माझा एक मित्र आहे, तो ज्या लग्ना स॑ब॑धी कार्यक्रमात जाई तेथे काही तरी गडबड ही निश्चित होते. त्यातील काही मजेशीर गोष्टी. एकदा त्याच्या मोठ्या भावाला मुलगी पहायला माझा मित्र, त्याचा भाऊ, आणि त्याचे आई,वडिल असे सगळे गेले, मुलगी अतिशय देखणी, माझ्या मित्राचे तर डोळे दिपलेच . मुलगी ला नापस॑त करण्यासारखे काहीच नव्हते, पण त्याचा भाऊ काही बोलेना, मग माझ्या मित्राने त्याच्या भावाला २ मिनिटे बाहेर नेले आणि सा॑गितले की तुला कोण आवडते ते मला माहित आहे, त्या मुळे तु तिच्याशीच लग्न कर, आणि मी हीच्याशी करीन, मग ह्या पट्ट्याने आत घरात जाऊन सा॑गितले की, दादाला एक मुलगी आवडते त्या मुळे तो काही बोलत नाही आहे त्याचे राहु दे, पण मुलीची हरकत नसेल तर माझ्याशी हीचे लग्न ठरवा. ते ऐकुन त्याचे स्वतःचे आई-वडिल, मुलगी आणि त्या॑च्या घरातील आ वाचुन राहिले. लग्न तर तिच्याशीच झाले त्याचे हे खास.
दुसरी मजा, एका मित्रा बरोबर त्याला मुलगी पहायला गेला, तर त्या मित्राचे लग्न ज्या मुलीला पाहायला गेला तिच्या बहिणीशी ठरवुन आला.
एकदा त्याच्या मित्राने सा॑गितले की मुलगी पहायला जायचे आहे तु डायरेक्ट ह्या पत्यावर मुलीच्या घरी ये, मी १० मिनिटाच पोहचत आहे. मग काय पोलीस खात्यात असल्यामुळे, ऑन ड्युटी हा युनिफॉर्मवर त्या मुलीच्या घरी मित्राच्या आधी पोहचला आणि मजा म्हणुन त्या मुलीच्या वडिला॑ना सा॑गतो , तो इथे येणार आहे हे मला माहित होते म्हणुन त्याला पकङायला आलो आहे. त्यावेळी त्या मुलीच्या वडिला॑चा चेहरा कसा झाला असेल.
आणखी एका लग्नाला गेला तर त्या माड॑वातुन नवरी मुलगीच पळुन गेली, त्या मुळे लग्न कॅन्स्ल, आणि हा आम्हाला फोन करुन सा॑गतो माझ्या कडुन तुम्हाला पार्टी चला आज जेवायलाच या ह्या कार्यालयात. नाही तर ते फुकटच जाणार आहे.
त्या मुळे मी माझ्या लग्नात ह्या पट्ट्याला काही बोलावले नाही.
मित्राच्या मजेशीर गोष्टी
गाभा:
प्रतिक्रिया
26 Apr 2008 - 1:34 am | इनोबा म्हणे
त्या मुळे मी माझ्या लग्नात ह्या पट्ट्याला काही बोलावले नाही.
नाहीतर तुमच्या नवर्याचे आणखी कोणाशी लग्न लावून मोकळा झाला असता. होय ना!
अनुभव आवडले.सवडीने आमचे अनुभव ही लिहीतो.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
26 Apr 2008 - 1:39 am | वरदा
बघ शितल मी उगाच नाही ही ही करत तू तसंच सांगतेस....त्याची बायको कशी सांभाळत असेल त्याला.....
माझ्या कडुन तुम्हाला पार्टी चला आज जेवायलाच या ह्या कार्यालयात. नाही तर ते फुकटच जाणार आहे.
बरोबरच आहे पळायचं ती पळाली आता सगळं वाया कशाला घालवा ..खी खी खी......
26 Apr 2008 - 2:26 am | डॉ. श्लोक _भातखंडे
एका मित्राच्या ऑफिसातील मित्राचा अनुभव...
लग्नासाठी महिन्याची रजा घेऊन गेलेला मित्र ८ दिवसातच परत कामावर हजर झाला.. कारण विचारताच असे कळले की त्याच्या लग्नाच्या दोन दिवस आधी त्याची होणारी बायको तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली...... याने शक्य तितक्या नातेवाईकांना सांगितले की लग्न कॅन्सल झाले म्हणून्....पेपरात जहिरातही दिली की लग्न कॅन्सल झाले आहे ... आणि स्वतः ( जे काही अनभिज्ञ आले, त्या नातेवाईकांचे स्वागत करत) कार्यालयात उभा राहिला... कल्पना करणेही कठिण आहे,बापरे, कितीही प्रयत्न केला तरी ही गोष्ट आठवून अजिबात हसू येत नाही...
26 Apr 2008 - 2:39 am | चतुरंग
तरी सुदैवी म्हणायचा की आधीच समजले;))
(नंतर काही काळ तरी लग्नाबद्दल अनिच्छा निर्माण झाली असेल त्याला!)
चतुरंग
26 Apr 2008 - 9:47 am | ठणठणपाळ
शितलताई, तुमच्या या मित्राला धमुच्या लग्नाला घेऊन या हं नक्की! आग्रहाचे आमंत्रण आहे.
26 Apr 2008 - 10:52 am | इनोबा म्हणे
शितलताई, तुमच्या या मित्राला धमुच्या लग्नाला घेऊन या हं नक्की! आग्रहाचे आमंत्रण आहे.
ऐकतोयस का रे? लेका सगळेच तुझ्या लग्नाच्या तयारीला लागलेत बघ.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
26 Apr 2008 - 4:16 pm | विसोबा खेचर
हम्म!
शितल, छान आहेत प्रसंग!
कोणे एकेकाळी घरच्यांच्या आग्रहाखातर मी काही कांदेपोह्यांचे कार्यक्रम खेळलो आहे, त्या सुरस कथाही मिपावर लिहीन केव्हातरी! :)
तात्या.
26 Apr 2008 - 7:39 pm | प्रभाकर पेठकर
मस्कतमधे माझ्या एका मित्राला ऑफिसला जायचा कंटाळा आला. त्याने दांडी मारली. त्याची बायको नेहमी प्रमाणे तिच्या ऑफिसला निघून गेली. हा घरात एकटाच. थोडावेळ टंगळ मंगळ केल्यावर हा कंटाळला. मग ह्याने जूनी कागदपत्रं वाचून निरुपयोगी कचरा घराबाहेर काढायचे ठरवले. तास दोन तास खपून सर्व कचरा २-३ प्लॅस्टीकच्या पिशव्यात भरला आणि त्या पिशव्या घराबाहेर ठेवण्यासाठी दरवाजा उघडला आणि कचरा बाहेर ठेवतोच आहे तेवढ्यात वार्याने दरवाजा जोरात बंद झाला. लॅच लागले. हा बाहेर कॉरिडरमध्ये अडकला. त्या क्षणाला त्याच्या लक्षात सर्वात भयंकर गोष्ट आली ती म्हणजे सकाळ पासून तो नुसत्या 'अंडरवेअर'वरच होता. ह्याला दरदरून घाम सुटला. ओळीने ७-८ फ्लॅट होते त्या मजल्यावर. सर्व बापे मंडळी (आणि काही बाया) कामावर गेली होती आणि काही बायका (नोकरी न करणार्या) आपापल्या फ्लॅट मध्ये होत्या. करायचे काय? किल्या, मोबाईल सर्व फ्लॅट मध्ये अडकले होते. शेजारी किल्ली होती पण तिथे फक्त त्या घरची स्त्री घरात होती. किल्ली मागायची कशी. कचरा न्यायला कचरेवाली बाई कधीही आली असती किंवा कोणी दुसरी बाई सुपरमार्केटमध्ये भाजी वगैरे घ्यायला बाहेर पडली असती. हा असा नुस्ताऽऽ अंडरवेअरवर... वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. टाकलेल्या कचर्यात एक वर्तमानपत्र होते. ते शोधून ते कमरेला गुंढाळले आणि शेजारच्या फ्लॅटची बेल वाजवली आणि दरवाज्या जवळ कोणी तरी आले आहे ह्याची चाहूल घेऊन हा ओरडू लागला, 'भाभीजीऽऽ दरवाजा मत खोलना.... भाभीजी ऽऽऽ दरवाजा मऽऽत खोलनाऽऽऽ।' ती बाई आतमध्ये घाबरली. ती आतून ओरडायला लागली, 'क्या हुवाऽऽ, क्या हुवाऽऽ भाईसाहब?' ह्याला भिती ह्या आरडा ओरड्याने दुसर्या एखाद्या फ्लॅटचा दरवाजा उघडायचा. मग ह्याने संयमीत आवाजात सांगितले, 'आप आपके घरका दरवाजा खोले बिना मेरे घरकी चाबी बाहर डालीए. बाकी मैं बादमे बताता हूं।' त्या बाईने ह्याने सांगितले तसे केले आणि किल्ली मिळताच, हा झटकन आपल्या घराचा दरवाजा उघडून सटकन् आत घुसला आणि दरवाजा आतून बंद करून घेतला. हुऽऽऽऽऽश्शऽऽ!
नंतर ह्याने फोनवर बायकोला सर्व सांगितले आणि तिनेही ते सर्व हसत हसत शेजारणीला सांगितले. नंतर कित्येक दिवस हा शेजारणीपासून तोंड लपवून फिरत होता.
27 Apr 2008 - 6:15 pm | भडकमकर मास्तर
अहाहा, पेठकरकाका....
एक अगदी अशीच गोष्ट , म्हणजे अरविन्द गोखले यांची लघुकथा वाचलेली होती.. त्याची आठवण झाली हे वाचून....
.. डीटेल्स आठवत नाहीत ...त्यात तो माणूस पूर्ण विवस्त्र रात्री उशीरा दारू पिऊन टाईट झालेला स्वतःच्याच घराबाहेर अडकतो....
28 Apr 2008 - 1:28 am | शितल
प्रतिसादा बद्दल सर्वा॑चे आभार !