मिक्स व्हेज कटलेट (जरा हटके)

शुभांगी कुलकर्णी's picture
शुभांगी कुलकर्णी in पाककृती
17 Jan 2011 - 9:49 am

मध्यंतरी मीमराठीवर मी कुणाची तरी गोलमाल कटलेट ही पाकृ. वाचली. उरलेले पदार्थ सत्कारणी लावायला आणि काहीतरी नविन खायला मार्ग सापडला.

रात्रीचा उरलेला भात २ वाट्या (नेहमी फोडणीचा भात करुन खायचा कंटाळा आला की हा पदार्थ करावा)
अर्धी वाटी घट्ट वरणाचा गोळा (घरात होता म्हणुन मी घातला, नसल्यास काही बिघडत नाही)
एक मोठ गाजर किसुन
एक बटाटा किसुन
फ्लॉवर गरम पाण्यातुन काढुन मग किसुन
मटार असतील तर १/२ वाटी ठेचुन
(अजुन कुठल्या भाज्या दोडका/ दुधी असेल तर किसुन, माझ्याकडे नव्हत्या)
२ मोठे चमचे कॉर्न फ्लोअर
२ मोठे चमचे डाळीचे पीठ (बेसन) नसल्यास भाजणीचे पीठ
हळद १/२ चमचा (छोटा)
लाल तिखट १ चमचा (छोटा)
गरम मसाला १ चमचा (छोटा)
हिंग चिमुटभर
१/२ चमचा (मोठा) धणे भाजुन कुटुन
तीळ १ चमचा
हिरव्या मिरच्या ५-६, आल्याचा तुकडा छोटा
लसुण पाकळ्या ७-८
कोथिंबीर धुवुन चिरुन १/२ वाटी
मीठ चवीनुसार
तळायला तेल

क्रमवार पाककृती:
धणे थोडे भाजुन मिक्सरवर भरडुन घ्यावेत
मिरची+आलं+लसुण वाटुन घ्यावा.
एका मोठ्या ताटात भात चांगला कुस्करुन घ्यावा. त्यात वरणाचा गोळा,धणे पुड, मिरचीच वाटण, सगळ्या भाज्या एकत्रीत, कोथिंबीर, हिंग, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, तीळ घालुन चांगल मळुन घ्यावं. वाटल्यास थोडा तेलाचा हात लावावा.
मिश्रण एकजीव झाल्यावर कढईत तेल गरम करायला ठेवाव.
आता मिश्रणाचे लांबट गोळे करुन रव्यात अथवा ब्रेड्क्रम्स मधे घोळवुन घ्यावेत.

" alt="" />

तापलेल्या तेलात एक एक सोडुन चांगले लालसर होईतो तळावेत.
" alt="" />

" alt="" />

गरम गरम कटलेट सॉस अथवा हिरव्या चटणीबरोबर खायला द्यावेत अथवा करता करता स्वतःच तोंडात टाकावेत कारण आपल्यापर्यंत ते कधी शिल्लक राहात नाहीत.

वाढणी/प्रमाण:
हवे तितके. आपण बास का आता? असं म्हणालो तरी खाणारा बास म्हणत नाही. :फिदी:
अधिक टिपा:
गरम गरम खावेत, गार झाल्यावर अजिबात चांगले लागत नाहीत.

माहितीचा स्रोत:
मी मराठीवरच्या एका सुगरणीच्या प्रेरणेतुन

प्रतिक्रिया

पियुशा's picture

17 Jan 2011 - 10:04 am | पियुशा

हम्म्म यम्मि दिस्तेय !

नगरीनिरंजन's picture

17 Jan 2011 - 10:48 am | नगरीनिरंजन

हे पाहा http://www.misalpav.com/node/16224.

फोटो चांगले आलेत, नवीन पाकृसाठी शुभेच्छा!

५० फक्त's picture

17 Jan 2011 - 11:45 am | ५० फक्त

पाकक्रिया व फोटो छानच,

पण आमच्याकडे चुकुन जरी भात उरला तर दुस-या दिवशी मी आणि बायको भांड्णं करुन फोडणीचा भात करुन खातो, त्या उरलेल्या भातावर एवढे उपचार करायला लागेल एवढा वेळ आणि संयम आमच्याकडे अजिबात नाही.

शनिवारी आमच्याकडे भात उरवला जातो रात्री, रविवारी पहिला नाष्टा फोडणिच्या भाताच्या करण्यासाठी.

हर्षद.

नरेशकुमार's picture

17 Jan 2011 - 11:47 am | नरेशकुमार

अधिक टिपा:
गरम गरम खावेत, गार झाल्यावर अजिबात चांगले लागत नाहीत.

ठिक आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

17 Jan 2011 - 11:54 am | परिकथेतील राजकुमार

ओक्के !
एकदा करुन बघायला हरकत नाही.

मस्त जितेंदर
दोन वाट्या भात आणि दोन वाट्या वरण उरणे हे बायको आयटीत असल्याचे लक्षण आहे.

५० फक्त's picture

17 Jan 2011 - 12:06 pm | ५० फक्त

''दोन वाट्या भात आणि दोन वाट्या वरण उरणे हे बायको आयटीत असल्याचे लक्षण आहे.''

हे मी ''दोन वाट्या भात आणि दोन वाट्या वरण उरणे हे बायको आपटीत असल्याचे लक्षण आहे." असं वाचलं आणि जाम हसलो.

हर्षद.

मस्त मस्त मस्त. मी पण बनवणार.

RUPALI POYEKAR's picture

17 Jan 2011 - 1:45 pm | RUPALI POYEKAR

छान दिसते कटलेट.

रूपाली पोयेकर

प्राजु's picture

17 Jan 2011 - 6:17 pm | प्राजु

जबरदस्त फोटो.

महेश काळे's picture

20 Jan 2011 - 2:20 pm | महेश काळे

मस्त फोटु आहे...

गार्नीशीन्ग सुद्धा उत्तम ...

दहा पैकी दहा...मार्क