तब्बल २२ वर्षांनी ठाण्यामध्ये अखिल भारतीय साहीत्य संमेलन होत आहे, ठाणेकरांसाठी ही गौरवाची गोष्ट आहे. ठाणेकरांनीही त्याची जोरदार तयारी केली आहे, संमेलनाच्या संयोजकांनी साहीत्य संमेलनातील मंचाना, प्रवेशव्दारांना थोर साहीत्यीकांची नांवे दिलेली आहे, त्यात सावरकरांपासुन ते शाहीर विठ्ठ्ल उमाप यांच्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे, असे हे सर्वसमावेशक संमेलन काही विषीष्ट जातीयवादी संघटनानी केवळ क्रिडा संकुलाच्या नावावरुन संमेलन उधळवुन लावु अशी धमकी दिली आहे. संमेलनाचा आणि क्रिडा संकुलाच्या नावाचा काहीही संबंध नाही परंतु ही धमकी केवळ सवंग प्रसीध्दी मिळवण्यासाठी दिली गेली की काय अशी शंका येते.
साहीत्य संमेलनात विचारांचे मंथन होते, तेथे विचारांचा सामना विचारांनी केला पाहीजे, विचारांचा सामना झुंडशाहीने करुन काय साध्य होणार आहे. हे संमेलन केवळ उच्चवर्णीयांचे आहे, त्याला आम्ही विरोध करणारच हे हास्यास्पद वाटते, आधुनिक महाराष्ट्रात जातीने कोणी उच्चवर्णीय ठरत नाही, त्याची वैचारीक पातळी उच्च असायला हवी, सर्वच जातीमध्ये चांगल्या आणि उच्च विचारांचे साहीत्यिक आणि विचारवंत आहेत, त्यामुळे केवळ जातीय राजकारणातुन असे हास्यास्पद आरोप कोणीच करायला नकोत. जशी राजकारण ही केवळ कोणत्या विशीष्ट जातीची मक्तेदारी राहीलेली नाही तशीच साहीत्य ही सुध्दा कोणत्या विशीष्ट जातीची मक्तेदारी राहीलेली नाही, राजकारणामध्ये दर्जा महत्वाचा मानला जात नाही परंतु आजही साहीत्यामध्ये "दर्जेदार साहीत्य" हा प्रकार अस्तीत्वामध्ये आहेच. आणि दर्जेदार साहीत्य हे समाजाकडुन आजही स्विकारले जाते, त्यावेळी साहीत्यीकाची जात पाहीली जात नाही. साहीत्य संमेलन उधळवुन लावु या झुंडशाहीचा सर्वस्तरातुनच निषेध होईल.
प्रतिक्रिया
24 Dec 2010 - 10:00 am | वेताळ
भारताला खरा धोका अती उजव्या जहाल विचारसरणीच्या हिंदु लोकांकडुनच आहे.
24 Dec 2010 - 11:15 am | टारझन
शक्यता नाकारता येत नाहि.
- वेतिल
24 Dec 2010 - 7:02 pm | नरेशकुमार
अती डाव्या लोकांबद्दल काय शक्यता हाय ?
24 Dec 2010 - 10:24 am | अमोल केळकर
सहमत
अमोल
24 Dec 2010 - 11:21 am | गणेशा
>> हे संमेलन केवळ उच्चवर्णीयांचे आहे, असे जे ते म्हणत आहेत
ते सारासार चुक आहे .. संमेलनाचे अध्यक्षच याचे उदाहरण आहे..
------
राजकाराण आणि समाजकारण खुप वेगळे आहे .. ( आता दोन्ही डागाळलेले आहे )
साहित्यिकांनी त्यांच्या शब्दानींच याला उत्तरे दिली पाहिजेत ..
उगाच हा राजकारणी का बोलला आणि तो का बोलला .. यापेक्षा सामण्य माणुस आणि साहित्यिक यांचेच म्हणने बातम्या आणि न्युज मध्ये दाखवुन त्यांच्या म्हणण्याची जरब समाजात उतरवली पाहिजे असे वाटते ..
---
24 Dec 2010 - 11:41 am | llपुण्याचे पेशवेll
एक काम करा तुमच्यासारखे ४-५ समविचारी घ्या तुमच्या बरोबर. खेळाची सामुग्री मिळणार्या दुकानात जाऊन हॉकी खेळण्यासाठी वापरली जाणारी वक्रदांडी (हॉकीस्टीक) विकत घ्या. (प्रत्येकानी . सगळ्यात मिळून एक नव्हे). तोड-फोड करणारे आले की विरोधी घोषणा देऊन प्रतिहल्ला करून त्यांची टाळकी सडका. त्यानेच काही झाले तर थोडेफार होईल. इथे धागा काढून काहीही होणार नाही. ठाण्यात असतो तर तुमच्या उपक्रमात (म्हणजे हॉकी काठ्यावगैरे घेऊन साहीत्यसेवा करण्याच्या) मी सक्रिय सहभाग घेतला असता.
24 Dec 2010 - 11:58 am | वेताळ
पुपे तुम्ही चुकीचा सल्ला दिला. महाराजाच्या काळात तलवार भाले वापरायचे.मी असतो तर धागा न काढता तलवार घेवुन फिरलो असतो संमेलनात.
24 Dec 2010 - 11:59 am | अवलिया
वेताळ मंडळी काहीही करु शकतात त्यामुळे तुम्ही म्हणता ती शक्यता नाकारता येत नाहि.
24 Dec 2010 - 7:09 pm | नरेशकुमार
त्यापेक्शा त्यान्ना एकेक आयडि द्या मिपावर, आनि रोज मिपा वाचायला सान्गा
च्याआईला, एके दिवशि आपनहुन जिव देतिल सगळे.
24 Dec 2010 - 12:08 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत थोडी चूक झाली खरी. पण भाषेचे डबके आटू नये म्हणून साहीत्यसेवेसाठी जास्तीत जास्त अद्ययावत हत्यारे सुचवली. (आणि साले हिंदू लोक कसले बॉम्ब, बंदूका घेऊन जाणार. म्हणून अद्ययावत हॉकीदांडी हा पर्याय सुचवला)
बाकी मी मुस्लिम असलो असतो तर आरडीएक्स, एके असा पर्याय नक्की सुचवला असता.
26 Dec 2010 - 1:44 am | अविनाश कदम
मुळ धाग्यामध्ये उपस्थित केलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. साहित्य संमेलन व साहित्यसंमेलनासाठी वापरल्या जाणार्या स्टे़डियमचं नाव यांचा काही संबंध नाही. साहित्यसंमेलन नगरीला सावरकरांचे नाव दिलेलं आहे. संमेलन आटोपल्यावर कोंडदेव स्टेडीयमच्या नावाचं काय करायचं हा प्रश्न ठाणे नगरपालीकेत सोडवावा. जसा पुणे नगरपालीकेने कोंडदेवांच्या पुतळ्याचा प्रश्न सोडवला.
पण साहित्य संमेलनातून हल्ली साहित्याऐवजी राजकारणी,उद्योजक, प्रयोजक यांचं महत्त्व वाढलं आहे. कोट्यावधी रुपये जमा करून नंतर उरलेले पैसे संयोजक संस्थानी वाटू:न घ्यायचे हा जो साहित्य संमेलनाचा किफायतशीर धंदा सुरू झाला आहे त्याचा विचार करायला हवा.(पुणे संमेलनात उरलेल्या ८२ लाखांचं काय झालं.) साहित्य संमेलन हा राजकीय खेळ व कुरघोडयांचा अड्डा बनवाल तर तिथे संभाजी ब्रिगेडवालेही आपलं राजकारण घेऊन येणारच. नथुराम गोडसेचा गौरव आणि साहित्याचाही काही संबंध नाही. पण तिथेही नथुराम गोडसेचा गौरव करून काहींनी आपले राजकारण पुढे रेटण्याचा प्रयत्न केलाच. मग त्या खेळात संभाजी ब्रिगेड इ. घुसून . त्यांनी आपलं राजकारण आणलं तर काय करणार ?
साहित्यिकांनी साहित्य संमेलने घेतांना आता या साहित्यबाह्य हस्तक्षेपांचं काय करायचं हे ठरवायला हवं.