असहकार यांनी त्यांच्या मुलीसाठी बिन गव्हाच्या केकची रेसिपी सुचवण्या बद्दल धागा काढला होता. तिला गव्हाची अॅलर्जी असल्याने ती मैद्याचे/रव्याचे केक खाऊ शकत नाही हे वाचून वाईट वाटले.
ही काही केकृ नाही. पण केक सदृष्य आहे म्हणुन देण्याचा मोह आवरता येत नाही.
साहित्यः
एक बाऊल नारळाचा चव.
१/३ कप साखर/पिठीसाखर.
३-४ मोठे चमचे मैदा.
व्हॅनिला इसेंस.
२ अंड्यांतला पांढरा भाग.
चिमुटभर मीठ.
कृती:
एका भांड्यात अंड्यांमधला फक्त पांढरा भाग वेगळा करुन थोडासा फेटुन घ्यावा.
मग त्यात बाकीचे जिन्नस घालुन चांगले एकजीव करुन घ्याव.
तयार मिश्रण साच्यामध्ये ओतुन घ्याव.
ओव्हन २०० ते २२५ °C वर ठेवुन, २०-२५ मिनिटे बेक करत ठेवाव.
प्रतिक्रिया
27 Jan 2011 - 10:20 pm | स्वाती दिनेश
मॅक्रोन्स मस्त..:)
स्वाती
27 Jan 2011 - 9:56 pm | गणपा
एक सांगायच राहिलं.
मैदा नावापुरताच घातला आहे. पण त्या ऐवजी कॉर्न फ्लॉर वापरल तरी चालेल.
27 Jan 2011 - 9:58 pm | रेवती
मग ठिक आहे.
27 Jan 2011 - 9:57 pm | रेवती
अरे, पण मैदा आहे ना यात!
तोही न घालता काय करता येइल?
बाकी पाकृ फक्कड आहे.
फोटू मस्त आलेत.
27 Jan 2011 - 10:18 pm | स्वाती२
यम्मी!
27 Jan 2011 - 10:43 pm | प्राजु
वेलकम ब्यॅक भाऊ!!
:) सह्ही सह्ही!!
27 Jan 2011 - 11:35 pm | कच्ची कैरी
गणपा तुम्ही ग्रेटच आहात ,आता मला पाककलेत काही अडचण आली तर मी तुम्हालाच विचारनार हं!
28 Jan 2011 - 10:21 am | विजुभाऊ
गणपा शेफ...
तुम्हाला आता गणपाशेठ ऐवजी गणपाशेफ असेच बोलवणार
28 Jan 2011 - 11:35 am | प्राजक्ता पवार
अगदी सह्ही दिसताहेत मॅक्रोन्स .
28 Jan 2011 - 12:20 pm | पियुशा
मस्त आहे
28 Jan 2011 - 1:38 pm | स्पंदना
अरे हे केल असत ना मी मग? उगाच सकाळभर केक करत बसले .
चलो नेक्स्ट टाइम हे बनवुन पहाते.
28 Jan 2011 - 1:40 pm | अवलिया
वेलकम ब्याक !!! :)