आपण पांढरा हत्ती पाळताय का ? ( उत्तरार्ध)

असहकार's picture
असहकार in काथ्याकूट
19 Jan 2011 - 1:24 pm
गाभा: 

पांढरा हत्ती म्हणजे काय रे भाऊ ?

न झेपणारा पण खोट्या मानपानाकरता , बडेजावाकरता करत असलेला खर्च ?
का
न झेपणार्‍या , न पटणार्‍या पण प्रवाहासोबत राहण्याकरता अंगीकारलेल्या सवयी ?
का
न झेपणारी, पण पटणारी पण प्रवाहाविरुध्द पोहण्याची धड्पड ?
का
मुल्यांशी केलेली तडजोड जी जीवाला बोचणी लावते ?

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(आधीच्या धाग्याला दिलेल्या प्रतिसादाकरता धन्यवाद.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पांढरा हत्ती म्हणजे न झेपणारा पण खोट्या मानपानाकरता , बडेजावाकरता करत असलेला खर्च असा अर्थ असला तरी
खर्च ही संकल्पना व्यापक आहे,

खर्च हा पैशानेच होतो असे नाही, फक्त तो दिसतो व समजतो,

खर्च म्हणजे आपल्याजवळील साधनसामुग्रीचा उपयोग (Utilisation of resources)

पण, आपले मानसिक , शारिरीक , भावनीक, पण खर्च असू शकतात,

उदा.
सिगरेट ( शारिरीक खर्च )

न आवडणार्‍या रुढी (मानसिक खर्च )

मनात घर करुन बसलेल्या आठ्वणी भांडण , प्रेमभंग इ. (भावनीक खर्च)

असे पांढरे हत्ती आपल्या जीवनात शोधा,

सापडले तर आपण त्यांना का पाळतो याचा विचार करा .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
( It is easy to understand that financial expenses which are unnecessary, but we keep on doing is WHITE ELEPHANT, but the expenses are not limited to financial only. Your mental, physical, emotional activities are also an expense on your life. Find out which are unproductive and dis-empowering , and think why do you need them, shouldn't you get rid of them ?)

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

19 Jan 2011 - 1:49 pm | चिरोटा

हल्लीच पाळले होते. हत्ती पकडायची गाडी आली आणि सगळे हत्ती गेले.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Jan 2011 - 11:21 pm | विश्वनाथ मेहेंदळे

हीहीही !!!! प्रतिसाद ऑफ द डे !!!!!!!!!

परिकथेतील राजकुमार's picture

19 Jan 2011 - 1:54 pm | परिकथेतील राजकुमार

जुन्या धाग्याचा उत्तरार्ध, अर्थात हा नवा धागा देखील सुंदर.

जाणकारांच्या प्रतिक्रीया वाचायला आवडतील.

मिपा वर नांदतोय की मजेनं.

नरेशकुमार's picture

19 Jan 2011 - 5:24 pm | नरेशकुमार

पांढरा हत्ती खाल्लेला आहे का कोणि ?
चव कशी लागले त्याची ?

निखिलेश's picture

19 Jan 2011 - 6:32 pm | निखिलेश

हात्तीच्या........

कवितानागेश's picture

19 Jan 2011 - 6:52 pm | कवितानागेश

अनेकजण कंप्युटरलासुद्धा 'पांढरा हत्ती' म्हणतात.
त्यावर होत असलेला, झालेला खर्च, आणि केला जाणारा उपयोग या गोष्टी प्रामाणिकपणे पाहिल्या तर हे नाव पटते. ;)
भावनिक खर्च हा मुद्दा पटला.
आपल्या डोक्यात बॅकग्राउंडला अनेक नाही नाही ते विचार चालू असतात, त्यात बरीच 'रॅम' खर्च होत रहाते, अनेक 'हत्ती' मेन्दूत अखंड चरत रहातात, आणि एकंदरीत क्रयशक्ती कमी होत रहाते....

असहकार's picture

20 Jan 2011 - 4:28 pm | असहकार

धन्यवाद

शुचि's picture

19 Jan 2011 - 8:29 pm | शुचि

छान आहे लेख. आवडला. हो आम्हीसुद्धा एक पांढरा हत्ती पाळतो आहोत पण इलाज नाही :(

असहकार's picture

20 Jan 2011 - 7:03 pm | असहकार

प्रतीसादाबद्दल धन्यवाद

विजुभाऊ's picture

30 Jan 2019 - 2:05 pm | विजुभाऊ

चार चाकी गाडी बाळगणे हा पांढरा हत्ती म्हणावा का? ( गाडी भाड्याने देणे / लावणे वगैरे साठी उपयोग करीत नसल्यास )
यावर होत असलेला, झालेला खर्च, आणि केला जाणारा उपयोग या गोष्टी तसेच त्यामुळे वाचवलेला / केलेला खर्च आणि कुटुंबासमवेत मजेखातर झालेल्या ट्रीपमधील इन्टँजीबल आनंद यांचा हिषेब कसा करायचा

सुबोध खरे's picture

31 Jan 2019 - 12:32 pm | सुबोध खरे

चारचाकी गाडीचा हप्ता आपल्या हातात येणाऱ्या पगाराच्या/ उत्पन्नाच्या १० % पेक्षा जास्त असू नये आणि हे जर ३०% पेक्षा जास्त असेल तर ते डोइजड( पांढरा हत्ती म्हणावे काय) होते असे एका अर्थविषयक तज्ज्ञाचे मत वाचलेले आठवते.

गाडी म्हणजे पांढरा हत्ती हे आपल्या मानण्या ना मानण्यावर आहे. प्रत्येक गोष्ट पैश्यात तोलता येत नाही. प्रत्येक अशी गोष्ट जिच्यापासून आर्थिक फायदा होत नाही ती म्हणजे पांढरा हत्ती असे मानून चालत नाही.
उदा. आपल्या घरी जर एखादा कुत्रा किंवा दुसरा पाळीव प्राणी असेल तर त्यापासून देखील कोणताच आर्थिक फायदा होत नाही.. मग हा सुद्धा पांढरा हत्ती समजायचा का???

स्वतः ची गाडी आणि भाड्याने मिळणारी गाडी या दोन्ही मध्ये आर्थिक तुलनेने भाड्याची गाडी जरी परवडत असली तरी हे आपल्या मानण्या न मानण्यावर आहे.. गाडीच्या बाबतीत कित्येक गोष्टी आहेत ज्या आपण पैश्यात नाही तोलू शकत...!!

विजुभाऊ's picture

31 Jan 2019 - 10:25 am | विजुभाऊ

लग्न करणे हा देखील पाम्ढरा हत्ती पाळण्यासारखेच आहे.
त्यामुळे बायको/नवरा या प्राण्याच्या आयुष्यभर खिदमतीत रहायची सक्ती , सोबत येणारे नको असलेले नातेवाईक , मुले इत्यादी गोष्टी आनि त्या पासून मिळणारा आनंद आणि त्रास यांचा ताळा करायला गेलो तर लग्न करणे म्हणजे पांढरा हत्ती पोसणे असेच होईल

पांढरा हत्ती म्हणजे थोडक्यात दाखवायला भव्य पण काहीच कामाचं नसलेला आणि भरमसाठ खाण्याचा खर्च आसलेल्या ऐक काल्पनिक प्राणी .
ासे पांढरे हत्ती पाळणे हे खूप लोकांचा शोक असतो आणि तो शोक ते खर्च उचलून पूर्ण करतात कितीही नुकसान होत असलं तरी चेहऱ्यावर कसलाच दुःखाचा भाव न दाखवत आनंदानी खर्च करतात .
किमती गाड्या .
करोड रुपये किमतीच्या गाड्या फक्त mothepanasathi खरेदी करणे हा पांढरा हत्ती आहे ना रस्त्यावर पार्क करता आणि प्रवासात नेहमी विचार कोण्ही घासणार तर नाही .
पेट्रोल खूप महाग महिन्यातून ऐकदाच रस्त्यावर kadu .
दुसरं गरज नसताना ३०००/४००० sq,/feet Ch घर घेणे भरमसाठ कर्ज काढून