शेवयांचा उपमा

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
20 Jan 2011 - 12:28 am

साहित्य- २ वाट्या शेवया, १ लहान कांदा, २ हिरव्या मिरच्या,मीठ चवीनुसार, १लहान चमचा साखर
२ लवंगा, एक दालचिनीचा तुकडा,काजूचे तुकडे,२ वाट्यांना थोडे कमी गरम पाणी ,लिंबू,नारळ, कोथिंबिर,
फोडणीसाठी- तेल,कढिलिंब, जिरं, मोहरी, उडदाची डाळ
कृती- शेवया कुस्करा आणि तांबूस भाजून घ्या व एका ताटलीत काढून ठेवा. तेल गरम करुन जिरं, मोहरी, हिरव्या मिरच्या, कढिलिंबाची पाने,उडदाची डाळ, लवंगा, दालचिनी अशी खमंग फोडणी करा. नंतर त्यात कांदा तांबूस होईपर्यंत परता.काजूचे तुकडे घालून परता. आता त्यात गरम पाणी घाला.मीठ व साखर घाला व उकळू द्या. चांगली उकळी आली की त्यात भाजलेल्या शेवया घाला. थोडे ओले खोबरे घाला.चांगली वाफ येऊ द्या.
खोबरे आणि कोथिंबिरीने सजवा.(फोटोतल्या डिशमध्ये खोबरे आणि कोथिंबिर घातलेले नाहीये..)
खाताना लिंबू पिळून खा.

प्रतिक्रिया

टारझन's picture

20 Jan 2011 - 12:37 am | टारझन

तोंड लाळावले !!!

विनायक बेलापुरे's picture

20 Jan 2011 - 4:21 am | विनायक बेलापुरे

हा चांगला वाटतोय.

अगदी टारझनसारखेच म्हणते.
फोटू झकास आलाय.
कधी हा उपमा करून बघितला नाही. आता ट्राय करीन.

पियुशा's picture

20 Jan 2011 - 10:20 am | पियुशा

शेवयान्चे सगळे प्रकार आव्ड्तात
चला आता कुनितरि शेवयाचि खिर पन टाका बघु !;)

मुलूखावेगळी's picture

20 Jan 2011 - 10:25 am | मुलूखावेगळी

१दम छान आहे ही रेसिपी
मी शेवयान्चा शिरा टाकेल
पियुशा तुच खीर टाका.

सहज's picture

20 Jan 2011 - 11:01 am | सहज

मस्तच!

जागु's picture

20 Jan 2011 - 12:49 pm | जागु

मस्त.

RUPALI POYEKAR's picture

20 Jan 2011 - 1:11 pm | RUPALI POYEKAR

खुपच छान,

अजुन येउद्या

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jan 2011 - 1:15 pm | परिकथेतील राजकुमार

जबर्‍या !
खुप वर्षांपुर्वी खाल्ला होता. आता एकदम आठवण ताजी झाली :)

ह्या रविवारी गणेश शेवयांचा उपमा ;)

हा आठवडा शेवयांच्या पाककृतीचा घोषीत केला जावा.. ही संपादक मंडळास विनंती...

- (चवीने शेवई खाणारा) पिंगू

कुंदन's picture

20 Jan 2011 - 1:57 pm | कुंदन

विकांताला करुन बघतो.

महेश काळे's picture

20 Jan 2011 - 2:11 pm | महेश काळे

सुंदर फोटो

खुपच छान पा. क्रु.

मेघवेडा's picture

20 Jan 2011 - 2:31 pm | मेघवेडा

मस्त पाकृ! फोटोही मस्त आलाय!

चवदार असतो एकदम.

मस्तच. मला फार्फार आवडतो.
मी यात गाजराचे तुकडे, मटार आणि मक्याचे दाणे सुद्धा घालते. मस्त लागतात.

शाल्मली's picture

22 Jan 2011 - 11:42 am | शाल्मली

फोटो छानच आला आहे.

हा माझा आवडीचा पदार्थ आहे. आजकाल रव्याच्या उपम्यापेक्षा हाच उपमा आवडतो. प्राजु प्रमाणे मी पण यात मटार, गाजर, मक्याचे दाणॅ शिवाय फ्लॉवरचे तुरेही घालते.

मदनबाण's picture

23 Jan 2011 - 7:07 am | मदनबाण

मस्त... :)
मला वाटतं बाजारात दोन प्रकारच्या शेवयांची पाकिटे मिळतात, एक न-भाजलेल्या शेवयांचे आणि दुसरे भाजलेले... गाय छाप /हात छाप वगरै असं काहीस नाव अंसतं पाकिटांचे.

स्वाती दिनेश's picture

26 Jan 2011 - 12:40 pm | स्वाती दिनेश

प्राजु, शाल्मली.. मला ह्या उपम्यात मटार, मके, फ्लॉवर इ. काही आवडत नाही, नेहमीच्या उपम्यात ते घालते पण ह्यात नाही..:)
बाणा, भाजलेल्या एकदम बारीक शेवया खिरीला जास्त वापरल्या जातात, ह्यासाठी न भाजलेल्या, जाड शेवया वापरते.
सर्व खवय्यांनो, धन्यवाद.
स्वाती

ऑफिसमध्ये फोटो दिसत नाहीत त्याचे फायदे स्वातीताईच्या खादाडीच्या धाग्यावर आले की प्रकर्षाने जाणवतात.
मी फोटो पाहिला नाही, माझी जळजळ होणार नाही! :)