खालील अळूचा कंद हा अळकुड्यांपेक्षा बर्याच मोठ्या आकाराचा असतो. लांबी साधारण रताळ्या एवढी आणि त्यापेक्षा बराच जाडाजुडा असतो. अळकुडीचे मोठे रुप कदाचीत हा कंद असावा. अजुन प्रत्यक्षात मी ह्याचे झाड पाहीले नाही पण पेणला हे कंद जास्त मिळतात. मी आत्तापर्यंत ह्या कंदाचा उपयोग आमटीमध्ये घालण्यासाठीच केलाय. नुसती बटाट्यासारखी भाजीही करता येते ह्याची. हा कंद सोलुन पाहीला की आतुन थोडा गुलाबी छटा आलेला असतो. अळूच्या मुळीसारखा हा चिकट होत नाही. थोडा कडकच असतो. चवही वेगळीच असते.
हा सोललेला कंद आहे. अगदी नवजात बाळासारखा गोरा गुलाबी दिसतो सोलल्यावर.
ह्या कंदाच्या फोडी
प्रतिक्रिया
18 Dec 2010 - 3:23 pm | निवेदिता-ताई
आता फ़ोडी झाल्या ...कर लवकर भाजी
18 Dec 2010 - 4:03 pm | जागु
निवेदिता ताई तुमच्यासाठी करुन ठेवल्यात फोडी. तुम्ही करुन टाका. मी ह्या फोडी आंबट वरणा मध्ये घातल्या होत्या.
18 Dec 2010 - 4:17 pm | निनाद मुक्काम प...
फारच छान .फोटो मस्त आहेत .पण ...
कधी तरी पास्ता /स्पेगेटी / अश्या जगप्रसिध्ध खाण्याची रेसिपी द्यावी
आय लव इटालियन फूड असा आवर्जून उल्लेख करावा .
म्हणजे आम्ही सारे खवय्ये मध्ये तुमची वर्णी लागण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न केले जातील .
18 Dec 2010 - 4:48 pm | सुहास..
ए जागुताई !!
यावर केवळ मीठ टाकुनही खातात ना ?
प्रश्नार्थी
सुहास
18 Dec 2010 - 5:22 pm | परिकथेतील राजकुमार
नविन म्हण :-
सुहासच्या मनात चकणा.
18 Dec 2010 - 5:48 pm | सुहास..
सुहासच्या मनात चकणा. >>>>
हा हा हा हा !!
अजुन काही नवीन म्हणी...
१ ) नातलग येति घरा , तोच कॅफी दसरा ! (साधु-संत येति ..)
२) कॅफेच्या दरवाज्याला , सौंदर्यफुफाटा फार ! (उथळ पाण्या.. )
३ ) आग धाग्यावरी , बंब खरडवही ! (सही, सही ) ( आग सोमे..)
४ ) हाता-हाती येइना, मांजरकन्या फाकडी ! (नाचता ये.. )
५ ) काखेत गोजिरी , हाताला देशद्रोही (सांगायची गरज आहे का ? )
18 Dec 2010 - 5:49 pm | मदनबाण
ह्म्म,,, जागु ताय स्पेशल !!! :)
(कंदी पेढा प्रेमी) ;)
18 Dec 2010 - 8:17 pm | पैसा
गोव्यात याला "अळूमाडी" म्हणतात. का ते माहित नाय. पण बटाटे किंवा नीरफणसासारखे याचे पातळ काप तिखट हळद, मीठ आणि तांदुळाचा रवा लावून परतून खातात किंवा मसाल्याची भाजी करतात.
18 Dec 2010 - 9:14 pm | प्रियाली
मी ही तिखट हळद, मीठ आणि तांदुळाचा रवा लावून शॅलो फ्राय केलेली कापं खाल्ली आहेत. हा कंद खाजरा असल्यास ही कापं थोडावेळ चिंचेच्या पाण्यात बुडवून ठेवतात.
18 Dec 2010 - 8:50 pm | प्राजु
मस्तय! :)
20 Dec 2010 - 12:06 pm | प्राजक्ता पवार
छान .