छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२०

कोडे "मी"

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
28 Dec 2010 - 11:46 am
गाभा: 

मी जर "मी " असेन अर तुम्ही कोण आहात?

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

28 Dec 2010 - 11:48 am | विजुभाऊ

लॉजीकल उत्तर द्या.

स्पा's picture

28 Dec 2010 - 11:55 am | स्पा

मि

अवलिया's picture

28 Dec 2010 - 11:59 am | अवलिया

मी जर मी असेल तर तुम्ही कोण आहात? वरवर पहायला गेला तर अतिशय बिनडोक वाटणारा प्रश्न पण नीट विचार केला तर त्यातुन काही सत्य स्वसंवेद्य होत प्रकाशमान होते. वरवर पाहता प्रज्ञावंत विचारवंत ह्या प्रश्नाला शब्दच्छल म्हणून हिणवतील पण ते त्यांच्या तुटपुंज्या ज्ञानाचे आणि भौतिकी जगात केवळ रममाण होणार्‍या विचारांचे निदर्शक आहे असे मी म्हणेन. विजुभाऊंकडून अशा प्रकारचा प्रश्न हा केवळ अपघाताने आलेला नसुन मध्यंतरी झालेल्या कट्ट्यामुळे प्राप्त झालेले नश्वर जगाचे ज्ञान त्यांना असे प्रश्न स्वतःला विचारण्यास प्रवृत्त करत आहे. हे विजुभाऊंचे मोठेपण आहे की त्यांनी या प्रवासात मिपाकरांना पण सामील करुन घेतले आहे. करुणामयी विजुभाउंचा अनेक मिपाकरांचा डोक्याला तेल लावण्याचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे हे नक्की. विजुभाउंना दिर्घायुष्य चिंतुन मी माझा प्रतिसाद आटोपता घेतो.. ह्या धाग्यावर अतिशय गहन आणि विस्तृत चर्चा अपेक्षित आहे. केवळ सहमत आहे, +१, चान चान अशा प्रतिक्रिया देऊ नये, त्याने काहीही साध्य होत नाही.

प्यारे१'s picture

28 Dec 2010 - 4:20 pm | प्यारे१

या >>>मी जर मी असेल >>> मध्ये अभिप्रेत 'मी 'म्हणजे कोण हे विजुभाऊंनी सांगावे.

थोडे कष्ट घेऊन ... 'जे माझे आहे ते मी नाही' हे अत्यंत तर्कशुद्ध वाक्य प्रत्येकाने वापरुन प्रत्येक 'मी कोण' ते ठरवावे.

सोबतीला एक उदाहरणः माझे घड्याळ म्हणजे मी नाही.

माझा मोबाईल म्हणजे मी नाही.

माझा हात म्हणजे मी .....???

माझे शिक्षण म्हणजे मी.....???

मी कोण? मी कोण ? को$हं....????

'बेसिक प्रश्नाच्या'बेसिक प्रश्नाकडे जाणे कधीही इष्टच. नाही का????

ज्ञानराम's picture

28 Dec 2010 - 5:32 pm | ज्ञानराम

हे कोड नसून, अध्यात्माचं गुढ उकलणारी एक किल्ली आहे..
माझ मत मांडावेसे वाट्ते.. "मी" हा शब्द जरी आपण स्वतः साठी मांडत असू. पण "मी" म्हणजे अहंकार आहे..
हा शब्द जरी आपण सहसा वापरत असू तरी तो शब्द फसवा आहे.. म्हणून स्वत : ला मी म्हणायचे नाही असे नाही..

या वरुन एक श्लोक लक्शात येतो.. '
" ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे , त्या त्या स्थळी हे निजरुप तुझे.
"मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणि, ते थे तुझे सदगुरु पाय दोन्हि.

"मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणि - "येथे मी म्हणजे "अहंकार" जेव्हा गळून पडतो.. तेव्हाच परमात्म स्वरुप सदगुरुचे दर्शन होते..
तेव्हाच त्या शिश्यास सदगुरुंचे चरण दिसतात..

इथे "मी" आणी "तु" असं काहिच नसून.. पक्त एक परमेश्वर आहे..

इथे आपण स्वतः ला मी म्हणू शकत नाही... "त्यामूळे तूम्ही कोण" अशा प्रश्नच उरत नाहि??

काहि चूकले असल्यास क्शमा असावी.

टारझन's picture

28 Dec 2010 - 12:01 pm | टारझन

तो क्या करु.. नाचु ?

-बाबु बिस्लेरी

तिमा's picture

28 Dec 2010 - 8:50 pm | तिमा

विजुभाऊ, हा धागा कळला नाही कारण यामधे 'नृत्य' कुठे आले याचे आकलन झाले नाही.
मी मी, माझे माझे, मला, मला, असे करणारे 'मी' पणाचे नृत्य करत असतात असे सुचवायचे आहे का ?

आज सक्काळी सक्काळीच वाटतं?

नन्दादीप's picture

28 Dec 2010 - 12:05 pm | नन्दादीप

>>>विजुभाऊंकडून अशा प्रकारचा प्रश्न हा केवळ अपघाताने आलेला नसुन मध्यंतरी झालेल्या कट्ट्यामुळे प्राप्त झालेले नश्वर जगाचे ज्ञान त्यांना असे प्रश्न स्वतःला विचारण्यास प्रवृत्त करत आहे.

हा हा हा....एकदम बरोबर...

सुहास..'s picture

28 Dec 2010 - 12:09 pm | सुहास..

कोडे कसले घालताय विजुभाऊ ?

' तुमचा आयडी ' हेच एक आम्हाला पडलेले कोडे आहे ?

नगरीनिरंजन's picture

28 Dec 2010 - 12:09 pm | नगरीनिरंजन

मा मी

धुमकेतू's picture

28 Dec 2010 - 1:44 pm | धुमकेतू

मी माझा आणि तु तुझा !!!

परिकथेतील राजकुमार's picture

28 Dec 2010 - 4:36 pm | परिकथेतील राजकुमार

गुजरातेत दारु मिळत नाही ना ?

चिंतामणी's picture

28 Dec 2010 - 5:12 pm | चिंतामणी

म्हणूनच मेंदुला चालना मिळाली. :D

विजुभाऊ's picture

28 Dec 2010 - 4:41 pm | विजुभाऊ

प्रेषक धुमकेतू दि. मंगळ, 28/12/2010 - 13:44.
मी माझा आणि तु तुझा !!!

!!! शिवराजांनी महाराष्ट्राला जगायचं कसं शिकवलं असेन , तर शंभूराजांनी महाराष्ट्राला मरायचं कसं हे शिकवलं !!! देव, देश आणि धर्मासाठी ...

धुमकेतु तै. तुमच्या स्वाक्षरीशी असहमत
मरायचं कसं....... नाही तर "मरायचं कशासाठी "असे ल्ह्या.

पराकाका
तुमच्याशी सहमत.
" मन तरपत ....दरशन दो आज"
नवी स्वाक्षरी: वारू आणि वारुणी तुम्हाला दूरवर नेतात.

विजुभाऊ , सहमत आणि धन्यवाद !!!!

वेताळ's picture

28 Dec 2010 - 5:30 pm | वेताळ

अखेर स्वाक्षरी बदलतीच तुम्ही??????

बाकी ईजुभाऊचा प्रश्न ईचार करण्यासारखा आहे.

वेताळराव तुम्ही पण तसे सुचवले होते तेव्हाच बदल करणार होतो पण विसरलो :(
धन्यवाद :) !

सोप्पय कारण जर मीच उरणार नाही तर मला तूम्ही दीसनारच नाही/ अनूभवाला येणार नाही कीव्हां अगदी स्पष्ट शब्दात तूम्ही अस्तित्वात असणार नाही..... म्हणून तर्कशूध्द उत्तर हेच की मी जर मी असेन तर तूम्ही सूध्दा मीच आहात

खरंच विजुभौ एवढा गहन प्रश्न आहे हा कि काय बोलावे. तुमच्यासारख्या वयोवृद्ध व्यक्तीस पडणार्‍या या प्रश्नाचे उत्तर आमच्या बाळबुद्धीला गवसेल की नाही ही शंकाच आहे. :)
तरीही याप्रश्नाच्या उत्तरासाठी आमच्या मनाच्या वारुवर आम्ही कोरडा उगारीत आहोत. परंतु,
अधिक कोरडा मारिता । तों तो अधिक जाय पंथा अशी गत झाली आहे. हा मनाचा घोडा प्रश्नापासून अतिशय विचलित होत असल्याने प्रश्नाचे उत्तर काय द्यावे हा एक वेगळा प्रश्न उभा राहिलेला आहे.

Sandeep Aher's picture

29 Dec 2010 - 7:36 am | Sandeep Aher

मी जर "मी " असेन अर तुम्ही कोण आहात?

हा मी 'अहंकारी' म्हणून असेल तर तुम्ही 'तुम्ही' च आहात. मी ने जग व्यापलेलं असत ते स्वत:पुरतच.

पण प्रत्येक वेळी मी हा तसा नसतो .. तेव्हा मी ही मी नसतो.

विजुभाऊ's picture

29 Dec 2010 - 11:05 am | विजुभाऊ

तुमच्यासारख्या वयोवृद्ध व्यक्तीस पडणार्‍या या प्रश्नाचे उत्तर आमच्या बाळबुद्धीला गवसेल की नाही ही शंकाच आहे.
सुधांशु काका तुम्ही प्रौढत्वी निजशैशवासी जपणे बाणा चालवताय त्यामुळे बाळबुद्धी वगैरे प्रश्न पडलेत हे मान्य आहे.
असो.
माझे हृदय म्हणजे "मी "नाही"
माझे डोके "मी "नाही "
माझे शरीर "मी "नाही "
माझे नाव "मी "नाही "
माझी आठवण "मी "नाही "
मग मी कोण्.....आणि मी म्हणजे मी असेन तर तुम्ही कोण आहात?

अवलिया's picture

29 Dec 2010 - 11:10 am | अवलिया

आहे ! प्रगती आहे... !!
असाच विचार कराल तर तुमचे तुम्हालाच उत्तर गवसेल !! शुभेच्छा !!