मदत हवी आहे पुण्यात राहण्याविषयी

चिप्लुन्कर's picture
चिप्लुन्कर in काथ्याकूट
12 Jan 2011 - 9:33 am
गाभा: 

माझे ऑफिसमधील एक सिनिअर सध्या पुण्यात नव्या कंपनीत १० फेब्रु. पासून रुजू होणार आहेत.

त्यांची कंपनी येरवड्यात असून त्याच्या जवळ कोठे मराठी बहुल भागात कुटुंबासह राहण्यास जागेची सोय हवी आहे.

पुण्यातील मिसळपाव प्रेमी मदत करतील अशी आशा आहे.

प्रतिक्रिया

पुण्यातील मिसळपाव प्रेमी तुम्हाला आणि तुमच्या ह्या नितांत सुंदर धाग्या ला फाट्यावर तर मारणार नाहीत ना ? ह्या विचारांन्नी मी व्यथित झालो आहे.

मी-सौरभ's picture

12 Jan 2011 - 7:07 pm | मी-सौरभ

शक्यता नाकारता येत नाही. :)

गवि's picture

12 Jan 2011 - 10:24 am | गवि

विश्रांतवाडी.

नावातकायआहे's picture

12 Jan 2011 - 11:06 am | नावातकायआहे

>>विश्रांतवाडी नाय. इसरांत वाडी

नावात काय आहे? ;)

चिप्लुन्कर's picture

12 Jan 2011 - 10:25 am | चिप्लुन्कर

इतकी वर्षे मराठी माणूस आणि त्यात कोकणी माणसाला फाट्यावर मारले जातच आहे.
त्याबद्दल व्यथित होण्याचे काही कारण नाही. त्याची सवय झाली आहे.
१० प्रतिसादात १ जरी कामाचा मिळाला तरी पुरे होते.
आपल्या या प्रतिसादाबद्दल / सुचने बद्धल आभार.
============================

पाषाणभेद's picture

12 Jan 2011 - 10:34 am | पाषाणभेद

"मराठी बहुल भागात"
हा शब्द पुण्याचा विचार करता खटकला. अजून परिस्थीती हाताबाहेर गेली नाही. कंपनीजवळच बघा घर.

मी_ओंकार's picture

12 Jan 2011 - 11:09 am | मी_ओंकार

सहमत. मराठी माणूस असा विचार करतो हाच प्रॉब्लेम आहे. जागा मिळेल तिथे पसरले पाहिजे.
येरवडा येथे हरिगंगा नावाची मोठी सोसायटी आहे, तिथे बघा.

- ओंकार.

टाऱ्यावाडीत सुद्धा जाऊ शकता :)

- स्पारझन

विजुभाऊ's picture

12 Jan 2011 - 12:47 pm | विजुभाऊ

"सकाळ" नावाचे एक जहिरातपत्र ( वर्तमान कमी झैरातीच जास्त म्हणून) पुण्यात तयार होते.
त्यात छोट्या जहीराती असतात त्या पहा. अथवा तुम्हाला ज्या भागात रहाण्याची जागा हवी आहे त्या भागात थोडे पायी चाला. अनेक इस्टेट एजन्टांच्या जहिराती विजेच्या खांबावर /बसस्टॉपवरदिसतील. त्यातल्या एक दोन ठिकाणी प्रयत्न करून बघा जागा सहज मिळेल.
प्यार्टी वगरे साठी आमच्या एका मिसळपावप्रेमी मित्रांचा वनबीएच्के आहे.
अवांतरः "मिसळप्रेमी" सध्या काय करतात हो?

चिरोटा's picture

12 Jan 2011 - 1:33 pm | चिरोटा

इकडे एक त्याच सोसायटीतला फ्लॅट भाड्याने द्यायचाय.
http://classifieds.sulekha.com/pune/rentals/apartments-flats/clad.aspx?c...
येरवड्याला भाडे ९५०० रुपये महिन्याला? बापरे.

आदिजोशी's picture

12 Jan 2011 - 2:11 pm | आदिजोशी

माझे ऑफिसमधील एक सिनिअर सध्या पुण्यात नव्या कंपनीत १० फेब्रु. पासून रुजू होणार आहेत.

दैव कुणावर कधी काय परिस्थिती आणेल सांगता येत नाही. आम्ही दु:खात सहभागी आहोत.

मित्राला मदत करायची असेल तर सर्वप्रथम पुण्यात येण्यापासून रोखा!
त्याउपरही त्यांना यायचेच असेल तर हापिसातच झोपायची सोय होते का ते पहा.
ते शक्य नसेल तर मात्र घर शोधावेच लागेल.
पुण्यात मराठी बहुल भाग उरले नाहीत हे खेदाने नमूद करावे लागेल. परंतु सहानुभुतीपर चार शब्द हवे असतील तर अमराठी संघाचे प्रचारक परा नेटवाला/अ.व. नालिनाया यांच्याशी संपर्क साधा. हल्ली तेच मराठी जनांप्रति सहानुभुती दर्शवतात.
जिथे जागा मिळेल, आणि जी जागा खिशाला परवडेल तिथे रहायचा सल्ला द्या, भाषेपेक्षा खिसा महत्वाचा!!
येरवडा भागात एक वेड्यांचे इस्पितळ आहे, परंतु तिथे भाड्याने जागा मिळत नाही. शक्यतो त्या इस्पितळापासून दूरच राहता आले तर उत्तम.
येरवडा भागात एक तुरुंगदेखील आहे, तिथे भाडे न भरतादेखील राहता येते, पण सोयी फार चांगल्या असल्याचे ऐकिवात नाही! त्यामुळे ही कल्पनादेखील बाद समजा.
पुण्याच्या पश्चिम भागात फारसे कष्ट न होता राहण्याच्या उत्तम सोयी आहेत.
मध्यवर्ती भागात देखील राहू शकाल, फक्त त्यासाठी पेश्शल ट्रेनिंगची गरज भासू शकते. परावळकरांना काँट्याक्ट करावा.

बाकी तुमच्या मित्राला खूप खूप शुभेच्छा!!

--असुर

पिवळा डांबिस's picture

13 Jan 2011 - 1:23 am | पिवळा डांबिस

जबरा प्रतिसाद, असुर!
जियो!!
टार्‍या, तुला जबरदस्त कांपिटेशन आलीये रे!!!!
:)

चिपळूणकर, बाकी येरवड्याला नोकरी असेल तर वर सुचवल्याप्रमाणे विश्रांतवाडीत शोधायला सांगा तुमच्या स्नेह्यांना.
("इसरांत वाडी? हाफ रिटन पडेल!" - हे कोण बोलले बोला? रिक्शावाला दिवसा निजला!!! :))

टारझन's picture

13 Jan 2011 - 11:31 am | टारझन

टार्‍या, तुला जबरदस्त कांपिटेशन आलीये रे!!!!

हा हा हा .. "म्या पामर"* काय कोणाला कांपिटेशन देणार सायबा ? :) आम्ही ज्युनियर मंडळी ... :)

* : डिक्शनरीसौजन्य : सुकाळे

- (म्या पामर) बेसुर

>>> टार्‍या, तुला जबरदस्त कांपिटेशन आलीये रे!!!! <<<

छ्या छ्या!! काही काय अहो पिडांकाका, हे म्हणजे डासाला डायनासॉर म्हणण्यासारखं झालं. कशाला उगाच तुम्ही मज गरीबास इतुकी कौतुके देता....
आपण टारुषेटला कांपिटिसन करायचा नाय वो, आम्ही रिंगणात असायची वेळ आलीच तर त्यांच्याबरोबर टॅग-टीम करु!! =)) =))

-- (गरीब) कार्लटन

"देत नाय जा", असे म्हणतो.

येरवड्याच्या आसपास बर्‍याच सोसायट्या झाल्या आहेत.
सकाळ पेपरमध्ये जाहिराती असतात.
पुण्यात मराठी कुठले हो एवढे आता!:(
जसे मुंबईत मराठी लोक कमी तसे पुण्यातही.....पण नावं ठेवणारे चिक्कार आहेत. ते बाहेरचे आहेत. त्यांचं म्हणणं फाट्यावर मारायचं. फक्त कोकणी माणसालाच फाट्यावर मारतात असं नाहिये. सध्या सगळे जणच एकमेकांना फाट्यावर मारताना दिसतात. तरी घर मिळून जाईल. काळजी करण्याइतकी मुंबैसारखी परिस्थिती नाही आली अजून.
मी पूर्वी रहात होते विश्रांतवाडीच्या जवळ, पण आता तो भाग बराच बदललाय म्हणून फारशी माहिती देता येत नाही.

विजुभाऊ's picture

13 Jan 2011 - 3:04 pm | विजुभाऊ

पुण्यात अजूनही मराठी बहुल भाग पुणे ३० असावा.
पूर्वी तेथे बरेच वाडे होते.
मराठी बहुल याचा नक्की अर्थ सांगितला तर बरे होईल.
पुण्यात कसबा पेठेत ले मराठी भाषीक वेगळे . फारफार अवर्षापूर्वीची गोष्ट असेल .येरवड्यात मराठी बहूल लोक नागपूर चाळ भागात रहायचे , गुंजन टॉकीज च्या आसपास रहायचे. आता तेथे काही बाहेरून आलेले मराठी लोक हर्मीस हेरीटेज वगैरे च्या परीसरात रहातात.
भवानी पेठ नाना पेठ वगैरे भागात देखील मराठी बहुल लोक रहातात. पण त्यांची मराठी थोडी बागवानी थाटाची आहे.
गणेश पेठ वगैरे भागातल्या मराठीत "दूध भट्टी" सारखे एकमेकांशी संबन्ध न येणारे स्थळदर्शक शब्द आहेत.
रवीवार पेठ गुजराथी मारवाडी परंतु मराठी भाषीक लोक आहेत.
मंगळवार , सोमवार् या पेठात कोळी कुंभार वगैरे मराठी लोक रहातात. ते जी मराठी बोलतात त्यात "कुठे या ऐवजी कुढं , किंवा "मी येइल. मी जाईल" असे शब्द वापरतात. त्याना एखादी गोष्ट शोधताना सापडत नाही तर भरताना रामाला भेटावे तसेही "भेटते" उदा: बस भेटली की मी जाईल, रस्त्यात चहा कुढं भेटेल वो?
असो
रास्ता पेठेत फारफार फार वर्षापूर्वी गोखले वगैरे सरदार रहायचे. त्यांना शास्त केली म्हणून त्यांचे नाव रास्ते झाले. त्यांचा वाडा आजही त्या पेठेत आहे. तेथे लोक रहातात आणि शाळा देखील चालवतात. पण त्या पेठे के ई एम ( के ई मुदलीयार) दवाखान्याच्या आअसपास तमिळ भाषीक मराठी लोक रहातात.
गुरुवार, म. फुले या पेठात सोलापूर इलाख्यातील तेलगु भाषीक मराठी लोक रहातात.
डेक्क्न जिमखाना इथले मराठी लोकाना घरात " हल्ली मराठी वर्ड्स रीमेम्बर करायला डिफिकल्ट जाते "
वानवडी ,क्याम्प सोलापूर बाझार भागात मराठी बहुल वस्ती पूर्वीपासूनच कमी होती.
बुधवार पेठेत कुटुंब वत्सल मराठी बहुल लोक रहात असल्याचे काही ऐकीवात नाही.
शुक्रवार पेठ ही हल्ली ब्यांका दुकाने कार्यालये इत्यादीमुळे गजबजलेली आहे
शनिवार पेठ ही पेशव्यांची पेठ .साक्षात पेशव्यांचे घरटे .तेथील देशमुख काही वेळा सिगरेट्सुद्धा हुक्का प्याल्याच्या थाटात पितात.
बाकी सेनादत्त पेठ नवी पेठ वगैरे चिल्लर पेठा आहेत.
पुलाच्या पलीकडे कर्वेनगर /गोखले नगर पतवर्धन बाग आहे तेथे थोडी मराठी भाषीक कुटुंबे आहेत.
पण त्यातील घरटी किमान एक तरी एन आर आय असतात. त्यामुळे त्यांची मराठी ही क्यालीफोर्निया किम्वा गेला बाजार सौदी तील स्थळाम्भोवती रेंगाळत असते.
कर्वे रस्त्यावर पुधे गेले की तेथे मॉडेल कॉलनी ,पौड रोड, वगैरे भागात काही मराठी मंडळी आहेत. पण तेथे जागेचे दर कसे ठरवायचे हा प्रश्न पुण्यातील लोकाना असतो.भुसारी कॉलनीत पाण्याचा प्रश्न आहे.
सिंह गड रस्ता इथला मराठी टक्का फारच कमी झालेला आहे
कर्वे पुतळा गांधी भवनाच्या आसपास ची वस्ती पुने ३० मधून स्थलांतरीत लोकांची आहे.
औंध वगैरे भागात पूर्वी मराठीवस्ती असल्याच्या तुरळक खुणा दिसतात. औंध हा शब्द अवध वरून आला असावा असे समजून एक शर्मा तीवारी नामक अगरवाल इसमाने तेथे रामलल्ला चे मंदीर बनवायच्या घोषणा दिल्या होत्या.
मुकुंद नगर ,टिमवी नगर शेजारच्या डायस प्लॉट तसेच पुढे धोबीघाटामुळे मराठी टक्का घसरत चाललेला आहे.
सहकार नगर मधे अजूनही मराठी बहुभाषीकता आपला टक्का राखून आहे.
अजून अधीक माहिती हवी असल्यास कॅफेनरेश परा याना भेटा.

मी आठवड्याभरानंतर पुण्यात असेन, तो यायच्या आधी खरडीतुन नंबर पाठव मला.

येरवडानिवासी अट्टल पुणेकर