थीम चांगली असूनही फसलेलं पुस्तक

सूर्यपुत्र's picture
सूर्यपुत्र in काथ्याकूट
19 Jan 2011 - 10:04 pm
गाभा: 

परवाच एक पुस्तक वाचलं : द अवेकनिंग. ले. : संजय सोनवणी.

कथेची नायिका शिबा राणी.. प्रचंड सुंदर.... आणी तेवढीच सामर्थ्यशाली, तिच्यासाठी समस्त सम्राट लोकं झुरतात.. पण ती कुणालाही भीक घालत नाही.
दररोज रात्री एका गुलामाबरोबर रत होणारी, आणी सकाळी त्याच्याच रक्ताने स्नान करणारी शिबा राणी... तिचा हा दिनक्रम (की रात्रक्रम) काही वर्षे सतत चालू अस्तो.
एका रात्री एका टोळीचा भूतपूर्व राजा शिबाच्या प्रेमापोटी तिच्याकडे गुलाम म्हणून येतो.... त्याचा तिच्याकडून अपेक्षाभंग होतो व तो तिला हे जीवन कसं भंगूर आहे हे आणि असं बरंच काही सांगून सकाळी शांतपणे मॄत्यूला सामोरं जातो.
हे शिबासाठी प्रचंड धक्कादायक ठरतं, कारण तिच्याकडे आलेला प्रत्येक गुलाम मरताना रडत-भेकत, प्राणाची भीक मागत मेलेला असतो..... आणि या गुलामाचे शांतपणे मॄत्यूला सामोरे जाणे तिला हबकवून टाकते.....

आणी येथून चालू होतो शिबाचे आत्मसंशोधन...

खरं तर थीम खूपच चांगली आहे. पण ती मॄत्यूला कसे जिंकायचे असा शोध घेते, त्यामुळे एन्ड पण काहीतरी विचित्र झालाय... असे मला वाटते.
खरं तर तिच्या अध्यात्मिक शोधाचा प्रवास रंगवला असता, तर बरे झाले असते....

पण, जरीही तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर उभे राहिलात, तरी तुमच्याकडे योग्य प्रश्न असणे अत्यावश्यक आहे, असा माझ्या दॄष्टीने सोयीस्कर धडा घेवून मी पुस्तक मिटले..............

बर्‍याचदा असा अनुभव येतो, की पुस्तकाची थीम (मराठी शब्द?) चांगली असली तरी मांडताना काही चूक किंवा त्रुटी राहिल्यामुळे ते पुस्तक फसलेलं आहे.
आपणही अशी उदाहरणे सांगू शकाल काय?

-सूर्यपुत्र.

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

19 Jan 2011 - 10:26 pm | कानडाऊ योगेशु

थीम = मध्यवर्ती कल्पना

शिबाच्या पात्रावरुन क्लिओपात्राची आठवण झाली.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jan 2011 - 10:28 pm | बिपिन कार्यकर्ते

ओळख त्रोटक वाटते आहे राव! अजून डिट्टेल लिहा की!

प्राजु's picture

19 Jan 2011 - 10:43 pm | प्राजु

अजून थोडे सविस्तर लिहिले असतेत तर बरं झालं असतं.

सुधीर काळे's picture

20 Jan 2011 - 8:04 am | सुधीर काळे

बिकासेठ आणि प्राजूशी सहमत! अजून जरा सविस्तर माहिती हवी होती. पुन्हा लिहा, चालेल!

"कथा/कादंबर्‍या" यांच्या वाटेला मी क्वचितच जाते मात्र "स्वयंसुधारणा" (सेल्फ्-इम्प्रूव्हमेन्ट) प्रकारच्या आणि संकलित अनुभव कथन या प्रकारच्या पुस्तकांवर तुटून पडते.

असच "लव्ह अँड रिस्पेक्ट" नावाचं पुस्तक हाती लागलं जे की पहील्यांदा बरं वाटलं होतं पण हळूहळू खूप सेक्सीस्ट आणि सुमार वाटू लागलं. या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना अगदीच लहानशी आहे त्यामुळे तिचा विस्तार किती होणार त्याला मर्यादा आहेतच.
मध्यवर्ती कल्पना ही आहे की एके दिवशी लेखकाला बायबलचे चिंतन करत असताना ५:३३ या कडव्यामध्ये साक्षात्कार झाला की - त्या कदव्याचे जर शब्दशः पालन केले तर स्त्री-पुरुषांच्या सर्व समस्यांचे निराकरण होऊ शकते .-

Ephesians 5:33 (New International Version, ©2010)
However, each one of you also must love his wife as he loves himself, and the wife must respect her husband.
पुरुष हे स्त्रीकडून "रिस्पेक्ट" (आदर") ची अपेक्षा करतात तर स्त्री ला प्रेम हवं असतं आणि ही विसंगती लक्षात न आल्याने दोघे एका व्हिशिअस सायकलमध्ये अडकतात. स्त्री प्रेम न मिळाल्याने आदर देऊ शकत नाही आणि पुरुष आदर न मिळाल्याने प्रेम देऊ शकत नाही वगैरे वगैरे.
कल्पना मला तरी प्रथमदर्शनी पटण्याजोगी वाटली परंतु तिला सपोर्टींग (मराठी शब्द?) उदाहरणे लेखकाला अजिबातच जमली नाहीयेत. अगदीच वेळ वाया घालविल्याची भावना मला यायला लागली आणि मी पुस्तक वाचणं सोडून दिलं. अति ख्रिस्ती आणि अति सेक्सीस्ट असं पार गंडलेलं पुस्तक आहे.

विजुभाऊ's picture

19 Jan 2011 - 11:20 pm | विजुभाऊ

"बाकी शून्य" स्तक बर्‍याच आशेने वाचायला घेतले. मध्येच नेमाडेस्टाईल मधेच शिरवाळकर स्टाईल मधेच जी के प्रधान , कानेटकर ,अच्यूत बर्वे , अनील अवचट असे करत करत ते पुस्तक नावाप्रमाणे आपल्या हाती बाकी शून्य ठेवते.
एक स्वतःला निष्कर्मी समजणारा पण प्रत्यक्षात ऐदी माणूस आनि त्याची तथाकथीत वाटचाल.
पुस्तक जामच फसलय.......
पुस्तक कसे फसते हे बघण्यासाठी जरूर वाचावे

स्वानन्द's picture

20 Jan 2011 - 9:54 am | स्वानन्द

हे पुस्तक फसले आहे असे अजिबात वाटत नाही.
>>एक स्वतःला निष्कर्मी समजणारा पण प्रत्यक्षात ऐदी माणूस आनि त्याची तथाकथीत वाटचाल.
मुळात लेखक कुठेही आपण निष्कर्मी वगैरे आहोत असे मत मांडत नाही. आणि राहता राहिला प्रश्न ऐदी असण्याचा, तर उलट तो अगदी कॉलेजात असल्यापासूनच स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत असतो. वृत्तपत्रात चित्रपट परीक्षण लिहीणे, व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणे, नंतर नोकरी करणे आणी मुख्य म्हणजे हे सर्व वडीलांचा स्वतःचा व्यवसाय असूनसुद्धा तो करतो. त्यामुळे तो ऐदी असतो हे अगदीच गैरलागू. आणि तुम्ही ज्या असंख्य स्टाईल सांगत आहात, त्या जर पुस्तकात आल्या असत्या... तर पुस्तक एकसंध झालंच नसतं. मला वाटतं तुम्हाला नेमाडे, अवचट, प्रधान यांनी निवडलेले लेखनविषय या कादंबरीत येतात असं म्हणायचं असेल. आणि जर तसं असेल तर ते होणं यात चुकीचं काही वाटत नाही. कारण इथे नायकाचा लहानपणापसून वयाच्या २९ वर्षांपर्यंतचा प्रवास आहे. आणि त्यात त्याने इतके वेगवेगळे अनुभव घेतले आहेत की ते अनुभव कथन अनेकस्पर्शी असणारच. पण त्यात 'स्टाईल' मात्र एकच राहते.

जामच "इन्सीक्योअर फील" करत होती की ती बया म्हणूनच थीम जरा नाटकी वाटत आहे.

सूर्यपुत्र's picture

20 Jan 2011 - 7:33 pm | सूर्यपुत्र

थीम नाटकी नाहीये..एक कोणतातरी फडतूस गुलाम, तिच्यासमोर नाक वर करून बोलतो... आणि बोलताना काय बोलतो, तर तिचे सौंदर्य किती भंगुर आहे. जिच्या दॄष्टीने सौंदर्य हे सर्वस्व आहे, ते असं लुप्त होणार, आणि आपण काहीही करू शकत नाही ही शिबाची खंत....

ह्म्मम्म्म्म्म....... बरोबराय, एक्दम वीक पॉइंट तीचा. आधी अशा प्रकारे ध्यानात घेतला न्हवता. कारण

सकाळी त्याच्याच रक्ताने स्नान करणारी शिबा राणी..

ही मला चूकून व्हॅम्पायर वाटून गेली, थोडक्यात इमोर्टल. म्हणून संकल्पनेत थोडा गैरसमज झाला होता.

अवांतर - सध्या वेअरवोल्फ आणी व्हॅम्पायर हेच फट्दीशी डोक्यात येते रक्त आणी स्त्री म्हटले की :p

सूर्यपुत्र's picture

21 Jan 2011 - 8:29 am | सूर्यपुत्र

>>ही मला चूकून व्हॅम्पायर वाटून गेली, थोडक्यात इमोर्टल.
नाही. व्हॅम्पायर रक्तप्राशन करतात. ही रक्तस्नान करायची. व्हॅम्पायर सारखी एखादी ब्रॅन्च असेल. ;)
आणि इमोर्टल तर नव्हती. कारण त्या गुलामाने जे मुद्दे मांडले होते, ते नाकारूही शकत नव्हती.

सातबारा's picture

20 Jan 2011 - 7:57 am | सातबारा

फारच छान परीचय करुन दिलात तुम्ही.

>>ओळख त्रोटक वाटते आहे राव! अजून डिट्टेल लिहा की!

असेच म्हणतो.

असाच प्रकार मध्य प्रदेश/ उत्तर प्रदेशमध्ये २-३ वर्षांपूर्वी घडला होता. पोलिसांना अनेक मॄतदेहांचे अवशेष मिळाले. तो माणूस आणि त्याचा साथीदारही आता आत्मसंशोधन करत असतील का ?
किंवा इतक्या हत्या केल्यावर आत्मसंशोधन केले/ नाही केले तर काय फरक पडेल?
निरपराध माणसे मारून मृत्युला कसे जिंकता येईल ?

हे किंवा असे मूलभूत प्रश्न लोकांना पडल्याने कदाचित या पुस्तकाला फारसा प्रतिसाद मिळाला नसावा.

सूर्यपुत्र's picture

21 Jan 2011 - 8:22 am | सूर्यपुत्र

शिबाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर ती हा कामविधी (रक्तस्नान) स्वःताचे सौंदर्य टिकवण्यासाठी आणि वॄद्धिंगत करण्यासाठी तिच्या धर्मगुरुंनी सांगितल्याप्रमाणे करत होती.

>>असाच प्रकार मध्य प्रदेश/ उत्तर प्रदेशमध्ये २-३ वर्षांपूर्वी घडला होता. पोलिसांना अनेक मॄतदेहांचे अवशेष मिळाले. तो माणूस आणि त्याचा साथीदारही आता आत्मसंशोधन करत असतील का ?
ती माणसे हे खून का करत असतील हे सांगता येणार नाही. कदाचित सॅडीस्टही असू शकतील. आता मनुष्य आत्मसंशोधन तेव्हाच करतो, जेव्हा त्याला आपल्या चुकांची किंवा कमतरतेची प्रखरपणे जाणीव होते.

मला, व्यक्तिगतरित्या ही कथा "अंगुलिमाल" च्या कथेशी साधर्म्य दाखवणारी वाटली.

सूर्यपुत्र's picture

21 Jan 2011 - 5:00 pm | सूर्यपुत्र

सर्व वाचकांचे, वाचून प्रतिसाद देणार्‍यांचे, वाचून प्रतिसाद न देणार्‍यांचेसुद्धा मनापासून आभार!!

बिका काका, प्राजूताई, काळेकाका आणि मा. सातबारा साहेब... लेख त्रोटक झाला आहे, यात शंकाच नाही. माझा लेखनाचा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे "शॉर्ट बट स्वीट" वाटावे, अशा पद्धतीने लेखाची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे.
तुम्ही उत्तेजन दिल्यामुळे मी अजून काही भर टाकू शकेल काय, यावर विचार केला, पण मला नाही वाटत की या पुस्तकाबद्दल मी अजून काही लिहू शकेन.... आपला आभारी आहे!!

आणि, मला ही चर्चा फक्त या पुस्तकापर्यंत मर्यादित न ठेवता, थीम चांगली असूनही फसलेली सर्व पुस्तके अशी होणे अपेक्षीत होते. पण मांडणी करण्यात माझी काहीतरी गल्लत झालेली दिसते......

कलंत्री's picture

21 Jan 2011 - 10:51 pm | कलंत्री

भाष आणि जीवन यामध्ये ( नोव्हे) मध्ये खालील उतारा वाचला.

सत्याचे प्रयोग यामध्ये रस्किनच्या अनटु द लास्ट याचा गांधींवरील प्रभाव वाचून लेखकाने बर्‍याच परिश्रमाने ते पुस्तक मिळविले आणि वाचले. परन्तु ते पुस्तक वाचुन त्यात असे काय आहे हेच त्या लेखकाला प्रश्न पडला. त्यावर त्याने असा अभिप्राय दिला की पुस्तक वाचताना मनस्थिती काय आहे हेच महत्त्वाचे असते.

चुभुदेघे.