नमस्कार मंडळी...
आज माझ्या आयुष्यातली पहीली परदेश वारी केली.. काही नाही हो, जरा भूटानला जाऊन परत आलो. (आसाममध्ये असल्याने ही मौज परवडते.) जेवढा पाहीला (फक्त दोन-तीन तास) तेवढ्यात हा भाग आवडला.
तर तिथे एका हॉटेलमध्ये गेलो असतांना तिथल्या बाथरुममधे गेलो. तिथे आत भिंतीवर एका छोट्याच्या लॅमिनेटेड पानावर "एच.आय.व्ही आणि एड्स"ची माहीती दिलेली होती. त्याच्याच खाली एका छोट्या बॉक्समध्ये लोकांकरीता "कंडोम्स" ठेवलेले होते.
हे बघितल्यावर माझ्या मनात काही विचार आणि प्रश्न आले, ते आपल्यासमोर मांडावेसे वाटतात.
१) ह्या छोटाश्या देशात, जो आता कुठे जागतिक पातळीवर येऊ लागलाय, त्यांच्या सामाजिक आणि राष्ट्रीय आरोग्य प्रश्नाबद्दल जी जागरुकता आहे, ती आपल्यात आहे का?
२) आपण एड्ससारख्या आरोग्यविषयक राष्ट्रीय प्रश्नावर, सांस्कृतिक सरमिसळ न करता, त्याला "टॅबू" न मानता प्रॅक्टीकली चर्चा, विचारविनिमय करु शकतो का? इच्छितो का?
३) भूटाननी ह्या समस्येचा प्रचार करण्यासाठी आणि प्रसार थोपवण्यासाठी जे साधे पाऊल उचलले, ते आपण उचलू का? आणि उचलले तर ते किती प्रभावशाली ठरेल?
मिपावरील विचारवंतांच्या प्रतिक्रीयांच्या प्रतिक्षेत....
प्रतिक्रिया
13 Jan 2011 - 10:04 pm | विसोबा खेचर
माझं स्वत:चं हाटेल असतं तर मी भुटानचा कित्ता गिरवला असता..! :)
(फुगेवाला) तात्या.
13 Jan 2011 - 10:17 pm | चिगो
माझं स्वत:चं हाटेल असतं तर मी भुटानचा कित्ता गिरवला असता..!
मला हेच म्हणायचंय तात्या, की तुम्ही हे करु शकला असतात कारण की तुम्ही फुकटचे "टॅबूज" मानत नाही. (असं मिपावर तुम्हाला जेवढं ओळखतो, त्यावरुन वाटतं.) प्रश्न हा आहे की, बाकीच्या लोकांपैकी (त्यात मीही आलोच) कितीजण हे करायला धजावतील किंवा समर्थन करतील? आणि कितीजण " मग आमच्या मुलाबाळींना, बायकापोरांना बाथरुममध्ये गेल्यावर काय वाटेल?" म्हणत ह्याचा विरोध करतील?
14 Jan 2011 - 4:50 am | रेवती
" मग आमच्या मुलाबाळींना, बायकापोरांना बाथरुममध्ये गेल्यावर काय वाटेल?" म्हणत ह्याचा विरोध करतील?
त्यात काय वाटायचय? भारताचा इंडीया झालेला असताना तर नाहीच नाही.;)
आजकाल पोरांना आईवडीलांपेक्षा जास्त माहिती असते कि काय अशी शंका येते.;)
आता भूतानवारीबद्दल लिहा. फोटू (निसर्गसौंदर्याचे) चढवा.
तुम्ही नियमाप्रमाणे $२५० खर्च केलेत का?
तिथल्या राजाने टुरिस्टांसाठी केलेल्या नियमांबद्दल वाचायला आवडेल.
14 Jan 2011 - 12:01 pm | चिगो
>>आता भूतानवारीबद्दल लिहा. फोटू (निसर्गसौंदर्याचे) चढवा.
अहो, इतका वेळ नव्हता हो.. सहज भटकायला, शॉपिंगला गेलो होतो.. (तिकडे काही वस्तू बर्यापैकी स्वस्त मिळतात..)
>>तुम्ही नियमाप्रमाणे $२५० खर्च केलेत का?
नाही ब्वॉ.. येवढे पैशे नाहीत हो माझ्याकडे. सहज अलाऊड असते की जायला. आणि मजेची गोष्ट म्हणजे आपली करंसी तिकडे चालते आणि त्यांची आपल्याकडे (बॉर्डर एरीयामध्ये).. बाकी त्यांचा कॉईन सुपर्ब आहे, अगदी मंगलचिन्हे वगैरे कोरलेला..
>>तिथल्या राजाने टुरिस्टांसाठी केलेल्या नियमांबद्दल वाचायला आवडेल.
नक्की कळवेन मला कळले की.. बाकी त्यांचा राजा शॉलिड आहे, हां.. तो लोकशाही आणण्यासाठी प्रयत्नशील आहे, आणि लोक म्हणतात की आम्हाला राजेशाहीच हवी.. प्रचंड श्रद्धा आणि आदर आहे तिथल्या लोकांना राजाबद्दल..
14 Jan 2011 - 7:23 pm | रेवती
लोक म्हणतात की आम्हाला राजेशाहीच हवी
अरे वा!!
13 Jan 2011 - 11:39 pm | स्वाती२
>> आमच्या मुलाबाळींना, बायकापोरांना बाथरुममध्ये गेल्यावर काय वाटेल?" म्हणत ह्याचा विरोध करतील?>>
असा विरोध करणार्यांना जोडिदारामुळे एच आय व्ही + झालेल्या नि:श्पाप स्त्रीया आणि जन्मतः बाधीत असलेली अजाण लेकरे यांचा सोईस्कर विसर पडत असावा.
13 Jan 2011 - 11:51 pm | चिंतामणी
टि.व्ही.वर "लावा"मोबाईलची जाहीरात नाही का पाहिली??????? :(
14 Jan 2011 - 12:03 am | पिवळा डांबिस
इश्श्य!
काय मेलं नांव ठेवलंय मोबाईलचं!!!
:(
14 Jan 2011 - 9:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अय्या, ते 'लावा' नैये कै, ते नाव 'लाव्हा' आहे. हे पहा.
भलत्या बाबतीत कसले टॅबूज आणि संस्कृती बुडण्याचा ओरडा? आपल्याकडेही पर्यटनावर अर्थकारण अवलंबून असलेल्या ठिकाणी, ट्रक्सचे जे ठराविक थांबे ठरले असतात अशा ठिकाणी उपलब्धता असावी.
14 Jan 2011 - 4:06 pm | आत्मशून्य
लाव्हा, अगदी सगळ्यानी लावले पाहीजे असे नाव आहे ते.
14 Jan 2011 - 12:07 am | शिल्पा ब
आपल्याकडे याविषयी जाहिराती, माहितीपट दाखवल्यावर लोकांची संस्कृती बुडते....
बाकी भूतान हा छोटुसा देश...प्रशासनाच्या एखाद्या गोष्टीचा समजा विरोध झाला तर त्याच्याशी डील करायला सोपे जात असावे...आपल्याकडे किती लोक, त्यात ते धर्म, त्यात अजून जाती अन अजून काय काय...समजा महाराष्ट्रात एखाद्या हाटेलात अशी सुविधा उपलब्ध करून दिली अन त्याविषयीचे माहितीचे पोस्टर लावले अन आले संभाजी ब्रिगेडवाले किंवा आणि कोणी अन केली नासधूस तर केवढ्याला पडायचे? त्यापेक्षा टीव्हीवर माहितीपट , जाहिरात हे उपाय ठीक. कंडोम सगळीकडे मिळतात.
15 Jan 2011 - 8:57 pm | पंगा
त्यापेक्षासुद्धा एक मोठा धोका दृष्टिपथास येतो.
समजा, कोणाच्याही हाताला सहज लागू शकतील अशा ठिकाणी असे काँडोम उपलब्ध करून दिले. आता रिकामटेकड्या समाजकंटकांचे दुर्भिक्ष्य नसलेल्या ठिकाणी कायकाय होण्याची शक्यता आहे याचा विचार करा.
समजा कोणी घाऊक भावात चोरले तरी एक वेळ म्हणतो हरकत नाही. कोणीतरी वापरतोय, उपयोग तरी होतोय. मग त्यामुळे भलेही असा उपयोग सर्वजनांना होण्यापासून थांबणार असला, एकट्यादुकट्याकडूनच बळकावला जाणार असला, तरी. शेवटी ज्याला जास्तीत जास्त गरज आहे तोच जास्तीत जास्त प्रमाणात बळकावणार, नाही का? मग अशी सुविधा उपलब्ध करून देण्यामागचा हेतू काही अंशी तरी सफल झाला, असे म्हणता येईल.
मात्र सुविधेचा लाभ घेणार्याने त्यानंतर या चीजवस्तूचा उपयोग कसा करावा यावर आपले नियंत्रण नाही. समजा अपेक्षित उपयोगाऐवजी कोणी (१) पाणी भरून रंगपंचमीचे फुगे म्हणून वापर केला, किंवा (२) नंतर खुल्या बाजारात त्याची पुनर्विक्री सुरू केली, तर त्यावर काहीही नियंत्रण राहू शकत नाही. पण केवळ या कारणासाठी सुविधाच नसावी असे नाही, इथवरही ठीक आहे.
मात्र प्रश्न तेव्हा सुरू होतो, जेव्हा कोणी रिकामटेकडा समाजकंटक या सुविधेचा स्वतः लाभ (किंवा गैरफायदा) घेत नाही, मात्र (उदाहरणादाखल) अशा सर्व उपलब्ध चीजवस्तूंना भोके पाडून पुन्हा जागच्याजागी व्यवस्थित ठेवून देतो. दुर्दैवाने अशाही मंडळींचे दुर्भिक्ष्य नसावे असे वाटते. माझ्या मते हा सर्वात मोठा धोका आहे.
15 Jan 2011 - 11:28 pm | शिल्पा ब
+१
14 Jan 2011 - 10:36 am | गवि
प्रश्न हा आहे की, बाकीच्या लोकांपैकी (त्यात मीही आलोच) कितीजण हे करायला धजावतील किंवा समर्थन करतील? आणि कितीजण " मग आमच्या मुलाबाळींना, बायकापोरांना बाथरुममध्ये गेल्यावर काय वाटेल?" म्हणत ह्याचा विरोध करतील?
फक्त पुरुष प्रसाधनगृहात ठेवायचे हो... :)
असो... बाय द वे.. सुलभच्या आणि तत्सम टॉयलेट्सच्या जवळजवळ प्रत्येक जेन्ट्स टॉयलेटमधे व्हेंडिंग मशीन्स दिसतात.
सर्वांना वाडग्यात भरून टॉफीसारखे ठेवणे भारताला परवडणार नाही.
आणि प्रश्न उपलब्धतेचा नाहीच आहे. ते वापरण्याविषयी सीरियसनेसच नाही हा प्रॉब्लेम आहे. अगदी रेल्वे लाईन क्रॉस करतानाची बेपर्वाई जितकी कॅज्युअल आहे तितकीच ही सुद्धा आहे.
किंवा "मी हेल्मेट वापरत नाही. मला थोडाच होणार आहे अॅक्सिडेंट? अॅक्सिडेंट तर इतर निष्काळजी बेदरकार लोकांना होतात.."
हेल्मेट घालून ड्रायव्हिंगची सगळी "मजा जाते". "गरम होते." "जड पडते." "व्ह्यू जातो" अशी कारणं खूप असतात.
वेश्यांकडून एका माध्यमातल्या प्रोग्रॅमसाठी गोळा केलेली माहिती पाहण्याची संधी मला कोणाच्या ओळखीने मिळाली होती त्यात थेट संवादात वेश्या सांगत होत्या की आम्ही स्वतः जवळ कोंडोम्स ठेवतच असतो आणि ते वापरा म्हणून आग्रह करुनही गिर्हाईक ते वापरत नाहीत. अगदी "मी एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे" असं स्पष्ट सांगूनही गिर्हाईके ही काळजी घेत नाहीत. हे अविश्वसनीय आहे पण खरं आहे.
बर्याच जणांना अजून "आपल्यालाही एड्स होऊ शकतो" अशी जाणीवच नाहीये. इनव्ह्ल्नरेबिलिटी म्हणून एक मनुष्यदोष आहे. त्याचे सूत्र आहे "बॅड थिंग्ज ऑल्वेज हॅपन टू अदर्स"
त्याचे बहुतांश लोक बळी आहेत.
इतर कारणांनीही या साधनांचा वापर अनेकांना अॅक्सेप्टेबल नसतो असंही या माहितीवरून दिसतं. अधिक चर्चा इथे उचित ठरणार नाही. जोपर्यंत या रोगाची दहशत पुरेशी बसत नाही तोपर्यंत न वापरण्यासाठी अनेक कारणे पुढे येत राहणारच.
अवांतर : हॉटेलांत अन्नपदार्थ पुरवणे अशी सर्व्हिस असते आणि त्या अनुषंगाने येणार्या टिश्यू, साबण, कटलरी अशा अॅक्सेसरीज तिथे ठेवलेल्या असतात.
तुम्ही पाहिलेली अॅक्सेसरी हा तिथ्थेच पुरवल्या जाणार्या सर्व्हिसेसपैकी एकाचा भाग नव्हता ना?
;)
(हे पांढरे कसे करायचे तेच समजत नाही.)
14 Jan 2011 - 12:12 pm | चिगो
बाकी
>>तुम्ही पाहिलेली अॅक्सेसरी हा तिथ्थेच पुरवल्या जाणार्या सर्व्हिसेसपैकी एकाचा भाग नव्हता ना?
हा प्रश्न येईलच, ह्याची खात्री होती..
नाही, मला तरी तसे वाटले नाही. ते रेस्टॉरंट होते. माझ्या मते, तो अवेअरनेसचा भाग होता, जी भूटानमध्ये वारंवार आढळते, सगळ्याच बाबतीत..
14 Jan 2011 - 7:24 pm | प्रसन्न केसकर
ते आधीच इथे झालेय. असो!
कंडोम्स, फॅमिली प्लॅनिंगच्या जाहिरातींना भारतात कितपत विरोध झालाय हे समजुन घ्यायला नक्कीच आवडेल. अगदी तीस चाळीस वर्षांपुर्वीपण लाल त्रिकोण देशभर माहिती होताच की. पुजा बेदीच्या कामसुत्र कंडोम च्या जाहिराती देखील गाजल्या त्या त्यातील बिनधास्तपणामुळेच.
मला आठवते तसे एचआयव्हीच्या जाहिरातींना विरोध झाला होता तो त्यातील कॅचलाईन्समधुन एक्स्ट्रॉ मॅरिटल रिलेशन्स जस्टीफाय करतात म्हणुन. शबानाच्या छुने से प्यार फैलता है जाहिराती स्वीकारल्याच की.
भुतानने जे केले ते स्पृहणिय नक्कीच आहे. पण...
१९८० च्या दशकात किमान महाराष्ट्रात तरी याबाबत उघड भुमिका घेण्यात आली होती. १९८९ मधे पुण्यात एक परिषद झाली होती वेश्यांच्या प्रश्नांसंदर्भात आणि तेव्हाच नो कंडोम नो सेक्स अशी भुमिका घेतली होती. वृत्तपत्रांमधुन तेव्हा याचे जाहीर कौतुक देखील झाले होते. (त्याच वर्षात सरकारी शाळांमधे बापाचे नाव नसलेल्या मुलांना प्रवेश देण्याचाही निर्णय झाला होता.) त्यानंतर त्याच वर्षात वेश्यावस्तींमधे कंडोम व्हेंडिंग मशिन्स बसवण्यात आली होती. अजुनही तशी ती अनेक ठिकाणी बसवली जातात. त्यांना मॉरल ब्रिगेडने विरोध केल्याचे ऐकिवात नाही.
ह्युमन ट्रॅफिकिंग आणि एचआयव्ही/एडसबाबत विकसनशील देशांचा दृष्टीकोण अनेकदा रंजक असतो. बहुतेकदा हे देश ह्युमन ट्रॅफिकिंगबाबत ठोस कारवाई करणे टाळतात कारण त्यातुन मोठी आर्थिक उलाढाल होते. युनेस्को, युनिफेम सारख्या संघटनांचे पहिले तीन चार इशार्यांकडे ते कानाडोळा करतात पण त्यानंतर कारवाई होते कारण तसे केले नाही तर आर्थिक मदतीवर त्याचा परिणाम होतो. मग बॉर्डर सिलिंग, रेस्क्यु अँड रिहॅब वर्क, अँटी एचआयव्ही प्रोग्रँस वगैरे सुरु होतात अन बहुतेकदा त्यासाठी इंटरनॅशनल फंडींग मिळते.
14 Jan 2011 - 7:32 pm | रेवती
अच्छा, असे आहे तर!
14 Jan 2011 - 8:05 pm | प्रसन्न केसकर
आणि त्यानंतर लक्षात आले की आपल्या एचआयव्ही मोहिमेमध्ये एका सुधाराची आत्यंत्यिक गरज आहे अन तो म्हणजे एचआयव्ही बाधित होण्याची सर्व कारणे लोकांच्या मनावर ठसवायला हवीत. एचआयव्हीचा सर्वाधिक प्रसार असुरक्षित संबंधांमधुन होतो हे मान्य पण अद्याप असे संबंध समाज पचवु शकत नाहीत. समाजाची धारणा असते की वेश्येकडे गेले तरच एचआयव्हीची बाधा होते. त्यामुळे एचआयव्ही बाधित व्यक्तीच नव्हे तर त्या व्यक्तीचे संपुर्ण कुटुंब कायमस्वरुपी परिणाम भोगते - बहिष्कृती, निरोगी असुनही मुलांना शाळेत प्रवेश किंवा खेळगडी न मिळणे आणि अगदी अंत्यविधींवरही बहिष्कार. त्यामुळे एचआयव्ही बाधित व्यक्ती आणि तिच्या कुटुंबियांची फ्रस्ट्रेशन लेव्हल खुपच जास्त असते आणि त्यातुन व्यक्ती किंवा संपुर्ण कुटुंबाने आत्महत्या करण्यासारख्या आततायी घटना घडतात. (अश्या घटनांचे प्रमाणही लक्षवेधी आहे परंतु बर्याचदा त्या घटना उजेडात येत नाहीत किंवा आल्याच तर त्यामागची कारणे स्पष्ट होत नाहीत.)
अद्यापही भारतात वैद्यकीय सेवांचा प्रचंड अभाव आहे. वैद्यकीय सोयी-सुविधा, औषधे, उपकरणे महाग आहेत. प्रायव्हेट सेक्टरमधे बराचसा धंदा असल्याने, वैद्यक व्यावसायिक्-फार्मा कंपन्या-स्वयंसेवी संस्था-सरकारी यंत्रणेतील लोक यांच्यात साटेलोटे असल्याने ही परिस्थिती बदलत नाही. त्यामुळे मेडिकल वेस्टचे मोठ्या प्रमाणात रिसायकलिंग होते. अश्या परिस्थितीत एचआयव्हीच्या प्रसारास अन्य कारणे जबाबदार असणे अशक्य नाही. जर ही कारणे देखील लोकांच्या मनावर ठसवली तर एचआयव्ही हा टॅबु विषय राहणार नाही आणि त्या विषयावर काम करणे अधिक सुलभ जाईल.
परंतु समाज, शासन, एनजीओ याबाबत बहुतेकदा एकसुरी भुमिका घेतात. मग एचआयव्ही बॅटल म्हणजे जाहिरातबाजी, कंडोम वाटप, क्लिनिकल ट्रायल्स एव्हढेच उरते. अर्थातच त्यांचे खुप महत्व आहे पण...
समजुन घ्या आज भारतातील अनेक राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांचे संपुर्ण अर्थकारण वेश्याव्यवसायावरच चालते. देशभरात किमान चाळीस जिल्हे/ शहरे आहेत की जेथुन देशातील सत्तर टक्के वेश्या येतात. (यात बार डान्सर्स, बार गर्ल, तमासगीर इ. व्यवसायातील मुली मी धरत नाही.) यातील बहुसंख्य मुली साधारणपणे पाच ते पंधरा वर्षे व्यवसाय करतात. (सोडवणुक झाल्यानंतर एकतर त्या त्याच शहरात, त्याच दलालांबरोबर परत देहविक्रय करतात किंवा घरी पाठवुन दिले तरी परत वेश्याव्यवसायात परततात. त्यांचे यशस्वी पुनर्वसन करण्याच्या प्रभावी योजना आंध्रातील चार-पाच जिल्हे वगळता कुठेच नाही.) त्यानंतर बर्याचदा घरी परततात. त्याखेरीज अनेकदा वेश्याव्यवसाय सावकारी पद्धतीने चालतो व अश्या वेळी संबंधित महिला कर्जफेड होईपर्यंतच वेश्या म्हणुन काम करते व त्यानंतर घरी परतते. त्याखेरीज परदेशात, विशेषतः आखाती देश, युरोपातील काही देश, अमेरिका खंडातील काही देश येथे अनेक महिला डोमेस्टिक हेल्प म्हणुन काही महिने/ वर्षांसाठी कामास जातात व लैंगिक अत्याचारास बळी पडतात. सतत फिरतीवर असणारे, अनेक दिवस देशातच किंवा परदेशात घरापासुन लांब काढणारे अनेक पुरुष देखील भारतात आहेत. हे समाजघटक एचआयव्हीचे पोटेंशियल कॅरियर आहेत. एचआयव्हीच का? असे लोक अन्यदेखील अनेक रोगजंतुंचे कॅरियर असु शकतात. त्यांच्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात एचआयव्हीचा प्रसार होऊ शकतो. या लोकांबाबत आपली भुमिका सतत गुळमुळीतच असते.
14 Jan 2011 - 8:22 pm | रेवती
मेडिकल वेस्टचे मोठ्या प्रमाणात रिसायकलिंग होते.
अगदी घातक.
असे लोक अन्यदेखील अनेक रोगजंतुंचे कॅरियर
नक्कीच!
14 Jan 2011 - 10:39 am | चिरोटा
माझ्यामते सरकारने असे पाउल कधीच उचलले आहे. सरकारच्या जाहिराती,एडसची माहिती वगैरे येवून दीड दशक तरी लोटले असावे.'तांबी वापरा'च्या जाहिराती तर येस्.ट्यांवर ८०च्या दशकात लागायच्या की.
वर म्हंटल्याप्रमाणे भूतान देश लहान शिवाय पर्यटन हा मुख्य व्यवसाय्.साहजिक 'ते' आलेच्.आपल्या येथे फ्रेंडस क्लब्/मसाज पार्लर्स आणि कुठल्या कुठल्या सर्विसेस मधून सर्व काही चालत असले तरी त्यास अधिकृत मान्यता नाही.म्हणून कंडोम्स्/तत्सम साधने जाहिर रित्या कुणी हॉटेलवाला ठेवू शकणार नाही.
14 Jan 2011 - 11:21 am | गवि
हो अगदी..
लहानपणी तिसरी चौथीत मित्र आणि मी त्याच्या बसने येणार्या बाबांना आणायला जवळच्याच बस स्टंडवर गेलो होतो आणि चुकामुक झाली.
घरी परत आल्यावर त्याचे बाबा आधीच आलेले. तेव्हा सर्व स्त्रीवृंदासमोर ओरडून मित्र मला निष्पापपणे म्हणाला "अरे..मी म्हटलं ना तुला.. म्हणजे बाबा त्या तांबीच्या गाडीतूनच आले.."
असो.
उगीच डिस्क्लेमर : तांबीचा आणि एडसचा काही संबंध नाही.
14 Jan 2011 - 11:10 am | वेताळ
तसेच कन्डम कोणते मेड होते,क्वालिटी कशी होती,त्याच्याबद्दल माहिती दिलीत तर बरे झाले असते.
14 Jan 2011 - 12:08 pm | चिगो
मी नाही आणली.. त्यामुळे पुढचे प्रश्न आपोआप उडतात. त्यांनी त्यांच्या लोकांसाठी ठेवले असतील तर आणून उगाच कशाला भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध बिघडवावेत? ;-)
14 Jan 2011 - 11:24 am | टारझन
एक मित्र काल सहकुटुंब सहपरिवार भुटाण ला चालला होता. त्याला धागा वाचायला दिला. आता तो तिबेट ला चालला आहे. भुटाण ला म्हणे एकटा जाईल नंतर :)
14 Jan 2011 - 11:27 am | गवि
भुटाणच ना ते जिथे जगात सर्वात जास्त ग्रॉस हॅपिनेस इन्डेक्स की कायसे आहे ? !
आलं लक्षात.. ;)
14 Jan 2011 - 11:29 am | रणजित चितळे
सगळ्या नॉर्थ ईस्ट राज्यांमध्ये ड्रग्स चे सेवन (सुयांनी) बरेच प्रचलीत आहे. हा प्रश्न मोठा आहे. त्या मुळे तिकडे असली जागृती जास्त आहे.
भुतान हा देश जरी पाश्चीमात्यांच्या नजरेतुन अविकसीत असला (कमी जि डी पी च्या निकषाने) तरी तो ज्यास्त सुखी (असा संयुक्त राष्ट्राचा अहवाल )आहे. त्यांचा देश गॉस नॅशनल सुख मोजते जिडीपी फक्त नाही.
तिथली लोक जास्त सार्वजनिक स्वच्छतेला महत्व देतात.
14 Jan 2011 - 11:42 am | परिकथेतील राजकुमार
हो ! आणि करायला सुरुवत देखील केली होती.
काही वर्षांपुर्वी पुणे - मुंबई , पुणे -नाशिक , मुंबई - गोवा अशा महामार्गांवरच्या पेट्रोल पंपस वरती कॉईन बॉक्सच्या आकाराचे कंडोम बॉक्स बसवण्यात आलेले होते. त्यात एक रुपाया टाकला की खालुन कंडोम बाहेर येत असे. पण पुढे पुढे काही दिवसातच हे बॉक्स अदृष्य झाले. त्यानंतर काही काही हॉटेल्सच्या रुम्समध्ये कंडोम पॅकेट्स ठेवायला सुरुवात झाली होती पण पुढे ते देखील बारगळले.
वारीच्या वेळी एडस आणि एच.आय.व्ही. संबंधित माहिती देणारी केंद्रे आणि त्यावर फुकट कंडोम वाटप सुरु झाल्याचे ऐकिवात आहे मात्र पक्की खात्री नाही. तसेच सरकार देखील एक ठराविक कोटा स्वयंसेवी संस्थाना वाटपासाठी देते असे ऐकुन आहे.
14 Jan 2011 - 8:11 pm | प्रसन्न केसकर
हायवेवर काही हॉटेलात तर चेक इन करुन रुममधे गेलात की लगेच वेटर पाण्याची बाटली (रिफिल बिसलेरी) अन कंडोमचे पाकिट घेऊन येतो. चकटफु असतात म्हणे. खरंच! विश्वास बसत नसेल तर हिंजवडी-वाकड भागात दोनचार हॉटेलात जाऊन रिसेप्शनवर चौकशी कर.
15 Jan 2011 - 1:05 pm | परिकथेतील राजकुमार
सविस्तर प्रतिसादांबद्दल धन्यु प्रसन्नदा.
हॉटेल विषयी फक्त ऐकुन होतो पण नक्की खात्री नव्हती. नागपुरच्या एका हॉटेलात मात्र हा अनुभव स्वतः घेतलेला आहे.
14 Jan 2011 - 12:03 pm | वेताळ
इकडे तर सरकारी दवाखान्यात गेले कि हवी तेव्हढी कन्डम पाकिटे नर्सबाय फुकट देते कारण त्याना पाकिटे संपवायचे टारगेट असते. पण त्याचा उपयोग करुन करुन किती करणार लोक त्यावर देखिल चर्चा होणे आवश्यक आहे. काही उनाड पोर त्याचे फुगे करुन हवेत उडवत बसतात हा सरकारी पैशाचा उपव्यय नाही का?
14 Jan 2011 - 5:03 pm | सूर्यपुत्र
खरंच काय करतील, सांगता येत नाही. आमच्या इथे पोरांनी कंडोम हापश्याला आतून बसवला होता. सकाळी पाणी भरायला आलेल्या..............
जाऊ दे...
14 Jan 2011 - 12:59 pm | विनायक बेलापुरे
त्यांची लोकसंख्या कमी आहे त्यामुळे त्याना परवडतय
14 Jan 2011 - 1:01 pm | विनायक बेलापुरे
भूतनीच्यांची लोकसंख्या कमी आहे त्यामुळे त्याना परवडतय ;)
14 Jan 2011 - 5:05 pm | सूर्यपुत्र
असल्या उपाययोजनांमुळेच कमी आहे का?? ;)
14 Jan 2011 - 6:19 pm | मी-सौरभ
म्या बी हेच ईचारणार होतो..
14 Jan 2011 - 7:29 pm | चिरोटा
साधासुधासौरभ,आय डी बदलण्याची वेळ आलीय.!!
14 Jan 2011 - 8:52 pm | चिगो
@ प्रसन्न, थँक्स अ लॉट, तुमच्या दिर्घ आणि वैचारीक प्रतिक्रीयेसाठी...
कंडोम व्हेंडींग मशीन्स पाहील्या आहेत. पण इनजनरल लोक ह्या विषयावर बोलायचं, समजून घ्यायचं टाळतात हा अनुभव असल्याने असे प्रश्न पडले होते..
अवांतर : बर्याच मागे लोकप्रभेच्या मुखपृष्ठावर एका चुंबन घेणार्या जोडप्याचे छायाचित्र आले होते, त्यावरचा गदारोळही आठवला..
15 Jan 2011 - 8:29 am | अप्पा जोगळेकर
त्याच्याच खाली एका छोट्या बॉक्समध्ये लोकांकरीता "कंडोम्स" ठेवलेले होते.
कोणत्या फ्लेवरचे होते?
15 Jan 2011 - 8:42 pm | चिगो
च्यायला, प्रतिसाद वाचत जा की अप्पा...
इचिभन, कोणाला कव्हरशी तर कोणाला फ्लेवरशी...
15 Jan 2011 - 8:29 pm | तिमा
कंडोमचे इतर उपयोग असे आहेत.
कंडोम हा सेमीपरमिएबल मेंब्रेन म्हणून काम करतो. उदा. एखाद्या ऑईल मधले अॅडिटिव्हज काढून टाकायचे असले तर ऑईल कंडोममधे भरुन कंडोमचे तोंड बांधून तो एका सॉल्व्हंट च्या व्हेपर्समधे टांगून ठेवायचा. सर्व अॅडिटिव्हज आंत राहून फक्त प्युअर ऑईल सॉल्व्हंट मधे येते.
दुसरा उपयोग: काही आंबटशौकिन त्याचे फुगे करुन क्रिकेट मॅचच्या वेळेस मागून पुढे सोडून मजा बघायचे. ब्रेबॉर्नच्या इस्ट व नॉर्थ स्टँडवर हा टाईमपास चालायचा.
15 Jan 2011 - 9:34 pm | गवि
कंडोम हा सेमीपरमिएबल मेंब्रेन म्हणून काम करतो..
>>>>>>>>>>>>
अॅ ?????
24 Jan 2011 - 9:25 pm | आवशीचो घोव्
अजून कोणाला "बलबीर पाशा"ची आठवण झाली नाही?