एकोळी धाग्यांचे मिसळपावावर एवढे वावडे का आहे कळायला मार्ग नाही. एकोळी धागा अनेक कारणांनी निघू शकतो.
- फेसबुक वर असलेल्या स्टेटस आणि लिंक च्या सुविधा या एकोळी धाग्यांशी साधर्म्य दाखवतात. त्याच धर्तीवर माझे एकोळी धागे असतात. यात फार मोठा अपराध आहे असे मला वाटत नाही. मिसळ्पाव हे फेसबुक नाही असा युक्तीवाद काहीजण करतील पण पुण्यात गाडी चालवायची ज्याना सवय आहे ते मुंबईत (सहसा) पुण्यासारखीच गाडी चालवतात आणि त्याउलट मुंबईत गाडी चालविणारे पुण्यात गोंधळून जातात.
- फालतु चर्चा टाळायला कमीत कमी शब्दात माहिती शेअर करणे मला श्रेयस्कर वाटते. शिवाय शेअर केलेली माहिती सेल्फ एक्सप्लेनटरी असेल तर आणखी स्प्ष्टीकरण द्यायची मला आवश्यकता वाटत नाही.
- अनेक वेळा आपण एखादे पुस्तक/अल्बम इ मित्राला देताना हे वाचच किंव हे ऐकच एवढंच सांगून देतो. दर वेळेला पुस्तकात काय आहे ते "चार-पाच वाक्यात" सांगत नाही.
एकोळी धाग्यांचा एवढा खुलासा पुरेसा ठरावा...
प्रतिक्रिया
18 Jan 2011 - 10:53 am | मी-सौरभ
एकोळी धाग्यांऐवजी ख्.फ. चा वापर संयुक्तिक नाही का?
कित्येक धागे हे खफ वर जास्त योग्य वाटले असते.
18 Jan 2011 - 12:26 pm | टारझन
एकोळी च्या धाग्याचे स्पष्टीकरण द्यायला एवढा मोठा धागा काढने तद्दम बौद्धिक दिवाळखोरीचा णमुणा आहे :)
एवढंच वाटत होतं तर चालु द्यायचं होतं आपलं आपलं :) प्रतिसाद कसे यावेत हे धागाकर्ते कसे काय ठरवु शकतात ?
दिलेले मुद्दे सेल्फ एक्स्प्लनेटरी आहेत की नाहीत हे स्वतः कसे ठरवणार? त्याचा संदर्भ - आगापिछा सर्वांना माहिती असेलंच कसा ? ;)
आम्ही तर बाबा एकोळीच्या धाग्यांवर मस्त बोटसुख घेणार :) बाकी चालु द्या :)
- टारोत्सु
18 Jan 2011 - 12:18 pm | गवि
धागा हा शब्दांच्या संख्येने मोजला जावा हे मलाही पटत नाही. तस्मात या बाबतीत धागाकर्त्याशी सहमत.
अर्थात मोजून चार शब्दातही खूप काही सांगता येतं आणि वाचणार्याचे खूप विचार जागे करता येतात.
आणि चार पाने लिहूनही त्यात अंशभरही मुद्दा नसू शकतो.
तेव्हा काय लिहिलंय हे महत्वाचं. नुसती लांबी नव्हे.
"एकोळी धागे टाकू नयेत" अशा कन्व्हेन्शनचा याचा मूळ उद्देश नक्कीच तथ्यपूर्ण आहे. उगीच स्पॅम म्हणून "काय म्हणता?", "कसं काय?" अशा अर्थाचे हजारो धागे येऊन फोरमचा मूळ हेतू धोक्यात येऊ नये म्हणून जनरली असं म्हटलं जातं.
फायनल मत देताना मात्र जे लिहिलंय (सो कॉल्ड बरं, वाईट..) त्याने वाचणार्याच्या मनात काय निर्माण होतं त्यावर अवलंबून द्यावं.. फक्त शब्दसंख्येवर नव्हे.
.........................
उदा: नोकरीचा शेवटचा दिवस.
----
माझ्या सहकर्मचारी मित्रांनो,
आज माझा या कंपनीतला शेवटचा कामाचा दिवस आहे. या दहा वर्षांत मी इथे खूप काही शिकलो. माझ्या सहकार्यांकडून आणि वरिष्ठांकडून वेळोवेळी सहकार्य आणि कौतुकाची थाप मिळाली.
जसे गोड तसेच कडू अनुभव येणारच. या सर्वांतूनच मी शिकत.....
इ इ इ इ...
.............................
या सर्वांपेक्षा जास्त इम्पॅक्टः
"गुडबाय. मित्रांनो. (पूर्णविराम)"
एवढ्या एका ओळीनेही येऊ शकतो. ही एक ओळ जास्त थॉट प्रव्होकिंग आणि बोलकी ठरते. त्या व्यक्तीच्या दहा वर्षांची श्रीशिल्लक दाखवते.
असो.
18 Jan 2011 - 12:20 pm | शिल्पा ब
<<आणि चार पाने लिहूनही त्यात अंशभरही मुद्दा नसू शकतो.
अगदी अगदी...कालेजात पानभर उत्तर लिहून एखादाच मार्क तर कधी एखादा उतारा लिहून पानभर मार्क मिळतात असा अनुभव आहे...(अर्थात एखाद्या मार्काचाच जास्त अनुभव आहे हे सांगू इच्छित नाही )
18 Jan 2011 - 12:29 pm | नन्दादीप
>>>अगदी अगदी...कालेजात पानभर उत्तर लिहून एखादाच मार्क तर कधी एखादा उतारा लिहून पानभर मार्क मिळतात असा अनुभव आहे...
दोन पानाचा program लिहून पण पाव मर्क्स दिला आहे आम्हाला. विचारल की पाव मार्क देता येत नाही, तर म्हणतात कसे, "पहिली ओळ बरोबर लिहीलीय म्हणून पाव, नाहितर शून्यच देनार होतो".
असो....गेले ते दिन गेले....
18 Jan 2011 - 5:54 pm | प्रीत-मोहर
आपण आयटीवाला हौत हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न
18 Jan 2011 - 6:23 pm | नन्दादीप
हा हा हा....
>>आपण आयटीवाला हौत हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न.
आपल्याला आय.टी. मदल काय पण जमत नाय हे दाखवायचा दमदार प्रयत्न होता तो.
आपण आपल मत दिल..बाकी कोणी कस वाचायच, काय अर्थ काढायचा हे आम्ही कोण ठरवणार????
18 Jan 2011 - 1:26 pm | कानडाऊ योगेशु
माझ्या निरीक्षणानुसार मिपासंस्कृतित जर तुम्ही एखादी लिन्क देत असाल तर तिथे काय लिहिले आहे ह्याबद्दल व धागाकर्त्याचे स्वतःचे मत वगैरे देणे आवश्यक आहे असे वाटते.
एकोळी वा दोनोळी धाग्याच्या नावाखाली काही लिन्कस द्यायच्या आणि तिथे जाऊन काय ते वाचा आणि इथे आपले मत नोंदवा असे वाचकांना म्हणणे म्हणजे एखाद्या लग्नात जायचे जेवायला दुसर्याच कुठल्यातरी हॉटेलात आणि हात धुवायल परत कार्यालयात असा प्रकार झाला.
लिन्क्स द्यायच्या नावाखाली उद्या कोणीही दहा बारा वर्तमानपत्रांच्या लिन्क्स देईल आणि अमुक अमुक बातमी वाचा आणि त्याच्याबद्दल तुमचे मत इथे लिहा अश्या आशयाचा धागा काढला तर चालणार आहे का?
मुळात बरेच जण मिपावर येतात ते इथले अस्सल लेखन/प्रतिक्रिया वाचायला तिथे जर कुणी असा फक्त लिन्क्स असणारा धागा वाचायला उघडला तर "जोशी दुसरीकडे राहतात उगाच इथे चौकशी करु नये" टाईप अपमान झाल्याचा फिल येतो.
18 Jan 2011 - 3:31 pm | गणेशा
धागे कसे का असेनात चालतात ..
पण तुमचे मत द्या असे म्हणुन स्वताचे मत न देणार्या माणसांचा मला राग आहे.
बाकी
एका ओळीत .. दोन ओळीत किंवा शंभर ओळीत काय आहे हे महत्वाचे.
18 Jan 2011 - 5:30 pm | पाषाणभेद
अहो पण त्या एकोळी धाग्यात तुमचे मत काय? अन केवळ दुसर्या लिंका द्यायला हे काही सर्च इंजीन नाही.
म्हणूनच एकोळी धागा जर काढायचाच असेल तर तुमचे मतही व्यक्त करत चला म्हणजे तो निश्वितच एकोळी धागा होणार नाही, काका.
18 Jan 2011 - 5:45 pm | विकास
मिपा हे फेसबुक नाही आणि चर्चा या स्टेटस अपडेट्स पेक्षा वेगळ्या असतात.
18 Jan 2011 - 9:39 pm | प्राजु
चर्चा करायची असेल तर त्या चर्चेला स्वतःचे मत काय आहे ते नोंदवून मगच सुरुवात करावी. लिंक देऊन त्यामध्ये मांडलेले मत आपले असेल तर ते तसे तरी नमूद करावे.
मिपा हे मराठी लोकांसाठी व्यक्त करण्याचे व्यासपिठ असले तरीही कोणाही धागाकर्त्याने या व्यासपीठावर येऊन.. घ्या लिंक आणि करा चर्चा.. असा अॅटूट्यूड ठेवणे योग्य नाही.
तेव्हा.. मिपाचा उपयोग योग्य रितिने चर्चा करण्यासाठी करावा ही विनंती.
18 Jan 2011 - 11:03 pm | विकास
मिपा हे मराठी लोकांसाठी व्यक्त करण्याचे व्यासपिठ असले तरीही कोणाही धागाकर्त्याने या व्यासपीठावर येऊन.. घ्या लिंक आणि करा चर्चा.. असा अॅटूट्यूड ठेवणे योग्य नाही.
सहमत.
आणि, त्या संदर्भात "मिसळपावचे आधिकारीक धोरण" कलम ६. लक्षात ठेवावेत असे वाटते.
19 Jan 2011 - 6:49 am | इन्द्र्राज पवार
"...मिपाचा उपयोग योग्य रितिने चर्चा करण्यासाठी करावा ही विनंती...."
+ प्राजुताईंच्या या मताशी सहमत.
श्री.विकास यानी मिपाच्या ज्या धोरणाचा उल्लेख केला आहे (शिवाय अन्यही) हे आपण बोनाफाईड मेंबर्स या नात्याने पाळलेच पाहिजेत. अन्य धाग्यावरील श्री.युयुत्सु यांच्या लिखाणाची हातोटी पाहता त्यानी अन्यत्र दिलेल्या दोन लिन्क्सबद्दल चार वाक्ये लिहिण्यास काहीच अडचण नव्हती. शिवाय अन्य काही सदस्यांनी थेट कबूलच केले आहे की, "आम्हाला इंग्लिश येत नसल्याने इंग्लिश लिंक्स इथे देऊ नयेत...".
शिवाय मि.पा. तुम्हाआम्हाला सेवेबद्दल कोणत्याही प्रकारचे शुल्कही आकारत नाही, त्यामुळे नैतिक दृष्टीने त्यांच्या सुचनांचे यथायोग्य पालन व्हावे अशी त्यांची अपेक्षा असेल तर आपण एक सुजाण सदस्य या नात्याने ती डावलू नये इतकेच.
(थोडेसे मिपा संपादक मंडळासाठीही : धोरणात 'एकोळी धागे उडवले जातील...' असे जर म्हटलेच आहे तर मग त्याबाबतची कार्यवाहीसुद्धा झाली तरच धोरण परिणामकारक राबविले जाते असे सदस्यांना जाणवेल.)
इन्द्रा