मुलगी ही लायाबिलिटी ?

तिमा's picture
तिमा in काथ्याकूट
29 Dec 2010 - 11:57 am
गाभा: 

आजच्याच टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार एका सुप्रीम कोर्टाच्या महिला न्यायाधीशांनी आपल्या दोन्ही अविवाहित मुलींना 'लायाबिलिटी' म्हणून दाखवले आहे. आधीच आपल्या देशांत मुलींचे प्रमाण कमी होत चालले आहे म्हणून सरकारी पातळीवरुन ' मुलगा किंवा मुलगी' काहीच फरक नाही अशा अर्थाच्या जाहिराती चालू आहेत. त्याच्या विरुध्द जाणारे हे विधान आहे.
स्त्री ही कधी समाजाच्या गळ्यातली धोंड होऊ शकते का ? लग्नाचा खर्च तर हल्ली मुलांनाही येतो. स्त्री पुरुष समानता या देशात कधी येणार ?
हा स्त्री वर घोर अन्याय आहे म्हणून त्याचा तीव्र निषेध !!!

प्रतिक्रिया

अवलिया's picture

29 Dec 2010 - 12:07 pm | अवलिया

युयुत्सुरावांचे विवेचन वाचायला उत्सुक !

त्या विवेचनावर शिल्पा ब यांचा प्रतिसाद वाचण्यास उत्सुक

पर्नल नेने मराठे's picture

29 Dec 2010 - 12:21 pm | पर्नल नेने मराठे

शिल्पा ब यांच्या प्रतिसादावर चि. पराच भाशण वाचण्यास उत्सुक ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Dec 2010 - 2:32 pm | llपुण्याचे पेशवेll

पराच्या भाषणावर नानाचा शक्यतेचा प्रतिसाद वाचण्यास उत्सुक.

नानाचा शक्यतेचा प्रतिसादावर शुचितैंच विवेचन वाचण्यास युयुत्सुक !!

मी-सौरभ's picture

30 Dec 2010 - 3:18 am | मी-सौरभ

कुणाच्या तरी प्रतिसादावर कुणाचा तरी +१ वाचण्यास ऊट्सुख :)

शिल्पा ब's picture

30 Dec 2010 - 12:21 pm | शिल्पा ब

आम्ही कोण युयुत्सुंना प्रतिसाद देणार?

गवि's picture

29 Dec 2010 - 12:13 pm | गवि

"सुप्रीम कोर्टाच्या महिला न्यायाधीशांनी आपल्या दोन्ही अविवाहित मुलींना 'लायाबिलिटी' म्हणून दाखवले आहे."

'लायाबिलिटी' म्हणून दाखवले आहे.'

कुठे ?

तिमा's picture

29 Dec 2010 - 12:22 pm | तिमा

टाइम्सची बातमी पूर्ण वाचा. अ‍ॅसेटस व लायबिलिटीज जाहीर करताना त्यांनी हे जाहीर केले आहे.

अहो, त्याच संदर्भासाठी विचारले. टाईम्स लगोलग वाचणे शक्य नसल्याने.

खुलाश्याबद्दल धन्यवाद.

आता मत देतो:

जर याक्षणी त्या मुली शिकत असतील आणि खर्चासाठी आईवर अवलंबून असतील तर लायेबिलिटीज म्हणून उल्लेख ठीक आहे.

पण ...

त्याच न्यायाने मुलगाही जर अद्याप नोकरीला न लागलेला/ पूर्णवेळ शिकत असलेला /बेकार असेल तरीही लायेबिलिटी ठीक आहे. आणि त्याच्याही बाबतीत तसेच म्हटले पाहिजे.

ते केवळ अविवाहित आहेत म्हणून नव्हे.

इव्हन नवराही घरी बसलेला, मद्यपि, उत्पन्न शून्य असलेला असेल आणि त्याला अजून पत्नी पोसत असेल तर तीही लायेबिलिटीच.

शिवाय हे ही खरंच की विवाहाचा खर्च वधूपक्षाच्याच डोक्यावर घालायचा अशी उघड प्रथा मेजॉरिटीत चालू असताना ती जबाबदारी आणि दायित्व आपल्याला अजून आहे (आपल्या डोक्यावर आहे) हे मान्य करण्यात काही चूक असेल तर ती प्रथांची... त्या बाईंची नाही.

उलट त्यांनी जबाबदारी कागदोपत्री स्वीकारली आहे..

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2010 - 12:46 pm | परिकथेतील राजकुमार

त्याच न्यायाने एकही दमडी मिपासाठी खर्च न करता मिपावर टुकार भिकार लेखन करुन मिपाची बँडविडथ खाणारे पब्लिक मिपाची लायबिलिटी म्हणावे काय ?

अहो पराभाऊ..

दमड्या खर्च करुन मग हक्काने (दमड्या मोजल्या आहेत्..फुकट नाही खात बॅडविड्थ असे म्हणत) मिपा विकत घेतल्यासारखे "टुकार भिकार" लेखन टाकण्यापेक्षा फुकट टाकताहेत ते बरंच ना. त्यामुळे तुम्हाला या अशा प्रतिक्रिया लिहून थोडी मनःशांती तरी करुन घेता येतेय.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2010 - 2:00 pm | परिकथेतील राजकुमार

दमड्या खर्च करुन मग हक्काने (दमड्या मोजल्या आहेत्..फुकट नाही खात बॅडविड्थ असे म्हणत) मिपा विकत घेतल्यासारखे "टुकार भिकार" लेखन टाकण्यापेक्षा फुकट टाकताहेत ते बरंच ना. त्यामुळे तुम्हाला या अशा प्रतिक्रिया लिहून थोडी मनःशांती तरी करुन घेता येतेय.

अहो पण रोज एक ह्या हिशेबाने ? मिपाकरांना सोडा पण निदान सर्व्हरला तरी विश्रांती द्या ;) काही महाभाग तर निव्वळ स्वतःचे लेखन प्रसवायला मिपावार येतात, त्यांची वाटचाल बघितली तर इतर कोणाही मिपाकराच्या लेखनावर त्यांची प्रतिक्रीया दिसत नाही. काही महाभाग दर ६ तासानी एक ह्या दराने लेखन प्रसवत असतात आणि वर अशा भिकार लेखनाला प्रतिक्रीया आल्या नाहीत तर कंपुबाजी म्हणुन गळे काढतात, नाहितर स्वतःच स्वतःच्या धाग्यावर प्रतिक्रीया देत बसतात.

अरे असाल तुम्ही उच्च वगैरे लेखक, पण म्हणुन काय रोज उठुन इथे खरडाल का काय ? इतर चांगल्या लेखकांचे धागे असे स्वतः रोज एक लेख टाकुन तुम्ही मागे टाकत नाही का ? लिहायला नाही कोण म्हणतय? पण निदान स्वतःला एक वेळेचे बंधन घालुन घ्या ना, का ते पण अवघड आहे ?

असो...

कोळसा उगाळावा...

हे योग्य बोललात.

एअरलाईन्समधे (एअरमनशिपमधे) याला समांतर उत्तम उदाहरण आहे. विमानतळाच्या कंट्रोल टॉवरशी त्या क्षेत्रात उड्डाण करणारी किंवा उडू इच्छिणारी अशी सर्व विमाने एकाच फ्रीक्वेन्सीला शेअर करत असतात. त्यात एका वेळी एकच पायलट बोलू शकतो. तो बोलत असताना इतरांना गप्प रहावेच लागते.

एकाच वेळी दोघांनी किंवा चारपाच जणांनी बटण प्रेस करुन माईकवर बोलले तर नॉईज होऊन कोणाचाच आवाज येत नाही.

सतत एक एक मिनिटाने बोलत राहिले तरी इतरांना वापर करणे कठीण होते. ते साईडलाईन होतात.

तेव्हा एक नियम असा असतो की आपले संभाषण थोडक्यात उरका आणि अधेमधे इतरांना वाव / अवधि द्या. कारण सतत बटण दाबून ठेवलेत तर इतर कोणी इमर्जन्सीत असेल तरी संपर्क करू शकणार नाही.

हे सर्व माहीत असून आणि प्रत्यक्ष आचरणात आणलेले असूनही इथे मलासुद्धा सुरुवातीला याची जाणीव झाली नाही की सर्वांनी मिळून इथे जागा वापरायची आहे.

असंच काही नवीन सदस्यांचंही होत असेल हे समजू शकतो.

ही खेदजनक बाब होती पण आता काही काळाने जाणीव झाल्यावर तुमच्या या मतांशी सहमती झाली आहे हे सांगून अंशतः अपराधीपणा कमी करतो.

स्मिता.'s picture

29 Dec 2010 - 5:00 pm | स्मिता.

असंच काही नवीन सदस्यांचंही होत असेल हे समजू शकतो.

ही खेदजनक बाब होती पण आता काही काळाने जाणीव झाल्यावर तुमच्या या मतांशी सहमती झाली आहे हे सांगून अंशतः अपराधीपणा कमी करतो.

अहो गवि, किती वेळा माफी मागता तुम्ही? फारच सौजन्यशील वागता बुवा तुम्ही!!
जे सुधरायला हवे त्याची तुम्हाला जाणीव झाली, एकदा माफी मागून झाली आणि सुधारणाही झाली. हे सगळ्यांना दिसतेच आहे. त्यामुळे तुम्ही असे वारंवार अपराधीपणाची भावना मनात आणण्याचे काही कारण नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2010 - 5:02 pm | परिकथेतील राजकुमार

अहो गवि, किती वेळा माफी मागता तुम्ही? फारच सौजन्यशील वागता बुवा तुम्ही!!
जे सुधरायला हवे त्याची तुम्हाला जाणीव झाली, एकदा माफी मागून झाली आणि सुधारणाही झाली. हे सगळ्यांना दिसतेच आहे. त्यामुळे तुम्ही असे वारंवार अपराधीपणाची भावना मनात आणण्याचे काही कारण नाही.

सहमत आहे !
आणि तसेही गवि आता मिपाच्या तालमीत चांगलेच तयार झाले आहेत.
लवकरच 'हलकट मिपाकरांच्यात' त्यांची वर्णी लागो अशा शुभेच्छा.

महा हलकट

नमनदुपारी

काय हो पराभाऊ मला हलकट म्हणता..
थांबा आता तुमच्यासाठी सांगलीहून आणलेलं भडंग खाऊन टाकतो.
असो... :)

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2010 - 5:07 pm | परिकथेतील राजकुमार

आता तुमच्यासाठी सांगलीहून आणलेलं भडंग खाऊन टाकतो.

कशे सापडलात ?
परवापासून भडंगावर चर्चा चालु आहे पण माझ्यासाठी भडंग आणल्याचे बोलला नाहीत. आता लगेच बोललात ;) हळुहळु होताय का नाही हलकट ?

गणेशा's picture

29 Dec 2010 - 9:01 pm | गणेशा

माफी बीफी काही नाहि ओ ..
चालायचेच .. उलट चांगले लेख रोज आले तरी चालतात मला तरी

अवांतर : परा आणि गवि ह्या दोन्ही चांगल्या लेखकांचे मतभेद नाहिसे झालेत हे पाहुन खरेच आनंद वाटला मनापासुन.
पु.ले.शु.

त्याच न्यायाने एकही दमडी मिपासाठी खर्च न करता मिपावर टुकार भिकार लेखन करुन मिपाची बँडविडथ खाणारे पब्लिक मिपाची लायबिलिटी म्हणावे काय ?

असल्या लोकांच्या धाग्यावर जाउन त्यांना प्रोत्साहन देणे आणि इथे त्यांच्या नावाने खडे फोडणे याला काय म्हणतात रे !!

'लायाबिलिटी' म्हणून दाखवले आहे.'

कुठे ?

उत्तर : Balance-Sheet च्या डाव्या (डेबिट) साईडला. ;)

५० फक्त's picture

29 Dec 2010 - 1:46 pm | ५० फक्त

ही घ्या ती लिंक - http://supremecourtofindia.nic.in/assets/gsmisra.pdf

येथे मा. न्यायाधीशांनी, लायबिलिटी या सदरांत तिन गोष्टी लिहिल्या आहेत.

१. त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी जे कर्ज घ्यावे लागेल त्याला जामीन होणे - मला वाटते कोणत्याही कर्जाला जामीन होणे ही एक लायबिलीटिच असते आणि प्रचलित अकाउंटिंग च्या नियमानुसार हे बरोबर आहे. याचा अर्थ एका मुलीचं शिक्षण झालं आहे असा ही होतो.

२. दोन मुली, ज्यांची लग्नं करायची आहेत / लग्नाच्या दोन मुली - यात त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ आहे की दोन मुलींच्या लग्नात जो खर्च होईल त्याची सोय किंवा तरतुद त्यांना करावी लागणार आहे. आपल्या मुलांच्या किंवा मुलींच्या लग्नाचा खर्च जर पालकांनाच करावा लागतो तर त्याची सोय करावी लागणारच ना. आणि जो पर्यंत असा खर्च प्रत्यक्ष होत नाही तो पर्यंत तो लायबिलिटिच दिसणार.

३. तसेच रिटायरमेंट नंतर बांधाव्या लागणा-या घराचा खर्च सुद्धा त्यांनी लायबिलिटि म्हणुन दाखवला आहे.

या सगळ्याचा अर्थ त्यांच्या मुली ह्या त्यांच्या आयुष्यातील मानसिक / सामाजिक/ आर्थिक लायबिलिटी आहेत असा होत नाही. तसेच या मध्ये कोठेही मुलगा- मुलगी हा भेद जाणवत नाही.

माझी मतं या ग्रुहितका वर आधारित आहेत की, मा. न्यायाधिशांना फक्त दोन मुलीच आहेत , जर त्यांना मुलगा / मुलगे असतील तर आपली,तसेच,या बातमीतील मतं काही प्रमाणात बरोबर आहेत.

हर्षद.

मा. संपादक मंडळ ,

सदर प्रतिसाद मा. न्यायाधिशांच्या वॅयक्तिक आयुष्यांत टिपप्णी करणारा आहे असे वाटत असेल किंवा कायद्याच्या द्रुष्टीने अयोग्य वाटत असेल तर काढुन टाकावा.

हर्षद.

गणपा's picture

29 Dec 2010 - 5:13 pm | गणपा

एका स्त्रीकडुन तेही उच्चशिक्षीत, अशी प्रतिक्रिया यावी याचे वाईट वाटते.

इंटरनेटस्नेही's picture

29 Dec 2010 - 6:40 pm | इंटरनेटस्नेही

"मुलगी ही लायाबिलिटी" ऐवजी "मुलगी ही रिस्पॉन्सीबीलिटी" हे योग्य वाटले असते.

असहमत.
फक्त मुलगीच का म्हणुन "रिस्पॉन्सीबीलिटी"
पालकांसाठी पाल्य हि नेहमीच "रिस्पॉन्सीबीलिटी" असते मग ती मुलगी असो वा मुलगा.

विनायक बेलापुरे's picture

29 Dec 2010 - 9:33 pm | विनायक बेलापुरे

खिशाला खोट असलेली प्रत्येक बाब आम्ही लायाबलीटिमधेच टाकतो, पेट्रोल आणि मुलावरचा खर्च सुद्धा .

अविनाशकुलकर्णी's picture

29 Dec 2010 - 9:47 pm | अविनाशकुलकर्णी

खर तर बायको हि पण लायाबिलिटीच आहे

विनायक बेलापुरे's picture

29 Dec 2010 - 9:53 pm | विनायक बेलापुरे

कधी ऐसेट कधी लायबलेटी

रेवती's picture

30 Dec 2010 - 6:57 am | रेवती

लायबलिटी कि रिलायबलिटी?;)

विनायक बेलापुरे's picture

30 Dec 2010 - 8:46 am | विनायक बेलापुरे

सम टाइम्स लायेबल टु बी रिलायेबल ;)

आयला, इंग्रजी भाषेचा एवढा कीस कधी त्या मा. न्यायाधिशांनी पण पाडला नसेल.

"खर तर बायको हि पण लायाबिलिटीच आहे" , घाईत मी हे वाक्य " खरी बायको हि पण लायाबिलिटीच आहे" असं वाचलं.

खरंतर तुमची बायको ही अशी अ‍ॅसेट असतं जी कायम लायाबिलिटिच राहते.

हर्षद.

हे हे हे हे