[नेहमीप्रमाणे ;-)] सोप्पी [पा.क्रु.] टोमॅटोची भाजी

Pearl's picture
Pearl in पाककृती
24 Jan 2011 - 1:45 pm

काल रात्री उशीरा घरी आल्यावर, घरी फक्त पोळ्या शिल्लक असल्याने पटकन होणारी कोणती भाजी करावी असा विचार मनात आला. मग टोमॅटोची भाजी केली. तिची पा.क्रु. देत आहे.
साहित्यः बारीक चिरलेला लाल टोमॅटो, बा. चि. कांदा, तिखट, मीठ, साखर, फोडणीचे साहित्य
क्रुती: कढईमध्ये थोडे तेल घेउन ते चांगले तापल्यावर त्यात थोडे मोहरी-जिरे टाकले. तडतडल्यावर त्यात हिंग, हळद, घालून त्यावर कांदा चांगला परतला. मग त्यात बा. चि. टोमॅटो घातला. चांगला परतला. मग चवीपुरते तिखट, मीठ आणि थोडी साखर घातली. भाजी चांगली परतली :-) अशी सोप्पी भाजी तयार. [या भाजीत साखर नेहमीपेक्षा थोडी जास्त घालावी. म्हणजे ती अधिक रुचकर होते.]

प्रतिक्रिया

फोटो न देउ शकल्याने in advance क्षमस्व.

कच्ची कैरी's picture

24 Jan 2011 - 2:45 pm | कच्ची कैरी

अरे वा ही तर एकदम quick n easy रेसेपी आहे मी पण अशीच करते फक्त त्यात थोडा शेंगदण्याचा कूट घालते .

गवि's picture

24 Jan 2011 - 3:38 pm | गवि

चटकदार भाजी. यात शेव घालून मस्त..

मुलूखावेगळी's picture

24 Jan 2011 - 4:22 pm | मुलूखावेगळी

मस्त
माझी आवडती भाजी आहे.

पैसा's picture

24 Jan 2011 - 9:43 pm | पैसा

थोडं टोमॅटो केचप घालून बघा. आणखी छान लागते!

निवेदिता-ताई's picture

24 Jan 2011 - 9:44 pm | निवेदिता-ताई

मी अशीच करते............साखर जास्त घालुन....आंणी शेंगदाणा कूटही घालते भरपुर...
मस्त लागते.

पर्नल नेने मराठे's picture

25 Jan 2011 - 12:07 pm | पर्नल नेने मराठे

मी ही काल हिच भाजी केली होती व्होट अ कोइन्सिद्न्स ... साखर न घालता गुळ घालावा जास्त खमंग लागते.

शेंगदाणा कूटही .....नो वे :(

मुलूखावेगळी's picture

25 Jan 2011 - 12:29 pm | मुलूखावेगळी

साखर न घालता गुळ घालावा जास्त खमंग लागते.

+१००

शेंगदाणा कूटही .....नो वे Sad

खाउन बघ आम्बट कमी लागते

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.
शेंगदाणा कूट घालून पाहिले पाहिजे.

पर्नल नेने मराठे,
सही कोइन्सिडन्स :-)
कधीतरी साखर न घालता गुळ घालून करून बघेन.