कायद्याचे पुस्तक आणि "copyright"

विश्नापा's picture
विश्नापा in काथ्याकूट
16 Jan 2011 - 6:50 pm
गाभा: 

आपण बाजारात मिळणारी कायद्याची पुस्तके विकत घेतो. त्या पुस्तकावर "copyright" हा लेखकाच्या नावे दिलेला असतो.
माझे म्हणणे असे आहे की कायद्याचे कोणतेही पुस्तक हे मूळ "act"/code" चे सरळसरळ भाषान्तर असते. सर्व प्रकाशकान्नी छापलेल्या कायद्यावरील पुस्तकातील भाषा ही जवळ्जवळ सारखीच असते
लेखक हा जितका निष्णात कायदे पण्डीत असेल्,तेवढ्या प्रमाणात "commentries" चे स्वरुप बदलु शकते .परन्तु आपण त्या अधिक महिती बद्दल पैसे देत असतो.
कायदा हा "constitution"चा भाग असतो.
लोकशाही मधे जनता ही सार्वभोम आहे. त्या मुळे कायद्याच्या पुस्तकान्चे "copyright" लेखकाच्या नावे नसावेत असे मला वाटते. जाणकार मार्गदर्शन करतील काय?
जर माझे म्हणणे योग्य वाटत असेल तर मा. न्यायालया पर्यन्त पोहोचवाल काय?

प्रतिक्रिया

प्रसन्न केसकर's picture

17 Jan 2011 - 2:42 pm | प्रसन्न केसकर

मी या विषयातला तज्ञ नाही पण जी थोडीफार माहिती आहे ती देऊ शकतो.
कायद्याच्या पुस्तकात महत्वाचे भाग म्हणजे - १) मुळ कायद्याची कलमे (बेअर लॉ/ लेजिस्लेशन), २) त्या कलमांचे अर्थ (इंटरप्रिटेशन/ अ‍ॅप्लीकेशन स्कोप/ कॉमेंट्री/ एक्सप्लनेशन्स इ.) व ३) त्या कलमांचे विविध न्यायालयांनी कसे अर्थ लावुन निवाडे दिले त्याचे दाखले (केस लॉज/ सायटेशन्स/ ऑथॉरिटीज इ.)
यातील पहिला भाग म्हणजे मुळ कायदा हे विधीमंडळाने संमत केलेले व प्राधिकृत झालेले विधेयक असते. त्यामुळे बेअर लॉ प्रताधिकार मुक्त असतो. बहुतेक सर्व बेअर लॉजची सरकारने छापलेली पुस्तके नाममात्र किंमतीत उपलब्ध आहेत. परंतु संकलित स्वरुपात एकापेक्षा अधिक बेअर लॉजचे पुस्तक जर कोणी काढले तर तो लेखक संकलक ठरत असल्याने त्याचा प्रताधिकार त्यावर येईल. पुस्तकामध्ये जर इंटरप्रिटेशन, अ‍ॅप्लीकेशन स्कोप, कॉमेंट्री, एक्सप्लनेशन्स, केस लॉज, सायटेशन्स, ऑथॉरिटीज इ असतील तर त्या परिस्थितीतही याच न्यायाने प्रताधिकार लागु होईल.

+१

याच तर्काने मेडिकल सायन्सवर येणारी माहितीपर पुस्तके किंवा आयुर्वेदिक (घरचा वैद्य, मधुमेहासाठी पथ्यकर आहार इ इ) सुद्धा कॉमन नॉलेज वापरत असूनही कॉपीरायटेड असतात..

धनंजय's picture

19 Jan 2011 - 4:25 am | धनंजय

प्रत-अधिकारमुक्त पाठ्य, आणि त्या पाठ्यावर नवीन टिपणे, असे पुस्तकाचे स्वरूप असेल, तर टिपणांवर प्रत-अधिकार असू शकतो.

विकाल's picture

17 Jan 2011 - 4:14 pm | विकाल

Copyrights Act 1957 हा कायदा वरील प्रश्नाचे उत्तर देईल.

सेक्शन १४ प्रताधिकार म्हणजे काय ते सान्गतो. त्याप्रमाणे प्रताधिकार कोणाला कसा लागू होतो ते सान्गीतले आहे.