मा.आमदार. हर्षवर्धन जाधव [कन्नड चे आमदार]यायला शिघ्र कृती दलाच्या जवानांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अजिंठा-वेरूळ विकास प्रकल्पाची पहाणी करण्यासाठी आले असता मुख्यमंत्र्यला भेटाला जाचं म्हून त्यायला जी मारहाण केली त्यायचे समर्थन होऊ शकत नाही. हर्षवर्धन जाधव यायनी पोलिसायचे अनाधिकृत धंद्याला आळा घातला आन त्यायचा बदला म्हून त्यायला टींगराच्या बाजूला रक्त गोठेपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली असे म्हणले जाऊ लागले हाये. ते म्हणले माझे किडनीचे आपरेशन झालेलं हाये त्या बाजूला मारु नका. तव्हा पोलिसायनी जाणूनबूजून त्यायला त्याच बाजूला हानलं अशी बातमी पाह्यला टीव्हीवर मिळली. बातमी
मा.आमदार हर्षवर्धन जाधव अरेरावी करत होते. त्यायची लय दादागिरी चालू होती. मुख्यमंत्र्याच्या दौ-यात काय गडबड होऊ नये म्हून पोलिसांची कारेवाही योग्य होती हे कारणं पटण्यासारखे नाय. पोलिस उपनिरिक्षाची माफी मागूस्तोर त्यायला जी मारहाण झाली ते लय निर्घून होतं असं बाबुरावला वाटतं. मिसळपावकरांना काय वाट्टं ?
प्रतिक्रिया
7 Jan 2011 - 10:02 pm | उग्रसेन
अजूक एक बातमी
जेष्ठ साहित्यिक ना.धो. महानोर यायनीबी या मारहाणीचा निषेध केला.
बाबुराव
7 Jan 2011 - 10:01 pm | शिल्पा ब
अवघड आहे.
7 Jan 2011 - 10:13 pm | उग्रसेन
आमदाराला आमी झोडून काढू शकतो तव्हा साध्या मान्साचं काय ?
ह्यो संदेश पोलिसायनी दिला. मला तर करमूच नाय राह्यलं. :(
मनसेचं आमदार बाळा नांदगावकर तेव्हढं बोलू राह्यल.
पर, आपल्या आमदाराला एवढं हानलं
राज सायबाचंत तोंडबी नाय उघडू नाय राह्यलं :(
बाबुराव (सामाल्य नागरिक)
7 Jan 2011 - 10:15 pm | नितिन थत्ते
एका आमदाराला (पांढर्या दहशतवाद्याला) मारल्यामुळे येथील अनेकांना समाधान वाटले असेल.
7 Jan 2011 - 10:39 pm | उग्रसेन
कोणाचं समाधान कशात आसन ह्ये काय सांगता येत नाय.
आमदाराला नागडं करुन हानलं असतं तरीबी पोलिस इज अल्वेज राइट
असं म्हन्नारी मंडळी हायेच की इथं. तव्हा सामाल्य माल्साची काय कथा ?
जाऊंच्या तिच्यामारी, आपून कशाला मनाला लावून घ्याचं.
आपल्या टींगराला कुठं लागलं अस्स म्हणत पोरासोरात आनंदान रमाचं नाय का ?
गुड नाइट.
बाबुराव. :)
8 Jan 2011 - 12:26 am | चिंतामणी
बाबुराव, तुमी नग मनाला लावून घेवु.
पण यामुले गुदगुल्या होनारे हैत ना. >:)
तेंच काय करायच?????????? X(
8 Jan 2011 - 1:17 am | Pain
का वाटू नये?
का यातही उगाच बुद्धिभेद करायचा आहे ?
7 Jan 2011 - 10:54 pm | यकु
एकदा एसारपीने कर्फ्यूमध्ये माझा पण दंड सुजवला होता म्हणून कसलीही लाज न बाळगता स्वानुभव सांगू शकतो..
त्यावेळी मी एका पेपरचा कर्मचारी होतो आणि कर्फ्यूमध्ये ड्यूटीवर जात होतो..
मला मारले म्हणून मी ओफिसात नंतर फार आरडा-ओरडा केला.. पण आयकार्ड सोबत घेऊन हिंडत जा या फुकट सल्ल्याव्यतिरिक्त काहीही झाले नाही..
या प्रकर्णात एसारपीचे आजकालचे जे beating rod or clubs आहेत त्यामुळं नंतर फार काही वेदना होत नाहीत.. वळ मात्र लय भारी उमटतात..
हां, वेत मात्र फार लागतो (त्याचाही प्रसाद लहानपणी अनेकदा खाल्लेला आहे)
पण या प्रकरणात पोलीसांचे / एसारपीचे काम कितीही अन्याय्य वाटत असले तरी त्यांनी उट्टे काढले आहे असे वाटते.. कारण इतरवेळी हेच लोक ( व्यक्तीश: हर्षवर्धनजी करतात की नाही ते माहीत नाही) पोलीसांची आयमाय उध्दरत असतात.. मग संधी आली की पोलीसही असे हात धूवुन घेतात.... फिट्टंफाट..
संबंधितांच्या बदल्या वगैरे करून अशी प्रकरणे फुस्स होतात..
हर्षवर्धनजीचं सोडा, ही जाहीर घटना आहे.. अनेक नेते पोलीसांकडून मरेमरेतो मार , शिव्या खातात कस्टडीमध्ये.. पण सांगतात कुणाला..
तस्मात सामान्य माणसाने असल्या प्रकारापासून दूरच राहाणे उत्तम..
7 Jan 2011 - 11:24 pm | सुहास..
हे प्रकरण गौताळ्याच्या चंदन-तस्करी पर्यंत आहे ..
दिलपाख (पिएसआय) होता तेव्हा पण असेच झाल होत.
च्या मारी ह्यांच्या !!
8 Jan 2011 - 8:43 am | अवलिया
+१
8 Jan 2011 - 1:17 am | आत्मशून्य
असे कसे काय घडले बूआ ?
8 Jan 2011 - 9:54 am | पाषाणभेद
पोलिसांची भुमिका संशयास्पद आहे. अशी कुणालाही मारहाण ते करू शकत नाही. त्यांनी एकवेळ आमदाराला ताब्यात घेतले असते तर ठिक आहे.
8 Jan 2011 - 11:16 am | परिकथेतील राजकुमार
काय सांगता काय?
आम्ही तर ह्या आधी फक्त आमदार आणि नगरसेवक (अथवा नगरसेवीकांच्या पतींना) सफाई कामगारांना, रस्त्यात ओव्हरटेक न करु देणार्यांना किवा सुरक्षा रक्षकांना मारहाण करताना बघितले होते. ह्यावेळी 'शिकारी खुद यहा शिकार हो गया..' असे झाले का काय ?
असो...
कुठल्याही राजकारण्याविषयी काडीचीही आत्मियता वाटत नाही.
8 Jan 2011 - 11:43 am | विजुभाऊ
ते आमदार कोणत्या पक्षाचे होते.
कांग्रेस ( दोन्ही ) / अपक्ष / जनता दल / शिवसेना /मनसे / री पा इं / शे का प ?
8 Jan 2011 - 3:43 pm | विनायक बेलापुरे
आंदोलने खपवून घेतली जाणार नाहीत - आर आर आबा
( लेकी बोले सुने लागे.)
8 Jan 2011 - 5:09 pm | चिरोटा
"Shiv Sena condemns goondagiri of police. The government does not have right to do goondagiri. Action must be taken against guilty policemen," Uddhav said.
Even police do not have right to take law into their hands, the Sena leader said.
मेलो
http://www.dnaindia.com/mumbai/report_mns-gets-uddhav-thackeray-s-suppor...
भारतात ताब्यात कोणी सापडला तर पोलिस गुरासारखे मारतात. पण तो मार खाण्याआधी सहसा काहीतरी चूक्(पोलिसांच्या दृष्टिकोनातून वा कायद्याच्या) झालेली असते.
8 Jan 2011 - 6:31 pm | नितिन थत्ते
सहमत. शिवसेना गुंडगिरीचा निषेध करताना वाचल्यावर ठार मेलो.
8 Jan 2011 - 9:00 pm | उग्रसेन
शिवसेना गुंडगिरीचा निषेध करताना वाचल्यावर ठार मेलो.
बाबुराव :)
9 Jan 2011 - 11:31 am | आजानुकर्ण
सहमत आहे. शिवसेनेने गुंडगिरीचा निषेध केल्याचे वाचून डोळे पाणावले.
8 Jan 2011 - 7:55 pm | आशिष सुर्वे
हर्षवर्धन जाधव??
कोण?
8 Jan 2011 - 8:59 pm | उग्रसेन
हर्षवर्धन जाधव??
कोण?
हर्षवर्धन जाधव हे आन हे
बाबुराव :)
13 Jan 2011 - 10:12 am | पाषाणभेद
आमदारांना पकडून ठेवण्यात आले अन मारहाण करण्यात बराच वेळ गेला. वरच्या हुकूमाची वाट पोलीस पाहत होते, असे राज साहेबांच्या भाषणातून समजले.
जे पोलीस दोशी असतील त्यांच्यावर मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा खटला दाखल करावा. त्यांचा मारविता धनी कोण आहे याचा तपास करावा.
(मागेही राजठाकरे यांच्या आंदोलनातसुद्धा पोलीसांनी असलीच आगळीक केली होती. मालेगावात तर पायांच्या नळ्या फोडल्या होत्या. असली अमानूष मारहाण ते अतिरेक्यांना सुद्धा करत नाहीत. शेपूट घालतात तेव्हा.)
- सत्य परिस्थीती काय ते समजण्यासाठी धागा वरती आणतोय.
जय मराठी, जय महाराष्ट्र