इंटरनेटवर भटकंती करत असतांना एक लेख वाचण्यात आला. सदर लेख आमचेच मित्र विशाल कुलकर्णी यांनी लिहीला आहे.
त्यातील काही अंश..
बागडीचे खरेखुरे फ़ोटो काही आज उपलब्ध नाहीत. पण या फ़ोटोवरून ’बागड’ या शब्दाचे स्वरुप आणि ती ब्रिटीशांनी उभी केलेली २३०० किमी लांबीची बागड किती विलक्षण असेल याची कल्पना येवु शकेल.
आता ही प्रचंड बागड उभे करण्याची ब्रिटीशांना का गरज भासली असेल? हे जाणुन घेण्यासाठी आपल्याला थोडा त्या काळाचा आढावा घ्यावा लागेल. ही बागड त्यावेळच्या इनलँड कस्टम्स लाईन (Inland Customs Line) चा एक हिस्सा होती. त्याकाळी १८०३ साली ब्रिटीशांनी भारतातील मिठाचे स्मगलींग रोखण्यासाठी आणि मिठाच्या वाहतुकीवर टॅक्स आकारण्यासाठी म्हणुन तत्कालिन पंजाबपासुन (मुलतान :आताचे पाकिस्तान) ते थेट ओरीसा प्रांतातील सोनापूर या गावापर्यंत ही इनलॅंड कस्टम्स लाईन उभी केली होती. एकुण २५०० मैल (४००० किमी) लांबीची ही कस्टम्स लाईन म्हणजे भारतीयांच्या हक्कांवर आणि मुक्त व्यापार नीतीवर लागलेल्या बंधनाचे अवाढव्य असे मुर्त स्वरुप होते. त्या काळी या कस्टम्स लाईनची चीनच्या भिंतीशी देखील तुलना केली गेली. मिठाची चोरी करणार्या तस्करांना रोखण्यासाठी म्हणुन ब्रिटीशांनी ही कस्टम्स लाईन डेव्हलप केली. १८७२ पर्यंत इनलँड कस्टम्स डिपार्टमेंटने कस्टम ऑफिसर्स, जमादार आणि गस्त घालणारे सामान्य रक्षक असे जवळपास १४००० च्या आसपास लोक या कस्टम्स लाईन्सच्या संरक्षणासाठी म्हणुन तैनात केले होते. सन १८७९ मध्ये मिठाच्या आंतरदेशीय आयात्-निर्यातीवर टॅक्स लावला गेला जो सन १९४६ पर्यंत लागु होता. हाच मिठाचा कायदा मोडण्यासाठी महात्मा गांधींनी त्यांची ती जगप्रसिद्ध दांडी यात्रा काढली होती जिचा उल्लेख पुढे येइलच
.
लेख वाचावासा वाटला तर इथे क्लिक करा
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !! भारतीय प्रजासत्ताक चिरायु होवो !!!!
प्रतिक्रिया
26 Jan 2011 - 12:46 pm | नरेशकुमार
काही म्हणा,
पण आज शुभेच्छा देण्याची इच्छाच होत नाहीये !
26 Jan 2011 - 2:38 pm | कच्ची कैरी
तुमच्या लेखमुळे ज्ञानात भर पडली नाहीतर बागडविषयी जास्त माहिती नव्हती ,फोटो दिसु शकला असता तर अजुनच ज्ञानात भर पडली असती .बाकी तुम्हालाही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा .
26 Jan 2011 - 5:32 pm | निनाद मुक्काम प...
शीर्षकाने दिशाभूल झाली राव
26 Jan 2011 - 9:06 pm | प्राजु
विशाल.. जबरदस्त!!
खूप सुंदर परिक्षण लिहिले आहेस.
नाना, धन्यवाद!
26 Jan 2011 - 10:44 pm | असुर
हा विशेष लेख आहे. म. गांधींना त्यांची महत्वाची कामे सोडून मिठाचा सत्याग्रह व दांडीयात्रा का कराविशी वाटली या प्रश्नाच्या खर्या उत्तराकडे नेणारा लेख आहे हा!
तसेच अॅलन ह्युम या मनुष्याबद्दलही नवीन माहीती मिळाली. त्याने भारतीयांच्या मुलभूत हक्कांसाठी सरकारकडे खूप प्रयत्न केले आणि लो. टिळक आणि डॉ. अॅनी बेझंट यांच्याबरोबर 'होम रुल चळवळ' चालवली इतकाच इतिहास शिकला होता शाळेत. हाच मनुष्य मिठासारख्या मुलभूत पदार्थावर कर लावून त्याची अंमलबजावणी आणि वसुली व्यवस्थित व्हावी म्हणून असा काही विशेष प्रयत्न करु शकतो हे माहीतीच नव्हते. पक्का इंग्रज व्यापारी!
ही विलक्षण माहीती वाचायला दिल्याबद्दल विशाल यांचे मन:पूर्वक आभार!
--असुर
27 Jan 2011 - 11:36 am | llपुण्याचे पेशवेll
असुराच्या मताशी सहमत आहे. इंग्रज धोकादायक होते ते खरे यात. म्हणजे स्वतःला उदारमतवादी भासवून वागणं मात्र हिणकसच.
27 Jan 2011 - 5:49 pm | sagarparadkar
>> तसेच अॅलन ह्युम या मनुष्याबद्दलही नवीन माहीती मिळाली. त्याने भारतीयांच्या मुलभूत हक्कांसाठी सरकारकडे खूप प्रयत्न केले आणि लो. टिळक आणि डॉ. अॅनी बेझंट यांच्याबरोबर 'होम रुल चळवळ' चालवली इतकाच इतिहास शिकला होता शाळेत. हाच मनुष्य मिठासारख्या मुलभूत पदार्थावर कर लावून त्याची अंमलबजावणी आणि वसुली व्यवस्थित व्हावी म्हणून असा काही विशेष प्रयत्न करु शकतो हे माहीतीच नव्हते. पक्का इंग्रज व्यापारी!<<
हीच तर खरी गंमत आहे ...
जे लोक असे म्हणत की १८५७ सारख्या हिंसक प्रतिसादाची पुनरावृत्ती टाळण्यासाठीच ह्या 'होम रूल' चे प्यादे पुढे करण्यात आले, त्यांच्यावर आपण सहज 'अज्ञानी' म्हणून शिक्का मारून टाकतो. पण एक गोष्ट लक्षात घेतली गेली नाही की ह्या 'होम रूल' चे प्रस्थ पद्धतशीरपणे वाढवून पुढे तिचीच 'काँग्रेस' बनवण्यात आली. आणि आपल्या जुलमी सत्तेला होणारा विरोध देखील 'विधायक' मार्गानेच होईल (म्हणजे ह्या शूर भारतीयांशी परत लढाई ? नको रे बाबा ...) ह्याचीपण खबरदारी इंग्रजांनी घेतली ... आपल्या विरोधकांना अशा प्रकारे नियंत्रित करणे हे जगात फक्त ब्रिटिशांना इथेच भारतातच शक्य झाले असेल ... किती आम्ही महान ....
27 Jan 2011 - 11:50 am | गवि
यावर दिवाळी अंकात सविस्तर लेख वाचला होता. तेव्हाही असेच एकदम इंटरेस्टिंग वाटले होते.
पण काही शंका त्यावेळी मनात आल्या. इथे त्या लिहितो:
१) इतकी लांब भिंत (फिजिकल बॅरियर) बांधणे ही प्रचंड गोष्ट उल्लेखित उद्देशासाठी आवश्यक होती का?
२) ही बागड फक्त मार्किंगसाठी होती की प्रत्यक्ष त्याच्यामुळे पलीकडे जाणे अडवता यावे (फिजिकल रिस्ट्रिक्शन) हा उद्देश होता?
३) जरी दोन्हीपैकी कोणताही उद्देश असेल तरी ती बागड दगडी, कठीण मटेरियलची बनवण्याऐवजी झुडुपांची का बनवली..? लागवड, मशागत, छाटणी, मुळात ती झुडुपे हजारो किलोमीटर लांबीच्या बागडीत मधे कुठल्याही भागात मरु न देणे (जेणेकरून गॅप पडेल) ... कोरड्या भागात पाण्याअभावी ती मरू न देणे..
इ इ इ.. अशी सर्व खबरदारी घेणे हे खूप जास्त किचकट आणि दगडी भिंतीपेक्षा जास्त खर्चिक काम नव्हते का ? (दीर्घ मुदतीची रनिंग / मेंटेनन्स कॉस्ट धरता..)
शिवाय, झुडुपाच्या गुंत्याने बनलेली भिंतवजा रचना ही तरीही तोडण्यास / घुसखोरीस कठीण भिंतीपेक्षा जास्त सोपी नाही का? त्यामुळे स्मगलिंगला आळा बसेल का?
मग असे विचित्र जैविक मटेरियल का वापरले?
आणि इतक्या लांब बागडीचे अवशेष आता अजिबातच कसे उरले नाहीत? तसे त्या लेखात काही दगडांची रास सदृश फोटो आहेत, पण अगदी तशाच दिसणार्या दगडाच्या ढीगवजा राशी ब्रिटिशकालीन फॉरेस्ट डिपार्टमेंटने देशातल्या सर्वच जंगलांत मोजणी / मार्किंगसाठी रचल्या होत्या. अनेक ठिकाणच्या (दक्षिणेत, महाराष्ट्रातही, ) जंगलात फिरताना त्या पाहिल्या आहेत.