१. युयुत्सु ह्यांच्या भविष्य अथवा ज्योतिष शास्त्र पद्धती प्रमाणे ते कोणताही तोडगा अथवा उपाय करायला सांगत नाहीत. आणि एकूणच त्यांची पद्धती ही प्रचलित लोकप्रिय पद्धतींपेक्षा वेगळी दिसत आहे. त्यानी ही पद्धत नीट मराठी भाषेत समजावून सांगितली तर कदाचित होणारे गैरसमज टळतील.
२.अ. युयुत्सु ह्यांचा देव आणि धर्म ह्या गोष्टीशी संबंध नसल्याने ते हा मुद्दा मान्य करतील असे नाही. परंतु ज्या गोष्टींचे कारण आपल्याला समजले नसेल त्या गोष्टी बहुधा नशीब अथवा प्रारब्ध ह्यावर ढकलल्या जातात. खरं तर सगुण / देह रुपात सगळ्याच गोष्टी प्रारब्धावर चालतात, प्रारब्ध सर्वप्रथम देहबुद्धीवर परिणाम करते, अन जशी देहबुद्धी होते तसे आपण वागतो. अर्थात ह्यात 'फ्री विल' सुद्धा असते. ह्या सर्व गोष्टींचे गणित मला अजून समजले नाही आहे, पण पुर्वकर्मांचे फळ आपल्याला प्रारब्ध स्वरुपात मिळते असा माझा (अंध??) विश्वास आहे. आणि ज्या काही बरे-वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात ते भोग भोगूनच संपवायचे असतात. वाईट गोष्ट घडल्यास दु:ख करण्यापेक्षा, कर्ज फिटल्याचा आनंद झालेला उत्तम..
२. ब .अर्थात अशा गोष्टी तोडगा वगैरे करून टाळता येत असतील तरी टाळू नयेत असे मला वाटते.
३. एक गमतीशीर निरीक्षण: ज्या लोकांचा भविष्य / ज्योतिष ह्या विषयावर विश्वास नाही तेच असल्या धाग्यांवर जास्त वेळ खर्ची करताना दिसतात. पूर्वी मी एका याहू ग्रूप चा मेंबर होतो, जेथे युयुत्सु ज्योतिष / भविष्य ह्या विषयावर लिहायचे. तेथे सुधा ज्यांचा ह्यावर विश्वास नाही हेच लोक जास्त रिप्लाय करण्यात दंग दिसायचे. सगळ्यात हाईट म्हणजे तेथील एक सिनिअर मेंबर 'आपण तर ह्यांच्या मैल सरळ डिलीट करतो असे म्हणत नेहमी रिप्लाय करायचे'. असो..
** २.अ. मधील काही गोष्टी माझ्या अध्यात्म-विषयक वाचनातून मला जशा आठवल्या / समजल्या तशा येथे लिहिल्या आहेत. त्यात विशेष करून गोंदवलेकर महाराजांचे चरित्र वाड्गमय समाविष्ट आहे. त्या वाक्यात काही चूक आढळल्यास ती माझी समजण्यातील चूक असेल अन मूळ चरित्र वाड्गमय मधील नाही.
प्रतिक्रिया
20 Jan 2011 - 9:52 am | बंडू
'आपण तर ह्यांच्या मैल सरळ डिलीट करतो असे म्हणत नेहमी रिप्लाय करायचे'. असो..
दुरुस्ती : ***' आपण तर ह्यांच्या - मेल न वाचता - सरळ डिलीट करतो असे म्हणत नेहमी रिप्लाय करायचे' असो..***
20 Jan 2011 - 9:57 am | गवि
बरं.
काथ्याकूट काय मग ?
20 Jan 2011 - 10:45 am | स्वानन्द
हेच म्हणतो. बंडू साहेब, तुमची मते.. त्यांच्या धाग्यावरच द्या.
20 Jan 2011 - 9:59 am | वेताळ
मग कशाला रेप्लाय द्यायचे? सरळ सरळ दुर्लक्ष करायाला हवे ना?तो इसम खोटे बोलत असावा असे मला तरी वाटते.
20 Jan 2011 - 10:01 am | विकास
एक गमतीशीर निरीक्षण: ज्या लोकांचा भविष्य / ज्योतिष ह्या विषयावर विश्वास नाही तेच असल्या धाग्यांवर जास्त वेळ खर्ची करताना दिसतात.
सहमत. हेच अंधश्रद्धानिर्मुलनाच्या बाबतीतही दिसून येते. कदाचीत ज्यांचा ज्योतिष्यावर श्रद्धा आहे अथवा कुठल्याही प्रकारे अंधश्रद्ध आहेत, अशा व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या श्रद्धांना फॉलो करण्यामधे असल्या ठिकाणी उत्तरे लिहीण्यास वेळ मिळत नसावा... :-)
20 Jan 2011 - 11:19 am | प्यारे१
>>>>वाईट गोष्ट घडल्यास दु:ख करण्यापेक्षा, कर्ज फिटल्याचा आनंद झालेला उत्तम.
अतिशय सुंदर दृष्टीकोन....
अर्थात वाईट आणि चांगले हे सापेक्ष असल्याने वाईट म्हणजे कशापेक्षा वाईट ही तुलना होतेच. अशी तुलनाच मुळात चुकीची आहे.
स्पर्धा अथवा तुलना करायचीच झाली तर स्वतःशीच करावी.
ज्योतिषाशी निगडीत : मुळात आपल्याला एवढा ओढा कशासाठी हे कळत नाही. जन्माला आलेला/ली कधीतरी मरणार हे १०० % सत्य. तो आजारी पडणं, अपघात होणं( अपघात हा शब्दच अनिश्चितता दाखवतो), म्हातारं होणं या सगळ्या गोष्टी ओघाने येतातच. (जन्म, मृत्यू, जरा, व्याधी)
स्वतःशी निगडीत शारिरीक, मानसिक, बौद्धिक अडचणी, (आध्यात्मिक ताप)
जगाशी संबंधित ( यात कुटुंबियांपासून सगळे) अनेक प्रकारच्या अडचणी, पूर, वादळ, भूकंप, इ.इ. (आधिभौतिक ताप) आणि त्या सर्वांची कमी अधिक प्रमाणात मिसळ (परम्युटेशन काँबिनेशन्स) हा जीवनाचा 'अविभाज्य' भाग आहे.
यात कुठे आणि कशाला शोधाशोध करायची पुढे काय आणि कसे होईल याची....???
'काय होईल आणि कसे होईल' या मनाच्या नित्यजपाला 'जसे व्हायचे तसे होईल' हे उत्तर देऊन शांत करावे आणि आपले काम व्यवस्थित १००% करावे. 'अॅन्क्झायटी' कमी होते.
आज आहे त्या क्षणाचा आनंद घ्यावा. भूतकाळात बुड्या आणि भविष्यात उड्या कशाला...???
20 Jan 2011 - 1:19 pm | प्रशांत उदय मनोहर
क्या बात है!
20 Jan 2011 - 8:31 pm | बंडू
ह्यावर एक संस्कृत सुभाषित वाचलेले, ते इथे देत आहे:
http://www.scribd.com/doc/11769085/Sanskrit-subhashit-collection
20 Jan 2011 - 8:44 pm | मूकवाचक
आज आहे त्या क्षणाचा आनंद घ्यावा. भूतकाळात बुड्या आणि भविष्यात उड्या कशाला...???
http://www.amazon.co.uk/Worrying-Start-Living-Personal-development/dp/07...
20 Jan 2011 - 8:56 pm | बंडू
ते खरच आहे..
माझ्या मते एकदा अध्यात्म आणि आत्मशोध ह्या मार्गाने वाटचाल करायची हे निश्चित केल्यास भविष/ज्योतिष ह्या गोष्टींची आवशकता नाही.
जे लोक अध्यात्म, देव, धर्म, नीती ह्यावर विश्वास ठेवत नाहीत त्यांची चिंता / काळजी घालवण्यास ही हाऊ टु पुस्तके शोर्ट टर्म करता बरी आहेत.. अर्थात केवळ वर्तमानात जगण्यात स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्याची गल्लत होण्याची शक्यता जास्त आहे..
20 Jan 2011 - 9:21 pm | मूकवाचक
पूर्णपणे सहमत.
20 Jan 2011 - 11:28 am | स्पा
वाचनीय धागा.
जाणकारांची प्रतिक्रिया जाणण्यास उत्सुक
काल्लिंग "परा"
20 Jan 2011 - 1:38 pm | परिकथेतील राजकुमार
खुप छान विषय काढला आहेत. मिपावर तेच तेच दळण दळले जात असताना तुम्ही अशा नव्या आणि थोड्या वादग्रस्त विषयाला हात घालण्याचे धाडस केल्याचे पाहुन तुमचे कौतुक वाटते.
खुप छान मांडणी केली आहेत विषयाची. अगदी समोर बसुन गप्पा मारल्यासारखे वाटत आहे.
ह्या विषयात फारसे ज्ञान नाही, पण चर्चा वाचायला आवडेल.
20 Jan 2011 - 1:43 pm | टारझन
बंडु यांनी डॅशबोर्ड खराब करण्यापेक्षा 'चाटे कोचिंग क्लास' लावावा :) आणि खरडवह्यांतुन ग्गो ग्गो गफ्फा हाणाव्यात .. किमान काँटॅक्ट्स वाढतील त्यांचे :)
बोर्डावर घाण करु णये ;)
20 Jan 2011 - 4:28 pm | नरेशकुमार
हातात डस्टर घेउन १०-१२ लोकं तयार ठेवली आहेत.
20 Jan 2011 - 8:39 pm | बंडू
ज्या लोकांना ह्या विषयात इंटरेस्ट नाही तेच लोक ह्या विषयाचे जास्त दळण दळत आहेत.. अशा लोकांनी रिप्लाय करायचे थांबवल्यास अशा धाग्यांचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता जास्त आहे..
20 Jan 2011 - 1:45 pm | चिरोटा
काहीच कळत नाही बुवा ह्या विषयातले.मित्तल,अंबानी किंवा मल्या आडनाव लावून माझे भविष्य बदलेल का?
21 Jan 2011 - 3:18 pm | वाहीदा
चिरोटा,
तुझ्या मिपावरिल नावावर आणखिन एक 'टा' लाव . अय्या ! 'चिरो-टाटा' तु तर आता 'टाटा' यांच्या समुहात सामिल झालास की .. ;-)
काही छान फरक पडला की सांग हां मला व्यनीतून.. मज्जा आहे की नाही ? :-)
20 Jan 2011 - 3:37 pm | ५० फक्त
"आणि आज आहे त्या क्षणाचा आनंद घ्यावा. भूतकाळात बुड्या आणि भविष्यात उड्या कशाला..." प्यारे जी माझ्या जगण्याचे सिकेट असे उघडे केल्याबद्दल आपल्याला रॉयल्टी द्यावी लागेल तयार रहा.
तुमचा शोध घेण्याचे काम आम्ही प्रत्यक्ष जातीने करणार आहोत, तयार राहा नाहीतर तोडगा हुडका.
हर्षद.
20 Jan 2011 - 6:10 pm | अवलिया
गंमतीशीर बातमी आहे वाचा.
http://www.dailymail.co.uk/femail/article-1348783/Astro-fertility-helped...
20 Jan 2011 - 7:14 pm | आमोद शिंदे
नाना,
संध्यानंद तो संध्यानंद
यूके मधला असला म्हणून काय झालं?
21 Jan 2011 - 8:30 am | अवलिया
काय सांगता? आम्हाला तर कूणीतरी म्हणाले की अमेरिकन, युरोपिअन लोकं फार विज्ञानवादी असतात, आणि उदाहरणार्थ भारतातच अंधश्रद्धाळू लोक असतात म्हणे. वगैरे. इत्यादी.
21 Jan 2011 - 8:39 am | गुंडोपंत
सही रे अवलिया!
बंडू, थत्तेसाहेबांना विचारून पाहा त्यांना बरीच माहिती असते. ;)
20 Jan 2011 - 7:06 pm | मूकवाचक
http://www.arunachala.org/newsletters/2011/?pg=jan-febarticle.2
(Please refer to point 8 and 9)
20 Jan 2011 - 10:24 pm | स्वानन्द
धन्यवाद
21 Jan 2011 - 10:50 am | भारी समर्थ
जांदो ना यार....कशाला मगजमारी...
भारी समर्थ