सान्डग्याची आमटी

मुलूखावेगळी's picture
मुलूखावेगळी in पाककृती
17 Jan 2011 - 9:58 pm

ही सान्डग्याची आमटी माझी फेवरेट आहे मह्नुन मी ती इथे शेअर करत आहे

सान्डगे- वाळवनातला १ प्रकार आहे
बाहेर किराना दुकानात पन मिळतात.

साहित्य-
१ कान्दा मध्यम चिरुन घ्यावा.
१०-१५ लसनाच्या पाकळ्या निवडलेल्या आनि बारीक केलेल्या किन्वा पेस्ट
आनि १/२ इन्च आले ठेचलेले
१ वाटी सान्डगे
२- मोठे डाव तेल
जिरे,मोहरी,हिन्ग्,तिखट्,मीठ्,मसाला. जेवढे लागेल तसे

१ वाटी सान्डगे त्यात १ मोठा डाव तेलात तळुन घ्यावे. मन्द आनि थोडे हाय गॅस्वर आनि रन्ग ब्राउन होइपर्यन्त परतावे.

आता गॅस ऑन करुन छोटा कूकर ठेवा .त्यामधे १ डाव तेल टाकुन तेल तापु द्या.
तेल तापल्यावर त्यात जिरे-मोहरी टाकुन तडतडु द्या मग त्यात हिन्ग टाका.
आता लसुन बारिक/पेस्ट केलेला टाका, आल्याची पेस्ट टाका.
रन्ग ब्राउन झाल्यावर त्यात कान्दा टाकुन परता.
कान्दा गुलाबि झाल्यवर त्यात तळलेले सान्डगे टाका.
आनि तिखत्,मीठ्,मसाला काळा टाकुन हलवा थोडी झाकन्टाकुन वाफ काढा.

आता ३ वाटी पानी टाका आनि कूकर् चे झाकन बन्द करा गॅस हाय करा.
(ह्याला शिजाय्ला वेळ आनि पानि जास्त लागते)

तुम्हाला जर थोडेस कच्चे चालत असेल तर ५ शिट्ट्या झाल्यावर बन्द करा नाहीतर ७-८ शिट्ट्या होउ द्या.
आता कूकर थन्ड झाल्यावर सर्व्ह करा.
ही भाकरी, पोळी, तसेच भातावर पन छान लागते.

प्रतिक्रिया

माझी आवडती पाक कृती टाकायची मला ह्या आधी बुद्धी का झाली नाही? बाकी सांडग्यांची आमटी म्हणजे माझा विक पाँईट.

- पिंगू

मुलूखावेगळी's picture

17 Jan 2011 - 10:33 pm | मुलूखावेगळी

हा फोटू आमटी झाल्यावर चा

निवेदिता-ताई's picture

17 Jan 2011 - 10:48 pm | निवेदिता-ताई

मस्त...मस्त...मला फ़ार आवडते..अशी सांड्गा भाजी.

छान पाक्रु उत्तम

पण एकच फोटो का हो ? इथे प्रत्येक स्टेपचा फोटो लागतो आणि तयार पदार्थाचा तर लागतोच, नाही तर करणा-याला कळणार कसं एंड प्रॉडक्ट कसं आहे ते.

आता पुन्हा एक्दा करा आणि बोलवा खायला.

हर्षद.

५० फक्त's picture

17 Jan 2011 - 10:56 pm | ५० फक्त

माफ करा तयार फोटो पण दिसला, भाकरी पण भाजलेली आहे छान. आता हे खाण्यासाठी बायको / आईला पॉलिश करावं लागेल आणि उद्या संध्याकाळ पर्यंत थांबावं लागेल.

नुसते फोटो टाकुन व पाक्रु लिहुन प्रत्यक्ष जेवायला न बोलवणा-या छळ्करी मिपाकरांची वाढती संख्या हा एक चिंतेचा विषय आहे.

हर्षद.

सांडग्यांची लहाणपणीच शिसारी बसली आहे :) पण एकदा ट्राय करायला हरकत नाही. कधी बोलवताय काकु ?

शेखर's picture

18 Jan 2011 - 7:48 am | शेखर

त्यामुळेच सांगत असतो एखादी चिंचेची काडी जवळ ठेवत जा.... ;)

रेवती's picture

17 Jan 2011 - 11:40 pm | रेवती

भन्नाट आवडता प्रकार आहे.
माझ्या मावससासूबाईंच्या हातची कांदा सांडग्याची आमटी आणि तळणीच्या दही लावून सुकवलेल्या मिरच्या जेवणात असल्या कि दुसरे तोंडीलावणे नसले तरी चालते.
फोटू बघून इनो घ्यावाच लागणार.

डावखुरा's picture

17 Jan 2011 - 11:44 pm | डावखुरा

नुसते फोटो टाकुन व पाक्रु लिहुन प्रत्यक्ष जेवायला न बोलवणा-या छळ्करी मिपाकरांची वाढती संख्या हा एक चिंतेचा विषय आहे.
+१

सांडग्याची भाजी / आमटी अन ज्वारीची भाकरी आहाहा !! पण गावासारखे सांडगे इथे नाही मिळत :-(

परिकथेतील राजकुमार's picture

19 Jan 2011 - 11:53 am | परिकथेतील राजकुमार

ख प लो !!

सांडग्याची भाजी / आमटी अन ज्वारीची भाकरी आहाहा !! पण गावासारखे सांडगे इथे नाही मिळत

हेच बोल्तो.
आणि दुकानात जे सांडगे मिळतात ते इतके भिकार चवीचे असतात कि काय सांगायचे.

झकास !!

सांडगे कुठे भेटले ग ?

माझ्या कडे आहेत. नुकतेच घेउन आले आहे मी. विसरलेच होते मी. धन्यवाद मुलुखा वेगळी!

मुलूखावेगळी's picture

18 Jan 2011 - 10:48 am | मुलूखावेगळी

@शेखर
चिन्चेची काडी कळले नाही.
@ सुहास
किराना दुकानात मिळतात आजकाल.
@टार्या,लालसा,हर्शद
इतक्या लोकाना बोलवायला जास्त तयारी लाग्ते ना.
तयारी झाली कि सान्गतेच मी
प्लीज सान्डगे नक्कि काय असतात कशाचे असत्तत ते जरा कोनि सान्गु शकाल का?

वरील सर्वान्चे प्रतिक्रियेबदद्ल/वाचनाबद्दल आभार.

ज्योति प्रकाश's picture

19 Jan 2011 - 12:09 am | ज्योति प्रकाश

सान्डगे कोहाळ्याचा किसाचे करतात.

गुंडोपंत's picture

18 Jan 2011 - 10:59 am | गुंडोपंत

सुंदर! आवडली.

नन्दादीप's picture

18 Jan 2011 - 11:10 am | नन्दादीप

मस्त.....कधी बोलवताय जेवायला????

आजानुकर्ण's picture

18 Jan 2011 - 12:11 pm | आजानुकर्ण

मुगाची डाळ घालूनही सांडग्यांची वेगळ्या प्रकारची कांदाविरहीत भाजी करता येते. कांद्याचे भाव वाढल्यामुळे आम्ही सध्या कांदाविरहीतच सांडगे खाल्ले. कांदे स्वस्त झाल्यावर वरील पद्धतीनेही करून पाहू.

आत्मशून्य's picture

19 Jan 2011 - 7:18 am | आत्मशून्य

तो आमटी झाल्यावर्चा फोटो टाकून टॉर्चर करायची काय गरज होती ? आता चैन नाही पडणार खाल्याशीवाय :(

साधा_सरळ's picture

19 Jan 2011 - 11:44 am | साधा_सरळ

स्स... स्स... स्स...
सांडग्यांची आमटी होय? धागा आला तेव्हा 'लांडग्यांची आमटी' असं वाचलं चुकून...
असो. हा पदार्थ (म्हणजे सांडग्यांची आमटी) लहानपणी (मिटक्या मारत) खाल्ल्याचं चांगलं स्मरतं. उत्तम पदार्थ! पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल आभार!

दिपक's picture

19 Jan 2011 - 12:39 pm | दिपक

सांडग्याची आमटी, भाजी खुप आवडते. शेंगदाण्याच्या आमटीत पण छान लागते. बाजरीची भाकरी हवी. :-)

मुलूखावेगळी's picture

19 Jan 2011 - 1:39 pm | मुलूखावेगळी

@ आजानुकर्ण
तशी ट्राय करुन बघते.

@वहिदा, परा
अरे आमच्या कडे तर किराना मधे मिळनारे लोकल ग्रुहउद्योग वाल्याच ठेवतात तर ते चान्गले असतात.

आनि
@ ज्योतिप्रकाश
हे कोहळ्याचे नसतात हो
हे वेगळे आहेत.

बाकि सर्वान्चे आभार

अवलिया's picture

19 Jan 2011 - 2:25 pm | अवलिया

मस्त !!!

महेश काळे's picture

19 Jan 2011 - 6:34 pm | महेश काळे

पा क्रु मस्त...

फोटु सुरेख...

धन्यवाद !