एशियन पदार्थ बाकी युरोपिअन किंवा अमेरिकन पदार्थांपेक्षा जास्त आरोग्यपूर्ण असतात. तसाच एक पदार्थ म्हणजे घरी केलेल्या stir fried noodles/vegetables. घरी केलेल्या हे महत्वा चे कारण आपल्या कडे सर्रास मिळणारं ठेल्या वरचं 'इंडिअन चायनीज' हे बर्यापैकी तेलकट असतं. पण हेच जर आपण घरी केलं तर एक healthy पदार्थ बनू शकतो.
१ पाकीट हाक्का नूडल्स (बोईल करून घेतलेल्या)
१ कांदा, लांबट बारीक चिरलेला (कांद्याची पात पण वापरू शकता)
२ शिमला मिरची, बारीक चिरलेली
२ कप बारीक चिरलेला कोबी
२ चमचे आलं लसूण पेस्ट
२ हिरव्या मिरच्या, लांबट चिरलेल्या
१ चमचा तेल
१ मोठा चमचा सॉय सॉस
चवीनुसार मीठ
२ अंडी (एग नूडल्स करायच्या असतील तर. तसेच चिकन चे बारीक बोनलेस तुकडे किंवा कोलंबी पण घालू शकता)
कृती:
नूडल्स उकळत असताना एकी कडे भाज्या चिरून घ्या म्हणजे वेळ वाचतो. नूडल्स मिठाच्या पाण्यात उकळा शिजे पर्यंत आणि मग एका गाळण्यात किंवा रोळीत गाळून त्यावर थंड गार पाणी ओता म्हणजे त्या चिकटणार नाहीत आणि मोकळ्या होतील.
एका मोठ्या कढई मध्ये, मोठ्या आचेवर तेल गरम करा. त्यात पटापट आल लसूण पेस्ट, कांदा घाला आणि भरभर परता. मग कोबी आणि शिमला मिर्च घालून परता. जर एग नूडल्स करायच्या असतील तर gas बारीक करून सर्व भाज्यांना कढई च्या एका बाजूला सारा आणि रिकाम्या जागी दोन अंडी फोडून त्याची नुसतीच भुर्जी करा. अंड शिजलं कि बाकी भाज्यांबरोबर नित कालवा. चिकन कोलंबी घालायची असेल तर आता घालून ते शिजेस्तोवर परता. आता ह्यात नूडल्स, मीठ, सोया सॉस घालून मोठ्या आचेवर २ मि परता आणि गरमागरम सर्व्ह करा.
प्रतिक्रिया
4 Feb 2011 - 1:56 pm | स्वैर परी
तु केलेल्या या नुडल्स चा फोटो पाहुन अंमळ बर्र्र्र्र्र्र्र्र्र्र वाटल बघ!
कारण २ मिनिटापुर्वीच कँटीन मध्ये बोर्ड वाचुन "वेज हाक्का नुडल्स" ची ऑर्डर दिली. तर त्याने मला अक्षरशः कांदेपोहे मध्ये पोह्यांऐवजी बॉईल्ड हाक्का नुडल्स टाकलेला पदार्थ दिला! :(
4 Feb 2011 - 1:59 pm | कवितानागेश
एक छोटी टिपः चायनीज पदार्थ करताना तिळाचे तेल वापरायचे. मस्त लागते.
शिवाय कोलेस्टेरॉलची भिती नाही.
4 Feb 2011 - 2:08 pm | कच्ची कैरी
एकदम फॅन्टाबुलस हं!!!!!कधीतरी खायलाही बोलव .
4 Feb 2011 - 2:15 pm | गणपा
न्युडलस् मस्त दिसतायत.
बरी आठवण केलीस बरेच दिवसात चायनीज् केल नाही. :)
न्युडलस् न चिकटण्यासाठी अजुन एक उपाय.
न्युडलस् शिजवतानाच त्यात १ लहान चमचा तेल टाकावे किंवा उकडुन झाल्यावर पाणी काढुन टाकल्यावर त्यात १ लहान चमचा तेल टाकावे.. गार पाणी टाकुनही कधी कधी आतल्या उष्णतेमुळे न्युडलस् चिकटतात.
4 Feb 2011 - 3:48 pm | खादाड अमिता
न्युडलस् शिजवतानाच त्यात १ लहान चमचा तेल टाकावे किंवा उकडुन झाल्यावर पाणी काढुन टाकल्यावर त्यात १ लहान चमचा तेल टाकावे.
4 Feb 2011 - 3:39 pm | प्राजक्ता पवार
मस्तंच.
4 Feb 2011 - 7:33 pm | प्राजु
मस्त फोटो.
जबरीच.