ऑरेंज केक (बिनामैद्याचा)

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
27 Jan 2011 - 9:44 pm

असहकार यांच्या मुलीला गव्हाची अ‍ॅलर्जी असल्याने ती मैद्याचे/रव्याचे केक खाऊ शकत नाही हे वाचून वाईट वाटले.
खास तिच्यासाठी हा बिनामैद्याचा ऑरेंज केक..
साहित्य- ३ टेबल स्पून बटर, १/४ कप साखर,२ टीस्पून मध, १/४ कप सोअर क्रिम, १/४ कप ऑरेंज ज्यूस,२ टीस्पून संत्र्याची किसलेली साल, २ अंडी,३ कप बदाम पावडर, १ टी स्पून बेकिंग पावडर, १ चिमूट मीठ
कृती- बटर पातळ करुन घ्या.त्यात साखर घाला व फेटा.अंडी वेगळी फेटून घ्या व ती त्यात घाला. मध ,सोअर क्रिम, संत्र्याच्या साली घाला व फेटा. ऑरेंज ज्यूस घाला व फेटा. बदाम पावडर व चिमूट भर मीठ घाला आणि मिश्रण एकत्र करा.
प्रिहिटेड अवन मध्ये १८० अंश से वर ३० ते ३५ मिनिटे बेक करा.
नेहमीसारखेच- केक बेक झाला की नाही ते सुरी घालून पहा. अवनचे मध्ये ५ मिनिटे तसाच ठेवा व नंतर जाळीवर काढून घ्या.
तुमच्या मुलीला केक खायचे समाधान मिळू द्या आणि आम्हाला इथे फोटो...:)
शुभेच्छा!

प्रतिक्रिया

नुसता बिनमैद्याचाच नव्हे तर जास्त पौष्टीक केक आहे हा!
मलाही त्यांच्या मुलीच्या अ‍ॅलर्जीबद्दल ऐकून कसेसेच झाले.
माझ्या मुलालाही सफरचंदाची अ‍ॅलर्जी होती. आता नाही म्हणून बरं वाटतय.
काही बीन गव्हाच्या रेसिप्या कळल्या मीही देईन.

चला असहकार यांच्या निमित्ताने बर्‍याच पौष्टिक रेशिप्यांची मेजवानी मिळणार आहे.
मी तरी अजुन ऑरेंक केक कधी चाखला नव्हता.
टु डु लिश्ट वाढते आहे.

प्राजु's picture

27 Jan 2011 - 10:04 pm | प्राजु

मी ही तेच म्हणते आहे.
बिनगव्हाच्या, तसे पौष्टीक पाकृ येतील आता एकेक. बरं होईल. नवीन प्रकार जरा! :)

धन्यवाद, आता नविन म्हण मिळाली आणि आपली मराठी सम्रुद्ध झाली.

बिनगव्हाचे खाणार त्याला मिपा देणार.

हर्षद.

कच्ची कैरी's picture

27 Jan 2011 - 11:32 pm | कच्ची कैरी

मी सहमत आहे हा तुमच्याशी

चला हा आठवडा केकृ आठवडा घोषित करायला हरकत नाही.... :)

- पिंगू

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jan 2011 - 10:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वातीताईचे धागे मी उघडणंच बंद केलंय.