करायला गेलो एक आणि..

सुहास..'s picture
सुहास.. in पाककृती
17 Jan 2011 - 10:00 am

आमचा विकांत हा नेहमी स्पेशल असतो (कसला डोंबलाचा स्पेशल काय माहीत ? पण आपल ते स्पेशल आण दुसर्‍याच ते ... असो असे म्हणायची पध्दत आहे )

तर, या शुक्रवारी, मी सुरुवात केली तीच मुळात रात्री नउ वाजता (तेच ते आयटी वाल्यांच सुप्रसिध्द कारण ).

घरी भाजी नव्हती आणि भाज्यांची दुकाने बंद !! जाताना आमच नेहमीच राशनवालं खोपड उघड दिसलं आणि त्यात दोन ढब्बु मिरच्या दिसल्या .म्हटल शेंगदाण्याचा कुट घालुन ढब्बु मिरची अगदीच काही वाइट लागत नाही. पण विकांत म्हणजे स्पेश्शलच पाहिजे . आणि घरी आल्यावर मी जे काही केले ते कागदावर उतरवत आहे. या भाजीला काय नाव द्यावे मला माहीत नाही, पण जे काही झाल होत ते चटकदार आणि झणझणीत होते.तसाही आमचा ओढा जरा चमचमीत खाण्याकडे जास्तच आहे.

१) बेसनपीठ घेतल.

खमंग भाजुन घेतल, गठुळ्या होउ दिल्या नाहीत.

२) मग ढब्बु मिरची चा, देठ काढुन त्याला असा काप मारला.

३) भाजलेल्या पिठात मीठ, लाल मिरची पुड आणि धनिया पुड घालुन एकत्र केली.

४ )चमचा वापरून हे मिश्रण ढब्बु मिरचीत घातल.

५ )त्यानंतर कढईत जिरे- मोहरी लाल मिरची पुड , हळद ,तेल याची फोड॑णी द्या , थोडे पाणी टाकल. पाण्याला उकळी आल्यावर ही ढब्बु मिरची त्यात सोडली , चांगली हलवुन घेतली एक उकळी आल्यावर माझ्या लक्षात आल की आतील बेसन शिजणार कसे मग जाउन त्याला एक मधुन काप मारला. जे काही झाले ते असे होते.

६) आणि हे फायनल !!

७ ) या जेवायला !!

प्रतिक्रिया

पियुशा's picture

17 Jan 2011 - 10:06 am | पियुशा

आय शपथ लय भारि बनविल !
आलेच जेवायला :)

सुहाश्या

गणपाला सोलिड टफ फाईट देतोयेस... :)
मस्त झणझणीत वाटतेय रे भाजी....

एक टीप देते (आग्रह नाहि सहज) ह्या बेसन भर्लेल्या मिर्च्या तु ७-८ मिनिट बेक केल्या असत्या तरि एक नविन डीश झालि असति
धब्बु मिर्चि विथ भरवा मसाला

sneharani's picture

17 Jan 2011 - 10:14 am | sneharani

मस्तच! मस्त दिसतेय डिश!!
करून बघते!
:)

मुलूखावेगळी's picture

17 Jan 2011 - 10:23 am | मुलूखावेगळी

अरे वा
मस्त डिश आहे
पन हे कूट घातल्यासार्खे का दिसत आहे?
घातलाय का?
करुन बघ्ते.

नावातकायआहे's picture

17 Jan 2011 - 11:05 am | नावातकायआहे

फोटुची क्लेरिटी अशी का ओ भाउ?
लेट फ्रायडे नाइट इफेक्ट म्हनायचा का? ;-)

डिश भारी आसल अस वाट्टतय. कवा येउ भत्याला?

कसला डोंबलाचा स्पेशल काय माहीत ? पण आपल ते स्पेशल आण दुसर्‍याच ते ... असो असे म्हणायची पध्दत आहे )

सत्यवचन :)
बाकी स्वाश्या तुझे कौतुक वाटते .. लेका आजकालच्या अधुनिक आणि मुक्त स्त्रीला लाजवेल ( लाज असली तर ) अशा पाककृती येतात गड्या तुला :) हॅहॅहॅ ... जियो मेरे लाल

कालंच आईबाबा अष्टविनायकाला गेले. आणि आम्ही घरी "मसाला चिकन्स .. टारु स्टाईल " बनवलं होतं .. रोट्या फक्त विकताच्या होत्या. :) पार चाटुन पुसुन साफ केलं होतं .. तुला चपात्या येतात त्याही गोल , त्याबद्दल वेगळं अभिनंदन :)

-( पार्टटाईम बल्लव) टारझन

नरेशकुमार's picture

17 Jan 2011 - 11:44 am | नरेशकुमार

हा प्रतिसादातिल काही वाक्ये जर लेख म्हनुन लीहीली
तर त्याला नक्कि १०० पेक्षा जास्त प्रतिसाद येतील.

wanna try ?

परिकथेतील राजकुमार's picture

17 Jan 2011 - 11:42 am | परिकथेतील राजकुमार

झकास रे !

पाकृ दिसतीये खल्लास.

नरेशकुमार's picture

17 Jan 2011 - 11:45 am | नरेशकुमार

लेख खुपच मोठ्ठा आहे,
वाचुन निवांत प्रतिक्रिया देईन.

५० फक्त's picture

17 Jan 2011 - 11:45 am | ५० फक्त

सुहास अभिनंदन,

तुझ्या पाकक्रियेचा प्रयोग पाहुन माझा पण एक प्रयोग.

अडला हरी मिर्चित बेसन भरी
बेसन शिजेना म्हणुन मिर्चिवर चालवी सुरी.

भाजी छानच वाटते आहे, आता करुन पाहेन. मिरची आतुन पोकळ करुन त्यात मसाला भरुन दिसायला बरी आणि खायला कधी तरी अशी भाजी मला करायला आवडते.

हर्षद.

अरे वा छान पाकृ बनलेय.

सुहास अजुन त्यात थोडे लिंबु पिळले की अजुन चटकदार होईल.

पोटावर (तु़झ्याच) अत्याचार करण्यापेक्षा रेडी टू इट पाकिटं का आणून ठेवत नाहीस?
रेडी टू ईट पोळ्या पण मिळतात.
आमच्या पलि़कडच्या गल्लीतली डॉली कुत्री घरच्या पोळ्यांना तोंड लावत नाही.
तु कधी सुधारणार?

नरेशकुमार's picture

17 Jan 2011 - 12:29 pm | नरेशकुमार

आमच्या पलि़कडच्या गल्लीतली डॉली कुत्री

अरे व्वा,
ती डॉली कुत्री तुमच्या पलिकडे आनि आमच्या अलिकडे.
म्हनजे आपन आल्याड्पल्याडच राहतो कि.

ती डॉली कुत्री कुठे बाहेर गेली कि भेटु मग आपन.

टारझन's picture

17 Jan 2011 - 1:03 pm | टारझन

टॉम्या पासुन सावधान :)

कवितानागेश's picture

17 Jan 2011 - 12:51 pm | कवितानागेश

एक गुजराती प्रकार आहे, 'लोटवाळा मरचा'.
त्यात मिरच्यांचे अजून थोडे तुकडे करतात आणि तेल, धणे-जिरे पूड, मीठ-साखर, लिंबू हे सगळं सढळ हातानी वापरतात.

दीविरा's picture

17 Jan 2011 - 2:09 pm | दीविरा

चांगले दिसतेय,करून पहायला हरकत नाही.

:)

प्रसन्न केसकर's picture

17 Jan 2011 - 4:26 pm | प्रसन्न केसकर

पोरगं खर्‍या अर्थानं पोटापाण्याला लागलेलं दिसतय. काहीही झालं तरी आता उपाशी नक्कीच मरणार नाहीस तु सुहास!
भाजी मस्तच. घरी करुन पहाण्यात येईल.

निवेदिता-ताई's picture

17 Jan 2011 - 9:18 pm | निवेदिता-ताई

अरे आतील सारण शिजले असते न..कशाला सुरी चालवलीस..
भाजीत पाणी घातले होतेस त्यावर शिजली असती मिरची आणी आतले सारणही.
मा़झा पुतण्याही सध्या असेच काय काय प्रयोग करत असतो पोटावर...हा हा हा

पुतण्याची गोष्ट सोडून बाकि प्रतिसादाशी सहमत.;)
मध्यम आचेवर ठेवाली लागली असती फक्त.
तश्याही भाज्या भसाभसा मोठ्या आचेवर शिजवू नयेत.

सुनील's picture

18 Jan 2011 - 12:37 am | सुनील

ही भाजी लहानपणापासून खाल्ली आहे.

मिरची उभी न चिरता आडवी चिरायची (एका मिरचीचे दोन cup बनवायचे). आतील बिया वगैरे काडून त्यात हे भाजलेले पीठ भरायचे. पाणी वगैरे न घालता झाकण लावून दहा मिनिटे शिजवायचे. पीठात थोडा गरम मसाला घातला तर उत्तम!

स्पंदना's picture

18 Jan 2011 - 9:43 am | स्पंदना

धन्य हो सुहास राव!! मेन म्हणजे दुसर्‍या दिवशी लेख लिहायला अन फोटो चिटकवायला जिवंत राहिल्या बद्दल 'हैप्पी बर्थ ड्डे! हो भाउ.

ढब्बु मिरची लाल तिखटा ऐवजी हिरव्या मिरचीत बनवुन पहा छान लागते. पण तुम्हाला ऐन्वेळी मिळेल त्यात तुम्ही बनवता अन इतक छान हे ही कौतुकास्पद!!

शिल्पा ब's picture

18 Jan 2011 - 9:49 am | शिल्पा ब

मस्त...चवदार दिसतेय भाजी...मला ढोबळ्या मिर्चीची भाजी नीट जमत नाही तेव्हा हा प्रकार करुन बघते...वरती लोकांनी काही सुचना दिल्यात त्या पण जमतायेत का पहाते...

अजुन प्रयोग येउ देत.

पर्नल नेने मराठे's picture

18 Jan 2011 - 1:54 pm | पर्नल नेने मराठे

'काप मारला' हे वाक्य मनाला भिडले. :|

रश्मि दाते's picture

22 Jan 2011 - 11:19 am | रश्मि दाते

क्या बात है मस्त दिसत आहे भाजी