प्राजुने विचारले म्हणून कॉर्न फ़्लोअर वापरून व्हाइट सॉस करायची कृति देत आहे.
मैद्यापेक्षा कॉर्न फ़्लोअर कमी लागते आणि पदार्थ क्रीम न वापरता क्रीमी होतो. एक किंवा अर्धा चमचा लोणी चवी करता घालायचे.कमी कॅलरीज.
पातळ सॉस१ मोठा चमचा (शिग भरून) कॉर्न फ़्लोअर.
२५० मिली लिटर दूध.
कॄति-- अर्धा कप दूधात कॉर्न फ़्लोअर मिक्स करून ठेवावे. उरलेले दूध गॅसवर ठेवावे. दूध उकळले की गॅस कमी करावा. सतत ढवळत केलेले मिश्रण हळूहळू उकळत्या दूधात घालावे. २ मिनिटे उकळू द्यावे.
मी हा सॉस क्रीमी पास्त्यासाठी करते. चिझ आपल्याला हवे तेव्ह्ढे घालावे.
हाच सॉस साखर व व्हॅनिला घातला की अॅपल पाय बरोबर पण छान लागतो.
घट्ट सॉस-- ३ मोठे चमचे कॉर्न फ़्लोअर(शिग भरून नको).
२५० मिली लिटर दूध.
कॄति--पातळ सॉस प्रमाणे.
हा सॉस बेक्ड व्हेजिटेबल्स साठी.
लतिका धुमाळे
प्रतिक्रिया
21 Dec 2010 - 5:30 pm | स्वाती२
धन्स लतिका!
21 Dec 2010 - 6:01 pm | रेवती
इतके दिवस मैद्याचाच सॉस करायचे.
आता कॉर्न फ्लोर वापरून बघीन.
धन्यवाद!
21 Dec 2010 - 7:32 pm | निवेदिता-ताई
धन्यवाद ...मलाही ही कॄती हवीहोती...
21 Dec 2010 - 7:36 pm | प्राजु
धन्यवाद लतिका! आवर्जून ही पाकृ दिलीस त्याबद्दल खूप खूप आभार.
एक छोटीशी शंका : लोणी केव्हा घालायचे? कॉर्न फ्लॉवर दूधात घालून घ्यायचे मग लोणी कधी घालयचे?
21 Dec 2010 - 7:42 pm | लतिका धुमाळे
शिजवून झाल्यावर अगदी शेवटी लोणी घालायचे.
लतिका धुमाळे
22 Dec 2010 - 7:27 am | रेवती
धन्यवाद लतिकाताई!
आजच सॉस केले आणि कधी नव्हे ते चांगले झाले.
त्यामुळे बेक्ड व्हेजी. ही चांगली झाली.
वरून बटर घातल्याने सॉसला चकाकी आली.
27 Dec 2010 - 2:41 pm | कच्ची कैरी
धन्यवाद ह्या उपयुक्त रेसेपीसाठी.