नाताळ म्हटला की इथे वेगवेगळ्या प्रकारच्या डेझर्टसची एकच गर्दी होते. वेगवेगळ्या प्रकारचे केक्स, पाय, कुकीज आणि विविध प्रकारची चॉकलेटं. त्यातलाच माझा आवडता प्रकार म्हणजे ट्रफल्स. तोंडात टाकताच विरघळणारे आणि बनवायलाही अगदी सोप्पे. तसेच बेसिक रेसिपीत फ्लेवरिंग किंवा वरुन लावायचे कोटिंग बदलून वेगवेगळ्या प्रकारचे ट्रफल्स करता येतात. खाली दिलेल्या मापात साधरण ६० ट्रफल्स होतात.
साहित्य
बेस रेसिपी
८ औस क्रिम चिज, मऊ केलेले
२ कप चॉकलेट चिप्स
२ कप आयसिंग शुगर
२ चमचे व्हिपिंग क्रिम
१ चमचा वॅनिला इसेंस
किंवा
मोठ्यांसाठी बनवणार असाल तर फ्लेवर साठी रम, ब्रॅन्डी
ट्रफल्स घोळवण्यासाठी थोडे ड्रिंकिंग चॉकलेट किंवा कोको
कृती
एका मोठ्या बोलमधे क्रिम चिज फेटुन घ्या. आता त्यात थोडी थोडी साखर घालून फेटा. मायक्रोवेव मधे किंवा डबल बॉयलर पद्धतीने चॉकलेट चिप्स वितळवून घ्या. हे वितळलेले चॉकलेट, क्रिम आणि वॅनिला क्रिम चिजच्य मिश्रणात घालुन फेटा. एकजिव झाले की तासभर फ्रिजमधे ठेवा. तासाभराने बाहेर काढुन एक गोळी करुन बघा. हाताळायला कठिण वाटल्यास जास्तवेळ फ्रिजमधे ठेवा. आता या मिश्रणाचे आपल्या तिळाच्या लाडवासारखे लाडू बनवा. हे बनवलेले लाडु ड्रिंकिंग चॉकलेट मधे घोळवा. यम्मी ट्रफल्स तयार!
बेस रेसिपीतील फ्लेवरिंग साठी वॅनिला ऐवजी आल्मन्ड किंवा पेपरमिंट वापरु शकता. तसेच ट्रफल्स घोळवण्यासाठी वेगवेगळ्या नटसचा चुरा वापरु शकता किंवा मेल्ट केलेल्या व्हाइट किंवा डार्क चॉकलेट मधे बुडवुन चॉकलेटचे आवरण बनवू शकता.
प्रतिक्रिया
18 Dec 2010 - 7:02 pm | स्वैर परी
काय भारी दिसत आहेत! जीभ लपलपायी! :)
18 Dec 2010 - 7:15 pm | पर्नल नेने मराठे
छानच हो !!!
HR मधे राहुन ऑफिसवर राज्य करणापरी IT त राहुन $चा माज करणे उत्तम! ;)
18 Dec 2010 - 7:57 pm | स्वैर परी
जमलय चुचु!
18 Dec 2010 - 7:08 pm | कवितानागेश
मी आजच इथे विचारणार होते या प्रकाराबद्दल.
धन्यवाद.
नक्की करणार आहे.
18 Dec 2010 - 7:34 pm | प्रियाली
तुझ्या रेसिपी (विशेषतः सणासुदीच्या) वाचून निग्रहाने त्यापासून दूर कसे राहावे अशी चिंता पडते. हा अत्याचार आहे. :(
ता.क. मी सर्व रेशिपी वाचलेल्या असतात पण त्यावर प्रतिसाद देणे टाळते. आज दिला. सकाळी सकाळी निग्रह कमी पडतो असे कळले. ;)
18 Dec 2010 - 7:48 pm | नगरीनिरंजन
नुसते पाहूनच किलोभर वजन वाढल्याचा भास झाला. नट्स मध्ये घोळवलेले ट्रफल्स किलर दिसताहेत.
18 Dec 2010 - 7:49 pm | टारझन
छाण दिसत आहेत गुलाबजाम आणि बेसनाचे लाडू !!
18 Dec 2010 - 8:38 pm | गणपा
खल्लास स्वातीतै.
जबरा प्रकार आहे हे ट्रफल्स म्हणजे. पण हे खाल्ल्यावर १/२ तास जास्त धावावं लागेल. :)
18 Dec 2010 - 8:42 pm | प्राजु
आहा!!! मस्तच!! एकदम खास!!
18 Dec 2010 - 9:11 pm | स्वाती२
धन्यवाद मंडळी!
कॅलरीजची काळजी वाटणे साहजिक आहे पण साधारण केकच्या एका चौकोनी तुकड्यावर लावलेल्या आयसिंग एवढ्या कॅलरीच (साधारण ७०-८०)एका ट्रफलमधे येतात. त्यामुळे मी तरी ब्राउनी किंवा केक ऐवजी ट्रफल पसंत करते.
18 Dec 2010 - 9:30 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
मस्त....
चॉकलेट मी कसं ही खाउ शकते!..
कोणत्याही फोर्म मध्ये!
आजकाल जर्रा थांबवते आहे स्वतःला!
पण class आहे रेसिपी!
19 Dec 2010 - 12:13 am | रेवती
अरे देवा!
मी या धाग्यावर आलेच नाही.
ग्रेट फोटू बघितलाच नाही आणि पाकृही वाचली नाही.
(का असा त्रास देतेस स्वाती२?) ;)
19 Dec 2010 - 8:55 pm | निवेदिता-ताई
रेवती काय हे??????????? हा हा हा
मस्त मस्त ....माझी मुलगी खुश होणार उद्या ही चॉकलेट ट्रफल्स खावुन..
20 Dec 2010 - 12:13 pm | प्राजक्ता पवार
मस्तंच आहे रेसेपी :)
20 Dec 2010 - 1:28 pm | विलासराव
माझा पत्ता देउ का?
पाठवुनच द्या आता.
नंतर सविस्तर प्रतिसाद देतो.
20 Dec 2010 - 4:04 pm | पिंगू
पाककृतीचं नाव वाचूनच मला कळलं कुणाची पाककृती आहे.. ह्यावेळेस पुर्ण शाकाहारी चाकलेटं पाहून आनंद झाला..
- चाकलेटप्रेमी पिंगू
20 Dec 2010 - 4:13 pm | परिकथेतील राजकुमार
वेड पाकृ !!
फोटु तर काय भन्नाट दिसतो आहे.
25 Dec 2010 - 11:27 pm | कवितानागेश
आज मी केले.
चव चांगली झाली, पण 'वरिजनल' चव माहित नाही,
त्यामूळे 'बरोबर' झाले की नाही महित नाही.
मुम्बईत कुठे 'बरोबर' ट्रफल्स मिळतात का?
एकदा तुलनात्मक अभ्यास करेन म्हणते.
29 Dec 2010 - 1:44 pm | खादाड अमिता
Theobroma, बांद्रा (प) लिंकिंग रोड किंवा कुलाबा कॉसवे - इथले Truffles मस्त असतात.
Truffles studio - जुहू ला पण एकदम वर्ल्ड क्लास truffles मिळतात.
तुल्नात्मक अभ्यासाला कम्पनी हवी असेल तर सान्गा.
30 Dec 2010 - 7:22 am | मदनबाण
शॉलिट्ट !!! शॉलिट्ट !!! शॉलिट्ट !!! :)
फोटो पाहुनशान लयं म्हणजी लयं त्रास झाला की... ;)