गाभा:
कधि कधि अस्सा राग येतो म्हणुन सांगु राव ,
१० जानेवारी ला कराड शहरात एक बिबट्या भर वस्तित घुसला , त्याने ६ लोकांना जखमी केले ,
त्यातिल ३ अजुन गंभिर आहेत . त्या बिबट्याला गोळी झाडुन यमसदनी पाठवनार्या कर्तव्यदक्ष
पोलिसा वर बिन्डोक वन विभागाने आज खटला दाखल केला .
आता याला काय म्हनायचे पशुदया वगैरे सर्व ठिक आहे हो , जोवर ते मनुश्याच्या जिवावर येत नाही.
ज्या पोलिसाचा सत्कार करयचा त्यावरच खटला , खटला खरे तर वन कर्मचार्यांवर भरला पाहिजे
ज्यांनी तस्करांच्या संगन मताने जंगंल नागवले आणि वन्यजिवांना शहरात यायला मजबुर केले .
प्रतिक्रिया
21 Jan 2011 - 12:38 pm | गवि
वन्यजीवांविषयी वाईट वाटतं. पण या केसमधे जशी स्थिती होती ती पाहता (अगदी जनावराने नैसर्गिक स्वसंरक्षणाच्या हेतूने लोकांवर हल्ला केला असं गृहित धरूनही) त्याला बेशुद्ध करणे हा उपाय योग्य होता आणि ती बेशुद्ध करण्याची यंत्रणा मिळण्याच्या वेळात फार हानी होत असल्याचे दिसल्यास ठार मारणे हा उपाय योग्य होता. (खरंतर भूल देण्याची गोळी अशा अधिकार्यांजवळ सदैव हवी..)
चौकशी व्हायला हरकत नाही. पण अधिकार्याने प्रत्यक्ष स्थिती पाहून जबाबदारीने निर्णय घेतला असणार त्यामुळे ते सिद्ध होईलच. त्याला अटक - शिक्षा वगैरे थेट दिली जाईलसे वाटत नाही. त्याने योग्य तेच केले असे प्रथमदर्शनी वाटते..
21 Jan 2011 - 12:40 pm | टारझन
एकट्या बिबट्याने ६ जणांना गंभिर जखमी केले त्या बद्दल बिबट्या काकांचे अभिनंदन ..
आणि एकट्या बिबट्या काकांना अनेक पोलीसांनी भ्याडासारखे बंदुका वापरुन ठार केले त्याबद्दल त्या पोलिसांचा करावा तेवढा धिक्कार कमी च आहे. पोलिसांना नागडे करुन ओल्या फोकाने फटके द्यायला हवेत.
- (बिबट्या प्रेमी) टारका गांधी
21 Jan 2011 - 12:46 pm | परिकथेतील राजकुमार
आमचे मित्र व वन्यजीव मित्र आणि संरक्षक श्री. टारझन ह्यांच्याशी सहमत आहे.
आता मात्र श्री. अश्फाक ह्यांनी स्वत:चा मोबाईल नंबर अथवा घरचा दूरध्वनी क्रमांक तोबताबड सर्व वनखात्यांना पाठवुन द्यावा अशी मी त्यांना विनंती करत आहे. पुन्हा असा प्रसंग ओढावल्यास ते स्वतः जातीने तेथे उपस्थीत राहुन मार्ग काढतील व अशा निघॄण हत्यांना आळा बसेल.
मोगली
21 Jan 2011 - 12:43 pm | पिंगू
मुळात वन कायदा हाच भिकार आणि इतका कमकुवत आहे. जंगलाच जाउन वन्यप्राण्यांची हत्या करणारे शिकारी राजरोस सुटतात.. तर वरची बातमी वाचून सुन्न पडायची वेळ आली आहे.. :(
- (वन्यकायदा विरोधक) पिंगू
21 Jan 2011 - 1:54 pm | योगप्रभू
काही प्रत्यक्षदर्शींनी आमच्या च्यानलच्या प्रतिनिधीला दिलेल्या प्रतिक्रियेवरुन प्रत्यक्षात वेगळाच प्रकार घडल्याचे दिसते आहे.
श्री. बिबटे हे चावडी चौकातील बॉम्बे रेस्टॉरंटमधील जगप्रसिद्ध आंबोळी खाण्यासाठी नदीकाठाने चालत आले होते. मशिदीजवळच्या हिंदुस्थान डेअरीत प्रथम पिल्लांसाठी आम्रखंड खरेदी करुन मग ते हॉटेलात गेले. तेथे त्यांची शेपटी मागच्या बाकड्यावर बसलेल्या एकाला टोचल्याने भांडाभांडी झाली. तरीही वाद नको म्हणून श्री. बिबटे तेथून बाहेर पडले. प्रीतिसंगमावरील पाणीपुरी खाऊन नदीकाठाने घरी जावे, अशा विचाराने निघाले असता त्यांचा रस्ता चुकला. हॉटेलातील इसमाने बिबटेरावांचा पाठलाग केला आणि वाटेत अडवून 'शर्ट का फाडलास?' असा जाब विचारला. त्यावरुन पुन्हा हाणामारी झाली आणि पुढचा दुर्दैवी प्रकार घडला.
21 Jan 2011 - 1:57 pm | टारझन
ह्या प्रकाराबाबद बिबट्या काकाची कुंडली आणि ग्रहदशा काय म्हणते ? जाणकार सांगतात अष्टमीत गुरु आल्यामुळे हा मृत्युयोग ओढवला. :)
-(गुरु) टारझन चपटे
21 Jan 2011 - 1:58 pm | अवलिया
अष्टमीत नाही अष्टमात. आणि गुरु नसावा शनी असावा. त्यावर मंगळाची चौथी दृष्टि असुन केतुने बाधित झालेल्या शुक्राशी षडाष्टक असावा. अन्यथा असे होणे असंभव... अधिक माहिती गुंडोपंत
21 Jan 2011 - 2:02 pm | टारझन
पण बिबट्या काकांच्या गळ्यात तर टेले ब्रांड्स चे शनी नजर सुरक्षा कवच होतं . .. मग हा घातपात झालाच कसा ? टेलेब्रांड्स च्या प्रॉडक्ट्स वर बंदी यावी ...
21 Jan 2011 - 2:06 pm | अवलिया
त्याचे पैसे दिले नव्हते. चेक बाउंन्स झाला होता.
21 Jan 2011 - 10:17 pm | आत्मशून्य
हाताच्या कोपर्यापासून.