एवढे केक चे प्रकार बघून मला पण नाही राहवलं. म्हणून ...
सामग्री:
२ अंडी
१ १/२ कप गव्हाचे पीठ (किंवा मैदा)
१०० ग्राम बटर
१ कप साखर (डायेट शुगर पण वापरू शकता)
१/४ कप चॉकलेट चिप
१/४ कप कोको
१/४ कप दूध
१ चमचा बेकिंग पावडर
१ चमचा सोडा
१ चमचा व्हेनीला इसेन्स
मफिन्स आणि केक मधला मोठा फरक म्हणजे त्याला बनवण्याची पद्धत. केक किंवा कप केक बनवताना आधी लोणी आणि साखर क्रीम करून मग त्यात एक एक अंड घालून सगळ्यात शेवटी मैदा घालतात. मफिन्स करताना क्विक ब्रेड मेथड वापरतात. म्हणजे सर्व ओली सामग्री एका बाउल मध्ये मिक्स करायची आणि सर्व कोरडी सामग्री वेगळ्या बाउल मध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि मग ओल्या सामग्री च्या भांड्यात, मैद्याचे मिक्स घालून, नित फेटून त्याला बेक करायचे.
ह्या मफिन्स मध्ये कोको आणि चोकलेट चिप्स दोन्हीचा वापर केल्या मूळे ह्याचे नाव - डबल चॉकलेट चॉकलेट चिप मफिन्स असे आहे. मफिन्स चे साचे नसतील तर ह्याला केक च्या भांड्यात पण बेक करता येते.
तर सोप्प आहे. अंडी, बटर, दूध आणि व्हेनीला इसेन्स एका भांड्यात चांगल मिसळून घ्या. मग दुसर्या भांड्यात गव्हाचे पीठ किंवा मैदा, कोको, बेकिंग पावडर, सोडा, चॉकलेट चिप, साखर असे नीट कालवून घ्या. आता ओल्या मिश्रणात कोरडे जिन्नस थोडं थोडं घालून नीट एकजीव होईपर्यंत कालवा. मफिन्स किंवा कप केक च्या साच्यात ह्याला बेक करा. १८० डिग्री ओव्हन टेम्प्रेचर वर २०-२५ मि लागतील.
प्रतिक्रिया
28 Jan 2011 - 9:16 pm | पिंगू
खादाडताय ह्यातून अंडी वगळायचा उपाय सांग.. बाकी फोटो पाहून लाळ गळाली ह्यात शंकाच नाही..
- पिंगू
28 Jan 2011 - 11:47 pm | आत्मशून्य
भलतेच काही घडल्यास जबाब्दारी स्वतः घ्या.
28 Jan 2011 - 10:23 pm | आशिष सुर्वे
"Live long and eat Muffins"..
मफिन्स साठी आम्ही निर्लज्ज आहोत.. कधी येऊ खादाडतै??
28 Jan 2011 - 10:25 pm | विंजिनेर
काय हो तुम्ही डायेटिशअन आहात ना?
28 Jan 2011 - 11:18 pm | मराठे
यम्म!
बघूनच एक दोन पौंड वजन वाढल्या सारखं वाट्तंय! पण तरीही तोंड आवरता येत नैये!
29 Jan 2011 - 2:05 am | आमोद शिंदे
ह्याची गव्हाचे पीठ (असहकार ह्यांच्या मुली साठी), अंडी (शाकाहारी पिंगू), साखर आणि चॉकलेट चिप्स (मिभोंचा डायबेटीस), बटर (मराठेंचे वाढते वजन) न घालता कुणी रेसिपी देऊ शकेल का?
29 Jan 2011 - 7:10 am | मदनबाण
वा... :)
पिंगू जे म्हणाला तेच मला देखील सांगावेसे वाटते.
29 Jan 2011 - 9:21 am | कच्ची कैरी
बरेच दिवस झाले अमिताची रेसेपी नव्हती जरा चुकचुकल्यासारखे वाटत होते आता जरा कसं बर वाटतय ! बाकी रेसेपी मस्त हं !
30 Jan 2011 - 3:21 pm | खादाड अमिता
:)
हॅपी टु बी बॅक
29 Jan 2011 - 11:41 am | विजुभाऊ
व्वा छान्. मस्तच आहे हा प्रकार
अवांतर : प्रकाशचित्रे अन्य संकेतस्थळावरून घेतली असल्यास श्रेय-नोंद केलेली बरी.अन्यथा धागा अप्रकाशीत व्हायचा संपादक मंडळाकडून एखाद वेळेस . हेलक्षात आले म्हणून इथे मांडले
29 Jan 2011 - 12:12 pm | अवलिया
खरंच मस्त प्रकार आहे,
अवांतरातील विजुभाउंचा सल्ला अतिशय बहुमुल्य !
29 Jan 2011 - 7:11 pm | खादाड अमिता
आहो, तुम्हाला हे फोटो दुसऱ्या कुठल्या वेब्सायीट वरून घेतलेले वाटले का? म्हणजे एवढा छान आहे का फोटो? खूप खूप धन्स! पण 'believe it or not' हा फोटो खुद्द मी केलेल्या मफिन्स चा मीच काढलेला फोटो आहे. तर फिकर नॉट!
जर कधी कुणा दुसऱ्या चा फोटो वापरला तर आवर्जून त्यांचा उल्लेख करणार्यांपैकी आहे मी.
29 Jan 2011 - 1:01 pm | परिकथेतील राजकुमार
खायला कधी देणार? नुसते फोटू दाखवुन किती जळवायचे आहे ?
29 Jan 2011 - 4:41 pm | धनुअमिता
पाककृती खुपच छान आहे. ही पाककृती बिना अन्ड्याची करता येईल का? मी नव्यानेच मिसळ्पाववरचा सदस्य झालो आहे.मी खुप दिवसापासून प्रयत्न करत होतो प्रतिक्रिया देण्याची,पण आज अखेर जमलच.म्हण्तात ना प्रयत्नानती परमेश्वर.माझा एक प्रश्न आहे त्याचे ऊत्तर मिळेळ का? प्रश्न असा आहे - प्रतिक्रिया देण्यासाठी पुन्हा: पुन्हा प्रवेश करवा लागतो का?त्या करीता काय करावे लागते.पासवड॓ दररोज बदलावा लागतो का?
2 Feb 2011 - 3:58 pm | काजुकतली
मस्तच एकदम....
एक प्रशन - नव्या मुंबईत चॉकलेट चिप्स कुठे शोधावे?????
3 Feb 2011 - 1:13 pm | खादाड अमिता
quality foods नवरत्न हॉटेल च्या अलीकडे , सेक्टर १७, वाशी
IIFA स्टोर , सेक्टर १७ वाशी macdonalds जवळ.
7 Feb 2011 - 8:17 pm | काजुकतली
अमिता धन्यवाद गं. तुझे ब्लॉग्स पण पाहिलेत एकदम मस्त.
9 Nov 2012 - 10:04 am | रुप्स
मला ही रेसिपी दिसत का नाही :(
12 Nov 2012 - 4:53 pm | मृदुला सूर्यवंशी
@खादाड अमिता, आज हे मफिन्स करुन पहिले...अप्रतिम झाले. मी फक्त कणिक वापरुन बनवल्याने २ बदल केले. इसेन्स एका चमच्याएवजी २ चमचे घातला आणि १ चमचा दालचिनी पावडर टाकली...पाककृतीसाठी तुमचे आभार :)