लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१) पालक धुवुन बारीक चिरुन १ वाटी
२) मेथी असेल तर धुवुन, बारीक चिरुन १ मोठा चमचा
३) मटार १ वाटी
४) हिरवी मिरची (४-५)+लसुन (५-६ पाकळ्या) + आलं १ छोटा तुकडा एकत्र वाटुन
५) मक्याचे दाणे १/२ वाटी
६) कोथिंबीर १/२ वाटी धुवुन, बारीक चिरुन
७) हरभरा डाळ १ चमचा मोठा भिजलेली
८) कॉर्नफ्लोअर २ चमचे मोठे
९) मीठ चवीनुसार
१०) धणे जीरे पुड १ चमचा छोटा
११) एक उकडलेला बटाटा
१२) तीळ अथवा काजू सजावटीसाठी
१३) तेल
क्रमवार पाककृती:
प्रथम मक्याचे दाणे व मटार उकळत्या पाण्यातुन काढुन घ्यावेत.
मटार थोडे जाडसर ठेचुन घ्यावेत.
हरबरा डाळ व मक्याचे दाणे मिक्सीमधुन बारीक वाटुन घ्यावेत.(पाणी अजिबात ठेवु नये, कोरडेच वाटावेत)
एका भांड्यात मक्याच वाटण, पालक, मेथी, ठेचलेला मटार, हिरव्या मिरचीच वाटण, कोथिंबीर, धणे जीरे पुड, मीठ, उकडलेला बटाटा कुस्करुन चांगले मळुन घ्यावे. लागेल तसे बाईंडींग साठी कॉर्न्फ्लोअर मिक्स करावे.
वरील मिश्रणाचे छोटे छोटे चपटे गोळे करावेत.
तव्याला अथवा फ्राईंग पॅनला तेलाचा हात लावुन त्यावर हे कबाब ठेवावेत. वरुन प्रत्येकी एक काजू दाबुन बसवावा. (तीळ वापरणार असाल तर तव्यावर कबाब ठेवायच्या आधी त्याची एक बाजू तिळात घोळवाती व नंतर तव्यावर कबाब ठेवावा).
कडेने थोडे तेल सोडुन कबाब शॅलो फ्राय करावेत.
मंद गॅसवर दोन्ही बाजुंनी खरपुस भाजुन घ्यावेत.
चटणी, सॉस, अथवा नुसतेच गट्ट्म करावेत.
" alt="" />
वाढणी/प्रमाण:
हे काय विचारण झाल??
अधिक टिपा:
गरम गरम क्रिस्पी लागतात गार झाल्यावर (अर्थात शिल्लक राहिल्यावर चिवट व्हायची शक्यता).
तुम्हाला हव्या तश्या हिरव्या भाज्या मिक्स करु शकता.
माहितीचा स्रोत:
आंतरजालावरील पाककृती, इकडुन तिकडुन ऐकुन आणि थोड स्वतःच ज्ञान पाजळुन
प्रतिक्रिया
24 Jan 2011 - 10:07 am | पियुशा
मि खालेल्ला आहे,छान आहे रेसेपि:)
24 Jan 2011 - 1:25 pm | कच्ची कैरी
हरे भरे कबाब !!!!! हरे रामा हरे क्रिष्णा वाचव रे बाबा तोंडाला सुटलेल्या पाण्याच्या पूरापासुन!!!!!!!!!!
24 Jan 2011 - 1:33 pm | गवि
काय झकास दिसत आहेत.
हे हॉटेलात बर्याचदा ऑर्डर केले. ते दिसतात छान पण खाताना पिठूळ लागतात. खुसखुशीतपणा नसतो.
असे घरी करुन पाहिले नाहीत कधी.. पिठूळ असणे हा त्यांचा गुणधर्मच आहे अशा समजुतीने.
24 Jan 2011 - 1:38 pm | वहिनी
छा न आहे ?
24 Jan 2011 - 1:38 pm | वहिनी
छा न आहे ?
24 Jan 2011 - 1:48 pm | पिंगू
छान आहेत... बघुया कधी संधी भेटते बनवायची..
- पिंगू