सॉसी चिली व्हेजिटेबल्स व्रॅप (wrap)

खादाड अमिता's picture
खादाड अमिता in पाककृती
3 Jan 2011 - 9:20 am

'पोळी भाजी खाऊन खून अगदी कंटाळा आलाय! अरे हो, पण एवढ्या पोळ्या केलेल्या आहेत न. त्याचं काय करायचं? फोडणीची पोळी करू? नको. मला काही तरी मस्त, चमचमीत खावंस वाटतंय. '

जर हा संवाद तुम्हाला ओळखीचा वाटत असेल, तर हि पाक्रु तुम्हाला नक्की आवडेल; आणि नसेल तरी आवडेल. सोप्पी कृती आहे. हा पदार्थ स्नॅक म्हणून किंवा स्प्रिंग रोल सारखं स्टार्टर म्हणून पण देता येतो. आणि हो, हि एक लो कॅलोरी हाय फायबर रेसिपी आहे.

सामग्री:

१ कांदा, लांबट बारीक चिरलेला
१ शिमला मिरची, बारीक चिरलेली
१ कप बारीक चिरलेला कोबी
१० पाकळ्या लसून, बारीक चिरून
२ हिरव्या मिरच्या, लांबट चिरलेल्या
१ चमचा तेल
१ मोठा चमचा सॉय सॉस
चवीनुसार मीठ
१ चिमुट साखर
२ पोळ्या/फुलके

क्रुति:

एक नॉन स्टिक पॅन मधे, तेल थोड गरम करुन, त्यात लसुण, कान्दा, हिर्व्या मिर्च्या घालुन मोठ्या गॅस वर परता.

मग त्यात कोबी आणि शिम्ला मिर्ची घालून परता. चवीनुसार मीठ आणि साखर घालून नीट परता.

सगळ्यात शेवटी सॉय सॉस घालून एक मिनिट सर्व भाज्या परता.

ह्या भाजी चे दोन किंवा तीन भाग करून, एका पोळी च्या कडेला ती भाजी घालून त्या पोळी चा रोल करावा. मधून कापून, सर्व्ह करा.

प्रतिक्रिया

वा.. मस्त पाकृ.

उरलेल्या पोळ्यांपासून करण्याची आयडिया छान..

पण हो...

फोडणीची पोळी हा सुद्धा एक अत्यंत टेसदार प्रकार आहे हे एक सत्य आहेच..कढीपत्ता, शेंगदाणे, भरपूर कांदा यांची फोडणी देऊन केलेली खमंग फोचिपो गोड दह्यासोबत...त्यामुळे पोळया उरल्या तर फोचिपो नकोय असे मी तरी कधी म्हणणार नाही.. :)

कच्ची कैरी's picture

3 Jan 2011 - 4:24 pm | कच्ची कैरी

हं यम्म्मीईईईईईए दिसतय टेस्ट करायला मिळाले असते तर फार बरे वाटले असते.

सारणासाठी वेगळं स्टफिंग वापरता येईल आणि त्यातून चांगली चवही मिळेल अर्थात लो कॅलोरी गृहीत धरुनच..

- पिंगू