नव वर्षाच्या शुभेछा! आज सुरुवात गोड चॉकोलेटी सॅन्ड्वीच ने करुया!
एकदम झटपट 'नो फस' रेसिपी. जेव्हा भूख लागलेली असते आणि चॉकलेट ही खावेसे वाटत असते- त्या वेळी.. किंबहुना केव्हाही खायला मस्त snack.
सामग्री:
१ चमचा किंवा हव्या तेवढ्या चॉकलेट चिप्स
चोकॉचीप्स नसल्यास- कुठल्याही चॉकलेट चे तुकडे
ते हि नसल्यास चॉकलेट सॉस किंवा सिरप
ते सुद्धा नसल्यास.... तुम्हाला चॉकलेट sandwich घरी करता येणार नाही. दुसर काही तरी करून खा! :)
आणि
दोन किंवा अधिक ब्रेंड च्या स्लाईस
थोडं बटर
कृती:
ब्रेड च्या दोन स्लाईस ला आतल्या बाजूला थोडं बटर लावा. मग त्यावर चॉकलेट चिप्स किंवा चॉकलेटचे तुकडे किंवा चॉकलेट सिरप पसरवा.
वरून थोड बटर लाऊन sandwich ला ग्रील करा.
आणि अजून कोणी बघायच्या किंवा मागायच्या आत, खाऊन टाका!
अश्या sandwich ला प्रॉपर डेझर्ट म्हणून पण सर्व्ह करता येते. वरून थोडा अजून चॉकलेट सॉस ओता आणि व्हिप्ड क्रीम घालून पेश करा.
प्रतिक्रिया
1 Jan 2011 - 10:53 am | श्रावण मोडक
आवडेल असा प्रकार दिसतोय. पण कॅलरीज किती आहेत? ;)
1 Jan 2011 - 11:31 am | कुक
काय हे मि आज पासुन डायटीग सुरु केले आहे.
जेवण कमी व सोबत आयुर्वेदीक टिर्ट्मेट
पण रात्री मस्त चिकण पोपटी खाली आहे. छान झाली होति पोपटी
1 Jan 2011 - 1:12 pm | प्राजक्ता पवार
छान आणि सोप्पी रेसिपी.
1 Jan 2011 - 6:40 pm | स्वाती२
छान दिसतय. जोडीला केळ्याचे पातळ काप किंवा ब्री घालून पण मस्त लागतं.
3 Jan 2011 - 9:33 am | खादाड अमिता
नेक्स्ट टाईम नक्की!
1 Jan 2011 - 10:09 pm | पिंगू
कधी खाल्लं नाही.. पण बनवून बघायला हरकत नाही.
4 Jan 2011 - 6:57 am | मदनबाण
मस्त !!! :)