गाभा:
विषय जुनाच ( दादोजी कोंडदेव प्रकरण ) पण काही नवीन माहिती सहित .......
प्रा. हरी नरकेंचा चा अग्रलेख वाचा .......... खालील लिंक वर
http://www.loksatta.com/lokprabha/20110204/cover.htm
कृपया आपले मत नोंदवा .........
विषय जुनाच ( दादोजी कोंडदेव प्रकरण ) पण काही नवीन माहिती सहित .......
प्रा. हरी नरकेंचा चा अग्रलेख वाचा .......... खालील लिंक वर
http://www.loksatta.com/lokprabha/20110204/cover.htm
कृपया आपले मत नोंदवा .........
प्रतिक्रिया
4 Feb 2011 - 8:29 pm | प्रियाली
मिपावरील असले एकोळी दिशादर्शक धागे लवकर संपादित व्हावेत.
विषयही जुना आणि लोकप्रभेचा अंकही जुना. नवा अंक आला आहे त्यात अधिक रोचक आणि नवी माहिती आहे.
4 Feb 2011 - 10:01 pm | विकास
सहमत! जर चर्चाप्रस्तावकाची स्वतःची काहीच मते नसतील तर असले धागे अप्रकाशीत करणे जास्त संयुक्तीक असे वाटते.
5 Feb 2011 - 7:31 pm | श्रावण मोडक
ओ संपादक, उडवा की मग... :) हाकानाका!!
4 Feb 2011 - 8:57 pm | jaydip.kulkarni
सदरच्या लेखावर ४ फेब्रुवारी २०११ अशी तारीख आहे , त्यामुळे विषय जुना पण लेख नवा असे म्हटले होते ....... ता . ४ ते ११ फेब्रुवारी चा अंक देखील आला आहे पण त्यात कव्हर स्टोरी पोपट ची आहे ( भेसळ वाला पोपट ).......आणि त्या वर पुष्कळ चर्चा येथे झाली आहे , सदरच्या लेखात काही नवीन माहिती वाचायला मिळाली ( कदाचित माझ्यासाठी नवीन असेल ) पण सगळ्यांपर्यंत पोचावी असे वाटले म्हणून विषय सुरु केला होता ......
4 Feb 2011 - 9:20 pm | प्राजु
लेख अतिशय सुरेख आहे..! दिलेले पुरावे वादातीत आहेत..
पण... अशी सारखी सारखी गीता वाचून कधी उपयोग झाला आहे का?
4 Feb 2011 - 9:42 pm | नितिन थत्ते
मला वाटलं दादोजी गुरू होते की नव्हते यावर लेखात काही प्रकाश पडला असेल. पण लेख तर सगळा ब्रिगेडच्या राजकारणाविषयी आहे. म्हणजे नवी माहिती काहीच मिळाली नाही.
5 Feb 2011 - 12:08 am | भडकमकर मास्तर
दादोजी ब्राह्मण होते हे मलाही २००४च्या जानेवारीतच कळालं...
अवांतर : पण नरकेंनी एकदम साईड बदलून कोलांटी का मारली बुवा?
मला वाटलं काहीतरी मस्त वाचायला मिळेल, आशेने वाचायला गेलो तर पोटतिडिकीने लिहिलेला लेख...
मग काय मजा नाय बुवा...
5 Feb 2011 - 9:39 am | प्यारे१
एक ऐकिव मत
(विश्लेषण माहिती नाही.)
त्याकाळी सर्वसाधारणपणे नावामध्ये असलेला 'जी' हा ब्राह्मणांमध्ये असायचा नाही- नव्हता. तर ब्राम्हणांमध्ये नावामध्ये राव लावण्याची पद्धत होती.
उदा. बाजी'राव', सदाशिव'राव', रघुनाथ'राव', इ.इ.
याउलट संभाजी, शहाजी, शिवाजी, मालोजी, इ.इ. नावे 'मराठा' (जातीच्या) लोकांमध्ये जास्त करुन होती. तसेच, जसे कोंडे देशमुख हे शिवापूर जवळ पहायला मिळतात तसे दादो'जी' 'कोंड'देव हे नाव आहे.
अर्थात बाळा'जी' विश्वनाथ हा ब्राम्हण होता.
5 Feb 2011 - 9:42 am | आम्हाघरीधन
दादोजी कोंडदेव शाहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार हे वर्णन पूर्णत: खोटे व बनावट असून लेखकाची मखलाशी आहे. ‘दादोजी गोचिवडे’ आणि ‘दादोजी कोंडदेव’ हे वेगवेगळे. दादोजी गोचिवडे हा मलठणचा आहे तर दादोजी कोंडदेव शिवथरचा आहे. दादोजी कोंडदेव विजापूरकरांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होता. इ.स. १६३० मध्ये त्याची हवालदापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळली. त्याचे दायित्व आदिलशाही हवालदार म्हणून दादोजी कोंडदेवाकडे जाते. इ.स. १६३२ ते १६३६ अखेपर्यंत शाहाजीराजांच्या शत्रुपक्षाकडे दादोजी कोंडदेव नोकरी करीत होता. त्याने शिवाजीराजांचा कोकणात उतरण्याचा रस्ता बराच काळ रोखून धरून आदिलशाही खजिना भरण्याचे काम केले होते व त्याची शिक्षा महाराजांनीच त्याला दिली.
अॅड. अनंत दारवटक
http://www.loksatta.com/lokprabha/20110204/pratikriya.htm
5 Feb 2011 - 3:14 pm | मैत्र
आम्हा घरी धन... तुम्ही एकदाही एकाही गोष्टीचं उत्तर देत नाही. मग बळंच असल्या माहित्या का देता?
अद्वितीय छ. श्रीसंभाजी महाराज खंड -- याचे संदर्भ दारवटक यांनी दिले आहेत. हा कुठला ऐतिहासिक पुरावा आहे ? कितव्या शतकात आणि कोणी लिहिला आहे?
दादोजी कोंडदेव मलठणकर या नावावर तुम्ही गेल्या चर्चेत वाद घातला होता. आणि संदर्भ दिले होते कुठल्या तरी पाटलावर हल्ला आणि जबरदस्ती केल्याचा. आता गोचिवडे हे नवीन नाव आलं. म्हणजे मुळात दादोजी कोंडदेव अस्तित्वातच नव्हते काय?
हरी नरके यांनी इतिहासा पेक्षा ब्रिगेडच्या ढोंगी राजकारणाची सत्य बाजू मांडली आहे. त्याला ब्रिगेडचे अनुयायी किंवा सदस्य म्हणून काही उत्तर तुम्ही द्याल काय ?
लेनला प्रथम महाराष्ट्रात कोणी परवानगी दिली हे सिद्ध झालं आहे मग तुम्ही तुमच्या महासंघाचे बोलविते धनी असलेल्या साहेबांना याबद्दल विचारणा करणार का? नाहीच - कारण त्यांची जात अमराठा नाही. ब्रिगेड आणि महासंघ जो फक्त एका आणि एकाच जातीच्या प्रगती साठी राजकीय फायद्या साठी प्रयत्न करतो ते तर मुळात भारतीयच नाहीत कारण त्यांना देश काय महाराष्ट्राशी पण देणं घेणं नाही. कित्येक शतकांपूर्वीच्या रूढी परंपरां मध्ये बांधलेल्या समाजात इतर जातींना वाईट वागणूक देणार्या ब्राम्हणांपेक्षाही तुमचं वागणं जास्त नीच मनोवृत्तीचं आहे कारण आजही पुढारलेल्या समाजात फुले आंबेडकरांचं नाव घेऊन तुम्ही मराठा सोडून इतर सर्व जातींना टार्गेट करून जी जात खरं तर आता जातीय वृत्ती थोडी का होईना कमी होत चालली आहे तिला मुद्दामून अत्यंत गलिच्छ स्वार्थासाठी पुन्हा पुन्हा तेल घालून पेटवत ठेवत आहात.
असो वरील लेखातच काही contradictory विधाने आहेत --
सहा कलमी शकावली ही दादोजी कोंडदेवाचे उद्दात्तीकरण करण्यासाठी लिहिलेली असावी हे सहाव्या कलमातील नोंदीवरून लक्षात येते. याच शकावलीच्या दुसऱ्या कलमात गाढवाचा नांगर धरल्याचा उल्लेख आहे तर सहाव्या कलमात सोन्याच्या नांगराचा उल्लेख आहे, यावरून वरील म्हणण्यास बळकटी येते. विशेष असे की, या दोन्ही नोंदीची ग्राह्यता अजिबात नाही. हे पुण्यातील अभ्यासक/संशोधकांना चांगले माहिती आहे.
हानुसार आपल्याकडे आलेल्या शाहाजीराजांस आदिलशाहाने पुणे प्रांताची सरंजामी देऊन पाठविले कर्नाटकात, विजापूरच्याही दक्षिणेकडे आणि त्याने पुणे प्रांताचा कारभार सोपविला आदिलशाहाचा विश्वासू माणूस दादोजी कोंडदेवाकडे! (पादशाहानामा (IB १५०); Shivaji and his Times, 4th edn. पृ. १८१९; श्रीशिछ-त्र्यंशंशे. पृ. ३७१; श्रीशिछ सच - मराचिब प्रकरण २.२; सहा कलमी शकावली,). यावरूनही कोंडदेव कोणासाठी काम करीत होता व त्याची निष्ठा कोणावर होती हे स्पष्ट होते.
जी शकावली लेखकाच्या मते मुद्दामून खोटी आणी दादोजीला मोठे करण्यासाठी लिहिली आहे ... त्याचाच संदर्भ परत विरुद्ध बाजूने कसा देता येतो?
हे म्हणजे गोडांबे / कोकाटे वगैरे काही ठिकाणी पुरंदरेंच्या पुस्तकातले संदर्भ देतात खरे म्हणून तसे झाले.
इतिहास काहीही असो - कोकाटेंचे संशोधन खरे असो किंवा बलकवडे यांचे. सामान्य मराठी माणसासाठी हेच खरं की यांचे संशोधन जास्त चांगलं किंवा तपशीलवार वगैरे. त्याचा महाराष्ट्रात फूट पाडण्यासाठि आणि केवळ राजकीय स्वार्थासाठी सवंग वापर करून काही जातींना टार्गेट करणार्या लोकांनी महाराजांचे नाव सुद्धा घेऊ नये. कारण अष्टप्रधान मंडळात ब्राम्हणांना घेणारे आणि औरंगजेबाशी लढणारे शिवाजी महाराज सुद्धा चुकीचेच होते. ही मंडळी जास्त बरोबर आहेत...
5 Feb 2011 - 4:58 pm | जयंत कुलकर्णी
१ यावेळी शहाजी मुघलांच्या नोकरीत होता. तेव्हा हा किल्ला शहाजीच्या जहागिरीत होता असेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. त्या काळी प्रमूख सरदारानी नोकरी बदलली की त्याचा मुलूख आपोआप त्या नवीन मालकाच्या मुलखात सामील व्हायचा. व त्यातला सगळा कर त्या नवीन मालकाला मिळे. हे दोन प्रकारे शक्य होत असे. एक म्हणजे त्या सरदाराने नोकरी बदलली तर किंवा त्याचा पराभव झाला आणि त्या नवीन मालकाने त्याला सरदारकी देऊ केली तर. पुर्वी छोट्या छोट्या सरदारांकदे सुध्दा दादाजी कोंडदेवांसारखी माणसे असायची. दादाजी कोंडदेव अदिलशाहच्या नोकरीत अप्रत्यक्षरित्या होता कारण शहाजी हा अदिलशहाचा नोकर होता आणि दादाजी शहाजीचा. असेच घडून १६३६ च्या शेवटास शहाजी याचा माहूली येथे पराभव होऊन त्याला अदिलशहाच्या नोकरीत जावे लागले. त्यामुळे त्याच्या मुलखातील त्याची सर्व माणसे ही अदिलशहाची अप्रत्यक्ष नोकरीत गेली.
१६४१ पर्यंत म्हणजे शिवाजी १२ वर्षाचा असेपर्यंत ते बेंगलोरास होते. या बाबतीत सभासद बखरीत खालील उतारा आहे.
“शाहाजीराजे यांसी दौलतेमधे पुणे परगाणा होता. तेथे दादाजी कोंडदेव शाहाणा, चौकस ठेविला होता. तो बेंगरुळास महारांजास भेटीस गेला. त्याबरोबर रा. शिवाजीराजे व जिजाबाई आऊ ऐशी गेली. ते समयी राजियांस वर्षे बारा होती. बराबर शामराव नीळकंठ म्ह्णून पेशवे करून दिले व बाळ्कृष्णपंत, नारोपंत दिक्षितांचे चुलत भाऊ, मजमूदार दिले व सोनोपंत डबीर व रघुनाथ बल्लाळ सबनीस ऐसे देऊन दादाजीपंतास व राजे यांसी पुण्यास रवाना केले”. ( काय हे आमच्या राजास या शहाजीने कसायांच्या हातात की हो दिले. कुठे फेडाल हे पाप ....)
या वरून हे कळते की त्या वेळेस दादोजी हे शहाजीच्या पदरी होते व शहाजी अदिलशहाच्या.
२ १६३६ साली शहाजी राजे अदिलशहाचे सरदार बनले नाही तर त्यांचा माहूली येथे अदिलशहाने पराभव केला व त्यांच्या आश्रयास असलेल्या निजामशहास ग्वाल्हेरला तुरुंगात टाकले. त्यांनी काही जॉब बदलला नाही.
आता दादोजींच्या तथाकथित आत्महत्येबद्दल. हा उल्लेख जदूनाथ सरकार यांच्या एका लेखात आली आहे ती कशी आली ते बघुयात. एक्याण्णव कलमी बखरीच्या एका फार्सी अनुवादातून ही नोंद सरकारांनी उचलली आहे. याच बखरीच्या बाकीच्या भाषांतरात याचा उल्लेख नाही. ही बखरच मुळी अत्यंत अविश्वसनीय आहे. कारण यात असाही उल्लेख आहे की दादोजींच्या मृत्यीनंतर शिवाजीने शहाजीराजांची सर्व मालमत्ता व खजीना जप्त केला. परत हा जो उल्लेख (आत्महत्येचा) २४ व्या कलमात आहे असे म्हटले गेले ते कलमच मुळ बखरीत नाही. ( पारसनीस यांची प्रत). दादोजींच्या मृत्यूचा उल्लेख असलेली तीन अस्सल पत्रे खुद्द शिवाजी महाराजांनीच लिहीली आहेत त्यात काय लिहीले आहे ते बघुयात.
१ पहिले पत्र १५ ऑक्टोबर १६४७चे आहे. ते त्यांनी पुणे परगण्यातील कर्हेलपठार तरफेच्या कारकुनास पाठवले आहे. त्यात त्यांनी पुर्वी जे इनाम चालू होते तेच चालू ठेवण्यास सांगितले आहे. त्यात असा उल्लेख आहे “ सालमजकुराकारणे मशहुरल हजरत दादाजी कोंडदेऊ सुभेदार यासी देवाज्ञा झाली म्हणऊनू”
मशहूर : प्रसिध्द, हजरत : या शब्दाचा अर्थ माधव ज्युलियन यांनी असा दिला आहे “ राजास, पैंगमबरास,अगर श्रेष्ठ व वंद्य पुरूषास या शब्दाने स्वामी या अर्थाने संबोधितात. या वरून शिवाजीमहाराजांच्या मनात या माणसाबद्दल काय भावना होती हे समजते.
२ दुसरे पत्र २४ मे १६४७ च्या आसपासचे आहे ते त्यांनी लिहीले आहे पुण्याच्या देशमुखांना पाठवलेले आहे त्यात सुध्दा त्यांनी एका मशिदीचे इनाम तसेच चालू ठेवायला सांगितले आहे. त्यात पण त्यांनी दादोजींचा असाच आदरपुर्वक उल्लेख केलेला आहे.
३ तिसरे महादजीभटाच्या तक्रारी विषयी पुण्याच्या देशमुखांना लिहीतांना त्यांनी म्हटले आहे “हाली मशहूरल हजरत दादाजी कोंडदेऊ सुभेदार यास देवाज्ञा जाली म्हणोन” इ....
जर शिवाजी महाराजांच्या उद्योगाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असती तर त्यांचा उल्लेख असा करायची शिवाजी महाराजांना गरज नव्हती हे मला वाटते मान्य असावे.
कृपया जेधे शकावलीत व तारीख-इ-शिवाजी यात हे कोठे लिहीले आहे हे सांगावे.
तारीख-इ-शिवाजी म्हणजे मुसलमानांनी केलेले एक्याण्णव कलमी बखरीचे फार्सी भाषांतर. त्यात अनेक त्यांच्या फायद्याच्या गोष्टी घुसडलेल्या ! ज्याचे केले त्याचे खरे नाव आहे “ तफ्सील अहवाल अरूज व खुरज राजाहाये व सरदारान दखन” याचा अर्थ दखनच्या राजांचा व सरदारांच्या उत्कर्षाचा व विद्रोहाचा इतिहास” हे सगळे मुळीच विश्वासार्ह नाही. यदुनाथ सरकारांना मराठी, मोडी, अजिबात येते नव्हते हे जगजाहीर आहे. त्यांनी लिहीले ते सगळे ग्रॅंट डफ आणि फार्सी साधनांवरून. त्यावर किती विश्वास ठेवायचा हाही प्रश्न आहे. हे म्हणजे नेहरुंनी शिवाजीला चोर आणि लुटेरा म्हटले त्यावर विश्वास ठेवण्यासारखे झाले.
खरे तर ते १६४१ पर्यंत बेगलोरला होते. शिवभारतात शिवाजी बेंगलोरास सात वर्षाचा झाला असा उल्लेख आहे. आता हे गोमाजी नाईक पानसंबळ कोण होते हे बघूयात.
जिजाबाईंचे लग्न जेव्हा शहाजी महाराजांशी झाले तेव्हा जाधवांनी एका नोकर माणसास जिजाऊंबरोबर दिले. त्याचे नाव होते “ गोमाजी नाईक पानसंबळ जामदार” याचा उल्लेख महाराजांनी अफजलखानाच्या स्वारीत बैठकीच्या वेळी जे हजर होते ( सल्लामसलतीची) त्या लोकांच्यात आहे. जामादार/जामदार म्हणजे कपडे/दागदागिने संभाळणारा. हा एक गडी जाधवांनी जिजाऊंबरोबर दिला होता. जाधवांचे आणि भोसल्यांचे संबंध पहाता शिवाजीला शिकवण्यासाठी जाधव एखादा माणूस देतील आणि भोसले तो त्या कामासाठी स्विकारतील हे असंभवनीय. शिवाय एक पत्रात शिवाजी महाराजांनी या नाईकांना समज दिली असाही उल्लेख आहे तो असा.
महाराजांनी हे पत्र मावळच्या देशाअधिकार्याठस पाठवले आहे.
पाषाण, तर्फ कर्यात मावल, येथील पाटीलकी गोविंदराव शितोळे, देशमूख, परगणा पुणे यांची आहे. वाडी करंदी येथील कुणबी रणपिसे हा आपल्याला निराळा मजरा करून दिला आहे म्हणून भांडण करतो. तुम्ही त्याच्या सांगण्यावरून शितोळ्यांशी भांडण करता असे त्यांनी आमच्याकडे येऊन विदीत केले आहे. तरी नसती पाटीलकीची नवी भांडणे करावयाची तुला काय गरज आहे ? आम्ही लहानपणापासून या मुलखात आहोत. मिरासदार कोण व गैरमिरासदार कोण हे आम्ही चांगलेच जाणतो आणि माणसाचे माणूस ओळखतो. तू नवा सुभा करायला आला आहेस. तुला हे काही ठाऊक नाही आणि उगाच एकाच्या सांगण्यावरून दुसर्याशी भांडण करतोस. हे तुला करायला कोणी सांगितले आहे ? यापुढे नसती मिरासदारांची नवी भांडणे करशील तर आपले केलेले पावशील हे समजून शितोळ्यांशी भांडणे न करावीत.
पूर्वी मातुश्री आऊसाहेबांनी करंदी हा वेगळा मजरा करायला सांगितले होते, त्यावेळी आम्ही ते मानले नाही. त्यानंतर गोमाजी नाईक पानसंबळ यांनी शितोळ्यांशी तंटा केला. ते वर्तमान आम्हाला समजल्यावर आम्ही त्यांस ताकीद केली. आत्तापर्यंत सुरळीत चालू आहे. त्याप्रमाणे आत्ताही शितोळ्यांची पाटीलकी सुरळीत चालवणे. वाडी करंदीचा मजरा केलेला नाही. मातुश्री आऊसाहेबांचे अगर दुसर्या कुणाचे पत्र तंट्यामुळे त्याने ( रणपिशाने) नेले असेल त्यावर जाऊ नये. शितोळ्यांशी काही भांडण केलेस तर आम्हाला बोल नाही. ताकिद होईल. जाणिजे.”
या पत्रात या गोमाजींना ताकीद दिली असा स्पष्ट उल्लेख आहे. गुरूजींना ताकीद देण्याइतके महाराज उध्दट असावेत किंवा हा त्यांचा गुरू नसावा. दुसर्याची शक्यता जास्त वाटते. तसेच हेही लक्षात घेतले पाहिजे की महाराजांनी साक्षात स्वत:च्या आईचे म्हणणे ऐकले नाही व न्याय दिला. त्यात त्यांच्या माहेरचा माणसाने शितोळ्यांना लुबाडण्याचा प्रयत्न केला असताना सुध्दा. पण इतिहासात अशा अनेक नोंदी (जवळ जवळ सगळ्या निकालाबाबत) आहेत की महाराजांनी स्पष्टच सांगितले आहे की दादोजींनी दिलेला निर्णयच पुढे चालवावा.
१ १६२९ साली लखूजी जाधवाचा विजापूर दरबारात खून झाल्यावर शहाजी महाराज पुण्यात येऊन राहिले. त्यानंतर त्यांनी हा मुकासा कधीही हातचा जाऊ दिला नाही. त्यांना इकडून तिकडे नोकरदारी केली पण हा मुकासा सोडला नाही. त्यांच्या अनेक पत्रात दादाजींचा उल्लेख मायन्यात असा केलेला आढळतो “राजश्री दादाजी कोनदेऊ शुभेदार किले कोंडाणा व परगणा पुणा व माहालानिहाये” दादोजी हा शहाजीने नेमलेला एका किल्ल्याचा सुभेदार होता. अदिलशाहीत व मुघलांच्या दरबारात सुभेदार हे पद फार मोठे होते व सहसा त्यांच्या नातेवाईकातच दिले जायचे. खुद्द शहाजी महाराज सुध्दा कधी सुभेदार झाले असावेत की नाही ही शंकाच आहे. कारण त्यांचा तसा उल्लेख कुठेही नाही. पण ज्या प्रमाणे इंग्लीश सिनेमाची कॉपी हिंदीमधे व हिंदीची मराठीमधे त्या प्रमाणे छोट्या छोट्या परगण्यातसुध्दा पेशवे, सबनीस, सुभेदार असायचे..... अर्थात दादोजींच्या परगण्यातून शहाजीला अदिलशहाला कर द्यावा लागत असणारच तो दादोंजी मार्फतच देत असणार. तो जर अदिलशाचा सुभेदार असता तर त्याला शहाजीच्या आज्ञा पाळायची काही गरज नव्हती. पण तो शहाजीच्या, जिजाऊंच्या व शिवाजीच्या आज्ञा पाळताना दिसतोय. तो नि:संशय शहाजीचाचा सरदार/नोकर होता. दुसरे म्हणजे सर्व कागदपत्रात दादोजींचा उल्लेख हा शहाजींच्या वतनासंबंधीतच येतो. तसे नसते तर इतरही परगण्याबाबत उल्लेख सापडले असते. पहिल्यापासून दादोजी हे शहाजीचे व शिवाजीचे एकनिष्ठ बुध्दिमान सेवक होते.
शहाजीने स्वराजस्थापनेचा प्रयत्न केला हे कुठल्या जगात जाहीर आहे हे कृपया सांगावे. त्याला बिचार्याला यासाठी वेळच नव्हता. तुमच्या घरातली वरीष्ठ मंडळी जेव्हा कौतुकाने तुमच्याबद्दल “ हा सारखा बंदूक बंदूक खेळत असतो” अशी तक्रार करतात तेव्हा त्यांना तुम्ही पुढे अतिरेकी देशद्रोही होणार असे म्हणायचे असते का ?
इतिहासात अनेक घटनांची तर्कशुध्द संग्ती लावायची असते. ती करताना प्रत्येक गोष्टीचा काटेकोर पुरावा असतोच असे नाही. नाहीतर फालतू व चक्रम प्रश्नही विचारता येतात.
हे काही सापडले नाही. कृपया लेख स्कॅन करून द्या, म्हणजे आभ्यास करता येईल. पण दादोजींच्या हाताचा एक उल्लेख एका दंतकथेत आहे. तो असा. ती त्या एक्याण्णव कलमी बखरीतील आहे म्हणून दंतकथा.
“दादोजीने शिवापूर येथे शहाजीच्या नावाने एक आमराई लावली होती. त्यातला एक आंबा त्याने तोडला. ही आपली चूक असे समजून तो आपला हात कापायला निघाला. लोकांनी त्याला त्यापासून प्रवृत्त केले. त्याची आठ्वण म्हणून त्याने त्याच्या अंगरख्याची एक बाही लांडी केली. ही हकिकत समजल्यावर शहाजीने समजूत काढण्यासाठी त्याला मानाची वस्त्रे पाठवली व त्यानंतर दादोजीने लांडी बाही वापरायचे सोडून दिले.” इ.....
शाहू महाराजांनी पण असा उल्लेख केलेला आढळतो “ मागे दादाजी कोंडदेव लहानसाच ब्राह्मण झाला परंतू त्याने केलेले निवाडे औंरंगजेब बादशहास वंद्य झाहले” हे उदगार शाहू महाराजांनी काढले असे पत्र बाजीरावाचा शाहूमहाराजांच्या दरबारातील प्रतिनिधी पुरंदरे याने बाजीरावास पाठवले आहे.....
अजून काय लिहावे .........................
या पार्श्वभुमीवर संभाजी ब्रिगेड्चे प्रवक्ते यांनी टि.व्ही.वर एका मुलाखतीत "एक उल्लेख सोडला तर हे पुस्तक उत्कृष्ट आहे" असा उदगार काढले त्याला काय म्हणावे ? आणि यासाठी इतिहास बदलायला निघालेल्यांना कुठली विकृती आहे.... हे आपल्याला समजले असेलच. या विकृतीचे नाव आहे xxर.....
महाराज आत्ता असते तर त्यांनी दादोजींच्या बदनामी केल्याच्या गुन्ह्यासाठी लेन आणि ब्रिगेडच्या असल्या शूरविरांचा चौरंग करायची शिक्षा दिली असती हे निश्चित......
5 Feb 2011 - 9:52 am | जोशी 'ले'
बिग्रेड वाले म्हणजे इतिहास जातीने तपासणारे.... मला तर दादोजी कोंडदेवांचे आडनाव कुलकर्णी असल्याचे खूप नंतर कळले
हे पहा
http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=7183644
5 Feb 2011 - 5:28 pm | सुरताल
आताशा स्वत:ला सुधारणावादी, समाजसुधारक, विद्रोही, परिवर्तनवादी, निधर्मी, चळवळवादी, बहुजनवादी अशाच नाना प्रकारची विषेशणे स्वत:ला लावुन घेणारी बरीच मंडळी आपल्या आजुबाजुला आढळतील. याचे कारण म्हणजे सध्या वारेच यांच्या विचारांच्या दिशेने वाहत आहे यांना हवी असलेली परिस्थिती सध्या महाराष्ट्रात चालू आहे. “आरोप” हे या लोकांचे क्रमांक एक चे अस्त्र आहे. याच अस्त्राच्या आधारावर हिंदु धर्मावर, संस्कृतीवर, शिवचरित्रावर, वेद-वेदांत, देश, संत-महंत, महापुरुष यांच्यावर अनेक आरोप ही मंडळी करायला मागेपुढे पाहत नाहीत. अगदी यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर सावरकर हे स्वातंत्र्यविर नसुन 'संडासविर' आहेत. हेडगेवार, टिळक ही देशद्रोही पिलावळे यांच्या दृष्टीने ठरतात, तर झांसीची राणी लक्ष्मीबाई या इंग्रजांच्या बटीक ठरता. ही झाली पहीली बाजू ज्यांनी या देशाची आजन्म सेवा केली ते यांच्या दृष्टीने देशद्रोही वगैरे ठरतात. दुसरी बाजू म्हणजे हे लोक कोणाला चांगले म्हणतात ?? तर ...औरंगजेबाला स्त्रि-दाक्षीण्यवादी असे विषेशण या लोकांनी लावले आहे. हिंदु-मुस्लिम दंगलीमध्ये हे नि:संकोचपणे मुसलमानांची बाजू उचलून धरतात. अफजलखान वधाचे चित्र लावण्यास विरोध करण्यामध्ये हेच लोक आग्रभागी असतात. म्हणजे सावरकर, हेडगेवार, राणि लक्ष्मिबाई, समर्थ रामदास, टिळक हे देशद्रोही आणि औरंगजेब, अफजलखान हे देशप्रेमी .. साधारण अशाप्रकारचे एक अभद्र समिकरण या स्वयंघोषीत समाजसुधारकांनी आज मांडलेले आहे. खरे तर यांच्या या समिकरणाला किती लोकांचा पाठिंबा आहे हा एक संशोधनाचा विषय आहे.
या लोकांकडे प्रसिद्धी हे एक हत्यार आहे . आमुक-आमुक या एखाद्या सभेला पच-पन्नास लोक उपस्थित असले की पाच-पन्नास चे पाचशे-पन्नास करुन आपल्या समविचारी प्रसिद्धी माध्यमामध्ये याची बातमी द्यायची . हा एक रोजचा भातुकलीचा खेळ असावा याप्रमाणे चालत आहे. या विद्रोही वादी लोकांच्या काही संघटना आहेत व या संघटनांवर कॉंग्रेस मधील काही 'बड्या' नेत्यांचा वरदहस्त आहे. अगदी लहानातल्या लहान सभेसाठी या नेत्यांकडून यांना आर्थिक ओघ येत असतो तसेच उपस्थितांची संख्या जास्त दिसण्यासाठी हे 'बडे' नेते आपल्या कार्यकर्त्यांना या संघटनांच्या कार्यक्रमांना पाठवत असतात व याचा मोबदला म्हणुन निवडणुकी वेळी या विद्रोही संघटनांचे कार्यकर्ते आपल्या 'बड्या' नेत्याचा प्रचार करण्याच दंग असतात. अर्थात पैसे, भ्रष्टाचार, लाच-खोरी अशाप्रकारच्या लोकशाहीला काळीमा फासणारे प्रकार यावेळी सर्रास केले जातात.
हिंदु समाजामजामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मोठी जन-जागृती होत आहे. मग त्याला कारण मिरज दंगली सारखी प्रकरणे असोत, धुळे दंगली सारखी प्रकरणे असोत, काश्मिर मध्ये हिंदुंचे हनन , इस्लामी दहशतवाद , आणि ना जाणो किती अशा अनेक प्रकरणांमुळे हिंदु समाज हळू-हळू जागृत होत आहे. बेगडी धर्मनिरपेक्षतेला लात मारुन ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करनारे हिंदु तरुण तयार होऊ लागले आहेत. हेच हिंदुत्व अशाचप्रकारे वाढू लागले तर आपल्या उद्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल असे या देशातील काही अहिंदुंना वाटू लागले. वेग-वेगळ्या माध्यमांतून अगदी प्रतिकूल परिस्थितिमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असलेली हिंदुजागृती पाहून काही लोकांची झोप उडाली आणि याच कारणामुळे वामन मेश्राम (नवबौद्ध), जैमिनी कडू (ख्रिश्चन), व रफिक कुरेश(मुसलमान) या त्रिकुटाने मिळून हिंदुधर्म, हिंदु संस्कृती, देशप्रेमी संत-महंत-महापुरुष, हिंदुधर्मग्रंथ तसेच हिंदुसमाज यांच्या विरोधात 'बामसेफ' ही संघटना स्थापण केली, सध्याची मराठा सेवा संघ या संघटनेमागील बाबसेफ ही सुत्रधार संघटना आहे. ती दलित संघटना असल्यामुळे तिला मराठा संघाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता नव्हती म्हणुन सुरवातीला 'मराठा महासंघ' या मसाठा संघटनेचा वापर करून घेण्याचे प्रयत्न करुन घेण्यात आले. परंतु या प्रयत्नांना पुरेसे यश मिळत नसल्याचे दिसून आल्यावर या कटाच्या सुत्रधारांनी मराठा सेवा संघ या नावची वेगळी संघटना स्थापन केली आणि कळसूत्रीप्रमाणे पुरुशोत्तम खेडेकर यांस अध्यक्ष केले. या संघटनांच्या स्थापणे संबंधी मराठा विकास परिषदेने ऑगस्ट २००९ रोजी प्रकाशीत केलेल्या 'शिवरायांचा देशधर्म, पुरुषोत्तमांचा द्वेशधर्म' या पुस्तिकेमध्ये श्री अशोक राणे यांचा एक परिच्छेद उल्लेखनिय आहे , तो असा.. “अयोध्या आंदोलनामुळे देशामध्ये हिंदुत्व पुनर्जागरणाला सुरवात झाली आणि त्याचा प्रभाव समाजीवनाच्या विविध क्षेत्रावर जाणवून प्रचंड हिंदुत्व जागरण झाले. त्यामुळे हिंदुत्वविरोधी कळपामध्ये खळबळ माजली व हिंदु समाजामध्ये जातीय संघर्ष उभा करणार्या चळवळी देशामध्ये सक्रिय झाल्या किंवा हिंदू समाजामध्ये जातीय संघर्ष निर्माण करणार्या संघटनांना खतपाणी घालण्याचे काम सुरु झाले. वर्ष १९९९ ते २००० या काळात हिंदुत्व हिंदुत्व जागरणामुळे गुजरातमधील डांग मध्यप्रदेशातील झाबुआ, ओरिसातील आनंदपूर येथील कमजोर हिंदुंची ख्रिश्चन मिशनरिंनी बाटवाबाटवी केली होती. तो ख्रिश्चन झालेला हिंदु समाज घरवापसी करुन हिंदु धर्मात पुनप्रवेश करु लागला. त्यामुळे ख्रिश्चन मिशनरी जगतामध्ये खळबळ निर्माण झाली व हिंदु समाजातील कमजोर वर्गाचे धर्मांतर करण्याऐवजी हिंदू समाजामध्ये केवळ जातीय संघर्ष निर्माण करण्याचे षडयंत्र रचले गेले. त्याचवेळेस सन २००१ मध्ये डरबन येथे विश्वसंमेलन झाले. त्यामध्ये w.c.c संघटनेच्या (world church council) नेतृत्वाखाली भारतीय दलित नेत्यांनी हजेरी सुद्धा लावली. त्यामुळे विद्रोही साहीत्य संमेलनाला महत्व आले. आणि त्यामधून वहारू सोनावणे यांनी 'आदिवासी हिंदु नाहीत' अशी भूमिका जाहीर केली. दया पवार, लक्ष्मण माने यांना विदेशी पुरस्कार जाहीर झाले. महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघाने 'मराठा जोडो' यात्रा काढून हिंदु धर्म सोडण्याचे आवाहन मराठा समाजाला केले.”
या संघटनांच्या कार्यपद्धतिविषयी संत श्री बाबुराव महाराज वाघ आपल्या 'हिंदुजागृती' या पुस्तकात म्हणतात , ''.....नंतर खोडेकर मराठा सेवा संघाचा अध्यक्ष होताच माने मराठा 'समाजाचे संघटन' या गोंडस नावाखाली सर्व मराठा समाजास ब्राम्हणद्वेष, हिंदद्वेष, हिंदूधर्मद्वेष, हिंदूधर्म ग्रंथांचा द्वेष, वारकरी सांप्रदायीक संतांचा द्वेष, वारकर्यांचा द्वेष, विठ्ठलाचा द्वेष इत्यादी शिकवण देण्यास आरंभ केला. म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदु, हिंदूधर्म, हिंदूस्थान यांच्या रक्षणाकरीता अहोरात्र ३६ वर्षे संग्राम केला त्या हिंदुधर्माच्या विरोधात बामसेफ प्रणित मराठा सेवा संघ आणि त्याच्या उपसंघटना यांनी काम करणे हा शिवाजी महाराजांचा घोर अपमाण होय.''
याचप्रमाणे प्राचार्य श्री अशोक बुद्धीवंत आपल्या एका लेखामध्ये मराठ्यांना आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा काढून आपली पोळी भाजू पाहणार्या तथाकथीत स्वयंघोषीत समाजसुधारकांबद्दल म्हणतात, ''ज्या नेत्यांच्या घरात अनेक टर्म आमदारक्या आहेत, जे निवडणुकांवर कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक करतात, ज्यांच्याकडे आजच्या काळातही शेकडो एकर जमिनी आहेत, ज्यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी पडलेल्या आहेत, ज्यांच्या संघटनांमध्ये हिशोब न दिल्यामुळे फुटी पडलेल्या आहेत ती मंडळी जेव्हा गरिबीबद्दल आणि गरिबांबद्दल खोटय़ा कळवळ्याने लिहितात तेव्हा ते अपराधभावातून आलेले लेखन आहे असेच म्हणावे लागते.'' तर श्री सुनिल चिंचोळकर आपल्या समर्थ चरित्र : आक्षेप व खंडन या पुस्तकात एके ठिकाणी म्हणतात, ''शिव्या देण्यासाठी अभ्यास करावा लागत नाही मात्र रचनात्मक लिहिण्यासाठी प्रतिभा व अभ्यास लागते या दोन्ही गोष्टिंचा या मंडळीकडॆ दुष्काळ.
मुळ लेख http://kaustubhfrmamb.blogspot.com/