याला काय म्हणावे? धांधरटपणा की व्यसन?

भय्या's picture
भय्या in काथ्याकूट
15 Jan 2011 - 12:51 am
गाभा: 

मी अफ़्रिकेत असताना आलेला एक प्रसंग सांगून तुमचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो.
जुलै २००८ ची गोष्ट.
मी डिसेंबर २००७ मध्येच रवांडा या छोट्या देशात नोकरी पत्करली सहा महीने काढल्यावर पत्नीला घेउन परत येण्यासाठी मी पुण्यातून निघालो. किगाली मधल्या एका मित्राच्या नुकतेच लग्न झालेल्या सुनेला पण घेउन यायचे होते, तर आम्ही तिघेही मुंबई अंतरराष्टीय विमानतळावर हजर झालो. केनया एयरवेज च्या लाइनीत उभे राहून सगळे सोपस्कार पूर्ण करून विमानात बसलॊ. रवांडाला जाण्यासाठी प्रथम नैरोबी (केनया) इथे जावे लागते आणि विमान बदलून नंतर किगाली ला जावे लागते. विमान कंपनी च्या नियमाप्रमाणे मुम्बई मध्येच दोनही विमानांचा बोर्डींग पास द्यायचा असतो आणि लगेज डायरेक्ट किगाली ला जाते. आपण फक्त विमान बदलायचे.
रात्री दोन वाजता मुंबई हून निघालेली फ़्लाईट सकाळी सहा वाजता नैरोबी (स्थानीक वेळ) ला पोचली. नंतर दुसरी फ़्लाईट आठ वाजता. सकाळी एयरपोर्ट वर चहा वैगैरे घेउन आम्ही दुसरया लाईनीत उभे राहीलो. आम्ही तिघे. सामान डायरेक्ट विमानात चढले होते. काउंटर वर समजले की विमानात जागा नाही आमच्याकडे बोर्डींग पास नाही. विमानाची वेळ गेली. विमानपण गेले. नंतर भांडाभांडी (बाचाबाची) झाली. पोटभर भांडून झाल्यावर त्यांनी त्यांची चूक मान्य केली. प्रत्येकी शंभर डालर नुकसान भरपाई आणि एक दिवसाचे होटेल देऊ केले. पर्याय नव्हताच. आमची वरात होटेलला पोचली .वेळ सकाळ्चे साधारण दहा.

ष्टोरी इथेच सुरू होते.

दोघीही खूप थकल्यामुळे पोटात काही तरी ढकलून त्यानी ताणून दिली. मी हतबल. बारा वाजले टिव्ही केनया मधला- कळणारे चॆनेल फ़क्त बिबिसी न्यूज आणि सीएनएन . किती बघणार?

मी स्वत: मॆच्यूर्ड नाही (सिगरेट्च्या बाबतीत) याची मला पूर्ण खात्री आहे पण लोकांनी मला मॆच्युर्ड म्हणावे म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात. त्यातली एक प्रकार हा की ती गोष्ट खुप कमी केलेली आहे. पण कधीतरी प्रकर्षाने सिगरेट प्यावी वाटते. तसेच झाले. विचार केला चला एक चक्कर मारू नाही तरी दोघी झोपल्याच आहेत, तासभर निश्चिंती झाली.

बाहेर पडलॊ. सवय पुण्याची कुठेतरी टपरी पहावी चार झुरके मारू आणि परत येउ. हा चौक तो चौक करीत करीत बराच लांब गेलो. डावे उजवे करीत एकदाची टपरी मिळाली. प्रश्न फ़क्त सुट्या पैश्य़ाच नव्हता तर करन्सी चा पण होता. केनेया ची करन्सी कुठुन आणणार? शेवटी एक सुटी सिगरेट न घेता पुर्ण पाकीट चढ्या भावाने विकत घेतली ती पण डोलर देउनच.

बरोबर लायटर पण घेतला. नैरोबी मध्ये घुम्रपान बंदी आहे ते तो पर्यंत माहीती नव्हते. टपरी वाल्याशी माझे मराठी मिश्रीत इंग्रजी आणि त्याची स्वाहीली मिश्रीत इंग्रजी यातून कसातरी संवाद साधला. त्याने एक सेफ़ जागा दाखवली. कार्यक्रम आटोपला. पुढ्च्या चौकात गेलो.

आणि ताळ्यावर आलॊ. रूम नंबर आठवत नाही हे समजले पण होटेल चे नाव पण पूर्ण विसरलो आहे हे जेव्हा लक्षात आले तेव्हा ऐन थंडीत घाम फ़ुटला दिशा हरवलेली- गावच नव्हे तर देशही वेगळा-- भाषाही वेगळी . दोघीही वाट पहात आहेत. पुरेसे पैसे नाहीत होटेलचे नाव माहीत नाही रस्ता सापड्त नाही. पासपोर्ट होटेलात.

शांत पणे विचार केला रविवार ची साधारण एक वाजला होता. नैरोबी लूटालूट आणि खिसेकापू यांच्यासाठी खुप कुप्रसिध्द आहे. असे म्हणतात की दोनेशे डालर साठी भोसकले जाते. रस्ते सुनसान होते घाबरण्यासाठी.

सरळ टॆक्सी करायची एयरपोर्टला जायचे. त्यांना विचारयचे की नोर्मली ते कुठल्या होटेलात आमच्या सारख्या लोकांना ठेवतात नंतर तीच टेक्सी त्या होटेल वर न्यायची. चला एक प्रश्ण सुटला आता टेक्सी शोधायची. तिथे नकारघंटा. रविवार विश्रांतीचा दिवस.

परत त्या टपरी वर गेलो परत मोडक्या तोडक्या भाषेत गप्पा झाल्या.मी चुकलो आहे हे त्याला समजले तर परत वांधे. त्याने सुचवले की पुढच्या चौकात टेक्सी स्टेंड आहे. परत पुढचा चौक. चालत चालत तिथे पोचलो. विमानतळावर जाण्यासाठी शेअर रिक्शा सारखा प्रकार आहे. त्यातला एक ही टेक्सिवाला एयरपोर्टला यायला तयार नाही.

माझ्या मानेवरून एक घामाचा मोठा ओघळ सरळ कमरेपर्यंत आला. टेक्सीवाले(?) तो पर्यंत माझ्याकडे विचित्र नजरेने पहात होते. एक भारतीय माणूस होता त्याने बोलण्याचा प्रयत्न केला मला मनात प्रचंड भिती होती सगळे त्यांना सांगावे तर आणखी भिती. पण काहीतरी करावेच लागेल ना?

शेवटी त्या माणसाने सुचवले की जवळच आणखी एक चौक लागेल तिथे टेक्सी मिळेल त्याच्या सल्ल्याप्रमाणे परत तंगडी तोड करीत घाम पुसत आणि चड्डी सावरत फ़िर फ़िर फ़िरलो टेक्सी दिसली तर 'नाही' म्हणायचा, करणार काय? चालत होतो बहुतेक त्याच त्याच रस्त्यावरून परत परत फ़िरत होतो.वेड्यासारखे खिसे परत परत चेक करणे असे चाळे सुरू होतेच.

एका क्षणी काय झाले कसे झाले माहिती नाही. पण एक होटेल दिसले. चला इथेच चौकशी करू इतक्या लांब एयरपोर्टला जाण्यापेक्षा तिथल्या मेनेजरला विचारायचे ठरले. तो कदाचित मदत पण करेल टेक्सि मिळवून देईल. तो काय लेक्चर देइल गप गुमान ऎकून घ्यायची मनाची तयारी करून आत घुसलो. रिसेप्शन ला असणार्या माणसाला विचारून होटेलचा पत्ता विचारून घ्यायचे, वाटले तर त्यालाच टेक्सी पण मिळवून द्यायची विनंती करायची. शब्दांची जुळवाजुळव करत हिंमत करून आत घुसलो.

आय एम भय्या फ़्रोम केक्यू असे म्हणताच त्याने रूम ची चावी हातात दिली. शब्दांची जुळवाजुळव करावी लागलीच नाही. जवळ्च्या कोचात बूड टेकले. खोल श्वास घेतला जीवात जीव येणे म्हणजे काय ते समजले. पण परत रेहमानी वळवळला. वेटरला विचारले इथे स्मोकींग ची सोय आहे का? होटेल पुर्ण पणे घुम्रपानासाठी बंद असल्यामुळे तिथे एक स्वतंत्र कक्ष आहे तिथे जा असे त्याने सुचवले. परत एकदा दोन कश सणसणून मारले. त्या माणसाला आणि माझ्या नशिबाला धन्यवाद दिले.

रूमवर दोघीही अजून ढाराढूर झोपल्याहोत्या. मी काय काय प्रताप करून आलो होतो त्यांची काही ही माहिती नव्हती !

मोरेल ओफ़ द स्टोरी काय?

१. माझा कंट्रोल आहे असा रूबाब न करता जरी सिगरेट नाही ओढली नाही तरी एक पाकीट स्वत: जवळ कायम ठेवावे.लायटर काय कुठेही मिळू शकतॊ.
२. बाहेर पडताना मोठ्या होटेलात रूमची चावी देत नाहीत तर त्यांचे व्हिजींग कार्ड जवळ ठेवावे.
३. लेक्चर ऎकायचे नसेल तर असले उद्योग करू नयेत आणि केलेच तर कुणालाही सांगू नयेत, मिपा वर. सुध्दा? इथे मला कोण ओळ्खतो? आणि लेक्चर कोण देणार?

धन्यवाद !

प्रतिक्रिया

यकु's picture

15 Jan 2011 - 12:59 am | यकु

बहोत बढीया!! खी: खी: खी:!!!

लॉरी टांगटूंगकर's picture

15 Jan 2011 - 1:00 am | लॉरी टांगटूंगकर

बेष्ट ....

मॉरल २ - लक्षात ठेवण्यासारखे आहे. धन्यवाद.

अर्धवटराव's picture

15 Jan 2011 - 1:39 am | अर्धवटराव

आयला... तुमचे मॉरल लईच भारी.
मॉरल ४- योग्य मॉरल पकडा.

(धांदरट)अर्धवटराव

विनोद.

पर्नल नेने मराठे's picture

15 Jan 2011 - 1:47 am | पर्नल नेने मराठे

बापरे ........

क्लिंटन's picture

15 Jan 2011 - 2:02 am | क्लिंटन

अनुभव आवडला.अर्थात त्या वेळी चांगलीच टरकली असेल.

अहमदाबादेत मला थोडासा यासारखा अनुभव आला होता.मी आणि हिलरी उतरलो होतो एप्सिलॉन नावाच्या हॉटेलात.मी माझ्या स्मरणशक्तीवर विश्वास ठेऊन हॉटेलचे नाव ’एक ग्रीक अक्षर’ म्हणून लक्षात ठेवले आणि रिक्षा करून आम्ही दोघे बाहेर पडलो.थोडीफार खरेदी झाल्यावर परत जायची वेळ झाली तेव्हा नेमके हॉटेलचे नाव विसरलो.शहर नवीन, हॉटेलचे नाव लक्षात नाही, एरिया कोणता ते लक्षात नाही.मग रिक्षावाल्याला सांगावे काय?माझ्या पासपोर्टसकट महत्वाची कागदपत्रे, मार्कलीस्ट सगळे हॉटेलात होते त्यामुळे ती पण एक काळजी होती.

भारतात एक जस्ट डायल म्हणून मोबाईलवर सेवा उपलब्ध आहे.त्यांना फोन केल्यास ते मिनिटभरात एस.एम.एस वर आपल्याला पाहिजे त्या गोष्टीची माहिती देतात.आमचे हॉटेल तीन चांदण्यांचे होते हे तर माझ्या लक्षात होते.तेव्हा त्यांच्याकडून एस.एम.एस वर शहरातील तीन स्टार हॉटेलांची यादी मागवली आणि त्या यादीत ताबडतोब आमचे हॉटेल ओळखले.मग त्यांना फोन करून पुढचा मार्ग कळला.असो.

असे काही परदेशात आणि त्यातही केनियासारख्या देशात होणे म्हणजे भितीदायकच.

बापरे!
हॉटेलचे नाव विसरणे अगदी शक्य आहे.

अभिज्ञ's picture

15 Jan 2011 - 4:40 am | अभिज्ञ

खतरनाक अनुभव.

तात्पर्य : सिगारेट ओढत असाल वा नसाल,नेहमी पाकिट बरोबर बाळगावे. ;)
वेळ काय सांगून येते काय?
:)

अभिज्ञ.

सूर्यपुत्र's picture

15 Jan 2011 - 10:06 am | सूर्यपुत्र

नशीब... हॉटेलात गेल्यावर तुम्हांला तुमचे नाव आठवले. नाहीतर...... ;)
मॉरल काय, तर स्वःताचे व्हिजिटिंग कार्ड सुद्धा बरोबर ठेवावे, वेळ सांगून थोडीच येते??? ;)

५० फक्त's picture

15 Jan 2011 - 10:08 am | ५० फक्त

छान अनुभव, हरवण्याचा, सापडण्याचा आणि एवढा वेळ बायको गाढ झोपण्याचा.

तात्पर्य - ४. असले पुरुषी उद्योग करुन बायकोला सांगु नयेत.

हर्षद.

रविंद्र प्रधान's picture

15 Jan 2011 - 11:44 am | रविंद्र प्रधान

मी भारत सरकारच्या सेवेत असताना सतत पूर्ण देशभर दौरे करावे लागायचे. बाहेरगांवी निरनिराळ्या हॉटेल मध्ये रहावे लागायचे. अनेक प्रांतात भाषेचा तसेच त्यांच्या लिपींचाही प्रश्न असायचा. हॉटेलमध्ये नाव रजिस्टर करतांना त्या हॉटेलचे कार्ड नेहेमी मागून घेऊन शर्टच्या खिशात ठेवत असे. त्यामुळे हॉटेलपासून दूरवर गेलो असलो तरी त्याचे कार्ड ज्यावर इंग्रजीसोबत स्थानीक लिपीतही पत्ता असल्याने ते कार्ड रिक्शावाल्यास दाखवताच तो बरोबर नेत असे. किंवा इतर कोणाही स्थानिक रहिवाशास दाखवल्यास योग्य मार्गदर्शन मिळे.

हा हा हा.. आत्ता जरी हसु फुटत असल तरी तेव्हा तुमची अवस्था काय झाली असेल याची पुरेपुर खात्री आहे.
शेवट गोड झाला आणि त्यातुन तुम्ही योग्य तो बोध घेतलाय हे बरं. ;)

आदिजोशी's picture

15 Jan 2011 - 3:03 pm | आदिजोशी

एकदम झक्कास अनुभव.
ह्या सिग्रेट ओढायच्या नादापाई स्वतःवर काय काय प्रसंग ओढावून घेतलेत ह्यावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.

मुलूखावेगळी's picture

15 Jan 2011 - 3:15 pm | मुलूखावेगळी

हा अनुभव जबरदस्त

मोरल- ५ असा अनुभव शेअर केला ना कि लोक आपले नाव कानफाट्याच करुन टाकतात.
तेव्हा सगळ्यान्शी शेअर करु नये

मोरल ६- व्यसन असनार्यानी धांधरटपणा करु नये

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jan 2011 - 4:42 pm | परिकथेतील राजकुमार

हायला !
अनोखा अनुभव. 'छान रंगवला आहे' असे कसे म्हणावे ? तो जेंव्हा खरच रंगला होता तेंव्हा तुमच्या चेहर्‍यावरचा रंग नक्की उडाला असणार ;)

सर्व वाचक आणि प्रतिसाद देणार्याचे मनःपूर्वक धन्यवाद. (आत्मकथनाचा पहिलाच प्रयत्न होता.)

तरी बरी तुम्हाला सिगारेटचच व्यसन आहे. दारु पिण्याचे असते तर कल्पनाच करवत नाही.