउन त्यात वॅनिला ईसेन्स टाकुन Electric bitter ने फेटुन घ्यावे.
५. हे egg white बटर मधे मिक्स करावे.
६. ह्या मधे मैदा मिक्स करावा.
७. dropping constistancy साठी थोडे दुध टाकावे.
८. cup cakes च्या बेकिंग ट्रे ला थोडे बटर व मैदा लावुन greecing करुन घ्यावे.
९. Oven 180 degree celcius ला १० min preheat करुन घ्यावा.
१०. 10 min नंतर बेकिंग ट्रे oven मध्ये ठेवुन १५-२० min साठी बेक करावा.
११. केक तयार झाल्यावर बाहेर काढावेत. गार झाल्यावर त्याचा वरचा भाग कापुन plain करुन घ्यावे.
१२. Jam थोड्या गरम पाण्यात mix करुन पातळ करावा.
१३. कापलेला केक Jam मधे बुडवुन डेसिगेटेड कोकोनट मधे घोळवावा.
१४. एका plate मधे ठेवुन त्यावर थोडे cream टाकुन वर strawberry किंवा cherry ठेवुन serve करावे.

Jam and Coconut cakes

प्रतिक्रिया

आयच्या गावात! कशाला तुम्हाला मदत करायला आलो असे झाले, आता मोबदला म्हणुन केक पार्सल करा प्लीज. ;-)

Mrunalini's picture

5 Feb 2011 - 4:47 am | Mrunalini

thank u soo much

कस केल तुम्ही हे??

मी खुप try केल, पण नाही जमले.

मंडळ आपले आभारी आहे.

:)

मृणालिनी ताइ.. एकदम मस्त फोटो...

रेसीपी थोडि वेगळी वाटते.. नक्की ह्याच केक ची आहे ना ?
आमच्या कडे वेगळ्या प्रकाराने हाच केक करतात. अंडि किती घातलीत ?

गणपा's picture

5 Feb 2011 - 4:53 am | गणपा

कृती वरुन बरेचसे केक सारखेच वाटतात.. थोडा फरक वगळल्यास.
म्हणुन मुद्दाम फोटो येइस्तो वाट पहात होतो.. पण आता पश्चाताप होतोय.
हाय रे कर्मा आधीच प्रतिसाद देउन मोकळा झालो असतो तर बर झाल असत.

मंडळ आपले आभारी आहे. आता हे केक try केल्यावर, ते कसे झाले हे कळवण्यास विसरु नका.

Mrunalini's picture

5 Feb 2011 - 4:54 am | Mrunalini

@वडिल

हो... रेसीपी ह्याच केक ची आहे. ह्या मधे २ अंडी आहेत.

कॅमेरा कुठला आहे ?

फोटो खरच सुन्दर आहेत.

Mrunalini's picture

5 Feb 2011 - 5:02 am | Mrunalini

thank u

camera model: Panasonic DMC-LZ2

ह्या फोटोंचे श्रेय, माझ्या mr. ना जाते.

वडिल's picture

5 Feb 2011 - 5:19 am | वडिल

तुमचे मि खरच लकि आहेत...
आमच्या घरी कसला केक आणि कसलं काय. आइनी केलेल्या केकची आठवण झाली आणि डोळे भरुन आले.
जर जवळ पास असता तर आलो असतो केक खायला.

केक ची खरी चव आणि कन्सीस्टन्सी हि तुम्ही अंडि किती घालता त्या वर अवलंबुन असतं.
बहुतेक गणपा जास्त अंडि घालतो.

गणपा's picture

5 Feb 2011 - 5:23 am | गणपा

बहुतेक गणपा जास्त अंडि घालतो.

हा हा हा तिकडचा वचपा इथे...
असो

:) चांगले वाटले, हे वाचुन, की तुम्हाला केक आवडले. कधी europe मधे आलात, तर नक्की या, केक तयार राहतील.

प्राजु's picture

5 Feb 2011 - 8:53 am | प्राजु

बहुतेक गणपा जास्त अंडि घालतो.
ठ्ठ्यॉ!!! फुटले... जोरदार फुटले..

गणपा कधीपासून अंडी घालायला लागला? (ह. घे रे गणपा)

निवेदिता-ताई's picture

5 Feb 2011 - 9:41 pm | निवेदिता-ताई

बहुतेक गणपा जास्त अंडि घालतो.
ठ्ठ्यॉ!!! फुटले... जोरदार फुटले..

गणपा कधीपासून अंडी घालायला लागला? (ह. घे रे गणपा)

हा हा हा ................आक्रितच म्हणायच

खरच... हे केक खायला आमचा तात्या हवा होता....
तुमचे केक बघुन त्याने काय केलं असतं माहित नाहि .. असो.

मृणालिनी... केक चा फोटो एकदम टेंप्टींग आहे गं.. जबरी!!

Mrunalini's picture

5 Feb 2011 - 6:16 pm | Mrunalini

@प्राजु
खुप छान वाटले. Thank you.

कच्ची कैरी's picture

5 Feb 2011 - 9:04 am | कच्ची कैरी

आई ग फुटले,सांडले,वाहले,पिळुन निघाले काय ५ स्टार (५ *****) फटू आहे आणि केक पण !!! गूड वर्क ,कीप इट ऑन !

प्राजक्ता पवार's picture

5 Feb 2011 - 9:11 am | प्राजक्ता पवार

एकदम टेम्पटींग . लवकरच करुन बघेन :)

स्वाती दिनेश's picture

5 Feb 2011 - 12:25 pm | स्वाती दिनेश

केक छान दिसत आहे,
स्वाती

मुलूखावेगळी's picture

5 Feb 2011 - 3:25 pm | मुलूखावेगळी

वा सुंदर फोटो आनि केक पन मस्त्च

पन मला डेसिगेटेड खोबरर्याचे वावडं असल्याने करुन नाही बघु शकत :(

Mrunalini's picture

5 Feb 2011 - 6:21 pm | Mrunalini

thank you.
मी अजुन कधी coconut न वापरता केला नाहिये. पण मला वाटते, तुम्हि coconut एवजी कुठ्ल्याही biscuit चा चुरा करून त्या मधे केक घोळवला, तरी छान लागेल. हे try करुन मला पण सांगा, केक कसे झाले होते ते.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Feb 2011 - 4:48 pm | परिकथेतील राजकुमार

हा आयडी पुढे फार छळणार असे दिसते. आताच बॅन करुन टाकावे हे उत्तम.

असो...

थोडा इनो घ्यावा.

Mrunalini's picture

5 Feb 2011 - 6:24 pm | Mrunalini

@ आमचे राज्य

आहो, असे केले तर कसे होनार. अजुन बरेच पदार्थ येणार आहेत. ID बॅन केला, तर तुम्ही नेत्रसुखास मुकाल. ;)

मृणालिनी ताइ ..
तुम्हि काहि मनावर घेवु नका.. फोटो टाकत रहा.
इथे फार वात्रट लोकं आहेत.. काहि च्या काहि अर्थ काढतात.
नाइल , गणपा हे उपाशी बोके केक खायला नेहमी अतुर असतात.

धनुअमिता's picture

5 Feb 2011 - 5:21 pm | धनुअमिता

खुप छान आहे. मस्त. पण अंडी न घालता हे कसे करतात्,प्लीज सांगाल का? त्याकरीता काय साहित्य लागेल.

Mrunalini's picture

5 Feb 2011 - 6:26 pm | Mrunalini

@ धनुआमिता
thank you. मी अजुन अंडी न घालता हा केक केला नाहिये. मी पहिले try करुन बघते. मग तुम्हाला ती recipe देते.

अंडि न टाकता .. केक चा लुफ्त उठवता येत नाहि...
तुम्हि अंडि टाकुन करता तोच खरा केक.

पण वरचे फोटो नक्कीच तुम्ही केलेल्या केकचे आहे ना?
एकदम जबराट झाला आहे केक, असले केक विकत देखिल मिळत नाहीत हो.तुम्ही कधी भारतात आला तर सांगा तुम्हाला भेटायला वाट वाकडी करुन येईन.

Mrunalini's picture

5 Feb 2011 - 11:17 pm | Mrunalini

@ वेताळ

आभारी आहे. हो, हे फोटो मी केलेल्या केकचेच आहेत. भारतात आल्यावर नक्की सांगेन.

मृणालीनी ताइ
तुम्हि अमेरीकेला जिंकलत.
आमच्या लेकानी तुमच्या केक चा फोटो पाहिला आणि बर्थ डे ला असाच केक हवा म्हणतो..
नेहमी बीया काढलेले हालपीनो मागतो.. आज केक पाहुन नुसता उड्या मारतोय.

:) खुप स्वीट,,, आता मग त्याच्या b'day ला हेच केक करा.

अमेरीकेत मुलं फार जाड होत चालली आहेत ( ओबेसीटि )
म्हणुन अमेरीकन आया , मुलांना बीया काढुन हालापीनो देतात खायला.

स्वाती२'s picture

6 Feb 2011 - 2:29 am | स्वाती२

यम्म! फोटो पाहून खल्लास!

मंडळ आपल्या सगळ्यांचे आभारी आहे. :)