गाभा:
आधी खुप भ्रष्टाचाराला खत पाणी घाला. मग अंगाशी यायला लागले तेव्हा पाच कलमी कार्यक्रम राबवा (हे पहिल्यांदीच करायला पाहिजे होते). पण पुढच्या निवडणुकांची तयारी कशी झाली असती मग.
पंतप्रधान बिचारे काय करणार.
जो लाच घेतो, लाच देतो व भ्रष्टाचारी तो पापी व राष्ट्रद्रोही असतो.
मग कोण देशप्रेमी.
आपल्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत.
पुर्वी लाखात घपला असायचा.
मग करोडोत
आता म्हणे हजार करोड वगैरे.
अबबब
प्रतिक्रिया
21 Dec 2010 - 2:46 pm | रानी १३
http://indianleaks.in/
21 Dec 2010 - 4:20 pm | आत्मशून्य
.
21 Dec 2010 - 7:19 pm | बहुगुणी
जिथे या संस्थळावर माहिती गोळा करणार्यांचीच माहिती जर सुरक्षित आणि गुप्त नसेल तर माहिती पुरवणार्यांच्या गोपनीयतेची हमी कोण देणार? फोन नंबर वरून हे संस्थळ डेन्मार्क मधून चालवलं जात आहे असं दिसतं. IP अॅड्रेस वरून आधिक पाठपुरावाही करता येईल.
जेंव्हा anonymized servers वरून असं संस्थळ चालवलं जाईल तेंव्हाच काही उपयोग झाला तर होईल.
21 Dec 2010 - 11:06 pm | आत्मशून्य
proxy servers वापरून अपलोड कराना आणी हे तूमचे म्हणने त्यांना पण सांगा
21 Dec 2010 - 2:49 pm | सूड
कुणाच्या सौ. ने हा चुहे खाण्याचा प्रताप केला ते वाचायला आलो, तर काय...!!
21 Dec 2010 - 7:01 pm | चिरोटा
काळेसाहेबांचा मुशर्रफ ह्यांच्यावर हा लेख असेल असे वाटले होते.
22 Dec 2010 - 9:59 pm | सुधीर काळे
हाहाहा! कल्पना वाईट नाहीं. पण 'मुश'चे ९०० चुहे कारगिल युद्धाच्या वेळीच झाले, पण हजला जायचे नांवही घेत नाहीं तो!