खर सांगायचं तर आम्हाला यात अजिबात पडायचं नव्हत. पण कुणीतरी स्वत: फुलता फुलता आम्हाला 'गेला बाजार ' का असेना पण हाकारल, अन आम्हालाही फुलावास वाटलं.
तशी तेव्हढी एक हाकच आम्हा पुरली असती, पण इथे ढीगभर कारण मिळाली.
जसे की आज राजकुमारांचा वाढदिवस, चू चू ला ओवन नसल्यान कस फुलाव हा पडलेला प्रश्न, इत्यादी, इत्यादी.
हा तर काय बोलत होतो आपण?... कुणीस हाकारल स्वत: फुलता फुलता...
अन मग आम्ही हीं ठरवल आपण हीं फुलायचं, पण कस? मनसोक्त...स्वत:च्या ही क्षितिजा ला भरून टाकत, तना मनातून मस्त गिरक्या घेत. घातलेल्या सादेचा पडसाद होत..
मुळचच मातीशी नात असणाऱ्या आम्हाला जमल हो तसच फुलण ...
तर मंडळी रेसिपी वगैरे काही नका विचारू, नुसत खायचं बघा, बोलवा त्या पराला अन होऊन जाऊ दया! ए कुणी कँडल आणेल का?
तस जाता जाता चू चू ला मात्र एक टीप , हा बघ बिन ओवनचा , मी मोठ्या भांड्यात घालून केलेला केक!
सुरवातीला गॅस मोठा ठेव १० मिनिट्स अन मग मध्यम उरलेले १० मिनिट्स. फिन्निश!!
तसा मी मावेत ३ मिनिटात केक करते पण त्याला बेक केलेला छान खरपूस वास नसतो!
From
प्रतिक्रिया
28 Jan 2011 - 1:11 pm | टारझन
=)) =)) =))
णक्की काय आहे हे ? =)) =)) =))
28 Jan 2011 - 1:22 pm | स्पंदना
केक आहे साहेब तो....चॉकलेट!! माझ्या मुलांना या वेळी चॉकलेट केक हवा होता, म्हंटल पराच्या वाढदिवसा निमित्त्य होउन जाउ दे. अन नेहमी सारखा ओवन मध्ये न करता गॅस वर केलाय सासुबाईंसारखा!
अॅकचुअली तो ' चॉकलेट फज' आहे , पण एक तर' फज 'खालच्या बाजुला जमते चॉकलेट बार वापरल्याने अन तो इतका फुलला की मला वाटल जाउदे ते फज अन बज्..मला असाच हवा
28 Jan 2011 - 1:24 pm | टारझन
पण् हा फज केक हा अपसाईड डाऊन आहे की डाऊनसाईड अप ? आणि त्याला ते मधे भोक का आहे ?
28 Jan 2011 - 1:37 pm | स्पंदना
अय्यो! सांगितल ना सासुबाईं सारखा केकच भांड वापरुन केलाय. मला वाटतय त्यामुळच तो एव्हढा फुललाय. मध्ये पण बेक होत राहिला तो. अन ते अप साइड डाउन सोड तु तुला नाही कळायच.
28 Jan 2011 - 2:33 pm | सहज
केकच्या मधल्या त्या रिकाम्या जागेत मस्त पैकी एक आईस्क्रीम / जेलाटोचा गोळा टाकायचा.
किंवा जाईताईंनी शिकवलेले चॉकोलेट मूस
28 Jan 2011 - 1:19 pm | अवलिया
जबरा !!
बघ परा तुझ्यासाठी गिफ्ट !! प्यार्टी दे आता !!!!!
28 Jan 2011 - 4:04 pm | परिकथेतील राजकुमार
जबराच !
प्यार्टी गिफ्ट आवडले.
त्या मधल्या जागेत एक खंबा ठेवता येईल ;)
28 Jan 2011 - 1:48 pm | कच्ची कैरी
वा ! मिपावर काय सध्या केक बेक करणे चालु झाले आहेत .मस्त आहे हा फज कि केक जे काही आहे तो !डाउनलोड करुन घ्यावा लागेल.
28 Jan 2011 - 2:00 pm | निवेदिता-ताई
मस्त्च
28 Jan 2011 - 2:04 pm | llपुण्याचे पेशवेll
मस्तं दिसतो आहे केक.
28 Jan 2011 - 2:41 pm | गणपा
ओक्के. मर्जी तुमची. ;)
का ही ही
आवांतर : बाकी काहीही म्हणा, सगळी बंधन झुगारुन मुक्तपणे उधळणारा केक आवड्या :)
28 Jan 2011 - 3:45 pm | ब्रिटिश टिंग्या
गणप्या *****, माझी प्रतिक्रिया ढापली!
28 Jan 2011 - 4:08 pm | गणपा
तुम्ही बसा तिथे चिन्नम्मा चिलकम्मा करत..
आम्ही काय तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहात बसायचं का तो वर ;)
अधीक माहितीसाठी सहज्रावांशी संपर्क साधावा ;)
28 Jan 2011 - 2:52 pm | विसोबा खेचर
छान.. :)
28 Jan 2011 - 3:28 pm | पियुशा
मस्त केक
:)
28 Jan 2011 - 3:50 pm | प्राजक्ता पवार
छान .
28 Jan 2011 - 4:05 pm | पर्नल नेने मराठे
अपर्णा ताय मस्त ग ;)