गाभा:
नमस्कार!
सध्या मी बंगलोर येथे आय. टी. क्षेत्रात काम करत असून आता नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता नंतर किमान २ वर्ष तरी माझा कोठेही, कोणत्याही प्रकारचे अर्थार्जन करण्याचा विचार नाही.
या पार्श्वभुमीवर मला काही प्रश्न पडले आहेतः
(ऑफिसमध्ये याबद्दल विचारले असता फंडातली रक्कम काढून घ्या असे तुटकपणे सांगून वाटेला लावले.)
१. माझ्या प्रॉव्हिडंट फंड मध्ये जमलेली रक्कम मी काढून घ्यावी की तशीच राहू द्यावी?
२. मी असेही ऐकले आहे की प्रॉव्हिडंट फंड असा मधेच काढून घेतला असता ३०% रक्कम कमी केली जाते. असे खरेच आहे का?
३. जर आता कंपनी सोडताना ती रक्कम मी काढून न घेता तशीच ठेवली तर पुढे ते रक्कम काढणे किती सोयीचे/गैरसोयीचे आहे?
कृपया या संबंधी निर्णय घेण्यासाठी मर्गदर्शन करावे. मिपाकरांच्या योग्य सल्ल्याच्या प्रतिक्षेत!!
प्रतिक्रिया
29 Dec 2010 - 2:53 pm | यकु
पाच वर्षांची असेल तर काहीही रक्कम कमी केली जाणार नाही.
९.५ टक्के दराने सध्या त्या रकमेवर व्याज दिले जाते.
पण तुम्ही नंतर काम करणार नाही म्हणजे पैसे काढून घेतलेले ठीक राहील.
सेवा खंड जास्तीचा असल्यास पीएफ काढूनच घेतलेला बरा.
इन्कमटॅक्स गुरू लखोटियांचा अनुवादक (यशवंत )
29 Dec 2010 - 2:59 pm | ५० फक्त
+१,
पिएफ काढुन घ्या, २ वर्षांनंतर तुमचे पॅसे तुम्हाला मिळतील याची खात्री नाही.
हर्षद.
29 Dec 2010 - 3:47 pm | अवलिया
माझ्या मते तुम्ही ते पैसे काढुन घ्या, कारण अजुन दोनवर्षांनंतर परिस्थिती नक्की कशी असेल हे तुम्ही आज सांगू शकत नाहीत. समजा दोन वर्षे किंवा अधिक कालावधी नंतर तुम्ही नोकरी केलीच नाही किंवा केली आणि तिथे पीएफ वगैरे सुविधा नसेल असे होऊ शकते. त्यावेळेस हे पैसे काढण्यासाठी तुम्हाला आटापीटा करावा लागेल. त्यावेळेस तिथे कंपनीत असलेले लोक तुमच्या परिचयाचे असतीलच असे नाही, त्यामुळे आज जितके सुलभ असेल तितके तेव्हा असेलच असे नाही.
आता हे काढलेले पैसे तुम्हाला आवश्यकता नसेल तर योग्य जागी गुंतवा. पीएफ प्रमाणेच पीपीएफ सुविधा उपलब्ध असतात (कोणत्याही जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत चौकशी करा) त्यात गुंतवल्यास पीएफ प्रमाणेच तुम्हाला लाभ मिळेल. १५ वर्षे कालावधी असलेली ही योजना खूप चांगली आहे. मात्र त्यात पैसे काही काळ लॉक रहातात. एफडी प्रमाणे हवे तेव्हा मोडता येत नाहीत. जोखीम स्विकारण्याची तयारी असल्यास शेअरबाजार किंवा म्युच्युअल फंड पर्याय आहेत.
मूळ मुद्दा - पीएफ चे पैसे काढुन घ्याच !
29 Dec 2010 - 4:24 pm | गवि
अजून किमान सहा महिने नोकरी करणार नसाल तर काढून घ्या. पी एफ बाबत जे ऐकले आहे त्यानुसार सरकार या वर्षीच्या ठेवींतून मागच्या वर्षीची व्याजे देत आहे आणि हे फार काळ चालवता येणार नाही.
29 Dec 2010 - 4:48 pm | स्मिता.
यशवंत, हर्षद, अवलिया आणि गवि प्रतिसादाबद्दल आभार. अवलिया यांनी जे भविष्यातील अडचणींबद्दल सांगितले आहे तेच मला विचारायचे होते.
तरी एक प्रश्न अनुत्तरीत राहीला की आता जर का मी रक्कम काढून घेतली तर त्यात ३०% कपात होईल का? कारण माझे खाते सुरू व्हायला ५ वर्षे पूर्ण झालेली नाहीत.
तसेच, भविष्यातील होणार्या त्रासापेक्षा ३०% गमावणे व्यवहार्य ठरेल का?
29 Dec 2010 - 9:11 pm | नितिन थत्ते
३० टक्के रक्कम कापली जात नाही. मी ५ वर्षांच्या आतच एकदा पीएफ काढला आहे.
९.५% हा चांगला व्याजदर आहे. पूर्ण सुरक्षित गुंतवणुकीवर इतका दर कुठेही मिळत नाही. पुन्हा नोकरी करण्याचा विचार असेल तर पैसे काढू नयेत.
परंतु पीएफ चे अकाऊंट सरकारी नसून कंपनीच्या ट्रस्टमध्ये असेल तर मात्र पैसे काढून घ्यावेत.
29 Dec 2010 - 6:09 pm | सुनील
पी एफ हा सरकारजमा असतो कंपनीकडे नाही. तेव्हा ३०% कमी करायचा हक्क कंपनीला कसा काय मिळेल?
माझ्या मते पी एफ काढू नये. नंतर दुसरी नोकरी पकडल्यास हा पी एफ तिथे स्थानांतरीत करता येतो. ही पद्धत पूर्वीप्रमाणे किचकट राहिलेली नाही. तुमच्या स्थानांतराची केस तुम्हाला ऑन-लाईन बघता येते. तुमच्या सध्याच्या शिलकीवर तुम्हाला ८.५% करमुक्त व्याज मिळत राहील.
29 Dec 2010 - 6:13 pm | छोटा डॉन
+१, संपुर्ण सहमत.
मी सध्या हेच केले आहे, ३०% काहुन कापणार ?
त्याचा काही संबंध नाही, तुम्हाला हवा असेल तर पीएफ घ्या काढुन पण ते कटिंग वगैरे झुट आहे.
दुसरीकडे जाणार असाल आणि पैशाची सध्या एवढी गरज नसेल तर ट्रान्स्फर करुन घ्या, प्रोसेस खरोखर अजिबात किचकट नाही.
- छोटा डॉन
29 Dec 2010 - 7:09 pm | मी_ओंकार
असहमत.
पी एफ रक्कम जमा होताना त्यात दोन भाग असतात.
१. तुमच्या बेसिक पगारावर काही टक्के रक्कम तुमच्याच पगारातून जाते.
२. तेवढीच रक्कम कंपनीकडूनही जाते.
यात तुमच्या पगारातून जाणारी रकमेवर इनकम टॅक्स लावला जात नाही. पण जर तुम्ही पी एफ काढला तर ही रक्कम करपात्र होते. त्यामुळे जमा असलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम हातात येते.
बाकी पी एफ काढण्याबद्दल नानांशी सहमत.
- ओंकार.
30 Dec 2010 - 2:05 pm | आजानुकर्ण
पी एफ कधीही काढला तरी त्यामध्ये असलेले नोकरदाराचे योगदान कधीही करपात्र नसते. पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी काढलेल्या पीएफमधील फक्त आस्थापनेचे योगदान व व्याज हे करपात्र असते.
30 Dec 2010 - 11:41 am | सुकामेवा
मी ऐकलेल्या माहिती नुसार जर खात्यामधी ६ महिन्याच्या कालावधीत पैसे जमा नाही जाले तर व्याज चालू राहत नाही, हि ऐकीव माहिती आहे शहानिशा करून घ्यावी.