सर्व मिपावरील सुगरणींना (सुगरणाना देखील) आवाहन आणि आव्हान !!!!!
माझ्या मुलीला गव्हाची अलर्जी (CELIAC DISEASE) असल्याने गहू/ मैदा विरहीत रेसीपीच्या शोधात आहे,
(तांदुळ/ ज्वारी/बाजरी/मका इ. घरी दळ्लेली पीठे चालतात. )
ड्रेसिंग करता (readymade आयसींग )चालत नाही (Risk of contamination).
अटी अवघड असल्याने पाकक्रुती प्रयत्न करणार्यांचे आधीच आभार !
-------------------------------------------------------------
असहकार
प्रतिक्रिया
27 Jan 2011 - 7:54 pm | यशोधरा
सांगते.
रवा चालेल ना लेकीला खायला?
२ लहान काकड्या किसून घ्या. मोठी असेल तर एकच. पाणी वेगळे काढा.
अर्धी वाटी गूळही चांगले बारीक चिरून घ्या.
१ वाटी रवा तुपावर चांगला खरपूस भा़जून घ्या. ह्या गरम असलेल्या रव्यातच हे गूळ व काकडी घालून चांगले मिक्स करा. मिक्स करताना, हे आता ओलसर व्हायला हवे म्हणून त्यात काकडीचे पाणी घालायचे, पण अगदीच पातळ व्हायला नको.
थलथलीत पण जरासे घट्टच (ओघळणार नाही असे) असे मिश्रण व्हायला हवे.
एका कूकरमधे बसणार्या डब्याला आतून तूप लावून घ्या व त्यात हे मिश्रण घाला. वरुन सजावटीसाठी काजू, बदाम वगैरे घालू शकता. कूकरला २ ते ३ शिट्ट्या येऊ देत. थंड झाले की डब्यातून काढून कापून सजावट करु शकता. सजावटीसाठी घट्ट कस्टर्ड बनवून ते वापरु शकता.
आमच्या कोकणात ह्याला काकडीचे धोंडस म्हणतात . आमचा हाच केक. :)
आता बनवून फोटो वगैरे तुम्हीच टाका. :)
27 Jan 2011 - 8:04 pm | असहकार
पण रवा म्हणजे दळलेला गहूच ना ..........
चालत नाही...
ते घरी कसे बनवावे ?
27 Jan 2011 - 8:59 pm | यशोधरा
खाली मेव्याने लिहिलेच आहे, पण तरीही सांगते की धोंडस तुम्ही तांदळाच्या रव्याचंही करु शकता.
कस्टर्ड मात्र मी विकतचीच पावडर घेऊन बनवते. पाकीटावर कसे बनवावे हे लिहिलेले असतेच, ते पाहून बनवू शकाल.
तुमच्या लेकीला आणि तुम्हाला शुभेच्छा.
28 Jan 2011 - 5:12 pm | असहकार
नक्की करुन पाहिन, कसा झाला ते कळवेन,..धन्यवाद
27 Jan 2011 - 8:56 pm | मेघवेडा
धोंडस एकदम सह्ही!
गहू नाही चालत तर तांदूळ घ्यायचा.
भिजवून वाळवून कण्या करून घ्यायच्या.
बरके गरे घ्यायचे बचकाभर. मस्त पैकी रस काढून घ्यायचा त्यांचा.
गूळ घ्यायचा चांगला मूठभर. चिरून घ्यायचा पाहिजे तसा. मग तांदळाच्या कण्या नि रस नि गूळ सगळं एकत्र करून घ्यायचं.
अगदीच घट्ट झाले झाल्या पाणी घालायचं. आणि तास-दीड तास मिश्रण झाकून ठेवायचं.
मोदकपात्रात हे मिश्रण उकडून काढायचं. थंड झाले की डब्यातून काढून कापून सजावट करु शकता. सजावटीसाठी बेदाणे, काजु वगैरे वापरु शकता.
सोबत नारळाचं दूध किंवा साधं दूध काय हवं ते वाटीत घ्यायचं!! आणि हवे तसे तुकडे करून हादडायचं!!
आमच्या कोकणात ह्याला फणसाचं सांदण म्हणतात . आमचा हाच केक. :)
आता बनवून फोटो वगैरे तुम्हीच टाका. :)
27 Jan 2011 - 8:42 pm | प्राजु
कॉर्न मील चा करून बघावा. कारण कॉर्न केक खाल्ला आहे मी. कसा करायचा बघावे लागेल.
कॉर्न (मक्याचा) रवा.. असतो त्यात वरची यशो ची पाकृ करावी. मी ही बघेन करून.
खूप वाईट वाटलं असहकार् ताई/दादा, आपल्या मुलीला गव्हाची अॅलर्जी आहे ऐकून.
27 Jan 2011 - 9:03 pm | यशोधरा
प्राजू, तांदळाचा रवा असतो गं, त्यात कर. किंवा नाचणी भरड दळून मिळते का पहा. तेही चालेल. तुझ्या तिथे सौदिंडियन स्टोअर असेल तर नाचणी असेल पहा. रागी म्हणतात.
27 Jan 2011 - 8:58 pm | निवेदिता-ताई
मलाही खूप वाईट वाटलं असहकार् ताई/दादा, आपल्या मुलीला गव्हाची अॅलर्जी आहे ऐकून.
27 Jan 2011 - 9:05 pm | प्राजु
वरती मेव्या म्हणतो त्याप्रमाणे..
तांदळाचा रवा, काढून घ्या.
थोड्याशा आंबट ताकात हा रवा भिजत घाला ३-४ तास. मग तो फुगून येतो.
त्यात साखर, केशर, काजू , वेलची पावडर वगैरे घालून ओव्हन ला बेक करा.
हा केक मी केलेला आहे एकदा. सुंदर होतो.
मी पुन्हा केला तर फोटो टाकेन.
27 Jan 2011 - 9:10 pm | स्वाती दिनेश
यशो , मेवे दोघांनी तवसाळ्याबद्दल सांगितले आहेच. शिवाय केकला आपला मराठमोठा ऑप्शन सांदणे,खांडवीही करता येईल.
अजून काही पाकृ आहेत बिनामैद्याच्या केकच्या, लवकरच देते.
स्वाती
27 Jan 2011 - 10:15 pm | स्वाती२
ही पहा चॉकलेट केकची रेसीपी.
http://allrecipes.com/Recipe/Warm-Flourless-Chocolate-Cake-with-Caramel-...
तसेच http://allrecipes.com//Recipes/healthy-cooking/gluten-free/Main.aspx
येथे इतरही बर्याच पाकृ आणि ग्लुटन फ्री पीठ वापरुन बेकिंग वगैरे माहिती आहे.
तसेच
http://www.csaceliacs.org/recipes.php येथेही बर्याच पाकृ आहेत.
तुमच्या मुलीला शुभेच्छा!
27 Jan 2011 - 11:29 pm | कच्ची कैरी
माझ्याकडुनही तुमच्या मुलीला खूप शुभेच्छा !
13 Feb 2011 - 12:54 pm | स्वाती दिनेश
हा अजून एक बिनामैद्याचा केक
ही रेसिपी मी बरीच आधी दिलेली होती, तिची लिंक तुम्हाला देत आहे.
स्वाती
पण इतक्या बिनामैद्याच्या केकृतली कोणती ट्राय केलीत ते तर सांगा..:)