"पीएसएलव्ही सी-9' चे यशस्वी उड्डाण

मानस's picture
मानस in काथ्याकूट
28 Apr 2008 - 6:46 pm
गाभा: 

आज सर्व भारतीयांना अभिमान वाटेल अशी घटना, "पीएसएलव्ही सी-9' चे यशस्वी उड्डाण.

एकाच वेळेस १० उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याचा विक्रम. "ईस्रो" च्या सर्व वैज्ञानिकांचे व सहकार्‍यांचे हार्दिक अभिनंदन. ह्या बद्दल सविस्तर माहीती येथे वाचा.

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

28 Apr 2008 - 6:55 pm | आनंदयात्री

काल सगळ्या न्युज वाहिन्या त्यांचे नेहमीचे रद्दड काहीतरी दाखवत होत्या फक्त एकच मराठी वाहीनी याबद्दल दाखवत होती, कौतुक वाटले.

गोट्या's picture

28 Apr 2008 - 7:22 pm | गोट्या (not verified)

"सर्व भारतीयांना अभिमान वाटेल अशी घटना, "पीएसएलव्ही सी-9' चे यशस्वी उड्डाण."

सहमत.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

व्यंकट's picture

28 Apr 2008 - 8:35 pm | व्यंकट

म्हणतो.

व्यंकट

मदनबाण's picture

28 Apr 2008 - 7:30 pm | मदनबाण

सर्व वैज्ञानिकांचे व सहकार्‍यांचे हार्दिक अभिनंदन.

(ईस्रो प्रेमी)
मदनबाण

आणि ह्या यशस्वी उड्डाणाने देशाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोचणार्‍या इस्रोच्या सर्व लोकांचे अभिनंदन!

एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल १० उपग्रह एकाच वेळी यशस्वीपणे अंतरिक्षात प्रस्थापित करण्याचा हा जागतिक विक्रम आहे!!
हॅट्स ऑफ!!

चतुरंग

सुधीर कांदळकर's picture

28 Apr 2008 - 7:35 pm | सुधीर कांदळकर

खरेच मानाचा तुरा.

सुधीर कांदळकर.

प्रमोद देव's picture

29 Apr 2008 - 8:55 am | प्रमोद देव

आणि ह्या यशस्वी उड्डाणाने देशाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोचणार्‍या इस्रोच्या सर्व लोकांचे अभिनंदन!

एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल १० उपग्रह एकाच वेळी यशस्वीपणे अंतरिक्षात प्रस्थापित करण्याचा हा जागतिक विक्रम आहे!!
हॅट्स ऑफ!!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मनस्वी's picture

29 Apr 2008 - 9:47 am | मनस्वी

म्हणते.

विकास's picture

28 Apr 2008 - 9:43 pm | विकास

कालच इस्रो असे करणार आहे म्हणून वाचले होते पण आज सकाळी रीडीफवर/मटा/सकाळवर पटकन बातमी दिसली नाही. बातमी वाचून आनंद झाला/अभिमान वाटला.

यातील मोठा भारतीय उपग्रह आता भारतासाठी मॅपिंग करणार आहे. तेव्हढे वाचून आनंद झाला कारण कधी काळी नीट नकाशे मिळतील अशी आता अशा करता येईल (संशोधनासाठी म्युन्सिपॅलीटीत चकरा मारून पहा).

केशवराव's picture

28 Apr 2008 - 10:39 pm | केशवराव

भारतिय शास्त्रज्ञांनी एक अभिमानास्पद कामगिरी केली ; आणि आमच्या सर्व वाहिन्यांना महत्व वाटत होते ते भज्जीने कानफटात मारल्याबद्दल भोगलेल्या शिक्षेचे. ' ब्रेकिंग न्युज ' म्हणुन किती वेळा ते दाखवत रहाल? ईस्रोची बातमी जागतिक महत्वाची. त्याला फूटेज किती आणि भज्जीला फुटेज किती ? काही तारतम्य ?
- - - - - पण हॅट्स ऑफ टू अवर सायंटिस्ट .
- - - - - - - केशवराव.

मदनबाण's picture

29 Apr 2008 - 7:26 am | मदनबाण

आमच्या सर्व वाहिन्यांना महत्व वाटत होते ते भज्जीने कानफटात मारल्याबद्दल भोगलेल्या शिक्षेचे. '
>या न्युज चॅनलवाल्यांना याच काही महत्वच वाटत नाही असे मला वाटले.....डोक्यात गेल्या माझ्यातर.....
माझ्या डोक्याचीच भज्जी करुन टाकली !!!!!

(हे चॅनल वाले बेफाम आणि बेलगाम झालेत)असे म्हणणारा.....
मदनबाण.....

शितल's picture

28 Apr 2008 - 10:43 pm | शितल

कौतुकास्पद कामगिरी केली आहे . ईस्रो" च्या सर्व वैज्ञानिकांचे व सहकार्‍यांचे हार्दिक अभिनंदन

देवदत्त's picture

28 Apr 2008 - 10:48 pm | देवदत्त

सर्व वैज्ञानिकांचे व सहकार्‍यांचे हार्दिक अभिनंदन.
काल रात्री बातम्यांमध्ये पाहिले की १५ मिनिटांत प्रक्षेपण होणार आहे (काहीतरी गोंधळ झाला माझा) म्हणून सर्व वाहिन्या तपासून पाहिल्या. त्या एकाच वाहिनीवर ती बातमी होती. म्हणून असेल पण नंतर विसरलो. सकाळी १० वाजता कोठल्यातरी संकेत स्थळावर वाचले की प्रक्षेपण झाले म्हणून. आनंद वाटला.

खरे तर आणखी एक गोष्ट राहून गेली. माझी एक मैत्रीण आहे इस्त्रो मध्ये तिला फोन करणार होतो, माहिती आणि अभिनंदनाकरीता. पण कामात विसरून गेलो :(
बघतो उद्या प्रयत्न करून.

मानस's picture

28 Apr 2008 - 11:45 pm | मानस

तुम्हा सर्वांना प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

हेच जाणुन घ्यायचं होतं, की भारतात या बातमीला रितसर प्रसिद्धी मिळाली का? कारण हल्ली "ब्रेकिंग न्युज" च्या नावाखाली जो काही गोंधळ ह्या न्युज चॅनलवाल्यांनी घातलाय ते बघता, ही बातमी त्यांना कितपत महत्वाची वाटते?

ब्रेकिंग न्युज - आज अमिताभ दोनदा शिंकला!

ब्रेकिंग न्युज - आज करीनाची डावी मांडी दुखत होती.

ब्रेकिंग न्युज - सकाळी माहीने (धोनी) मोटर-सायकल चालवली.

असल्या ब्रेकिंग न्युजच्या जमान्यात भारताने विज्ञान क्षेत्रात काय भरारी मारली व कुठला तरी उपग्रह त्याबरोबर १० उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडले, यात काय महत्वाचं?

तरीही, आज सकाळी इथे अमेरिकेत "आज-तक" या वाहीनीवर ४० सेकंदाची बातमी पहायला मिळाली आणि १५ सेकंदासाठी का होईना, उपग्रह अवकाशात झेप घेतानाचे चित्रण पहायला मिळालं ह्याचं खूप मानसिक समाधान वाटलं. "पीएसएलव्ही - ९" ने अनेक इतर राष्ट्रांचे ८ लघु-ग्रह (नॅनो-सॅटलाइट्स) सुद्धा पृथ्वीच्या कक्षेत सोडले त्यांत जपान, जर्मनी, स्वीडन, ब्राझिल सारख्या बलाढ्य राष्ट्रांचा समावेश आहे ह्याची दखल सी.एन.एन. व ए.बी.सी. या चॅनल्स् नी घेतली हे पाहुन फार बरं वाटलं.

अन्या दातार's picture

28 Apr 2008 - 11:50 pm | अन्या दातार

माझ्या माहितीप्रमाणे जसे आज १० उपग्रह सोडले, तसे अजून २५ उपग्रह इस्रो अवकाशात सोडणार आहे.

(त्यातील एका उपग्रहासाठी मला थोडे फार काम करायला मिळाले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.)

आपला,
(हर्षोल्लसित) अभियंता

विकास's picture

29 Apr 2008 - 5:42 am | विकास

त्यातील एका उपग्रहासाठी मला थोडे फार काम करायला मिळाले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.

तुमचे पण अभिनंदन!

अजून एक - एका प्रक्षेपणात १० उपग्रह सोडणे हा जागतीक विक्रम आहे.

प्रमोद देव's picture

29 Apr 2008 - 9:01 am | प्रमोद देव

अजून एक - एका प्रक्षेपणात १० उपग्रह सोडणे हा जागतीक विक्रम आहे.

ह्या आधी रशियाने एका वेळी १६ उपग्रह सोडले होते. मात्र त्यांचे वजन बरेच कमी होते. त्याबद्दलची ही बातमी वाचा.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

आनंदयात्री's picture

29 Apr 2008 - 9:43 am | आनंदयात्री

तो जागतिक विक्रमच आहे, रशियाने ८ सॅटेलाईट एकावेळेस प्रक्षेपित केले होते असे स्मरते. खालील दुवे पहा.

इस्रो चे यश

१८ सॅटेलाईट वाहुन नेतांना रशियाच्या रॉकेट ला झालेला अपघात

आनंदयात्रींनी माझ्या दुरुस्तीची चूक दुरुस्त केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मानस's picture

29 Apr 2008 - 7:34 am | मानस

(त्यातील एका उपग्रहासाठी मला थोडे फार काम करायला मिळाले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.)

अभिनंदन, खरोखरच अभिमानास्पद आहे.

विसोबा खेचर's picture

29 Apr 2008 - 9:58 am | विसोबा खेचर

"पीएसएलव्ही सी-9' चे यशस्वी उड्डाण" या घटनेमुळे भारतीय असल्याचा खूप अभिमान वाटला!

परंतु त्याचसोबत स्वातंत्र्य मिळून ६० वर्ष होऊन गेली तरी आज ठाण्यासारख्या शहरात आम्ही रोजचे ३ तास लोडशेडिंगचे पारतंत्र्य भोगतो आहोत याची भारतीय म्हणून शरमही वाटते! लेको, आधी रोजची धड वीज तर द्या आणि मग करा हवी तेवढी उड्डाणं!

च्यामारी, इथे गावागावात वीज, आरोग्यसेवा, पाणी यांसारख्या मूलभूत गरजांची मारामार आहे आणि लेकाचे उपग्रहांची उड्डाणं करताहेत! छ्या....!

आपला,
(वेळच्या वेळी विजेचं बील भरणारा एक त्रस्त भारतीय नागरीक) तात्या.

विसुनाना's picture

29 Apr 2008 - 2:36 pm | विसुनाना

एकाचवेळी दहा उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम केल्याबद्दल इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन!
ज्या देशात वीज,पाणी, रस्ते अशा साध्या सोयींची वानवा आहे अशा देशातल्या शास्त्रज्ञांकडे बुद्धीमत्तेची कमतरता नाही हे पाहून अभिमान वाटला.

तात्यांशी तात्विक सहमती असली तरी शास्त्रज्ञांनाही याच वीजबचतीचा फटका बसतो हे सत्य आहे.
तात्या, हे वाचा.

update: we just had a short power outage here (which is not unusual) so we had to use our flashlights to help with applying thermal tapes

तेव्हा आपण आणि शास्त्रज्ञ यांच्यात वीजपुरवठ्याबाबत तरी फारसा फरक नाही. नाही का?
मग त्यांच्या यशात आपणही निर्भेळ आनंद लुटू या!

शरम वाटलीच तर नाकर्त्या राजकारण्यांची वाटली पाहिजे.

गोट्या's picture

29 Apr 2008 - 11:43 pm | गोट्या (not verified)

"शरम वाटलीच तर नाकर्त्या राजकारण्यांची वाटली पाहिजे. "

१०००००००००००००००% सहमत.
खरोखर ह्यांना लाज लज्जा नावाची अनुभूती / संवेदना राहली नाही असे वाटावे असे हे दिवस !

जो कोणीच नाही तो स्वतःला युवराज म्हणवतो, जो काही आहे तो स्वतःला हाय-कमांडचा सेवक समजतो ! ह्यातच देशाचे भले आहे असे समाज समजत आहे !
व ह्यातून काहीच प्राप्त होणार नाही हे माहीत असून देखील मी स्वत:ला का भारतीय समजतो आहे, हेच कळायला मार्ग नाही आहे !
जेथे मार्ग नाही तो देश भारत !
जेथे विज नाही तो देश भारत !
जे थे सर्व काही हाय कमांडच्या हाती तो आपला भारत देश !

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

प्रभाकर पेठकर's picture

29 Apr 2008 - 2:52 pm | प्रभाकर पेठकर

"पीएसएलव्ही सी-9' ने १० उपग्रह अंतराळात सोडले. अभिनंदन.
पुढची स्वारी चंद्रावर (चंद्र ह्या उपग्रहावर) असे घोषीत केले आहे. हार्दीक शुभेछा...!

शरुबाबा's picture

29 Apr 2008 - 5:54 pm | शरुबाबा

पीएसएलव्ही सी-9' ने १० उपग्रह अंतराळात सोडले. अभिनंदन.
हार्दीक शुभेछा...!