असहकार यान्च्या मुलीसाठी कोकणातील केक अर्थात काकडीचे धोन्डस.

ज्योति प्रकाश's picture
ज्योति प्रकाश in पाककृती
28 Jan 2011 - 4:15 pm

साहित्यः-जून काकडी,गुळ,तान्दळाचा रवा(इडली रवा),वेलची पूड्,काजु तुकडा तब्येतीप्रमाणे,नारळाचा चव.
कृती :-काकडी बारीक किसून घ्यावी.त्यातील पाणी काढून बाजुला ठेवावे.तान्दळाचा रवा मन्द विस्तवावर भाजुन घ्यावा.
काकडीच्या किसात रवा मिसळावा.सुके वाटल्यास काकडीचे पाणी घालावें. नन्तर त्यात गुळ आपल्या गोडीप्रमाणे
घालावा.काजु तुकडा मनसोक्त घालावा.सर्व मिश्रण मन्द विस्तवावर शिजवुन घ्यावे.केकचे भान्डे असल्यास त्यात
शिजवलेले मिश्रण घलून बेक करण्यास ठेवावे.(भान्ड्याला आधी सर्वत्र तूप लावावे चिकटू नये म्हणून).
केकचे भान्डे नसल्यास तव्यावर वाळू घालून त्यावर भान्डे ठेवावे.व वर परत तवा ठेवून त्यावर वाळू घालून
बेक करावे.अश्याच प्रकारे रसाळ फणसाच्या गर्याचे पण धोन्डस करतात्.काकडी ऐवजी गर्यातील आठळी काढून
गरे मिक्सी मध्ये वाटून घ्यावे.बाकी कृती वरीलप्रमाणे.काकडी जुन नसल्यास बाजारात त्यातल्या त्यात जून बघून घेणे.

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

28 Jan 2011 - 4:22 pm | स्वाती दिनेश

इथेही पाहता येईल..
स्वाती

असहकार's picture

28 Jan 2011 - 5:25 pm | असहकार

नक्की करुन बघेल.

आमच्या ईथे ताड गोळ्याच्या पिकलेल्या फळाचा असा काहीसा प्रकार करतात

प्राजु's picture

28 Jan 2011 - 7:50 pm | प्राजु

अरे वा!! मस्तच!