चला मंड्ळी आज तुम्हाला आम्च्या यु.पी वाल्यांची स्पेशल भाजी कशी करतात ते सांगते,आज संध्याकाळी ताडोबाला जायचे आहे १ १/२ दीवसाच्या जंगल भ्रमंती साठी, त्यासाठी भाऊरायाची खास फर्माईश होती,ही भाजी तुम्ही वांगी,कारली,तोडंली,भेंडी आणी लहान कांदे वापरुनही करु शकता,२-३ दिवस खराब होत नाही म्ह्नुन प्रवासात नेण्यासाठी बेस्ट ही भाजी शीज्त आहे हे गल्लीच्या कोपरयावरुन ही ओळ्ख्ता येते एवढा घमघमाट सुटतो,भाकरी,पराठे किवा पुरी बरोबर मस्त लागते आणी कारली वापरली असल्यास भातात चुरुन ............फ्क्त कारली घेत असाल तर मेथीदाणे वापरु नये
भरली वांगी
जरा वेगळ्या प्रकार आहे हा नेहमिच्या भरल्या वांग्या एवजी
वांगी २५० ग्राम,मी २ कारली होती घरात ती ही घेतली आहेत
बटाटे २-३
लसुण ६-७ पाकळ्या
बडी शोप २-३ चमचे
जीरे २ चमचे
मोहरी,मेथीदाणे नावाला
कलुंजी(कांद्याच्या बीया,काळ्या लहान लहान असतात,nigela seeds) १ १/२ चमचा
धणे १/२ वाटी
लाल तिखट आवडीनुसार
हळद,हींग,मीठ गरजेनुसार
आमचुर पुड १ चमचा
तेल १ १/२ ते २ वाट्या(आवडत असल्यास मोहोरीचे घ्यावे,मि तेच घेते)
बडी शोप,जीरे,घणे,कलूंजी,मोहरी,मेथीदाणे चांग्ले खमंग भाजुन घ्या व थंड करुन त्यात हळद,हिंग,तिखट,आमचुर,मिठ घालुन मिक्सर वर वाटुन पुड करुन घ्यावी,मग लसुण घालुन परत फीरवुन घ्यावे.
http://picasaweb.google.com/adv.aakash/BluetoothExchangeFolder?authkey=G...
चांग्ली कोवळी वांगी घ्यावी,देठ्या कडुन काप मारुन घ्यावेत,बटाट्याच्याही फोडी करुन घ्याव्यात व पाण्यात घालुन ठेवा
आता वांगी पाण्यातुन काढुन त्यात वाटलेला मसाला दाबुन भरुन घ्या व उरलेला मसाला बाजुला ठेवा.
तेल तापत ठेवा,चांगले कडकडीत तापल्यावर त्यात बटाट्याच्या फोडी घाला,भरलेली वांगी घालुन हलक्या हाताने ढवळुन घ्या
कढईवर ताट कुन वर वाफे करीता पाणी घाला,मंद आचेवर शीजु द्या,७-८ मीनीटांनी ढवळुन परत तेल सुटे पर्यतं शीजवा
प्रतिक्रिया
25 Jan 2011 - 3:48 pm | कच्ची कैरी
पाकृ वाचुन तर छानच असावी असे वाटतेय पण फोटो पाहुन अजुन छान वाटले असते जरा फोटो पण दाखवा ना!
25 Jan 2011 - 3:48 pm | पिंगू
हे काय रश्मीताय अजुन तुला फटु टाकायला जमत नाय? ते फटु मी टाकतो...
http://lh3.ggpht.com/_krToGOYtfyc/TT6cvL9YTNI/AAAAAAAAAEY/ZmPpjBx0WWk/Im...
http://lh5.ggpht.com/_krToGOYtfyc/TT6ddvkEVtI/AAAAAAAAAEo/mM_AHq5PGNs/Im...
25 Jan 2011 - 3:49 pm | परिकथेतील राजकुमार
25 Jan 2011 - 4:01 pm | पिंगू
पोपट झाला फोटो टाकताना... :)
25 Jan 2011 - 4:34 pm | मुलूखावेगळी
करुन बघाय्ला पाहिजेल
पन कारले कधी घातली ते तर लिहिलेलेच नाहीयेस ग
ते नीट सान्ग ना
27 Jan 2011 - 10:50 am | रश्मि दाते
मिक्स भाजी करत असाल तर सर्व भाज्या सोबतच घाला आणि वेगेवेग्ळ्या करायच्या अस्ल्यास बटाट्यांन्तर
26 Jan 2011 - 10:40 pm | राजू
आलोच भाकर,कांदा,लिंबु.घेवून.