गाभा:
बगीच्यात अनेक झाडे आहेत. त्यातल्या काही झाडांची फुले उमलल्यावर लगेच गळून पडतात. अगदी खाली जमिनीवर देखील पहायला मिळत नाहीत. पण काही झाडांची फुले कडू वासाची असली तरी तरारून फुलतात, आणि मधमाशांच्या झुंडी त्यांचा आस्वाद घेतांना दिसतात.
जाणकारांनी फुले टिकवण्याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
प्रतिक्रिया
24 Dec 2010 - 5:58 pm | अवलिया
बगीचा कूणाचा आहे हे कळाले नाही.
24 Dec 2010 - 6:09 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत आहे.
तसेच :-
अनेक म्हणजे नेमकी संख्या किती व जाती-प्रजाती कोणकोणत्या ? ह्यातील देशी किती व विदेशी किती ? हायब्रिड आहेत काय ?
काही म्हणजे किती झाडांची व कोणत्या झाडांची ? फुले उमलण्याची व गळण्याची सरासरी किती ?
ह्याचा अर्थ उमलल्यावर फुले लगेच गळून पडतात व सदेह स्वर्गात जातात काय?
कडू म्हणजे कितपत ? ती झाडे कुठली ? तरारुन म्हणजे साधारण कशाप्रकारे ?
झुंडीत साधारण किती मधमाशा असतात ? माशा देशी आहेत काय? चावतात का ?
कुठल्या विषयातल्या जाणकारांनी ?
24 Dec 2010 - 7:10 pm | नरेशकुमार
माशा देशी आहेत काय?
हो,
चावतात का ?
खुप, आत्ताच चाउन चाउन लाहि लाहि केलिये.
24 Dec 2010 - 6:11 pm | विनायक प्रभू
कारणानी त्रस्त होउन बगिचात लक्ष घालायचे ठरवलेत की काय?
24 Dec 2010 - 6:12 pm | अवलिया
शक्यता नाकारता येत नाहि.
24 Dec 2010 - 6:13 pm | अरुण मनोहर
कोणी मदत मागत आहे, त्याला आता एखादा तीन पानी फॉर्म भरायला सांगा! तो पर्यंत कितीतरी निष्पाप फुलांचा जीव जाईल!
24 Dec 2010 - 6:13 pm | अवलिया
शक्यता नाकारता येत नाहि.
24 Dec 2010 - 6:18 pm | परिकथेतील राजकुमार
तेच बरे होईल !
उमलुन तरी काय बघणार ते ? आजुबाजुचे प्रदुषण, खुन, मारामार्या, हुंडाबळी, चोर्या, भ्रष्टाचारच ना?*
तत्वज्ञानी
परा
*वरिल सर्व प्रकार मनोहरकाकांच्या घराच्या आसपासच घडतात असे सांगण्याचा उद्देश नाही ;)
24 Dec 2010 - 6:13 pm | विनायक प्रभू
हिरवा आहे का?
24 Dec 2010 - 6:14 pm | अवलिया
हाताचा की पायाचा?
24 Dec 2010 - 6:16 pm | विनायक प्रभू
एवढच विचारलत हो अवलिया.
24 Dec 2010 - 6:17 pm | अवलिया
जास्त विचारलं असतं तर अश्लिल अश्लिल म्हणत मराठीचे कैवारी आले असते
24 Dec 2010 - 6:16 pm | अरुण मनोहर
भगवा आहे! आता आतंकवादी म्हणू नका लगेच!
24 Dec 2010 - 6:17 pm | विनायक प्रभू
हम्म.
तरीच.
24 Dec 2010 - 6:18 pm | अवलिया
तरीच काय हो? सांगा ना डीट्टेलमधे...
24 Dec 2010 - 6:18 pm | अरुण मनोहर
हम्मा.. असे वाचले! (भगवा आहे ना!)
24 Dec 2010 - 6:21 pm | विनायक प्रभू
भगव्या आंगठ्याच्या फुलशेती बद्दल समोरासमोर चर्चा बरोबर राहील.
24 Dec 2010 - 6:22 pm | अवलिया
कुणाच्या समोर?
24 Dec 2010 - 6:24 pm | अरुण मनोहर
लिहीलेय ना त्यांनी! समोराच्या समोर!
24 Dec 2010 - 6:25 pm | अवलिया
शक्यता नाकारता येत नाहि.
24 Dec 2010 - 6:15 pm | सुहास..
आमचे एक काका आहेत यक्षनगरीत,त्यांना संपर्क करावा !
http://www.misalpav.com/user/401
हा त्यांचा पत्ता !! पण जरा जपुन ;)
24 Dec 2010 - 6:23 pm | शुचि
काही गोड फुले विहरती स्वर्गगगनाच्या शिरी l
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद ह्रुन्मन्दिरी ll
काही जाउनी बैसती प्रभुपदी पापापदा वरिते l
एकादे फुटके नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारिते ll १ ll
-- राम गणेश गडकरी
वेल ......... ज्यादा टेन्शन नय लेनेका जो होता है सो देखनेका ;) .... चिल!!!!
24 Dec 2010 - 6:30 pm | अरुण मनोहर
मस्तच! बाकी रागगंना देखील ही समस्या होती हे माहित नव्हते! (त्या वेळी आजसारख्या बागा होत्या का हो?)
24 Dec 2010 - 7:59 pm | सूर्यपुत्र
रागगंना म्हणजे काय??
24 Dec 2010 - 6:24 pm | नगरीनिरंजन
काका, तुमचं दहा पाकळ्यावालं फुल आलंय की तरारून वर. मधमाशाच काय भुंगेपण आलेत.
24 Dec 2010 - 6:32 pm | अरुण मनोहर
अहो, भुंगेच फुले तरारावयाला सातत्याने आणि टोकदार मदत करतात असे ऐकले!
24 Dec 2010 - 6:38 pm | नगरीनिरंजन
असं असेल तर दोनचार भुंगे पाळता आले तर बघा प्रयत्न करून. ;-)
24 Dec 2010 - 6:28 pm | नन्दादीप
फेमि़काल वापरा... गळून पडलेल्या फुलांना फेमि़काल लावा आणि परत चिकटवा.
>>अगदी खाली जमिनीवर देखील पहायला मिळत नाहीत...
फुलराखा (गुरे राखणारा तो - गुराखी या धर्तीवर) ठेवा....फुले चोरीस जात आहेत तुमची.....
24 Dec 2010 - 8:03 pm | जागु
अरुण त्या झाडांना योग्य प्रमाणात खत घाला तसेच एकदा किटकनाशक फवारुन बघा.
24 Dec 2010 - 8:07 pm | अरुण मनोहर
धन्यवाद. पण कीटकनाशके सर्वसामान्यांना बॅन केलेली आहेत. फक्त अधिकृत रक्षकांनाच वापरता येतात.
24 Dec 2010 - 8:10 pm | नरेशकुमार
मिपावर बरेच्से 'अधिकृत रक्षक' आहेत, त्यान्ना गाठा.
24 Dec 2010 - 8:13 pm | नावातकायआहे
आयला ही म्हन का आठवलि?
फुले ही देवाघरची मुले!
24 Dec 2010 - 8:17 pm | नरेशकुमार
मिपाची मुले, देवाघारि फुले.
24 Dec 2010 - 8:22 pm | अरुण मनोहर
मिपाची मुले? लींक द्या लवकर. तिकडे पण फुले गळतात का? (असतीलच म्हणा! अनुवंशीक असेल)
24 Dec 2010 - 8:26 pm | नरेशकुमार
गळागळी चि भाशा क्रुपाया करु नये,
माझे हाथ शिवशिवतात आनि मग धडाधड मेल येतात.