वृषभ रास / वृषभ लग्न

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
5 Jan 2011 - 2:40 pm
गाभा: 

राशी चक्रातील दुसरी रास वृशभ.
या राशीतील व्यक्तींबद्दल सांगताना बरेच जण ही रास शुक्राची रास असते. रसिक असते.
वगैरे सांगतात.
राशीचक्र कार्यक्रम करणारे शरद उपाध्ये सांगतात की वृषभ रास असणार्या व्यक्ती या आपल्या रहाण्याबद्दल फार काटेकोर असतात. त्याना नटण्याथटण्याची आवड असते.
या गुणाबद्दल सांगताना ते सांगतात की वृषभ रास असणारी स्त्री ही सकाळी दूध आणायला निघाली तरी ती लग्नाला निघाली असावी इतकी नटून निघते.
आणि कुंभ राशीची स्त्री ही लग्नाला निघाली तरी सकाळी दूध आणायला जावे अशा अवतारात जाते.
राशीवरून माणसाची वर्तणूक/स्वभाव ठरु शकतात?
वृषभ रास असणार्‍या लोकांची स्वभाव वैषिष्ठ्ये काय असतात?
कुंभ रास असणार्‍या लोकांची स्वभाव वैषिष्ठ्ये काय असतात?

प्रतिक्रिया

विजुभाउंना सगळी माहिती फुकटात हवी असते

विजुभाउंना सगळी माहिती फुकटात हवी असते

पिसे द्यायची तयारी आहे. घेणाराने ओळख पटवून घेवून जाणे

गुंडोपंत आणि युयुत्सुरावांना खवमधे लिंक दिली आहे

सूर्यपुत्र's picture

5 Jan 2011 - 2:48 pm | सूर्यपुत्र

आम्ही खूप वांडपणा करायचो. म्हणून मास्तर आम्हांला "नालायक राशीचे" म्हणायचे.
या राशीविषयी सुद्धा अजून वाचायला आवडेल.

पर्नल नेने मराठे's picture

5 Jan 2011 - 3:09 pm | पर्नल नेने मराठे

*आणि कुंभ राशीची स्त्री ही लग्नाला निघाली तरी सकाळी दूध आणायला जावे अशा अवतारात जाते.

असेही आइकलेय कि "कुंभ रास म्हणजे विद्येने भरलेला घडा !!!"
कर्क राशिच काही सन्ग्ता अले तर बघा.. मी कर्क राशीची आहे.

कर्क राशीच्या लोकांना शुद्ध लिहिण्याचा ज sssssss रा प्रॉब्लेमच असतो असे कुठूनसे समजले...अभ्यासुंच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत.

मी कर्क राशीची आहे. >>>
कर्क राशीचे लोक अतिशय शुध्द बोलतात म्हणे खरे आहे का ?

वाक्यात "त्यांच्या मते" हा शब्द राहिला

स्वतन्त्र's picture

5 Jan 2011 - 4:29 pm | स्वतन्त्र

वृषभ राशीचे लोक दिसायला सुंदर असतात.
खूप कष्टाळू असतात .
उदा:माधुरी दीक्षित-नेने

चिंतामणी's picture

6 Jan 2011 - 12:12 am | चिंतामणी

स्वतन्त्र - तुझी रास काय????? :-/

स्वतन्त्र's picture

6 Jan 2011 - 10:46 am | स्वतन्त्र

वृषभ .

यादीत अजून काही नावे.
विचारवंत असतात :लेओनार्डो दा विन्ची,कार्ल मार्क्स,विलयम शेक्सपीयर.
अजून एक मोठा नाव राहिलंच:अडोल्फ हिटलर.

सद्दम हुसेन चे नाव देखील अ‍ॅड करा.

कृष्ण हा वृषभ राशीचा होता असे उपाध्ये म्हणतात

प्रीत-मोहर's picture

7 Jan 2011 - 2:34 pm | प्रीत-मोहर

मी सुद्धा वृषभचीच

स्वतन्त्र's picture

7 Jan 2011 - 6:16 pm | स्वतन्त्र

वरील वृषभचे गुण असतीलच !

सूचना:हे फक्त राशीचे तथाकथित गुण जुळतात का हे पाहण्यासाठी आहे.इतर कोणताही उद्देश यात नाही.

माझ्याच मकर राशि बद्दल काही माहित नाही .. इतर राशींबद्दल आपल्याला काहीच माहित नाहि ..
उलट आम्हालाच कोणॅए फुकटात मकर बद्दल माहीती द्या की राव ...

ज्ञानराम's picture

5 Jan 2011 - 5:58 pm | ज्ञानराम

कुंभ राशीचे लोक सहनशील असतात....

तिमा's picture

5 Jan 2011 - 6:35 pm | तिमा

समस्त मानवजातीला अवघ्या १२ राशीत बसवून त्यांचे असे ठोक वर्णन करणे हे उथळपणापेक्षा पैसा मिळवण्याच्या क्लुप्त्या आहेत.
ज्योतिष शास्त्रात जी कुंडली असते त्या बारा घरात एकाच राशीत इतकी परम्युटेशन्स आणि काँबिनेशनस शक्य आहेत की एकाच राशीत सुध्दा 'व्यक्ति तितक्या प्रकृती' ही म्हण लागू पडते. अधिक माहिती युयुत्सु, गुंडोपंत वा अन्य तज्ञ व्यक्तिच देऊ शकतील.

वेताळ's picture

5 Jan 2011 - 8:05 pm | वेताळ

बैल आणि कोणत्या तरी ग्रहाची सांगड घाला. त्यावरील कथा बनवा अन वाचा. अवघड काय आहे त्यात?

स्वैर परी's picture

5 Jan 2011 - 8:35 pm | स्वैर परी

वृषभ राशीची व्यक्ती हि श्रुन्गारीक असते. नटणे थटणे अगदी जन्मसिद्ध हक्क असल्यासारखी.
फार बोलके असतात. त्यांचा स्वभाव हा मनमिळाउ असतो!
वरील विधाने ही आजवर इथुन तिथुन कानावर पडलेल्या माहितीवरुन लिहिलेली आहेत.

वृषभ हे एकंदर राजेशाही काम असतं. या लोकांचे स्वभावविशेष खालील उतार्‍यात ठळक केले आहेत.
_______________
वृषभ राशीची एक स्त्री माझ्या ओळखीतली होती नेहमी खूप छान नटत असे. भारतात असताना तिने केस ब्लाँड करून घेतले होते. ती गोरी असल्याने तिला छान दिसले पण भारतात आपल्याला पहायची सवय नसल्याने जरा विचीत्र वाटायचं. खाणं पीणं अगदी सांभाळून खात असे. म्हणजे कॅलरी कॉन्शस होती पण तिला खाण्याची आवड होती.
_______________
माझे बाबा याच राशीचे. बाबांमध्ये खूप म्हणजे कमालीची सहनशीलता (इनफायनाइट पेशन्स) आहे. बाबांना अत्तरे, नियमित झोप, नियमित माफक व्यायामाची आवड आहे. ही हॅज अ ग्रीन थंब. खूप सुंदर झाडं / बोन्साय ते करतात. खाण्यापीण्याची आवड आहे. छंद म्हणून वाईन बनवतात.
____________
माझी रूममेट याच राशीची होती. ती कपडे घेण्याबाबत खूप चोखंदळ होती. रंग भडक नाही तर अतिशय आल्हाददायक असे ती निवडत असे. सूतदेखील मऊ लागत असे. ती स्वतः खूप चांगले खाणं बनवत असे. कानातले आदि बनवत असे मुद्दाम मणी, साहीत्य आणून. ते मणीही अतिशय चोखंदळपणे निवडणार. स्वभाव खूप गोड होता. आय मिस हर :(
_________________

रेवती's picture

5 Jan 2011 - 9:31 pm | रेवती

धन्यवाद!;)

:) ह्म्म तू वृषभ राशीची दिसतेस :)

उपास's picture

6 Jan 2011 - 3:53 am | उपास

उपरोक्त बरेच गुण अस्मादिकात दिसतात असं लोकं म्हणतात :प
आम्ही चंद्र आणि सूर्य दोन्हीकडून वृषभ राशीचे बैलोबा ;)

कुंभ राशीचे लोक माणूसघाणे असतात असा माझा अनुभव आहे. म्हणजे आत्मकेंद्रित अथवा स्वार्थी अप्पलपोटेपणातून आलेला माणूसघाणेपणा नसून उलट खूपसं त्यांना इतर लोक समजू शकत नाहीत या भावनेतून आलेला हा माणूसघाणेपणा असतो.
जिथे इतर लोक छानछोकी, कपडेलत्ते, दागदागीने आदिच्या आहारी गेलेले असतात तिथे कुंभ राशीच्या लोकांचे मन सामाजिक समस्या, बौद्धिक कोडी उकलण्यात रममाण झालेले असते. त्यामुळे पेहेराव आदि क्षुल्लक गोष्टींकडे त्यांचा ओढा अजिबातच नसतो हे माझं नीरीक्षण.
यांच्या स्वतःच्या थिअरीज असतात फक्त पोपटपंची नसून त्यांची स्वतःची मतं असतात. ही वायू (बुद्धीप्रधान) राशीतील सर्वात शेवटची रास.
पर्सनल स्पेस (व्यक्तीस्वातंत्र्य) मला वाटतं ही कन्सेप्ट या लोकांनी पहील्यांदा शोधून काढली असावी. याची कारणं २ - हे व्यक्तीस्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते असलेले मी पाहीले आहेत दुसरं संशोधक वृत्ती अंगी पुरेपूर बाणलेली असते.

ही झाली माझी नीरीक्षणं.

चिंतामणी's picture

6 Jan 2011 - 12:18 am | चिंतामणी

कुंभ राशीचे लोक माणूसघाणे असतात असा माझा अनुभव आहे.
सहमत

म्हणजे आत्मकेंद्रित अथवा स्वार्थी अप्पलपोटेपणातून आलेला माणूसघाणेपणा नसून उलट खूपसं त्यांना इतर लोक समजू शकत नाहीत या भावनेतून आलेला हा माणूसघाणेपणा असतो.

असु शकेल.

जिथे इतर लोक छानछोकी, कपडेलत्ते, दागदागीने आदिच्या आहारी गेलेले असतात तिथे कुंभ राशीच्या लोकांचे मन सामाजिक समस्या, बौद्धिक कोडी उकलण्यात रममाण झालेले असते. त्यामुळे पेहेराव आदि क्षुल्लक गोष्टींकडे त्यांचा ओढा अजिबातच नसतो हे माझं नीरीक्षण.

तुझी रास काय आहे??????????

कवितानागेश's picture

6 Jan 2011 - 1:35 am | कवितानागेश

कुंभेच्या लोकांना 'माणूसघाणे' म्हटल्याबद्दल णिषेध!
मला कधीच माणसांची घाण वाटत नाही.
( तशी तर पालींची/ झुरळांचीही वाटत नाही ;) )

फक्त कधीकधी कंटाळा येतो माणसांचा, जाम बोअर करतात!

(लग्नाला जाउन दूध घेउन येणारी, एक तृतियांश कुंभ) माउ

वेताळ's picture

6 Jan 2011 - 9:51 am | वेताळ

आपण कुंभ लोक असतोच असे,माणुसघाण.....
मला गर्दी अजिबात आवडत नाही.
पण कपड्यांच्या बाबत हे सत्य आहे. माझे कपडे खुप दिवस टिकतात.

कवितानागेश's picture

6 Jan 2011 - 4:16 pm | कवितानागेश

माझे कपडेपण खूप दिवस टिकतात.
...कारण माझ्याकडे खूप कपडे असतात! ;)
कपाट उघडले की अंगावर कोसळतात.
माझी बिचारी तूळ राशीची आई ते मधूनच आवरते.
....आणि माझे लाडके-जुने जुने कपडे गपचुप गायब करते.
अशा वेळेस मी पुस्तकात डोके खुपसून माझी ज्ञानाची भूक भागवत असते!

--निर्लज्ज सदासुखी माउ

तुमचे वाचुन मी माझ्या मित्र आणि बहिन यांची ही कुंभ रास आहे त्यांचे वागणॅ बघितले तंतोतंत जुळते आहे ..

जरा मकर बद्दल सांगा की आता..
मी बर्याच दा पाहिले आहे सगअ‍ॅळ वृश्चिक-वृशभ , कुंभ-मेष , आणि सिंह ह्याच राशिबद्दल बोलतात ...

विलासराव's picture

6 Jan 2011 - 12:06 am | विलासराव

चला आता फुकटात माझ्या राशीबद्दल वाचायला मिळणार तर.

शिल्पा ब's picture

6 Jan 2011 - 12:08 am | शिल्पा ब

माझी एक रास वृषभ अन दुसरी वृश्चिक आहे असे समजते...याचा काय अर्थ घ्यावा?

गुंडोपंत's picture

6 Jan 2011 - 10:16 am | गुंडोपंत

जन्मकाळी ज्या राशीत चंद्र आहे ती तुमची रास. पाश्चात्य पद्धतीनुसार जेथे सूर्य ती तुमची रास. (पण माझ्या अनुभवा प्रमाणे चंद्र रास नेमकी असते कारण चंद्र म्हणजे तुमचे मन.) कुठे चंद्र आहे ते पाहा म्हणजे नेमकी रास कोणती हे कळेल.

वाटाड्या...'s picture

6 Jan 2011 - 12:16 am | वाटाड्या...

>> व्यक्तीस्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते असलेले मी पाहीले आहेत दुसरं संशोधक वृत्ती अंगी पुरेपूर बाणलेली असते. - एकदम बरोबर..

ह्या लोकांना कुठल्याही गोष्टीच्या अंतापर्यंत जाण्याची खाजच असते. कुठल्याही गोष्टीचं सहजासहजी उत्तर देत नाहीत कारण विचार करण्याची शक्ती आणि त्यासाठी लागणारा पेशन्स हा अंगभुत गुणच असतो. ही लोकं साधारण संशोधक किंवा क्रिमीनल इनवेस्टिगेशन मधे चांगलं कार्य करु शकतात.

असाधारण काम करण्याची क्षमता, त्यासाठी वाट्टेल तेवढा तन, मन धन देण्याची तयारी हे ह्यांची काही वैशिष्टे आहेत.

- (जवळ पोपट नसलेला) वाटी भविष्यवाला

अमोल केळकर's picture

6 Jan 2011 - 10:04 am | अमोल केळकर

वा वा छा न . ज्ञानात भर पडत आहे

अमोल

कवितानागेश's picture

6 Jan 2011 - 3:41 pm | कवितानागेश

सगळ्या ज्ञान पाजळणार्‍यांसाठी हा टोमणा समजायचा का हो ज्योतिषीबुवा?

अवांतरःकन्या रास अहे का हो तुमची?

विजुभाऊ's picture

6 Jan 2011 - 10:36 am | विजुभाऊ

म्हणजे नक्की काय.

तुळ राशीबद्दलही बोला की कुणी :( सगळे फक्त हे लोक संतुलित असतात यवढंच सांगतात...यापेक्षा वेगळही काही सांगा कुणी तरी प्लीज.....

अमोल केळकर's picture

6 Jan 2011 - 3:25 pm | अमोल केळकर

तुळ राशीला सध्या साडेसाती चालू झाली आहे .

अमोल

धंद्यात हुशार दिसता ज्योतिषबुवा, नव्या गिर्‍हाईकाला थेट साडेसाती सांगुन पार टरकवला आता साडेसात वर्ष तुमचा खिसा गरम.. क्काय्य्य?

धंद्यात हुशार दिसता ज्योतिषबुवा
:D
+१

अमोल केळकर's picture

7 Jan 2011 - 9:41 am | अमोल केळकर

:)
++१

अमोल

विजुभाऊ's picture

6 Jan 2011 - 2:33 pm | विजुभाऊ

नवर्‍याची रास वृषभ आणि पत्नीची रास कुंभ असे एक जोडपे माझ्या पहाण्यात आहे.
नवर्‍याला जेंव्हा रसीक पण करावासा वाततो नेमके त्याच वेळेस बायकोला "सीक" पण करावासा वाटतो.

पर्नल नेने मराठे's picture

6 Jan 2011 - 2:39 pm | पर्नल नेने मराठे

=)) =))

विनायक प्रभू's picture

6 Jan 2011 - 3:41 pm | विनायक प्रभू

सहमत

अरे हे ब्येस आहे की विजुभाउ, नवर्‍याचा सीक अन बायकोचा रसिक मुड असेल तर...

उपास's picture

6 Jan 2011 - 8:59 pm | उपास

susan miller monthly horoscope असा सर्च मारला गुगल मध्ये तर तुम्हाला ह्या बाईंचं महिन्याभराचं सूर्य राशी (इंग्लीश महिन्या)नुसार भविष्य दिसेल, अतिशय रंजक. .:) (हापीसातून लिंक देता येत नाहीये त्याबद्दल क्षमस्व..)

ज्ञानराम's picture

7 Jan 2011 - 12:33 am | ज्ञानराम

"जिथे इतर लोक छानछोकी, कपडेलत्ते, दागदागीने आदिच्या आहारी गेलेले असतात तिथे कुंभ राशीच्या लोकांचे मन सामाजिक समस्या, बौद्धिक कोडी उकलण्यात रममाण झालेले असते. त्यामुळे पेहेराव आदि क्षुल्लक गोष्टींकडे त्यांचा ओढा अजिबातच नसतो हे माझं नीरीक्षण "

"अगदी बरोबर - चिंतामणी यांच म्हणन बरोबर आहे"

विजुभाऊ's picture

8 Jan 2011 - 12:08 pm | विजुभाऊ

वृषभ राशीच्या व्यक्तीना नटण्यासजण्याची हौस असते. आरसे वगैरे लावून सजवलेली रिक्षा असेल तर त्या रीक्षाचा चालक्/मालक वृशभेचा आहे असे नक्की समजा.
वृषभ राशीच्या व्यक्तीना विरुद्ध लिंगी व्यक्तीचे आकर्षण असते. ते स्वपत्नीची जास्त काळजी घेतात.
वृषभ व्यक्तींचे बोलणे वागणे समोरच्यावर छाप पाडणारे असते. वाचन कला संगीत वगैरे मध्ये वृषभ व्यक्तीना रस असतो.
वृषभ व्यक्ती या स्थैर्याची अपेक्षा ठेवतात. त्याना अधिकाराने नाही तर प्रेमाने वश करता येते.... इति. - शरद उपाध्ये

विनायक बेलापुरे's picture

8 Jan 2011 - 3:57 pm | विनायक बेलापुरे

एकदा एक वृषभ राशीच्या बाई पंक्तित वाढप करत होत्या.
खाली मान घालून जेवणारी माणसे पानावर हात आडवा धरुन मानेनेच नको नको म्हणत होती.
बाईंनी , "घ्या ना हो ! " असा लडिवाळ आग्रह केल्यावर

आडवा हात धरुन जेवणारी माणसे एकदम चमकून वर बघून " आँ ! तुम्ही होय ? मग वाढा वाढा...... " म्हणत होती.

बाई पंक्तित मीठ फिरवित होत्या. :)

अनुमान १ - वृषभ राशीच्या व्यक्तिना मिरवणे फार्फार आवडते
अनुमान २ - पुरुष त्यांच्यापुढे गुढगे टेकतात.

:)

शिल्पा ब's picture

9 Jan 2011 - 12:31 am | शिल्पा ब

भारी किस्सा.. :)

सूर्यपुत्र's picture

10 Jan 2011 - 8:04 pm | सूर्यपुत्र

एकवेळ मिरवण्याचे मान्य करू शकेल, पण...
>>पुरुष त्यांच्यापुढे गुढगे टेकतात.
अरे बापरे!!! मी वॄषभ आहे.... :(