"महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने...."

वाचक's picture
वाचक in काथ्याकूट
2 May 2008 - 6:37 am
गाभा: 

नमस्कार

सर्वात प्रथम सर्वांना "महाराष्ट्र् दिनाच्या' शुभेच्छा !

चर्चेस कारण असे की 'लोकप्रभा' मधला हा लेख --- "महाराष्ट्र धर्म"

अतिशय संतुलित लेख वाटला. वास्तविक श्री. राजू परुळेकर हे तसे पाहीले तर 'सेना' गटातले पण तरी सुद्धा त्यानी 'शिवसेनेच्या' पदरात तिच्या चुकांचे माप घातले आहे.

सध्याच्या 'राज ठाकरे' कृत आंदोलानामुळे सर्व सामान्यांना नक्की कुठली बाजू घ्यावी हे कळेनासे झाले आहे. एकीकडे 'उत्तर भारतीय दादागिरी हटवा' हे पटते पण त्याच बरोबर 'ती हटवण्याचा' मार्ग तितकासा पटत नाही. आपण स्वत: काही तरी करायल हवे असे जाणवत असून सुध्धा 'ही चळवळ' वैचारिक मार्गाने जात नसल्यामुळे प्रत्यक्षात काहीच सहभाग देता येत नाही. त्यातच महाराष्ट्राच्या 'सर्वांगिण खच्चीकरणासाठी' ह्या उत्तर भारतीयांनी केलेले संघटित प्रयत्न वाचले की राग आल्या शिवाय रहात नाही.

महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृति, भाषा टिकवायची असेल तर काही तरी केले पाहिजे असे वाटते पण नक्की काय ते कळत नाही....

तुम्हाला काय वाटते ?

कृपया आपली मते मांडावी ही विनंति !