माझे छळवादी.

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in काथ्याकूट
24 Dec 2010 - 12:57 pm
गाभा: 

ऑफिसमधली ऐन कामाची वेळ. मी अगदी कॉम्पुटरच्या स्क्रीनमध्ये घुसून कामात (किंवा काम नसल्यास मिपात) एकाग्र झालेलो. बाकीचेही लोक कामात गर्क. अगदी पिनड्रॉप नाही तरी ऑफिसमध्ये बर्‍यापैकी शांतता. अशा या कर्मसमाधीत एकतान झालेलो असताना अचानक कानावर समाधीतून ओढून काढणारा आणि दुर्लक्ष न करता येण्याजोगा आवाज येतो "फुर्र फुर्र" किंवा "मच्याक मच्याक मच्याक..". मी डोळे बंद करतो, दात आवळतो आणि सर्वांगातून जाणारी संतापाची सणक कमी व्हायची वाट पाहतो. खोल श्वास घेउन डोकं थोडं शांत झाल्यावर मी वळून पाहतो. अपेक्षेप्रमाणे माझा एखादा कॉफी पिणारा किंवा सॅन्डविच खाणारा किंवा डब्यातला भात खाणारा देशबांधवच त्या आवाजाचा स्त्रोत असतो. मी वळून पहिले म्हणजे काहीतरी गडबड आहे ही शंका त्याला यावी ही माझी अपेक्षा फोल ठरवत तो मला एक गोग्गोड स्माईल देतो. मी मलूलपणे हसून त्याने तोंड आणखी उघडून विश्वरूप दर्शन द्यायच्या आत पुन्हा स्क्रीनकडे पाहू लागतो. त्यानंतर त्याचं खाणं-पिणं होईपर्यंत माझं लक्ष लागत नाही आणि बहुतेकवेळा मी पाणी प्यायला म्हणून उठून जातो.

कामाच्या दिवशी सकाळी साडेसातला मी ट्रेन पकडतो तेव्हा बरीच गर्दी असते पण त्यात माझे देशबांधव फारसे दिसत नाहीत. पण जर कधी उशीर झाला तर ट्रेनमध्ये देशबांधवांची संख्या बरीच दिसते. देशबांधव चेहरेपट्टीवरून तर ओळखू येतातच पण आणखी एक व्यवच्छेदक लक्षण आहे. ते म्हणजे पाठीवर अडकवलेली सॅक. व्यवस्थित फॉर्मल किंवा सेमीफॉर्मल कपडे घातल्यावरही सॅक पाठीला कशाला हवी हे मला कळत नाही. इतर लोक छानपैकी स्टायलिश ऑफिसबॅग्ज वापरत असताना आपण अगदी लुई व्हीटन नाही तरी एखादी साधी पण चांगली दिसणारी बॅग वापरावी असं का वाटत नाही कोण जाणे. असो ज्याची त्याची आवड. त्याचा त्रास नाही. त्रास संध्याकाळी होतो. संध्याकाळी घरी जाताना गर्दीच्या वेळी हे सॅकधारी बरेच दिसतात आणि सॅक पाठीवरून न काढता गर्दीत घुसतात आणि मग गर्दीत जसे जसे लोक चढतील उतरतील तसे तसे त्यांना जागा करून देताना इकडे तिकडे हलतात आणि आपल्या सॅकने मागे उभ्या असलेल्या माणसाच्या छातीला, पोटाला किंवा जमलंच तर तोंडालाही छानपैकी मसाज करतात. जेवणाचे डबे भरलेल्या या सॅक्सनी अशा बर्‍याच डब्यांचा वास अंगात जिरवलेला असतो आणि मग मागे उभ्या असलेल्या माणसाला तो 'सु'गंधी मसाज सहन करण्यावाचून पर्याय उरत नाही.

हे झालं कामाच्या दिवशीचं. सुट्टीच्या दिवशी देशबांधव सहकुटुंब बाहेर पडतात आणि या कुटुंबांचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्यांच्याबरोबर असलेली बाबागाडी आणि त्यात एक बाबा किंवा बाबी.
परदेशात नोकरी करायला शक्यतो तरुण जोडपीच येतात पण तरुण असूनही मूलबाळ अजून न झालेल्यांचं प्रमाण दहात एक असावं. पंचवीस-सव्वीस वयाच्या जोडप्याला एक-दोन वर्षांचं एक आणि तीस-बत्तीस वयाच्या जोडप्याकडे ४-५ चं एक आणि १-२ चं एक असं साधारण चित्र असते. छान सुखी कुटुंबे. असं एखादं कुटुंब ट्रेनमध्ये शिरतं, त्यांच्याकडे असलेल्या बाळाकडे पाहून जागा करून दिली जाते. बाळाची आई आणि बाळ बसते तो पर्यंत ठीक पण ५०-६० वर्षांच्या व्यक्तींनी दिलेली जागा घेउन बाळाचा तिशी-पस्तीशीतला बापसुद्धा बसून घेतो. लांब उभं राहून मी आपला बघतो.

चित्रपटाच्या तिकीटाची रांग असो की बसच्या तिकीटाची माझ्या मागे जर एखादा देशबांधव येउन उभा राहिला तर माझा थरकाप होतो. बर्‍याच लोकांना सुरक्षित अंतर म्हणजे काय ते कळत नाही. मागून मग सतत त्यांचा वैतागवाणा स्पर्श सहन करत रांगेत एका पायावरून दुसर्‍या पायावर भार टाकत उभे राहणे नशिबी येते. दोन-तीन वेळा धक्के देउन, प्रसंगी सांगूनही पुन्हा पाच-दहा मिनिटातच अक्षरश: ये रे माझ्या मागल्या. (हा अनुभव इतक्यांदा आलाय की मागचा माणूस गे आहे की काय ही आधी आलेली शंका नंतर येईनाशी झाली.) (या अनुभवामुळे स्त्रियांबद्दल मला अतीव सहनुभूति वाटते.)

तसा मी माणूसघाणा नाही आणि लोकांचं निरीक्षण करून त्यांना नावं ठेवणे मला आवडत नाही. पण कधीकधी काहीकाही गोष्टी अगदीच सहन होत नाहीत. विशेषत: आपले देशबांधव असं वागताना पाहून वाईट वाटते. आपण आपल्या संस्कृतीचे इतके गोडवे गातो मग हे साधे संस्कार का नसावेत लोकांवर? दुसर्‍यांबद्दल जराही संवेदना नसावी?
या असल्या वागण्याने एक समाज म्हणून, एक देश म्हणून आणि एक संस्कृती म्हणून आपण काय चित्र उभे करतो जगासमोर? हे आणि असलेच निष्फळ, निरर्थक आणि फालतू विचार मनात येउन मी आपला उगीच माझाच छळ करत बसतो.

प्रतिक्रिया

"फुर्र फुर्र" किंवा "मच्याक मच्याक मच्याक..".

=) ) =) ) =) )
खरंय तुमचं... मला पण भारी राग येतो असल्या आवाजकाढू लोकांचा..
तसेच ते मोबाईलवर बोलणारे... अख्ख्या गावाला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात भाषण ठोकल्यासारखे बोलत असतात..

पण त्यांची ती सवय फार जुनाट अतैव दुर्धर असते .. मग अशा जागेहून आपणच लांब जाणे बेहतर

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 1:16 pm | अरुण मनोहर

>>>जेवणाचे डबे भरलेल्या या सॅक्सनी अशा बर्‍याच डब्यांचा वास अंगात जिरवलेला असतो आणि मग मागे उभ्या असलेल्या माणसाला तो 'सु'गंधी मसाज सहन करण्यावाचून पर्याय उरत नाही.<<<

कोरीयात पीक अवर्समधे मेट्रो रेल मधे चढून बघा. किंवा खच्चून भरलेल्या लिफ्ट मधे उभे रहा. लसूण ह्या प्रकाराशी जन्माची अढी बसेल. बर्याच ढेरपोट्यांनी लसणाचा वास आपापल्या पोटात जिरवला असतो. आणि तो सगळ्या सिमा शक्य असेल तिथे तोडून बाहेर येत असतो! त्या पुढे आपले देशबांधव बरेच बरे!

मस्त आणि खुश्कुशीत लेख

कोरीयात पीक अवर्समधे मेट्रो रेल मधे चढून बघा. किंवा खच्चून भरलेल्या लिफ्ट मधे उभे रहा. लसूण ह्या प्रकाराशी जन्माची अढी बसेल. बर्याच ढेरपोट्यांनी लसणाचा वास आपापल्या पोटात जिरवला असतो. आणि तो सगळ्या सिमा शक्य असेल तिथे तोडून बाहेर येत असतो! त्या पुढे आपले देशबांधव बरेच बरे!

आपण परदेशात राहतो हे दाखवण्याचा "क्षीण" प्रयत्न...

- आतून न्हाणीघर

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 3:28 pm | अरुण मनोहर

काही जळल्याचा वास आला काहो?

नावातकायआहे's picture

24 Dec 2010 - 8:38 pm | नावातकायआहे

मायक्रोवेव मंदला मुरवलेला लसुन आसल... ;-)
आम्चा पन क्शीन प्रयत्न...

इंटरनेटस्नेही's picture

24 Dec 2010 - 1:26 pm | इंटरनेटस्नेही

वा वा चान चान! आवडलं!

टारझन's picture

24 Dec 2010 - 1:38 pm | टारझन

छोटेखानी लेखण छाण आहे. निरिक्षणे नेहमीच्या पहाण्यातली ;)
अशीच वागणुक काहिंची जालावरही असते बरं :) त्यांची ती बळेच लगट करण्याची प्रवृत्ती पाहिली की किळस येते ;)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

24 Dec 2010 - 1:40 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

बर्‍याच लोकांना सुरक्षित अंतर म्हणजे काय ते कळत नाही. मागून मग सतत त्यांचा वैतागवाणा स्पर्श सहन करत रांगेत एका पायावरून दुसर्‍या पायावर भार टाकत उभे राहणे नशिबी येते. दोन-तीन वेळा धक्के देउन, प्रसंगी सांगूनही पुन्हा पाच-दहा मिनिटातच अक्षरश: ये रे माझ्या मागल्या. (हा अनुभव इतक्यांदा आलाय की मागचा माणूस गे आहे की काय ही आधी आलेली शंका नंतर येईनाशी झाली.)

मी मागे अश्यच एका देशबांधवच्या श्रीमुखात भडकवलेली आठवली!..
अजुन एक अशीच तिडिक आणणारी गोष्ट म्हणजे... तो मावा कि काय तो असतो ना... कि गुटखा....कि ज्याचा अत्यंत उग्र आणि घाण वास येतो.... तो गर्दीच्या ठिकाणी खाणं... वाटतं एक सण्ण्कुन कानाखाली लावावी.

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 8:23 pm | नरेशकुमार

बर्‍याच लोकांना सुरक्षित अंतर म्हणजे काय ते कळत नाही.
परिस्थिति परमाने याच्या व्याख्या बदलत जातात.

सुहास..'s picture

24 Dec 2010 - 8:54 pm | सुहास..

मी मागे अश्यच एका देशबांधवच्या श्रीमुखात भडकवलेली आठवली!.. >>>>

बर झाल बाबा मी गुटखा सोडला !

च्यायला .. मी हे वाचुन गुटखा खायला सुरु करीन म्हणतो ..

- (बॅड मॅन) गुलषण गुल्वर

योगी९००'s picture

24 Dec 2010 - 2:20 pm | योगी९००

देशी बांधवाचे वागणे पटले..

पण परदेशी (गोरे) पण काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतात असे नाही. माझ्या ऑफिसातले काही लोकं तर रोज आंघोळ करत नाहीत. काही जण खुप जोरात नाक शिंकरतात. केवळ गोरे म्हणून त्यांच्या या गोष्टी दुर्लक्षण्यासारख्या नाहीत.

हेच लोंक भारतात जर आले तर उगाच आपल्याला नावे ठेवतात...White Skin syndrome मुळे आपण त्यांचे असे वागणे चालवून घेतो का?

नगरीनिरंजन's picture

24 Dec 2010 - 4:17 pm | नगरीनिरंजन

गोरे लोक कागदाने काम करत असल्याने आंघोळ न करता आल्यास अतिशय घाण वास मारतात असा अनुभव आहे. तेव्हा फार त्रास होतो आणि त्यांना तो सूचकपणे जाणवून देण्यात अजिबात वाईट वाटत नाही उलट झाला तर असुरी आनंदच होतो. चालवून तर शेवटी सगळ्यांचेच घ्यावे लागते पण आपल्या लोकांना कोणी वाईट म्हणू नये अशी इच्छा असते.

सूर्यपुत्र's picture

24 Dec 2010 - 4:49 pm | सूर्यपुत्र

म्हणजे स्वःताच्या भारी मोबाइलची, त्यावर मोठ्ठ्याने गाणी लावून मिरवणूक काढणे... हेडसेट वापरायला काय जाते??

ए.चंद्रशेखर's picture

24 Dec 2010 - 5:06 pm | ए.चंद्रशेखर

तुमचे ब्लड प्रेशर वाढले आहे वाटते? असल्या साध्या साध्या गोष्टींचा मनस्ताप व्हायला लागला की हमखास समजावे.

नगरीनिरंजन's picture

24 Dec 2010 - 5:41 pm | नगरीनिरंजन

असेल बुवा. लिहीलंय त्यातून खूप मनस्ताप झालाय, चीडचीड होतेय असं वाटतंय का? पण तसं काही नाहीय.

प्रदीप's picture

24 Dec 2010 - 5:29 pm | प्रदीप

बर्‍याच लोकांना सुरक्षित अंतर म्हणजे काय ते कळत नाही. मागून मग सतत त्यांचा वैतागवाणा स्पर्श सहन करत रांगेत एका पायावरून दुसर्‍या पायावर भार टाकत उभे राहणे नशिबी येते. दोन-तीन वेळा धक्के देउन, प्रसंगी सांगूनही पुन्हा पाच-दहा मिनिटातच अक्षरश: ये रे माझ्या मागल्या. (हा अनुभव इतक्यांदा आलाय की मागचा माणूस गे आहे की काय ही आधी आलेली शंका नंतर येईनाशी झाली.) (या अनुभवामुळे स्त्रियांबद्दल मला अतीव सहनुभूति वाटते.)

अगदी १००% सहमत. ह्या सवयीचा उगम कुठून होतो ह्याचा मी थोडा विचार केला (म्हणजे 'इन मिटीगेशन ऑफ दोज ग्रायंडर्स'). तेव्हा मला असे वाटते की आपल्याकडे शिस्त मुळात नाही, आणि त्यातून कुठेही सार्वजनिक ठिकाणी जी काही थोडीफार शिस्त असेल तर ती तोडण्यात धन्यता मानली जाते. त्यामुळे एकतर शिस्तबद्ध क्यूची तशी संवय देशबांधवांना नाही, आणि जर ते क्यूमधे उभे राहिले, आणि समोरची व्यक्ति व स्वतःमध्ये थोडी जागा जरी सोडली तर तात्काळ कुणीतरी शहाणी व्यक्ति त्या मधल्या गॅपमधे येऊन उभी राहील, अशी भीति त्यांच्या मनात असावी!!

काही अजून काही खास संवयी :

* सार्वजनिक ठिकाणी (ऑफिसात, रेल्वेत, फेरीवर, रस्त्यावर...) आपापसात मोठमोठ्याने बोलणे.

* शक्य तितका भोंगळपणा करीत रहाणे. उदा. काही कार्यक्रमासाठी हॉल एका ठराविक वेळेसाठी बुक केला आहे, हे माहिती असूनही हॉल वेळेवर खाली न करणे. तेथील कर्मचार्‍यांनी तसे सूचित करताच 'गिव्ह अस टेन मोर मिनीट्स' वगैरे अजीजी करणे.

* रोखून पहाणे, विशेषतः स्त्रीयांकडे.

* शक्य असेल तिथे पान खाऊन थुंकणे.

नगरीनिरंजन's picture

25 Dec 2010 - 6:36 am | नगरीनिरंजन

अगदी बरोबर. भोंगळपणा तर भरपूर बाबतीत दिसून येतो. साधं मीटींगमध्ये स्टेटस सांगतानाही स्वतः केलेल्या कामाची अचूक माहिती न देता येणारे खूप लोक असतात आणि मग दुसर्‍याकोणी प्रश्न, शंका विचारली की लगेच अहं दुखावला जातो.

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Dec 2010 - 8:20 pm | बिपिन कार्यकर्ते

खरंच छळवादीपणा असतो हा सगळा!

राजेश घासकडवी's picture

25 Dec 2010 - 4:20 am | राजेश घासकडवी

सॅकधारींच्या वर्णनावरून चार्ली चाप्लीनचं खांद्यावर मोठी शिडी घेऊन चालणं, वळणं आठवलं.

बाकी प्रत्येकच समाजाच्या काही इतरांना विचित्र वाटणाऱ्या पद्धती असतात. तेव्हा आपल्या सवयी सुधारता आल्या नाहीत तरी किमानपक्षी इतरांना सरसकट शिव्या तरी कमी द्याव्या.