लागणारे साहित्य:
सुरण
मिठ
तुप
चिंच कोळ
पाककृती:
सुरणाच्या चकत्या पाडून साल काढा म्हणजे साल काढायला सोप्पे जाते.
सुरणाची पातळ चकती काढून घ्या.
चकतीचे कापुन त्रिकोण करा. तुम्हाला डिझाईन येत असतील दुसर्या त्या काढल्यात तरी चव एकच राहणार आहे.
ह्या त्रिकोणांना चिंचेचा कोळ करुन त्यात पाणी घालुन सुरण उकडून घ्या.
उकडल्यावर भांड्यातले पाणी काढून सुरणाच्या फोडी ताटात काढा. त्याला मिठ चोळा जखमेवर चोळतात तसे.
पॅनवर तुप किंवा तेल टाकुन खरपुस तळून घ्या.
पाहीजे असल्यास्/वेळ असल्यास्/आवड असल्यास सजावट करा.
अधिक टिपा:
तुम्ही मिठाबरोबर मिरचीपुडही घालु शकता. उपवास नसेल तर मिरपुडही लावता येते. मिरपुडचे काप खुप छान लागतात.
उपवासासाठी करताना जर शिंगाडापिठ असेल तर भजी करु शकता. वरीच्या तांदळात काप घोळवुन शॅलोफ्राय करु शकता. तेल टाकुनही करु शकता.
प्रतिक्रिया
30 Dec 2010 - 3:38 pm | परिकथेतील राजकुमार
चतुर्थी कधी आहे ? हा प्रकार घरी करायला लावलाच पाहिजे.
तुला ग फार अनुभव ;)
30 Dec 2010 - 5:25 pm | चिंतामणी
त्याच्या बरोबर "ते" घरी चालेल का? ;)
30 Dec 2010 - 11:21 pm | सुहास..
तुला ग फार अनुभव >>
नाही तर काय रे पर्या ? तो गणपा जखमा करतो आणि ही जखमावर मीठ !!
कधी एकदा या इडली-डोसातन बाहेर येतो काय माहीत ?
30 Dec 2010 - 3:45 pm | जागु
तुला ग फार अनुभव
हो मासे टाकुन मी बर्याच जणांच्या जखमांवर मिठ चोळते :smile:
30 Dec 2010 - 3:46 pm | गणपा
मस्त :)
सुरणं मटणात टाकुन चापणारा ;)
30 Dec 2010 - 3:50 pm | गवि
आहा..
कुरकुरीत आणि खुसखुशीत यांचं झकास मिश्रण असेल हा पदार्थ.
तेवढे वांग्याचे काप टाका ना जागुतै..
30 Dec 2010 - 3:53 pm | जागु
वांग्याचे काप मला दर आठवड्याला करायला लागतात. लेकीला डब्यात देण्यासाठी करते. तिचाही खुप आवडता प्रकार आहे. पुढच्या आठवड्यात टाकतेच.
30 Dec 2010 - 5:07 pm | परिकथेतील राजकुमार
नाही नाही !
आज उद्यात टाक प्लिइइइइइइइइइइइइइइइइइइज. म्हणजे रविवारी करता येतील ;)
30 Dec 2010 - 5:28 pm | चिंतामणी
का रे. रविवारी काही "पेशल" आहे का??????? :D
30 Dec 2010 - 4:14 pm | पर्नल नेने मराठे
माझा आज उपास आहेच्..जागु ताया दे पाठ्वुन २-४ ;)
30 Dec 2010 - 4:23 pm | प्राजक्ता पवार
मस्तंच गं जागु . लवकरच करेन :)
30 Dec 2010 - 4:25 pm | जागु
चुचु मेल ने पाठवु का ग ?
30 Dec 2010 - 8:28 pm | प्राजु
मस्तच..!
वेगळा प्रकार. सुरणाचे काम कधी खाल्ले नव्हते.
करून बघेन. इथे सुरण मिळाले तर ..अर्थात!
30 Dec 2010 - 8:49 pm | चिंतामणी
सुरणाचे कबाब बनण्याची कृती माहित असेल तर ती सुध्दा दे.
30 Dec 2010 - 11:17 pm | सुहास..
जागु ताई ,
ज ह ब ह रा !!
अवांतर : तुझा आणि त्या गणपाचा पाकृ-मेंदु हायजॅक करावा म्हणतो
31 Dec 2010 - 10:09 pm | जागु
सुरणाचे कबाब थोड्या दिवसांत देतेच.