एका असंबद्ध लिखाणाचा पंचनामा या नावाचा एक लेख नुकताच (लेख जुनाच म्हणजे सप्टेंबर १० अखेरचा आहे मात्र माझ्या नुकताच वाचण्यात आला)
तब्बल तीस (की सदतीस?) वर्षानंतर, वाजत-गाजत प्रकाशित झालेली भालचंद्र नेमाडे लिखित "हिंदू एक समृद्ध अडगळ' ही कादंबरी मराठी साहित्य जगतात व सामाजिक विचारात क्रांती घडवणार असे वातावरण तयार झाले होते.परंतु ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर मात्र मराठी साहित्यविश्र्व व विचारविश्र्व हतबुद्ध झाल्यासारखे भासते आहे. या पार्श्र्वभूमीवर, या कादंबरीचे नायक खंडूराव यांच्याशी कादंबरीतील असंबद्धतेबाबत पत्ररूपाने साधलेला संवाद.... असे त्यालेखाचे लेखक दिलिप करंबेळकर सांगतात आणि लेख लिहितात.
तो लेख इथे वाचता येईल... http://www.evivek.com/26sept2010/lekh001.html
मिपावर अनेक नेमाडपंथी, अनेमाडपंथी, ननेमाडपंथी आणिक जे काही असतील नसतील ते आहेत. त्यांचे विचार जाणण्यास उत्सुक आहे... :)
प्रतिक्रिया
15 Dec 2010 - 2:06 pm | ५० फक्त
मी कोणताही चित्रपट पाहताना जसे तांत्रिक बाबी पाहतो, तसेच हे आहे. आणि असे असेल तर मी हे पुस्तक मिळण्यासाठी लायब्ररीत नंबर लाबला आहे तो काढुन टाकतो.
हर्षद.
15 Dec 2010 - 3:06 pm | यकु
अक्षी चिंध्याच केल्यात की कादंबरीच्या... सुप्रिम कोर्टात (!) उलटतपासणी घेतल्यासारख्या!
पण काय ! कादंबरी लिहीणारा लिहून मोकळा झाला.... विकणारे विकून मोकळे झाले... वाचणारे शेंबूड शिंकरल्यासारख्या चर्चा करून मोकळे झाले..
विरोधातल्या लोकांनी (प्रस्तुत लिंकमधील लेखकासारख्या) सपासप स्वतःच्या अंगाभोवती वार केले.... नेमाडे काही अपेंडीक्स जोडणार नाहीत आता कादंबरीला... उलट खळबळजनक म्हणून आवृत्त्या काढतील.
अल्टिमेट्ली यॅडा ठरला तो सामान्य वाचक... कोणत्याही धर्माला अढळपद न देणारा पण सकस वाचन करू इच्छिणारा..
एकंदरीत टाईम खोटी! :)
15 Dec 2010 - 3:02 pm | चिंतामणी
पंचनाम्यात जबरदस्त "पंच" (Punch) आहे. Punchनामा असेच म्हणावे लागेल.
15 Dec 2010 - 5:04 pm | यशोधरा
दिलेल्या दुव्यावर लेख वाचला. धन्यवाद.
15 Dec 2010 - 5:17 pm | छोटा डॉन
"हिंदु कादंबरी एकदम छान, मस्त, मुद्देसुद आणि अचुक आहे" असे आमचे मत आहे.
बाकीच्यांनी स्वतःच 'असो' म्हणुन घ्यावे.
बाकी टिकाकारांना हिंदु कितपत समजली आणि पचली ह्याची एक शंकाच आहे ;)
- डॉन्या नेमाडे
15 Dec 2010 - 7:34 pm | यकु
पचायचा आणि न पचायचा संबंध नाही डॉनश्री.
अबरचबर घोळाणा किती खायचा याचाही हिशेब ठेवला पाहिजे ना?
नेमाडे प्रामाणिक असतील तर त्यांनी स्वत: पुढच्या आवृत्तीत कबूल करावं की "ते हिंदू या कादंबरीचा घोळ लिहून फसले आहेत.."
दिलीप करंबळेकरांचे बहुतांशी मुद्दे व्हॅलिड आहेत.
बाकी "मी जगण्याची समृध्द अडगळ" असे आधीच पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच म्हटलेय, अडगळ आवरण्याची जबाबदारी मी का घेऊ?.. असेही म्हणायला ते मोकळे आहेत.
या धाग्यावरून मी आता कायमची कल्टी मारतो. :)
16 Dec 2010 - 12:15 am | पिवळा डांबिस
मस्त लेख आहे!
दिलीप करंबेळकर यांचे अभिनंदन!
16 Dec 2010 - 4:09 am | पिंगू
पंचनामा वाचल्यावर मूळ कादंबरी वाचावी का नाही.. या विचारात पडलोय.. तुम्हीच सांगा राव..
- पिंगू
16 Dec 2010 - 4:48 am | अभिज्ञ
हि कादंबरी म्हणजे निव्वळ फालतुपणा आहे.
पंचनामा जबरदस्तच.
अभि़ज्ञ.
---------------------------------------------------------------------
"आमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. ज्योतिष सांगणा-यावर नव्हे. :)"
17 Dec 2010 - 2:34 am | धनंजय
नेमाड्यांच्या कादंबरीचे जितके अंश वाचलेले आहेत, त्यांचे साहित्यिक मूल्य करंबेळकरांच्या लेखनाच्या साहित्यिक मूल्यापेक्षा अधिक वाटते.
नेमाड्यांची कादंबरी वाचण्याबद्दल उत्सूकता कायम आहे.
श्री. करंबेळकरांची निकृष्ट लेखनशैली (किंवा नेमाड्यांना जमली त्या शैलीची हास्यास्पद लंगडी नकल) थोडा वेळ बाजूला ठेऊ. करंबेळकरांचे मुद्दे काय ते नीट कळले नाही. श्री. यशवंत एकनाथ म्हणतात की मुद्दे व्हॅलिड आहेत. ते मुद्दे कुठले? हे मला कोणी समजावून सांगेल काय?
बराचसा भाग खंडेरावाची जन्मतारीख आणि वेगवेगळ्या प्रसंगाच्या वेळेला त्याचे वय काय? याच्या गणितात घालवला आहे. हा मुद्दा व्हॅलिड आहे काय? (श्री. करंबेळकर चित्रपट बघताना "गाने म्हणायला लागलेल्या ४.५ मिनिटांत खरेच प्रेम होऊ शकते काय... वगैरे हिशोब करतात काय, अशी कल्पना मनात येऊन दरदरून घाम फुटला.) हा मुद्दा कोणी समजवावा, मग त्यापुढचे मुद्दे सुद्धा साध्या शैलीत कोणी समजावून द्यावेत.
17 Dec 2010 - 2:39 am | आमोद शिंदे
तुमच्यसाठी मूल्य जास्त आहे, पण सगळेच काही तुमच्यासारखी बुध्दीमत्ता घेऊन जन्माला आले नसतात. त्यांच्यासाठी करंबळेंचे मूल्य अर्थातच जास्त आहे.
बाकी प्रतिसादाशी सहमत आहे.
17 Dec 2010 - 4:47 am | यकु
धनंजयजी,
मी या धाग्यावरून कल्टी मारलेली होती. पण तुम्ही करंबळेकरांचे मुद्दे व्हॅलीड कसे आहेत ते विचारले आहे. मला तो लेख पुन्हा वाचून, मला व्हॅलिड वाटलेले मुद्दे तुमच्यासमोर ठेवायला आळस आला आहे; पण तसे का वाटले ते थोडक्यात सांगू इच्छितो -
नेमाड्यांनी धड इतिहास म्हणूनही ही कादंबरी लिहीलेली नाही आणि-
- फक्त त्या प्रकारचे पूर्वायुष्यातील त्यांचे अनुभव, वेगळा प्रयत्न म्हणून लिहीलेल्या एका कादंबरीवर (कोसला)झालेली/होत असलेली चर्चा, नंतर मिळालेले पद आणि काही कचरावाचू वाचकांनी दिलेले "साहित्यीक" हे बिरूद मागे लागलेले असो की आणखी काही असो-
माझ्या लेखी नेमाडे हे साहित्यिक नाहीत; वावटळीसारखा धुरळा उडवणारे त्यांचे लिखाण वाचण्यात रस नाही. त्या प्रकारची एक कादंबरी चालली म्हणून नंतरच्या पुस्तकांतही वाटेल तशी असंबध्द बडबड करणारा तो एक जळगावसाईडचा एक अत्यंत विक्षिप्त माणूस वाटतो - नो मॅटर हू इज हू ऍण्ड हू सेज व्हॉट!
17 Dec 2010 - 8:40 am | ऋषिकेश
श्री. करंबेळकर यांचा लेख (कसाबसा) वाचूनही कादंबरी वाचायची इच्छा अजूनही कायम आहे.
(एक प्रश्न हे श्री.दिलिप करंबेळकर कोण?)