मदत पाहीजे....VOIP

नरेशकुमार's picture
नरेशकुमार in काथ्याकूट
16 Jan 2011 - 7:59 am
गाभा: 

सर्व मिपा करांना नमस्कार !
मिपाकर ह्या भूतलावर सगळीकडे पसरलेले आहेत. याची पूर्ण जाण आहे. सर्व आपापल्या नातेवैकांशी कोणत्या न कोणत्या माध्यमातून संपर्कात असतातच. यासाठी मिपाकर कोणते माध्यम वापरतात याची माहिती हवी आहे.

पुढील काळात पूर्वेला जसे चीन, जपान, थायलंड येथे कुटुंबासोबत कामानिमित्त दीड-दोन वर्षे वास्तव्य करण्यासे जाने होणार आहे. तिथून फिरतीवर असताना जर्मनी, फ्रांस, अमेरिका, आणि प्रिय आपुला देश येथील सर्व मित्रांशी संपर्कात कसे राहू याची गेले काही दिवस खूप चिंता वाटत आहे. सध्या बाहेरील मित्राना कॉल करण्यासाठी action VOIP वापरतो, पण ते खूप महाग पडते.

SKYPE GTALK हे पर्याय तर उपलब्ध आहेतच पण याला काही मर्यादा आहेत. जसे दोनीही बाजूने कॉम्पुटर हवा असतो.(आणि नेमके जेव्हा काही महत्वाचे बोलायचं असते तेव्हा मित्र कॉम्पुटरपाशी नसतात.)

मोबायील - मोबायील किवा कॉम्पुटर - मोबायील यासाठी मिपाकर कोणते सेवा वापरतात याची माहिती हवी आहे.

सदर माहिती आपण खालील स्वरुपात दिल्यास आभारी असेन
१) सेवा,
२) खर्च. किमान वर उल्लेख केलेल्या (चीन, जपान, थायलंड) देशातून इतर देशात (जर्मनी, फ्रांस, अमेरिका, आणि प्रिय आपुला देश)
३) रीलायबीलीटी (मी वापरत असलेल्या action VOIP चा server नानाविविध कारणाने बर्यान्चदा बंद असतो, व काही वेळा कॉल मधूनच कट होतो)

इंटरनेट वर सर्च केल्यावर
www.nonoh.net, www.justvoip.com, www.webcalldirect.com
अश्या काही सेवा सापडल्या पण यातील कोणती चांगली हे माहित माहित नाही.

------------------------------------------------------------------------------------------------------------
सर्व मिपाकरांना एक कळकळीची विनंती : अवांतर प्रतिसाद देऊन कृपया या मदतीची अवहेलना करू नये.

प्रतिक्रिया

नन्दादीप's picture

16 Jan 2011 - 11:15 am | नन्दादीप

तुम्ही टाटा चा VOIP (VOICE OVER INTERNET PROTOCOL) वापरून बघा.....कस्ट. केयर ला फोन करा...मग कदाचीत तुम्हाला डेमो देतील ते.....(cust. care : 9220000121)

अवांतरः ही टाटाची जाहीरात्बाजी नाहीये.

हा हा हा , उडालेले प्रतिसाद वाचुन अंमळ मोरपिस फिरले होते :)

- टारझन
वदनी कवळी घेता , दातपाडा एकेकाचे
सहज हवन होते .. माज सर्वांचे

उमराणी सरकार's picture

17 Jan 2011 - 7:25 pm | उमराणी सरकार

मो-कॉल वापरून बघा...

अवांतरः ही मो-कॉल ची जाहीरात्बाजी नाहीये.

सुनिलपाटील's picture

18 Jan 2011 - 9:20 pm | सुनिलपाटील

श्री नरेशकुमार
हा माझा पहिलाच प्रतिसाद आहे तरी साम्भाळून घ्या हि विनन्ति .

मी इथे जपान मध्ये आहे. सहा महिने actionvoip वापरत आहे. सुरवातिला माझ्या काही मित्रान्चि थोडी तक्रार होती , पण मला कधिच problem आला नाही. १ युरो सेन्ट प्रति मिनिट दर पडतो भारतात फोन करायला . एकदा दोनदा फोन लागले नाहित, पण मिनिटे कट झाली असा प्रकार कधी नाही.
मागचा १ आठवडा झाला, मि fastvoip.com ट्राय करत आहे. ०.५ युरो सेन्ट दर आहे म्हणजे actionvoip च्या निम्मा. आवाज क्वालिटी छान आहे. फार मोठा कॉल केला नाहि , त्यामुळे डिस्कनेक्ट चा प्रॉब्लेम अजुन तरि आला नाही.
हे दोन्ही voip मी iPhone वरुन वापरत आहे. घरच्या पीसी वर पण इनस्टॉल केला आहे पण त्या वरुन कधिच प्रयत्न केला नाहि, कारण बायको आणि मुलान्च्या तावडीतुन मला पीसी कधिच मिळत नाही :-(

प्राजु's picture

19 Jan 2011 - 8:08 pm | प्राजु

आम्ही व्हॉनेज वापरतो...
तुम्ही परदेशात गेल्यावर तिथे VOIP सेवा पुरविणार्‍या टेलिफोन कं असतीलच. त्यांच्याशी संपर्क करा. बी रिलॅक्स्ड!!
प्रवासासाठी शुभेच्छा!