हा खरे तर गोड केक नाहिय्ये. पण केक सदृष आहे
हान्डवो याला आपण तिखट /खारा केक म्हणूया
हा सम्मिश्र कडधान्यांपासून करतात
तांदूल १ वाटी
तूर दाळ १ वाटी
काळे उडीद १/४ वाटी
मूगाची डाळ १/४ वाटी
चणे डाळ 1१/४ वाटी
आंबट दही १ वाटी
दुधी भोपळा कीस अडीच वाटी
गोडे तेल चार चमचे
लिंबाचा रस १/२ चमचा
1खान्याचा सोडा १ चमचा
साखर २ चमचे
लाल तिखट ३ चमचे
हिरवी मिर्ची लसुण पेस्ट ३ चमचे
हळदी १/२ चमचे
चवीपुरते मीठ
फोडणी साठी
राई ( मोहरी ) २ चमचे
पांढरे तीळ २ चमचे
ओवा २ चमचे
हिंग १/२ चमचे
फोडणी साठी तेल चार चमचे
कृती
तांदूळ आणि डाळी पाण्यात ४ ते पाच तास भिजत घालाव्यात. त्यानन्तर पाणीकाढून टाकावे
ओले असतानाच ते एकत्र दळून घ्यावे . इडलीप्रमाणे घट्ट पेस्ट तयार होईल.
यात आम्बट दही घालुन रात्रभर आंबण्यासाठी ठेवावे.
दुधीभोपळ्याचा किस ,चार चमचे तेल ,लिंबाचा रस खाण्याचा सोडा तिखट हळदी हिरवी मिर्ची लसुण पेस्ट.साखर मीठ घालून मिक्क्सरमधून घुसळून काढा
हे मिश्रण एका तेल लावलेल्या ताटात्/डब्यात ओतून घ्या
या वर फोडणीसाठी काढुन ठेवलेले तेल मोठ्या पळीत तापवून घ्या
तेल तापल्यावर त्यात प्रथम मोहरी टाका चांगले तडतडायला लागले की त्यात ओवा तीळ हळदी आणि हिंग टाका
काही वेळ तापू द्या तीळाचे दाणे किम्चीत सोनेरी दिसू लागले ही फोडणी मिश्रणावर पसरा
केक पात्रात किंवा प्रीहीटेड ओव्हन मध्ये साधारण २०० डीग्री सें ला ३० ते ३५ मिनिटे ठेवा .
मस्त सोनेरी रंगाचा हांडवो तयार होईल.
टीपः हांडवोम स्त क्रीस्प करायचा असेल तर थाळीत मिश्रणाचा थर फार जाड ठेवू नये. ( एक ते दोन इंच फक्त)
प्रतिक्रिया
28 Jan 2011 - 6:28 pm | विजुभाऊ
टीपः हांडवोम स्त क्रीस्प करायचा असेल तर थाळीत मिश्रणाचा थर फार जाड ठेवू नये. ( एक ते दोन इंच फक्त)
हे वाक्य टीपः हांडवो मस्त क्रीस्पी करायचा असेल तर थाळीत मिश्रणाचा थर फार जाड ठेवू नये. ( एक ते दोन इंच फक्त)
असे वाचावे
28 Jan 2011 - 6:31 pm | टारझन
वाचलो . .. असहकार यांची मुलगी नाही म्हणुन वाचलो ... नाही तर हा ही केक खावा लागला असता =))
अवांतर : छाण दिसतोय :) ढोकळ्यासारखा
- केकुभाऊ
29 Jan 2011 - 12:52 am | आमोद शिंदे
हाहाहाहा.... आम्ही तर केक वरच असहकार पुकारला आहे!
28 Jan 2011 - 6:38 pm | गणपा
संध्याकाळच्या चहाच्या जोडीला मस्त चमचमीत प्रकार असतो हा.
लहानअसताना खाल्लाय शेजार्यांकडे.
धन्स हो विजुभौ.
28 Jan 2011 - 7:53 pm | प्राजु
मला खूप आवडतो हा प्रकार.
अतिशय पौष्टीक आणि रूचकर आहे. यात मी बारिक चिरून गाजर, मक्याचे दाणे सुद्धा घालते. खूप छान लागतो हा हांडवो.
28 Jan 2011 - 7:57 pm | रामदास
हांडग्याचा केक म्हणून ओळखतात तोच तर नव्हे विजुभाऊ !!
29 Jan 2011 - 3:26 am | पिवळा डांबिस
स्वामी,
तुमच्याकडे करतात तो हांडग्याचा केक!
विजुभाऊ करतात तो दांडग्याचा केक!!!
:)
विजुभाऊ, हांडवो मस्त दिसतोय, खायला कधी येऊ?
(ह्ये आपलं उगाच अवांतराचा आरोप केल्या जाऊ नये म्हणून लिवलं!!!!)
:)
28 Jan 2011 - 8:00 pm | स्वाती दिनेश
मस्त दिसतो आहे हांडवो..
स्वाती
28 Jan 2011 - 8:20 pm | मुलूखावेगळी
मस्त दिसतोय
ट्राय करेल आनि कसा झाला ते पन कळवेल
28 Jan 2011 - 8:36 pm | स्वाती२
मस्त!
28 Jan 2011 - 9:19 pm | पिंगू
हांडवो केक भारीच विजुभौ.. बाकी मिपाकर अगदी अगत्याने पाक कृतीचा प्रश्न सोडवतात..
- पिंगू
28 Jan 2011 - 9:21 pm | मेघवेडा
जबर्या! आपुन एकदा केक समजके फस्या था. पिरीपिरी सॉस असेल तर धम्माल!!
28 Jan 2011 - 10:00 pm | रेवती
भारतीय ग्रोसरीत कोरडे हांडवो पीठ मिळते. ते वापरून एका मैत्रिणीने खिलवला होता. आंबट ताक असणे महत्वाचे असावे असा अंदाज. छान लागतो. त्यावरचे तीळ चांगले दिसतात. बरं झालं ही पाकृ मिळाली.
28 Jan 2011 - 11:44 pm | आत्मशून्य
लीहीत रहा.
अवांतरः - मस्त पा.कृ. आहे.
29 Jan 2011 - 4:22 am | धनंजय
छान.
आंबलेल्या पिठात खीस-मसाला मिक्सरमधून मिसळण्याऐवजी हलकेच ढवळून मिसळले, तर आंबलेल्या पिठातली फूग तशीच राहील काय? मग सोडा घालायची गरज राहाणार नाही.
(प्रकाशचित्रे अन्य संकेतस्थळावरून घेतली असल्यास श्रेय-नोंद केलेली बरी.)
29 Jan 2011 - 7:02 am | आमोद शिंदे
मा.संपादक,
अन्यथा ती चित्रे 'ढापलेली' समजली जातात! आणि म्हणून कुणी तसे म्हंटले तर ती प्रतिक्रिया उडवायची नसते.
29 Jan 2011 - 10:21 am | विजुभाऊ
धनंजय जी
या लेखातील छायाचित्रे मी गुज्जुफूड फाईल्स ब्लॉक वरून तसेच फ्लिकर आणि बापु डॉट कॉम या संस्थळावरून घेतलेली आहेत.
तसा उल्लेख करावयाचा असतो हे माझ्या लक्षात आले नव्हते.
29 Jan 2011 - 11:05 am | अवलिया
मुखपॄष्टावरचे भीमाण्णांच्या आदरांजली खालचे चित्र कुठुन घेतले आहे याचा उल्लेख नाही हे सहज दिसले आणि नमुद केले.
30 Jan 2011 - 12:12 am | धनंजय
या छान पाककृतीमधली ती त्रुटी दूर केली, हे उत्तम केले.
29 Jan 2011 - 5:00 am | शुचि
आई बनवायची. अप्रतिम लागतो.
29 Jan 2011 - 8:45 am | यशोधरा
मस्त आहे कृती. आवडली.
29 Jan 2011 - 10:10 am | विजुभाऊ
मी सध्या घराबाहेर रहातोय. त्यामुळे छायाचित्रे आंतरजालावरून घ्यावी लागली.
नुसती पाककृती दिली असती तर तेवढी कल्पना आली नसती.
29 Jan 2011 - 12:59 pm | टारझन
विजुभाऊ , तुम्ही बिण्धास्ट टाका चित्रे ... कुठुनही कशीही ... तुम्ही आमचे बाब्या आहात .. तुम्हाला सगळे माफ .. बघु कोण ऑब्जेक्षण घेतो .. खुद्द ओरिगिनल फोटुमालकाने जरी ऑब्जेक्षण घेतले तरी त्याचा बाजार उठवु .. नाय काय नाय काय
:)
29 Jan 2011 - 1:07 pm | परिकथेतील राजकुमार
चांगला हांडगा प्रकार दिसतोय.
कधी खाल्ला नाहीये ह्या आधी.
29 Jan 2011 - 1:50 pm | sneharani
चांगला प्रकार दिसतोय.
अजून खाल्ला नाहिये!