हि रेसिपी स्पेशल आहे. कारण ह्यात पिझ्झा बेस पण घरी आपल्या रोजच्या वापरातल्या गव्हाच्या पिठातून (होल व्हीट फ्लॉर) बनवला आहे.
पिझ्झा बेस साठी :
३ कप गव्हाचे पीठ
१ १/२ मोठे चमचे ड्राय यीस्ट
१ चमचा मीठ
१ चमचा साखर
१ कप कोमट पाणी
१ चमचा तेल
- यीस्ट आणि साखर कोमट पाण्यात विरघळवून त्याला १५ - २० मि बाजूला ठेवा थोडा फेस येईपर्यंत.
- गव्हाच्या पिठात मीठ, तेल आणि यीस्ट चे मिश्रण घालून त्याची सैल कणिक भिजवा. वाटल्यास थोडं अजून पाणी घाला.
- आता ह्या कणकेला एका मोठ्या भांड्यात घालून त्याला प्लास्टिक wrap किंवा ओल्या रुमालानी झाकून ठेवा. हे भांड घरातल्या जरा ऊब असलेल्या जागी ठेवावे म्हणजे यीस्ट ची प्रक्रिया लौकर होईल.
- एका तासाभर नंतर ती कणिक साधारण दुप्पट अशी फुलेल. मग त्याला परत नित मळून पुन्हा आणि एक तास झाकून ठेवा.
- एका अल्युमिनियम च्या ट्रे ला तेल लावा. फुललेल्या कणकेचे ५ गोळे करा. प्रत्येक गोळा हातानी थालीपीठ थापतो तसे थापून त्या ट्रे मध्ये २० मि १८० डिग्री वर बेक करून घ्या. पिझ्झा बेस तयार झाला.
पिझ्झा सॉस आणि टोपिंग साठी:
५ टोमाटो ची पेस्ट (मिक्सर मध्ये वाटून घ्या)
२ चमचे देग्गी मिर्च पावडर
१ चमचा साखर
मीठ आणि मिरीपूड चवीनुसार
हवे असल्यास हर्ब्स
- ह्या सर्व सामग्री ला एका सॉस pan मधे दाट होईपर्यंत शिजवा. हे सॉस छान दाट आणि लाल होईल.
पिझ्झा बेस वर सर्व प्रथम पिझ्झा सॉस पसरवा. मग वरून शिमला मिर्च, मशरूम, पनीर, बेबी कॉर्न, कांद्याची पात इ. पसरवा. शेवटी वरून पिझ्झा चीज किसून घाला (हवे तेवढे) आणि पिझ्झा १० मि चीज वितळे पर्यंत बेक करा.
प्रतिक्रिया
30 Jan 2011 - 4:51 pm | रश्मि दाते
बादलीभर पाणी सुटलेना तोंडाला,मस्तच आजच करावा म्हणते
30 Jan 2011 - 8:10 pm | स्वाती२
मस्त पाकृ!
31 Jan 2011 - 6:14 am | गुंडोपंत
मस्त पाकृ वाचण्यावरच समाधान मानतो!
31 Jan 2011 - 11:07 am | कच्ची कैरी
अमिता तुस्सी तो छा गये! मस्त पाकृ. आणी फोटो तर एकदम ढिनच्याक ढिच्याक!
31 Jan 2011 - 11:46 am | पियुशा
यम्मि !
आताच पाहिजे :)
31 Jan 2011 - 3:16 pm | वहिनी
वा वा वा ?छा न आहे
2 Feb 2011 - 3:51 pm | काजुकतली
खुप छान रेसिपी. माझ्या मुलीला पिझ्झा खुप आवडतो पण विकतचे बेस मैद्याचे असतात म्हणुन करायला जीवावर येते. ही रेसिपी आता वापरुन पाहते.
पिज्जाबेस आधी न भाजता, वर टोपिंग्स लावुन मग भाजला तर नीट भाजला जाणार नाही काय? पिज्जाशॉपमध्ये तरी टॉपिंग्स लावुन भाजलेला पाहिला.
3 Feb 2011 - 1:21 pm | खादाड अमिता
पिज्जाशॉपमध्ये ते पिझ्झा च्या कणकेत जेल राईसिंग एजंट घालतात, शिवाय त्यांचा ओव्हन पण मोठ्ठा असतो. मी घरी टोपिंग घालून मग बेक केला तर तो मध्यभागी थोडा ओला राहिला होता, जास्त बेक केला तर खालून करपत होता. म्हणून आधी बेस बेक करून घेतला मग वर टोपिंग घालून ५-१० मिन बेक केला.
पिझ्झा स्टोन कुठे मिळाला तर त्याचा वापर करा आणि मला पण सांगा कुठून घेतलात ते. :)