साहित्य- एक वाटी बारिक चिरलेली मेथी,आठ-दहा लसुण पाकळ्या, ओवा-जिरे एक एक चमचा, मीठ, तिखट चवीनुसार, कणीक एक वाटी, एक चमचा बेसन पिठ, तेल,
कॄती- आठ-दहा लसुण पाकळ्या, ओवा-जिरे एक एक चमचा हे सर्व मिक्सरमधुन बारीक करुन घ्या,त्यात कणी़क, बेसन पिठ,बारिक चिरलेली मेथी तिखट ,मीठ चविनुसार घाला , थोडे तेल घाला,पिठात सर्व एकत्र
करुन पिठ घट्ट मळून घ्या, छोटे परोठे लाटून, तेल सोडून भाजावेत,
त्यावर साजुक तुपाचा गोळा व जोडीला सायीचे दही घ्या.
प्रतिक्रिया
22 Jan 2011 - 11:16 pm | रेवती
अगदी तवाभर केलेले गरम पराठे पाहून छान वाटले.
मला इतके मोठे जमत नाहीत. सात इंच व्यासाचे साधरणपणे करते.
तू केलेले जास्त चांगले दिसतायत.
22 Jan 2011 - 11:58 pm | चिंतामणी
अगदी तवाभर केलेले गरम पराठे पाहून छान वाटले.
पण तवा उभा केल्यावरसुध्दा पराठा पडला नाही हे कसे शक्य झाले????
:-O
23 Jan 2011 - 8:58 am | निवेदिता-ताई
हा हा हा.....................
22 Jan 2011 - 11:17 pm | ज्योति प्रकाश
उद्या सकाळच्या ब्रेकफास्टचा मेनू ठरला,काय करावे या विचारात होते,धन्यवाद
22 Jan 2011 - 11:43 pm | पैसा
मला वाटतं मेथी उपलब्ध नसेल तर कसूरी मेथी वापरून पण हे पराठे करता येतात.
23 Jan 2011 - 9:42 am | कच्ची कैरी
वाआआआअ यम्मीच दिसताय पराठे