शेवयाची खिचडी

मुलूखावेगळी's picture
मुलूखावेगळी in पाककृती
19 Jan 2011 - 9:20 pm

शेवयाची खिचडी ही पौष्टीक, डायट फुड आनि वन डिश मील आहे.

साहित्य-
१ वाटी शेवया
१ कान्दा बारिक चिरललीला
२-३ मिरच्या
मूठभर शेन्गदाणे
१/४ वाटी मुगाची डाळ भिजवलेली (असल्यास)

तेल्,जिरे,मोहरी,मीठ्,ह्ळद

क्रुती-

गॅस ऑन करुन त्यावर कढइ ठेवा.
त्यात शेवया टाकुन त्यात थोडेसे तेल टाकुन त्या भाजा.रन्ग ब्राउन येइपर्यन्त भाजा.

आता ताटात काढुन ठेवा
कढइमधे तेल टाका आनि तापल्यावर मोहरी-जिरे टाका.
आता मिरची आनि कान्दा टाका.
कान्दा परतत आल्यावर त्यात मुगाची डाळ भिजवलेली टाका.
आनि ५ मिनिटे झाकन ठेवुन वाफ येउ द्या.
मूग शिजल्यासारखे झाले असतिल तर त्यात मीठ्,हळद टाका.
आता त्यात १ वाटी पानी टाका
आनि त्याला उकळी आल्यावर भाजलेल्या शेवया टाका.
झाकन ठेवुन सगळे पानी आटुन जाउ द्या.
होत आल्यवर किन्वा ताटात वाढ्ताना १ चमचा चान्गले तुप टाका जास्त छान लागते.

आता ताटात घेउन पोटात जाउ द्या

प्रतिक्रिया

अंतु बर्वा's picture

19 Jan 2011 - 9:55 pm | अंतु बर्वा

लई भारी... करुन पाहिली पाहिजे.

मेघवेडा's picture

19 Jan 2011 - 9:57 pm | मेघवेडा

आईशप्पत लै भारी!!

चला पोह्यांना पर्याय मिळाला.. चांगली आहे खिचडी..

- पिंगू

ए हि तर माझि आवडति खिचडि आहे यम्मि !

पहिल्यांदाच ही आयडिया पाहिली. आजच सकाळी दलिया-उपमा ब्रेकफास्टला होता. तेव्हा विचार आला होता की यात तूरडाळ घातली तर?

शेवयांचा उपमा / ख्रीर केलेले आहे. हा मात्र एक नवा प्रकार झाला.

सहज's picture

20 Jan 2011 - 10:59 am | सहज

करुन पाहीले पाहीजे.

स्पंदना's picture

20 Jan 2011 - 11:52 am | स्पंदना

आवडल!! करुन सांगेन.

विकपॉइंट पकडला आहे माझा . निषेध !!!

- (शेवया न नुडले प्रेमी) टांग शुं वांग

महेश काळे's picture

20 Jan 2011 - 2:25 pm | महेश काळे

इनोव्हेटिव्ह आयडीया

आयडियाची कल्पना छान आहे

आयडियाची कल्पना छान आहे

स्वानन्द's picture

20 Jan 2011 - 2:40 pm | स्वानन्द

चांगली आयडीया आहे!

कच्ची कैरी's picture

20 Jan 2011 - 2:44 pm | कच्ची कैरी

शेवयांची खिचडी प्रथमच वाचली ,करुन बघायला हवी

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Jan 2011 - 3:54 pm | llपुण्याचे पेशवेll

कल्पणा छाण वाटते आहे. पण खिचडी इतकी तेलकट का दिसत आहे बरे?

मुलूखावेगळी's picture

21 Jan 2011 - 10:03 am | मुलूखावेगळी

सर्व प्रतिक्रिया देनार्यान्चे अनि वाचकान्चे आभार

मला वाटले नव्ह्ते कि ही बर्याच लोकान्साठी नवीन रेसिपी असेल
असो ट्राय करुन सान्गा
@ पिन्गु
सहमत आहे
@पुपे
तुम्हाला खरड केलिये